Jeera Rice Recipe in Marathi जीरा राईस रेसिपी मराठी जीरा राईस या भाताच्या प्रकाराला आपण एक पारंपारिक पदार्थ म्हणू शकतो कारण पूर्वी देखील भाताला जिऱ्याची फोडणी दिली जायची पण आता या भाताला थोडे मॉडर्न स्वरूप आले आहे. जीरा राईस हा पदार्थ कोणत्याही प्रसंगी जसे कि पार्ट्या, लग्न आणि वाढदिवस किंवा छोट्या समारंभासाठी अश्या कार्यक्रमामध्ये बनवली जाणारी रेसिपी आहे. जीरा राईस हि एक अशी रेसिपी आहे कि ज्यामध्ये सुंगधी तांदूळ, जिरे, तूप आणि तमाल पत्री वापरली जाते. जीरा राईस हा एक साधा पांढऱ्या रंगाचा जिरे आणि तमाल पत्री टाकून फोडणी दिलेला भात असतो जो आपण डाळ तडका, डाळ फ्राय, सांबर सोबत खाल्ला जावू शकतो.
आपण कोणत्याही हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये आपण रोटी खाऊन झाल्यानंतर आपण शक्यतो जीरा राईस ऑर्डर करतो आणि तो रेस्टॉरंट मधील जीरा राईस खाऊन आपल्याला देखील वाटते कि आपल्याला देखील असाच जीरा राईस बनवता यावा आणि अश्या वाटणाऱ्या लोकांच्यासाठी आज आपण या लेखामध्ये जीरा राईस कसा बनवायचा याबद्दल पाहणारा आहोत.

जिरा राईस रेसिपी मराठी – Jeera Rice Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
शिजण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
वाढणी | २ ते ३ व्यक्ती. |
जीरा राईस म्हणजे काय ?
जीरा राईस म्हणजे सुगंधी तांदळाला तूप, जिरे, तमाल पत्री याची फोडणी देवून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी आणि चवीनुसार मीठ घालून हा भात शिजवला जातो आणि तो डाळ तडका, डाळ फ्राय, सांबर सोबत खाल्ला जातो.
- नक्की वाचा: मसाले भात रेसिपी मराठी
जीरा राईस मध्ये वापरले जाणारे मुख्य घटक – key ingredients
- तांदूळ : आपण जीरा राईस या भातासाठी वापरला जाणारा तांदूळ हा चांगल्या दर्ज्याचा तसेच सुंगध युक्त असावा त्यामुळे आपला भात स्वादिष्ट आणि खमंग होईल.
- जिरे : जिरे हा घटक मसाल्यामध्ये मोडतो आणि हा घटक या पदार्थातील महत्वाचा घटक आहे.
- तूप : भाताला फोडणी देण्यासाठी जे तूप वापरले जाते ते तूप चांगल्या दर्ज्याचे असावे.
जीरा राईस रेसिपी – how to make jeera rice recipe in marathi
जीरा राईस हा भाताचा प्रकार खूप साध्या पद्धतीने बनवला जातो आणि हा भाताचा प्रकार कित्येक लोकांच्या आवडत्या प्रकारापैकी एक आहे. जीरा राईस हा पदार्थ बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि हा पदार्थ कूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये खूप उत्तम, स्वादिष्ट आणि खमंग बनतो.
जीरा राईस बनवण्यासाठी आपल्याला तांदूळ, जिरे आणि तूप हे महत्वाचे साहित्य आवश्यक असतात आणि हे साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होऊ शकते. चला तर मग जीरा राईस कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते. या रेसिपीमध्ये आपण कुकर मधील आणि भांड्यामधील जीरा राईस कसा बनवायचा याबद्दल पाहणार आहोत.
- नक्की वाचा: व्हेज बिर्याणी रेसिपी मराठी
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
शिजण्यासाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
वाढणी | २ ते ३ व्यक्ती. |
जीरा राईस बनवण्यासाठी लागणारे साहित्य (- ingredients needed to make jeera rice
जीरा राईस बनवण्यासाठी अगदी मोजकेच साहित्य लागते आणि ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे अवलंबून असते. आता आपण जीरा राईस बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी बासमती तांदूळ.
- २ वाटी पाणी.
- २ मोठे चमचे तूप.
- १/२ चमचा जिरे.
- २ तमाल पत्री पाने.
- मीठ ( चवीनुसार ).
जीरा राईस बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make jeera rice
पहिली पध्दत : कुकर मधील जीरा राईस
- सर्वप्रथम तांदूळ एक भांड्यामध्ये घेवून ते चांगले स्वच्छ धुवून घ्या आणि ते पाण्यामध्ये १५ ते २० मिनिटे भिजवून घ्या.
- मग त्यामधील पाणी गाळून घ्या आणि ते तांदूळ बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कुकर ठेवून तो गरम झाला कि त्यामध्ये तूप घाला आणि ते गरम झाले कि त्यामध्ये जिरे तमाल पत्री आणि जिरे घाला आणि ते चांगले हलवा आणि मग त्यामध्ये तांदूळ घालून ते चांगले मिक्स करा.
- एकी कडे गॅसवर पाणी उकळायला ठेवा.
- मग ते तांदूळ चांगले भाजले कि त्यामध्ये उकळलेले पाणी घाला आणि त्यामध्ये मीठ घालून ते चांगले मिक्स करून त्याला कुकरचे झाकण लावून त्याला ३ शिट्या द्या.
- तुमचा जीरा राईस तयार झाला.
दुसरी पध्दत : भांड्यामधील जीरा राईस
- सर्वप्रथम तांदूळ एक भांड्यामध्ये घेवून ते चांगले स्वच्छ धुवून घ्या आणि त्यातील पाणी काढून त्यामध्ये चांगले स्वच्छ पाणी आणि मीठ ( चवीनुसार ) घालून तो भात मध्यम आचेवर ९० टक्के शिजवून घ्या आणि त्यानंतर गॅस बंद करा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर एक कढई ठेवा आणि आणि ती गरम झाली कि त्यामध्ये तूप घाला.
- तूप गरम झाले कि त्यामध्ये जिरे आणि तमाल पत्री टाका आणि ते चांगले मिक्स करून घ्या आणि लगेचच भात घालून तो चांगला एकत्र करू घ्या आणि त्याला झाकण लावून तो ५ ते ६ मिनिटे वाफवून घ्या त्यामुळे तुमचा भात चांगला शिजला जाईल.
- तुमचा जीरा राईस तयार झाला आता त्याला एका प्लेटमध्ये काढून त्यावर थोडी कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
- नक्की वाचा: डाळ खिचडी रेसिपी मराठी
जीरा राईस कश्यासोबत खातात – serving suggestion
आपण जीरा राईस हा भात आमटी, सांबर, डाळ फ्राय किंवा डाळ तड्क्यासोबत खावू शकतो.
टिप्स ( Tips )
- सुगंधी जीरा राईस बनवण्यासाठी चांगल्या प्रतीचा बासमती तांदूळ आणि ताजे तूप वापरा त्यामुळे तुमच्या भाताला चंगला स्वाद येतो.
- उत्कृष्ट परिणामासाठी प्रीमियम दर्जाचा बासमती तांदूळ वापरा.
- तुम्ही या भाताच्या फोडणीसाठी साधे जिरे किंवा शहा जिरे वापरा.
जीरा राईस बनवण्यासाठी उत्तम बासमती तांदूळ – basamati rice
- झीबा प्रीमियम बासमती तांदूळ:
- कोहिनूर बासमती तांदूळ:
- इंडिया गेट.
- फॉर्च्यून बासमती तांदूळ.
- दावत बासमती तांदूळ.
आम्ही दिलेल्या jeera rice recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर जिरा राईस रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या jeera rice and dal tadka recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि jeera rice dal fry recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये jeera rice dal tadka recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट