बटर चिकन रेसिपी मराठी Butter Chicken Recipe in Marathi

Butter Chicken Recipe in Marathi – Butter Chicken Masala Recipe in Marathi बटर चिकन रेसिपी मराठी चिकन पासून बनवलेल्या डिश कोणाला आवडत नाहीत, असे अनेक लोक आहेत जे चिकन डिशेस खाण्यासाठी खूप वेडे असतात आणि ते आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोणतीतरी चिकन पासून बनवलेली डिश खातात आणि चिकन रेसिपी मधील एक लोकप्रिय डिश म्हणजे बटर चिकन रेसिपी. फक्त या रेसीपीचे नाव जरी घेतले तरी नॉन व्हेजिटेरियन लोकांच्या तोंडाला पाणी सुटते आणि खाऊ वाटते अशी हि डिश स्वादिष्ट, खमंग आणि पौष्टिक देखील असते. बटर चिकन बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी जरी खूप मोठी असली.

आणि हि रेसीपी बनवण्यासाठी थोडा वेळ लागत असला तरी हि रेसिपी खाल्ल्यानंतर आपण वापरलेल्या साहित्याचे आणि घालवलेल्या वेळेचे समाधान वाटते. नॉन व्हेजिटेरियन लोकांच्या आवडत्या यादीतील बटर चिकन हि रेसिपी पहिल्या नंबरला असू शकते. बटर चिकन मसाला घरी बनवण्यासाठी खूप सोपी रेसिपी आहे.

परंतु हि डिश बनवण्यासाठी लांबलचक साहित्याची यादी असते आणि बहुतेक साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते ते आपण बाजारातून आणून ते सर्व साहित्य जमवून मग डिश बनवली तर ते आपल्याला खूप सोपे पडेल. चला तर मग स्वादिष्ट बटर चिकन रेसिपी कशी बनवायची याबद्दल आता आपण पाहूयात.

butter chicken recipe in marathi
butter chicken recipe in marathi

बटर चिकन रेसिपी मराठी – Butter Chicken Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
मॅरीनेटसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ६० ते ६५ मिनिटे
पाककलाभारतीय (दिल्ली)
बनवण्याची पध्दतसोपी
प्रकारनॉन व्हेज

बटर चिकन रेसीपी म्हणजे काय ?

बटर चिकन हि एक भारतीय डिश आहे जी तंदुरी चिकन टोमॅटो-आधारित सॉसमध्ये शिजवले जाते आणि त्यावर बटर टाकून सर्व्ह केले जाते. हि डिश बनवताना सर्वप्रथम चिकन मॅरीनेट केले जाते मग ते भाजून घेतले जाते. त्यानंतर काजू, बदाम, टोमॅटो आणि कांदा या ग्रेव्ही मध्ये शिजवले जाते आणि ते सर्विंग बाऊल मध्ये काढून त्यावर फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा. 

बटर चिकन कसे बनवतात – how to make butter chicken recipe in marathi

बटर चिकन हा एक उत्तर भारतीय पदार्थ आहे आणि हा पदार्थ सर्वप्रथम दिल्ली मध्ये बनवण्यात आला होता. बटर चिकन रेसिपी हि नॉन व्हेजिटेरियन लोकांच्यामध्ये खूप प्रसिध्द आहे आणि हा पदार्थ भारतामध्ये खूप लोक आवडीने खातात आणि घरी बनवण्याचा देखील प्रयत्न करतात. अश्याच बटर चिकन प्रेमींच्यासाठी आज आपण स्वादिष्ट आणि तोंडाला पाणी आणणारी बटर चिकन रेसिपी कशी बनवायची हे आता आपण पाहणार आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
मॅरीनेटसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ६० ते ६५ मिनिटे
पाककलाभारतीय ( दिल्ली )
बनवण्याची पध्दतसोपी
प्रकारनॉन व्हेज

बटर चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make butter chicken 

हि डिश बनवण्यासाठी लांबलचक साहित्याची यादी असते आणि बहुतेक साहित्य घरामध्ये उपलब्ध नसते ते आपण बाजारातून आणून ते सर्व साहित्य जमवून मग डिश बनवली तर ते आपल्याला खूप सोपे पडेल. चला तर मग बटर चिकन बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

चिकण मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य 

  • १ वाटी दही.
  • १ चमचा लाल तिखट / लाल मिरची पावडर .
  • २ चमचे आले लसूण पेस्ट.
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • १ चमचा तेल.
  • १/२ चमचा धने पावडर.
  • ४०० ग्रॅम चिकण
  • मीठ (चवीसाठी).

बटर चिकणसाठी लागणारे इतर साहित्य 

  • १ चमचा तेल.
  • ३ बटर क्यूब्स.
  • २ चमचे आले लसूण पेस्ट.
  • २ दालचिनी.
  • ४ ते ५ हिरव्या वेलची.
  • ५ लवंगा.
  • १ काळी वेलची.
  • २५ ग्रॅम काजू.
  • ४ टोमॅटो ( बारीक चिरलेले ).
  • १ वाटी कांदा ( चिरलेला ) .
  • मीठ (चवीसाठी).
  • ४ चमचे लाल तिखट.
  • ३ चमचे फ्रेश क्रीम.
  • कोथिंबीर (गार्निशसाठी)

बटर चिकन बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make butter chicken recipe 

  • सर्वप्रथम एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये चिकन, दही, मीठ, लाल मिरची पावडर, आले-लसूण पेस्ट, गरम मसाला पावडर, धने पावडर आणि थोडे तेल घालून चांगले मिक्स करा आणि हे मिश्रण १५ मिनिटे मॅरीनेट करा.
  • मग ते मॅरीनेट केलेले चिकण ओव्हनमध्ये २० ते २५ मिनिटासाठी भाजून घ्या.
  • आता एक कढई घ्या आणि त्या कढईत बटर गरम करून त्यामध्ये थोडे तेल घालून त्यामध्ये लवंगा, दालचिनी, हिरवी वेलची, काळी वेलची घालून हा सगळा गरम मसाला थोडावेळ भाजून घ्या.
  • ह्या मसाल्यांचा चांगला वास सुटल्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, काजू, मीठ चांगले मिसळा आणि १० मिनिटे शिजवा त्यानंतर सर्व मिश्रण ब्लेंडरमध्ये काढून बारीक प्युरी बनवा.
  • दुसर्‍या पॅनमध्ये थोडे बटर गरम करा आणि त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, बनवलेली प्युरी घाला आणि १० मिनिटे शिजू द्या त्यानंतर मीठ, थोडी साखर, भाजलेले चिकन घालून ४ ते ५ मिनिटे शिजवा ( टीप : यामध्ये जर पाणी घालण्याची आवश्यकता असेल तर त्यामध्ये थोडे पाणी घालून देखील शिजवू शकता )
  • चिकन चांगले शिजले म्हणजेच ते चांगले मऊ आणि रसाळ झाले कि गॅस बंद करा.
  • तुमची बटर चिकण रेसिपी तयार झाली, त्यावर फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

बटर चिकन कश्यासोबत खाल्ले जाते – serving suggestions 

बटर चिकन हे आपण रोटी, नान, चपाती, जीरा राईस किंवा साध्या पांढऱ्या भातासोबत देखील खूप छान लागते.

बटर चिकन ही भारतीय पाककृती आहे का ?

होय, बटर चिकन हि एक भारतीय डिश आहे, बटर चिकन ही मूळ भारतीय पाककृती आहे ज्याला मुर्घ मखनी या नावाने देखील ओळखले जाते. बटर चिकन ही उत्तर भारतीय रेसिपी आहे (ती विशेषतः दिल्लीची आहे). बटर चिकनचा शोध दर्यागंज (दिल्ली) येथे असलेल्या मोती महल रेस्टॉरंटचे मालक कुंडलाल गुजराल यांनी लावला होता.

बटर चिकन बनवताना वापरलेल्या टिप्स – tips to make butter chicken recipe  

  • चिकन दह्यामध्ये आणि इतर मसाल्यांच्यामध्ये १५ ते २० मिनिटे चांगले मॅरीनेट करा.
  • बटर चिकन या डिशला काजू, बदाम, टोमॅटो प्युरी, बटर या सर्व साहित्यांच्या मुळे चांगली चव येते.
  • बटर चिकन बनवण्यासाठी ताजे मसाले वापरा त्यामुळे बटर चिकन रेसिपीला खमंग चव येते.
  • बटर चिकन बनवताना आपण चिकनला थोडेसे मीठ आणि काळी मिरी पावडर लावून मॅरीनेट केले तरी चालेल मग दुसरे मसाल्यांचे मॅरीनेशन करा.
  • बटर चिकनची ग्रेव्ही घट्ट बनण्यासाठी आपण त्यामध्ये नारळाचे दुध देखील वापरले तरी चालेल.

आम्ही दिलेल्या butter chicken recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बटर चिकन रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chicken butter masala recipe या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि butter chicken masala recipe step by step माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये butter chicken gravy recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!