सी ए म्हणजे काय? CA Information in Marathi

CA Information in Marathi सीए बद्दल माहिती सी. ए. म्हणलं की आपल्याला आठवत की इन्कम टॅक्स किंवा टॅक्स भरण्याशी संबंधित असणार करिअर. पण हेच करिअर हे सर्वात महत्वाचं, आदरातिथ्य, प्रोफेशनल अशा करिअर पैकीच एक आहे. आपल्याला जेंव्हा टॅक्स फाईल किंवा रिटर्न टॅक्स भरायचा असतो तेंव्हा आपण सी. ए. कडेच जातो; अहो एवढच काय आपल्याला आपला टॅक्स वाचवायचा जरी असेल तरीपण आपण एखाद्या सी. ए. चीच मदत घेतो. असं हे छान तसच इन्कम सुद्धा जास्त मिळवून देणार करिअर बद्दल आज थोडी माहिती घेऊ.

ca information in marathi
ca information in marathi

सीए बद्दल माहिती – CA Information in Marathi

वैशिष्ट्येतपशील
परीक्षेचे नावआयसीएआय परीक्षा, सीए सीपीटी, सीए आयपीसीसी, सीए अंतिम
परीक्षा आयोजितइन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया
परीक्षा पातळीराष्ट्रीय पातळीवरील परीक्षा
परीक्षा वारंवारतावर्षातून दोनदा
परीक्षा मोडऑनलाईन
परीक्षेचा कालावधीदोन तास
भाषाइंग्रजी
परीक्षेचा उद्देशप्रशिक्षण व चार्टर्ड अकाउंटंट्स प्रमाणित
परीक्षा हेल्पडेस्क क्र.1800 419 2929
परीक्षा वेबसाइटicaiexam.icai.org

सी ए स्वरूप

chartered accountant meaning in marathi चार्टर्ड अकाऊंटंट म्हणजेच सी. ए. मध्ये मिळणारा भरमसाठ पगार हे सध्या करिअर साठी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी जास्त उपयुक्त ठरतं. सी. ए. परिक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणे हे आजसुद्धा खूप मोठ्ठी गोष्ट आहे. सी. ए. ची परीक्षा हि इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) या स्वायत्त संस्थेकडून वर्षातून ही परीक्षा घेतली जाते. गेल्या दोन वर्षांमध्ये चार्टर्ड अकाऊंटट बनण्यासाठी देशात सीएच्या परीक्षेला बसणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रॉब्लेम्स सोडवणे, संकल्पनांचे प्रत्यक्षात उपयोग करून पाहणे यावर तयारी करताना भर दिला पाहिजे तरच सी. ए. उत्तीर्ण होणे सोपे जाते. सी. ए. परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याना इन्स्टिटय़ूटकडून अभ्याससाहित्य आणि प्रश्नसंच देण्यात येत. परीक्षेसाठी आवश्यक साहित्य म्हणून ते पुरेसे आहे ज्याद्वारे विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात.

सी ए फुल फॉर्म – ca full form in marathi

chartered accountant in marathi: चार्टर्ड अकाऊंटंट म्हणजेच सी. ए.

सी ए पात्रता – ca exam information in marathi

पूर्वी १९७० मध्ये वाणिज्य शाखेची पदवी असल्याशिवाय सी. ए. होता येत नव्हतं. पण आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. भारतामध्ये औद्योगिकीकरणची वाढ मोठ्या प्रमाणात झाल्याने सीए क्षेत्राला मागणी वाढली आणि म्हणून आता कोणतीही पदवी करत करत सीए करता येते.

  • मान्यताप्राप्त बोर्डतून १२ वीची सर्टिफिकेट हे रजिस्ट्रेशन साठी महत्वाचं असतं.
  • जर विद्यार्थी दुसऱ्या देशाचं रहिवासी असेल तर त्या देशाचे नागरिकत्व प्रमाणपत्र.
  • जर विद्यार्थी SC/ST/OBC ह्यापैकी काही एक जातीचा असेल तर त्या जातीचे प्रमाणपत्र.

सी ए परिक्षा शुल्क

  • सीपीटी
    भारतातील परीक्षा केंद्रांसाठी
    १०००
    काठमांडू (नेपाळ) मधील परीक्षा केंद्रांसाठी
    १७००
  • आयपीसीसी
  • नोंदणी शुल्क :
    दोन्ही गट १५०००
    सिंगल ग्रुप ११०००
    विद्यार्थी क्रियाकलाप फी ( फक्त सिंगल ग्रुप) २०००
    लेख सहाय्यक म्हणून नोंदणी फी (फक्त सिंगल ग्रुप)- १०००
  • एकूण शुल्क:
    दोन्ही गट १८०००
    सिंगल ग्रुप १३०००
  • परदेशी विद्यार्थ्यांसाठी
    गट I – ३६०००
    गट II – २५०००
  • फायनल सी. ए.
    भारतीय केंद्रे
    १८०० / – (सिंगल ग्रुप)
    ३३०० / – (दोन्ही ग्रुप)
    अबू धाबी, दुबई, मस्कट
    आणि डोहा ($)
    $३२५ (सिंगल ग्रुप)
    $५५० (दोन्ही ग्रुप)
    काठमांडू (INR)
    २२०० / – (सिंगल ग्रुप)
    ४००० / – (दोन्ही ग्रुप)

सी ए परीक्षेचे स्वरूप

सी. ए. होण्यासाठी तीन स्तरांतून जावे लागते.

सीपीटी (कॉमन एंट्रेंस टेस्ट) –

सीपीटी ची परीक्षा ही जून व डिसेंबर या महिन्यात घेतली जाते. जर वाणिज्य शाखेची ५५% मिळालेली पदवी असेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन ची पदवी असेल तर ही परीक्षा देण्याची गरज नाही. ही परीक्षा ही २ विभागात होते. ह्यासाठी दोन तासाचा वेळ देण्यात येतो. पहिला विभाग हा फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग आणि मर्केंटाइल लॉ ह्यावर आधारित १०० गुणांचा असतो; तर दुसरा विभाग हा जनरल इकोनॉमिक्स ५० व क्वांटिटेटिव एप्टीट्यूट ५० असे दोन्ही मिळून १०० गुणांचा पेपर असतो.

आयपीसीसी –

आयपीसीसी ही परीक्षा जे सीपीटी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात तेच देऊ शकतात किंवा ज्यांकदे पदवी आहे ते सीपीटी न देता ही परीक्षा देऊ शकतात. ह्यात एकूण ७ विषय असतात व ते २ ग्रुप मध्ये विभागलेले असतात. पहिल्या ग्रुप मध्ये ४ विषय व दुसऱ्या ग्रुप मध्ये ३ विषय समाविष्ट केलेले असतात. प्रत्येक विषयात उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे गुण धरले जातात परंतु एकूण १०० पैकी ४० गुण मिळवणे हे महत्वाचे असते. तसेच सगळ्या पेपर मध्ये व दोन्ही ग्रुप मध्ये उत्तीर्ण होन गरजेचे असते. पहिल्या ग्रुप साठी कमीतकमी २०० अंक व दुसऱ्या ग्रुप साठी कमीतकमी १५० अंक मिळवणे हे महत्वाचे असते.

ग्रुप १
पेपर १ – अकाउंटिंग – १००

पेपर २ – व्यापार कानून, नैतिकता आणि संचार
भाग १ कानून भाग – ६०
भाग २ व्यावसायिक नैतिकताभाग – २०
भाग ३ व्यवसाय संचार – २०

पेपर ३ – लागत लेखा औरवित्तीय प्रबंधन
भाग १ लागत लेखा – ५०
भाग २ – वित्तीय प्रबंधन ५०

पेपर ४– टॅक्सेशन
भाग १ आयकर भाग – ५०
भाग २ सेवा कर और वैट – २५+२५

ग्रुप २
पेपर ५ – एडवांस्ड अकाउंटिंग – १००

पेपर ६ – लेखा परीक्षा और आश्वासन – १००

पेपर ७ – सूचना प्रौद्योगिकी और सामरिक प्रबंधन
भाग १ माहिती तंत्रज्ञान – ५०
भाग २ सामरिक व्यवस्थापन – ५०

फायनल सी. ए.
सीए फायनल उत्तीर्ण करण्यासाठी तुम्हाला सीएच्या सर्व ८ पेपर्समध्ये किमान ४०% गुण आणि सर्व पेपरमध्ये ५०% गुण मिळवणे आवश्यक आहे.

सी ए अभ्यासक्रम 

  • सीपीटी :

१)फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग: यादी, लेखा प्रक्रिया, लेखा धोरण, सैध्दांतिक संरचना, बँक सलोखा विधान, घसारा लेखा, विशेष व्यवहारासाठी लेखा, एकमेव मालकांसाठी अंतिम खाती तयार करणे, कंपनी खात्यांचा परिचय, भागीदारी खाती.

२)मर्केंटाइल लॉ : विक्रीचा माल कायदा, 1930, भारतीय करार कायदा, 1872, इंडिया पार्टनरशिप कायदा, 1932.

३)जनरल इकोनॉमिक्स : भारतीय आर्थिक विकास, मायक्रो इकॉनॉमिक्स.

४)क्वांटिटेटिव एप्टीट्यूट : असमानता, Uन्युइटी-अनुप्रयोगांसह साधे आणि चक्रवाढ व्याज, समीकरणे, परमिटेशन आणि कॉम्बिनेशनच्या मूलभूत संकल्पना, संच, कार्ये आणि संबंध, गुणोत्तर आणि प्रमाण, निर्देशांक, लोगारिदम, क्रम आणि मालिका – अंकगणित आणि भूमितीय प्रगती, मर्यादा आणि सातत्य-अंतर्ज्ञानी दृष्टीकोन, डिफरेंशियल आणि इंटिग्रल कॅल्क्युलसच्या मूलभूत संकल्पना

(त्रिकोणमितीय कार्ये वगळता), मध्यवर्ती प्रवृत्ती व फैलाव यांचे उपाय, डेटाचे सांख्यिकीय वर्णन, सहसंबंध आणि प्रतिरोध, सैद्धांतिक वितरण, गणिताच्या अपेक्षेने संभाव्यता आणि अपेक्षित मूल्य, नमूना सिद्धांत, निर्देशांक क्रमांक.

  • आयपीसीसी :

१) लेखांकन: लेखा मानके, कंपनी खाती, नफ्यासाठी नसलेल्या संस्थांची आर्थिक स्टेटमेंट्स, विशेष व्यवहारासाठी लेखा इ.

२) व्यवसाय तोटा, नीतिशास्त्र आणि दळणवळण: पेमेंट बोनस कायदा १९६५, पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी Actक्ट, १९७२; पर्यावरण आणि नीतिशास्त्र; कंपनी अ‍ॅक्ट, २०१ इ.

३)खर्च हिशेब आणि आर्थिक व्यवस्थापनः किंमत दहा देखभाल, खर्च पुस्तिका ठेवणे, आर्थिक निर्णय, वित्त प्रकार इ.

४)कर: आयकर; जीएसटी कायदा, इनपुट टॅक्स क्रेडिट, व्यवसाय आणि व्यावसायिक कडून नफा आणि मिळकत, भांडवली नफा, अ‍ॅडव्हान्स टॅक्स आणि टॅक्स कपात इ.

५)अ‍ॅडव्हान्स अकाउंटिंग: भागीदारी खात्यात अ‍ॅडव्हान्स इश्यू आणि मर्यादित देय भागीदारी, कंपनी अकाऊंट्स, स्पेशल ट्रान्झॅक्शनसाठी अकाउंटिंग इ.

६)ऑडिटिंग आणि अ‍ॅश्युरन्सः ऑडिटिंग संकल्पना, ऑडिटिंग व गाइडन्स नोट्सचे मानक, ऑडिटिंग सॅम्पलिंग, कंपनी ऑडिट I आणि II, वॉचिंग कंट्रोल, ऑडिटची तयारी, मालमत्ता व उत्तरदायित्वाचे लेखापरीक्षण

७)माहिती तंत्रज्ञान आणि रणनीतिक व्यवस्थापन: व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन आणि आयटी, व्यवसाय माहिती प्रणाली, दूरसंचार आणि नेटवर्किंग, माहिती प्रणाली आणि आयटी मूलतत्त्वे इ.

  • फायनल सी. ए. :

आयसीएआयने सीए अंतिम अभ्यासक्रमासाठी जुन्या योजनेत बदल केला आहे आणि काही नवीन निवडक पेपर जोडले आहेत ज्यामधून विद्यार्थी कोणताही विषय निवडू शकतात.

पेपर – १: आर्थिक अहवाल

पेपर -२: स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेन्ट (स्ट्रॅटेजिक फायनान्शियल मॅनेजमेंट)

पेपर -३: प्रगत ऑडिटिंग आणि व्यावसायिक नीतिशास्त्र (प्रगत ऑडिटिंग आणि व्यावसायिक आचारसंहिता)

पेपर -४ ए: कॉर्पोरेट कायदे

पेपर -४ बी: इतर आर्थिक कायदे

पेपर – ५: प्रगत व्यवस्थापन लेखांकन

पेपर -६: पर्यायी पेपर्स

पेपर -७ ए: प्रगत थेट कर कायदे

पेपर -७ बी: आंतरराष्ट्रीय कर

पेपर -८: प्रगत अप्रत्यक्ष कायदे

नवीन योजनेनुसार पेपर ६ आयएससीएची जागा पर्यायी कागदावर घेण्यात आली आहे. पर्यायी कागद पर्यायी आहे. त्यापैकी विद्यार्थी कोणताही एक पेपर निवडू शकतात.

  • जोखीम व्यवस्थापन
  • आंतरराष्ट्रीय कर
  • आर्थिक कायदा
  • भांडवल बाजार
  • जीएफआर
  • बहु-शिस्तीचा प्रकरण अभ्यास

आयसीएआय पोर्टलला भेट देऊन आपण नवीन सीए अंतिम अभ्यासक्रम सुद्धा डाउनलोड करू शकता व अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता.

पुस्तके

१)CA Foundation Scanner Cum Compiler – मनमित कौर . Volume 1:- एस. के. अग्रवाल

२)Paper 1- Principles and Practice of Accounting

Paper 2- Business Laws and Business Correspondence and Reporting

३)CA Foundation Scanner Cum Compiler Volume 2:

Paper 3 – Business Mathematics, Logical Reasoning and Statistics: Padhuka’s

Paper 4 – Business Economics, Business and Commercial Knowledge – डॉ. एस. के. अग्रवाल

४)General Economics – डॉ. एस. के. अग्रवाल.

५)Fundamentals of Accounting for CA – P.C Tulsian and Bharat Tulsian

६)CPT Grewal’s Accountancy – एम. पी. गुप्ता आणि बी. एम. अग्रवाल.

७)S Chand Mercantile Laws for CA CPT – पी पी एस गोगणा.

८)Mercantile Law – एम. सी. कुच्चाल आणि विवेक कुच्चाल.

९)Quantitative Aptitude Mathematics With Short Tricks – सी ए राजेश जोगणी

१०)Quantitative Aptitude for CPT: mathematics and Statistics – Tulsian P. C. आणि झुनझुनवाला भरत.

११)General Economics – पी एम सलवान आणि प्रांजल बी देशपांडे.

१२)Quantitative Aptitude – पी एन अरोरा, डॉ टी पद्मा & के सी पी

१३)Elements of Mercantile Law – एन डी कपूर

१४)CA Foundation Business Laws – डॉ वी के जैन, सी ए शशांक शर्मा

१५)Taxmann’s Business and Commercial Knowledge – डॉ सी बी गुप्ता.

१६)Padhuka’s Easy Guide to Business Maths and Logical Reasoning & Statistics – सी ए जी शेखर, सी ए बी सर्वणा प्रसाद.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेलच, सी ए म्हणजे काय ? सीए बद्दल माहिती ca information in marathi language कशी असते? त्याचे स्वरूप व पात्रता काय आहे? त्याचा अभ्यासक्रम काय आहे ? पेपर कोणते व किती मार्क्स चे असतात महत्वाची पुस्तके कोणती आहेत या सर्वाचे थोडक्यात मार्गदर्शन केले गेले आहे.

information about ca in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच chartered accountant in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही सी ए म्हणजे काय ? सीए बद्दल माहिती विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या chartered accountant meaning in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही ca long form in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!