एरंडेल तेल उपयोग व फायदे Castor Oil Benefits in Marathi

Castor Oil Benefits in Marathi – Castor Plant in Marathi – एरंड झाडाची माहिती एरंड लागवड माहिती एरंडेल तेलाची माहिती जवळजवळ सगळ्यांनाच परिचित असणारी एरंड हि वनस्पती भारतात उगवणारी असून आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. एरंड या वनस्पतीची पाने, बिया, मूळ या सगळ्यांमध्येच औषधी गुणधर्म असल्यामुळे याला आयुर्वेदामध्ये महत्व आहे. हि वनस्पती प्रामुख्याने भारत, चीन, ब्राझील, थायलंड, फिलिपाईन्स, दक्षिण आफ्रिका आदी देशात आढळते.जगातील एकूण उत्पादनापैकी सर्वाधिक उत्पादन हे भारतात होते. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि राजस्थान या राज्यात एरंडाची लागवड केली जाते.

castor oil benefits in marathi
castor oil benefits in marathi

एरंडेल तेल उपयोग मराठी – Castor Oil Benefits in Marathi

नावएरंड – Castor in Marathi
वैज्ञानिक नावRicinus Communis
उंची२ ते ४ मीटर

Castor Oil in Marathi

What is Castor Oil called in Marathi ?

Castor Oil Meaning in Marathi याला मराठीमध्ये एरंडेल तेल असे म्हणतात.

एरंड झाडाचे वर्णन

एरंड हि वर्षायु किंवा बहुवर्षीय वनस्पती युफोर्बिएसी कुळातील आहे. त्याचे वैज्ञानिक नाव रिसिनस कम्युनिस असे आहे. एरंडाचे झाड साधारण २ ते ४ मीटर पर्यंत उंच वाढते. याची पाने हिरवट तांबड्या रंगाची, विशिष्ट आकाराची म्हणजेच हाताच्या बोटांप्रमाणे लांब, त्रिकोणी आणि दातेरी कडा असलेली असतात. एरंडाची फळे दोन भागांनी बनलेले आणि आकाराने गोलसर आणि त्यावर मऊ काटे असतात. याच्या बिया काळ्या धुरकट रंगाच्या असून त्यावर पांढऱ्या रेषा व ठिपके असतात. एरंडाच्या बियांना एरंडी असे म्हणतात.

मोगली एरंड

युफोर्बिएसी कुलातील मोगली एरंड हि पानझडी वनस्पती औषधी असून तिचे शास्त्रीय नाव जट्रोफा करकस आहे. मोगली एरंडाचे लहान वृक्ष किवा मोठे झुडूप असून ते ३-७ मी उंच वाढते. या वनस्पतीच्या बियांमध्ये २७-४०% तेल असते. या तेलावर प्रक्रिया करून उच्च दर्जाचे जैव इंधन मिळते. ते डीझेल मध्ये मिसळून जड वाहने चालवण्यासाठी उपयुक्त असते.

याच्या पाना खोडांना चीक असल्यामुळे जनावरे याला तोंड लावत नाहीत. त्यामुळे शेताभोवती कुंपण म्हणून तिची लागवड करतात. खरुज, इसब आणि नायटा यांवर वनस्पतीतील चीक गुणकारी असतो. हिरड्या सुजल्यास पानांच्या देठांनी किंवा कोवळ्या फांद्यांनी घासतात. याच्या बिया कृमिनाशक व रेचक असतात.

एरंडाचे दोन प्रकार आहेत

  1. पांढरा एरंड – white eranda

याचे दोन उपप्रकार आहेत, लहान आणि मोठा. लहान एरंडाची मुळे व बियांचे तेल व मोठ्या एरंडीची पाने प्राचीन काळापासून विविध रोगांत औषध म्हणून वापरण्याचा प्रघात आहे.

  1. तांबडा एरंड – red eranda

तांबड्या एरंडापासून तेल मिळवले जाते. हे तेल अधिक तीव्र असते. विशेष औषधात या तेलाचा वापर केला जातो.

एरंडाचे आयुर्वेदामध्ये खूप उपयोग सांगितले जातात त्यामुळे त्याला बाजारामध्ये चांगली मागणी आहे. यापासून वंगण निर्मिती केली जाते आणि त्यासाठी त्याला क्विंटलमागे ३००० ते ३५०० रुपय इतका भाव मिळतो. एरंडाची लागवड करण्यासाठी नांगरट खोलवर करावी लागते. कारण याच्या मुळ्या खोलवर जात असतात. नांगरट झाल्यानंतर कुळवणी केली जाते.

यासाठी लागणारी जमीन हि हलकी आणि मऊ पद्धतीची असल्यास हे पिक चांगल्या पद्धतीने येते. यासाठी लागणारे हवामान कोरडे आणि उष्ण असावे लागते. याच बरोबर पावसाच्या भागात देखील हे पिक येऊ शकते. या पिकाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात करता येते. याची लागवड करण्यासाठी प्रती एकर ३ ते ५ किलो बियाणे लागतात. या पिकासाठी पाणी देण्याची गरज भासत नाही कारण मुळातच या पिकाला पाणी कमी लागते.

साधारण ५-६ महिन्यात हे पिक काढणीसाठी तयार होते. याचे उत्पन्न जीरायातीमध्ये १०-२० क्विंटल आणि बागायतीमध्ये २०-३० क्विंटल असे येते.

एरंडेल तेल किंमत

एरंडेल तेल हे एरंडाच्या बियांपासून तयार केले जाते. याला castor oil असे म्हणतात. एरंडेल तेल हे किंचित दाट आणि पिवळ्या रंगाचे असते. त्याला चिकटपणा असतो. हे आपल्या नैसर्गिकदृष्ट्या चेहऱ्याची चमक वाढवणे, केस जाड, मजबूत आणि लांब करते. बाजारामध्ये हे तेल २०० ते २५० रुपयाला १०० मिली असे उपलब्ध आहे.

एरंडेल तेलाचे फायदे – उपयोग – Castor Oil Uses in Marathi

  • एरंडेल तेल हे अनेक रोगांवर फायदेशीर असल्याने आयुर्वेदामध्ये त्याला अमृताची उपमा दिली आहे.
  • अनेक रोगांवर एरंडेल तेल गुणकारी ठरते. डोळ्यांची समस्या, मुतखडा, ताप, मुळव्याध, खोकला, पोटदुखी इत्यादी समस्यांवर विशिष्ट मात्रेत एरंड तेलाचा वापर केला जातो.
  • या तेलामध्ये असलेले ‘रीकीनोलिक असिड’ शरीराच्या कोणत्याही भागावर आलेली सूज कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. एरंडेल तेल हलके गरम करून त्याचा मालिश केल्यास सूज कमी होण्यास मदत होते.
  • एरंडेल तेल उपयोग केसांसाठी

एरंडेल तेलात दाह कमी करण्याची व अॅन्टी बॅक्टेरीयल क्षमता असल्यामुळे याचा वापर सौंदर्यप्रसाधनासाठी केला जातो. केसांसाठी एरंडेल तेल आरोग्यदायी आहे. केसगळती, केसात कोंडा होणे, केसांना फाटे येणे, अशा समस्या कमी करण्यास या तेलाची मदत होते. रक्तदोषामध्ये हे तेल गुणकारी ठरते. यामध्ये केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असणारे व्हिटामिन ई, मिनरल्स व प्रोटीन्स हे पोषक घटक असतात. केसांची वाढ होण्यासाठी एरंडेल तेलात २ मोठे चमचे आल्याचा रस घालून मिक्स करून केसांना लावावे.

  • एरंडेल तेल उपयोग पोटासाठी

 एरंडेल तेलाचा वापर करून कप, वात आणि पित्त नियंत्रणात आणता येते. रात्री झोपण्याआधी एरंडेल तेल प्यायल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका होते.

  • एरंडेल तेलाचा नियमित वापर केल्यास आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. याच्या वापरामुळे शरीरातील टी-११ पेशींची संख्या वाढते, जी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते.
  • सांधेदुखीवर एरंडेल तेलात लसणाच्या पाकळ्या टाकून गरम करून लावल्यास दुखणे कमी होते. या तेलाच्या मालीशने पाठदुखीच्या समस्येपासून मुक्तता मिळते.
  • वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी एरंडेल तेलाचा वापर केला जातो.
  • एरंडेल तेलामध्ये फॅटी एसिडचे गुणधर्म आढळतात, जे चेहरा स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त आहेत. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी या तेलाचा उपयोग होतो.
  • एरंडेल तेलाने आतड्यातील श्र्वेष्मल त्वचेस मृदुपणा येतो व त्यामुळे मळाच्या गाठी सैल होऊन खाली निसटतात.
  • याचा वापर अनेक औषधे बनवण्यासाठी केला जातो.
  • या तेलाचा गोठणबिंदू कमी असल्यामुळे हे तेल विमाना तील यंत्रात वंगण म्हणून वापरले जाते. तसेच साबण, मेणबत्त्या व सुवासिक तेले यासाठी हे तेल वापरतात. कापूस रंगविणे, छपाई, नायलॉन धागे बनविणे व काताड्यांचे उद्योग यांकरिता एरंडेल तेल उपयुक्त आहे.

एरंड पानाचे फायदे

  • कोणत्याही प्रकारच्या सुजेवर एरंडाच्या पानांनी शेक दिल्यास सूज उतरण्यास मदत होते. गुडघ्यांवर सूज आल्यास एरंडाची पाने वाटून तो लेप लावल्यास सूज कमी होते.
  • कावीळ या आजारावर एरंड अतिशय फायदेशीर ठरते. एरंडाच्या पानांचा रस ५ gm, त्यामध्ये १० gm साखर घालून पोटात घेतल्यास कावीळ बरी होण्यास मदत होते.
  • प्लीहा वाढल्यास त्या ठिकाणी एरंडाच्या पानांचे पोटीस बांधावे, प्लीहा कमी होते.
  • स्त्रियांच्या समस्यांवर एरंडाच्या पानांचा खूप उपयोग होतो.
  • याच्या पानांचा काडा पिल्याने थकवा दूर होण्यास मदत होते.
  • एरंडाची सुकलेली पाने मधुमेहावर उपयोगी ठरतात.

एरंड झाडाचे fact

  • एरंड हि भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.
  • भारतभर एरंडेल तेलावर परतलेले हिरडा चूर्ण म्हणजे गंधर्व हरीतकी घेण्याची सार्वत्रिक प्रथा आहे.
  • एरंड वनस्पतीची पाने, मूळ, बिया, एरंडापासून मिळणारे तेल या सर्वामध्येच औषधी गुणधर्म आहेत.
  • याच्या तेलामध्ये ‘रीकीनोलिक असिड असते.
  • याचे वैज्ञानिक नाव ‘रिसिनस कम्युनिस’ असे आहे.

एरंडेल तेलाचे नुकसान

  • एरंडेल तेल फायदेशीर आहे परंतु काही बाबतीमध्ये हे हानिकारक देखील आहे.
  • एरंडेल तेल गर्भावस्थेमध्ये स्त्रियांनी वापरल्यास त्याचा तीव्र परिणाम होतो आणि ते हानिकारक ठरू शकते.
  • एरंडेल तेलाचे अति प्रमाणात सेवन केल्यान उलट्या होणे, जुलाब होणे, अतिसार, निर्जलीकरण, आमाशय व आतड्यांना सूज येण्याचे दुष्परिणाम दिसून येतात.
  • एरंडेल तेलामध्ये रिकीन हे विष असते. जर हे जास्त प्रमाणात प्याले तर पोटात पेटणामुळे मरण होऊ शकते. त्यामुळे एरंडेल तेल औषध म्हणून घेण्याआधी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.

एरंड लागवड माहिती

एरंडाची लागवड करण्यासाठी नांगरट खोलवर करावी लागते. कारण याच्या मुळ्या खोलवर जात असतात. नांगरट झाल्यानंतर कुळवणी केली जाते. यासाठी लागणारी जमीन हि हलकी आणि मऊ पद्धतीची असल्यास हे पिक चांगल्या पद्धतीने येते. यासाठी लागणारे हवामान कोरडे आणि उष्ण असावे लागते.याच बरोबर पावसाच्या भागात देखील हे पिक येऊ शकते.

या पिकाची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात करता येते. याची लागवड करण्यासाठी प्रती एकर ३ ते ५ किलो बियाणे लागतात. या पिकासाठी पाणी देण्याची गरज भासत नाही कारण मुळातच या पिकाला पाणी कमी लागते.

साधारण ५-६ महिन्यात हे पिक काढणीसाठी तयार होते. याचे उत्पन्न जीरायातीमध्ये १०-२० क्विंटल आणि बागायतीमध्ये २०-३० क्विंटल असे येते.

एरंडेल तेल कसे घ्यावे

आम्ही दिलेल्या castor oil benefits in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “एरंडेल तेल उपयोग व फायदे” अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Castor Oil Uses in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये caster oil meaning in marathi Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर information about castor plant in marathi language असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!