चक्रासन म्हणजे काय ? कसे करावे ? Chakrasana Information in Marathi

Chakrasana Information in Marathi चक्रासन मराठी माहिती चक्रासन म्हणजे काय ? चक्रासन हा अनेक योगांमधील एक महत्वाचा आसनप्रकार आहे. खरंतर, चक्रासन या शब्दाचा उदय ‘चक्र’ या संस्कृत शब्दापासून झालेला आहे. शिवाय, संस्कृतमधील चक्र या शब्दाचा मराठीमध्ये चाक असा अर्थ होतो. मित्रहो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या आसनाला चक्रासन असे नाव का ठेवण्यात आले असेल? तर मित्रांनो, या आसनाच्या अंतिम स्थितीमध्ये आपले पूर्ण शरीर गोलाकार होते, म्हणूनच या आसनाचे नाव ‘चक्रासन’ असे पडलेले आहे. त्याचबरोबर, चौथ्या शतकातील अहिर्बुध्न्यसंहिता, सतराव्या शतकातील नारायणतीर्थ यांनी लिहिलेली योगसिद्धान्तचन्द्रिका आणि इसवी सनाच्या सतराव्या ते अठराव्या शतकामध्ये श्रीनिवासयोगी यांनी लिहिलेली हठरत्नावली या सर्व ग्रंथांमध्ये चक्रासन या आसनाची माहिती आढळते.

या ग्रंथांमध्ये विशेष असणाऱ्या अहिर्बुध्न्यसंहितेनुसार चक्रासन या आसनाचे वर्णन पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे. आपले संपूर्ण शरीर सरळ रेषेत स्थित करून, सव्य म्हणजे आपल्या डाव्या मांडीची खालची बाजू उजव्या पायाच्या घोट्यावर आणि उजव्या मांडीची खालची बाजू डाव्या पायाच्या घोट्यावर ठेवणे या स्थितीला एकंदरीत चक्रासन आसन असे म्हटले जाते.

chakrasana information in marathi
chakrasana information in marathi

चक्रासन मराठी माहिती – Chakrasana Information in Marathi

महान योगी ठरलेल्या जनार्दनस्वामींनी आणि इतर अन्य योगविशारदांनी चक्रासन आसनाच्या कृतीमध्ये अनेक अत्यावश्यक असे बदल केले आहेत. यांतील जनार्दनस्वामी यांनी चक्रासनाची कृती सामान्य व्यक्तींना सुद्धा सहजपणे समजेल अशा शब्दांत सांगितली आहे, ती पुढीलप्रमाणे; तर मित्रांनो, त्यांच्या कृतीनुसार पहिल्यांदा आपण जमिनीवर उताणे झोपावे.

त्यानंतर आपल्या पायाचे दोन्ही गुडघे वरच्या बाजूला करून, दोन्ही पाय जमिनीच्या पृष्ठभागाजवळ आणावेत व ही कृती करत असतानाच आपल्या दोन्ही   हातांचे तळवे कानांच्या जवळ आणून जमिनीवर सावकाशपणे पालथे ठेवावेत.

यानंतर, आपल्या शरीरामध्ये लवचिकता आणून अलगदपणे कंबर वरच्या दिशेने उचलावी आणि आपल्या डोळ्यांची नजर हातांकडे केंद्रित करावी व आसनाच्या शेवटी अगदी हळूवारपणे आपले दोन्ही हात आणि पाय जवळ आणावेत. अशा प्रकारे, ही संपूर्ण कृती म्हणजे चक्रासन या आसनाची पूर्णस्थिती होय. अखेर आसन पूर्ण झाल्यावर आपले  शरीर सावकाशपणे जमिनीवर टेकवावे.

याखेरीज, योगसिद्धान्तचन्द्रिका या ग्रंथामध्ये देखील चक्रासन या आसनाची कृती अत्यंत साध्या शब्दांमध्ये समजावून सांगितली आहे, ती पुढीलप्रमाणे; तर मित्रहो, या ग्रंथामध्ये वर्णन केलेल्या कृतीप्रमाने सर्वप्रथम आपण  शवासनाच्या स्थितीत उभे राहून आपले दोन्ही पाय मस्तकाच्या मागच्या बाजूस म्हणजेच आपला डावा पाय उजव्या बाजूच्या दिशेला आणि उजवा पाय डाव्या बाजूच्या दिशेला, अशा पद्धतीने मस्तकाच्या मागील बाजूस न्यावेत.

चक्रासन या आसनामुळे गुल्म, प्लीहा अथवा पाणथरी व वात यासंबंधीचे इतर रोग देखील काही ठराविक कालावधीनंतर पुर्णपणे नाहीसे होतात असे योगसूत्र २.४६ मधील श्लोक क्रमांक १५ यामध्ये सांगितले आहे.

शिवाय, या आसनामध्ये आपल्या पाठीची रचना एखाद्या कमानीसारखी होते तर, शरीराची रचना एखाद्या चक्राप्रमाणे गोलाकारसारखी होते. परंतू, एक गोष्ट आपण सर्वांनी आवर्जून लक्षात ठेवली पाहिजेत की या आसनाची कृती कष्टसाध्य आहे.

चक्रासनाचे फायदे – Chakrasana Benefits in Marathi

चक्रासन या आसनामुळे आपल्या शरीराच्या अनेक अवयवांचे विविध विकार दूर होतात जसे की;  मेरुदंड, कंबर, हात, पाय, छाती, गळा, पोट आणि मान या अवयवांचे अनेक विकार या आसनाच्या मदतीने बरे करता येतात. याशिवाय मित्रहो, ज्या व्यक्तींची पचनशक्ती कमी असते किंवा ज्यांना पचन क्रियेच्या संदर्भात अनेक समस्या उद्भवतात जसे की खाल्लेले व्यवस्थितरीत्या न पचन होणे, त्यामुळे पोटदुखी होणे, शौचास साफ न होणे, पोट जड वाटणे इत्यादी.

तर अशा व्यक्तींची या आसनामुळे पचनशक्ती सुधारते व त्यांना अशा अनेक समस्यांपासून सुटका मिळते. त्याचबरोबर, आपल्या शरीरातील स्नायू आणि ग्रंथी चक्रासनामुळे मजबूत, बळकट आणि कार्यक्षम होतात.

याशिवाय, हे आसन आपल्या डोळ्यांसाठी अधिक हितकारक आहे. हे आसन दररोज न चुकता केल्याने आपल्या डोळ्यांना तर त्याचा विशेष असा फायदा होतोच, पण त्याचबरोबर डोळ्यांच्या इतर समस्यांपासून आपली सुटकाही होते. जसे की, डोळे दुखणे, डोळ्यांत जळजळ होणे, डोळे मिटल्यावर पाणी येणे इत्यादी.

उपरोक्त कृतीनुसार केलेल्या चक्रासनामध्ये आपल्या शरीराचा मेरुदंड डाव्या बाजूला तसेच, उजव्या बाजूला झुकविला जातो. या कृतीमुळे आपल्या पाठीचा कणा बळकट, मजबूत आणि व्याधिमुक्त  होतो. कारण, आपल्या मणक्यांमधील कुर्चे म्हणजे एका सरळ रेषेत एकमेकांच्या आधारे उभ्या असणाऱ्या मणक्यातील चकत्या इकडेतिकडे अजिबात सरकू शकत नाहीत.

शिवाय, या आसनाचा आपल्या कंबरेला देखील विशेष असा लाभ होतो आणि आपल्याला जर कंबरेचे दुखणे असेल तर ते लवकर बरे सुद्धा होते. तसेच, मेरुवक्रता हा जर आपल्याला बरेच वर्षांपासून दोष असेल तर या आसनाने हा दोष बऱ्याच अंशी दूर होऊ शकतो. चक्रासन या आसनाच्या अभ्यासातून असे समोर आले आहे, की या आसनाचा जास्तीत जास्त फायदा आपल्या पोटासाठी होतो.

उदाहरणार्थ, जर आपल्या पोटाच्या डाव्या बाजूस तसेच, उजव्या बाजूस चरबीच्या घड्या किंवा वळ्या असतील तर या आसनाच्या मदतीने सगळ्या वळ्या नाहीशा होतात. शिवाय, या आसनामुळे आपल्या फुप्फुसांची क्षमता वाढते. याखेरीज, आपले मानसिक संतुलन राखले जाते. आपली उंची वाढण्यासाठी देखील चक्रासन हे  आसन सर्वोत्तम मानले जाते.

स्वामी कुवलयानंद यांची चक्रासनाची कृती

स्वामी कुवलयानंद हेदेखील एक प्रचलित योगी आहेत. त्यांनी विकसित केलेली चक्रासन या आसनाची कृती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे; त्यांनी सांगितलेल्या कृतीनुसार सुरुवातीला एका ठिकाणी आपण स्थिर उभे रहावे म्हणजे आपण आपल्या दोन्ही पायांमध्ये किंचित अथवा थोडेसे अंतर ठेवून सरळ ताठपणे उभे रहावे.

नंतर, आपला उजवा हात हळुवारपणे उजव्या बाजूने सरळ वरच्या दिशेला  न्यावा, या कृतीमध्ये आपल्या हाताचा पंजा वरच्या दिशेने नेताना तो सरळ आकाशाकडे करावा. आता आपला दंड उजव्या कानाला लागला की उजवा हात थोडासा वरच्या बाजूने ताणून आपले संपूर्ण शरीर डाव्या बाजूला झुकवावे. अशी कृती करताना आपल्या पोटाच्या उजव्या बाजूला थोडासा ताण पडेल.

आता आपण सरळ दिशेने समोर पहावे आणि असे करताना अजिबात मधेमधे श्वास रोखू नये तसेच, मागे किंवा पुढे झुकू नये. आता साधारणतः दहा ते पंधरा सेंकद याच  स्थितीत थांबून, आधी आपला मेरुदंड सरळ करावा आणि त्यानंतरच हात खालच्या बाजूस आणावा. अशी समान कृती आपण आपल्या डाव्या हाताने देखील करावी.

अशा प्रकारे, हे आसन आपल्याला एकाच वेळी दोन ते तीन वेळा करता येते. याशिवाय, चक्रासन या आसनाला अर्धचंद्रासन असे सुद्धा म्हटले जाते. मित्रहो, हठयोगाच्या कोणत्याही आसनामध्ये आपला मेरुदंड डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला झुकेल अथवा वाकेल अशी कृती नाही. शरीरशास्त्रानुसार असे मानले जाते की आपल्या मणक्यांच्या स्वास्थ्यासाठी अशा प्रकारचा ताण मिळणे गरजेचे आहे.

एकंदरीत, सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की चक्रासन हे आसन सर्व गोष्टींसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तंदुरुस्त आणि निरोगी जीवन जगण्यासाठी चक्रासन हे आसन एक उत्तम आसन आहे.

चक्रासन कधी करावे व कधी करू नये

सगळ्यात महत्वाचे म्हणजे जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शारिरीक किंवा मानसिक गंभीर समस्या असेल तर आपण चक्रासन आपल्या जवळच्या  डॉक्टरांचा सल्ला घेऊनच करावे. याशिवाय ज्या व्यक्तींना हृदयरोग किंवा उच्च रक्तदाबासारख्या समस्या आहेत त्या व्यक्तींनी हे आसन करू नये.

तसेच, जर एखाद्या व्यक्तीला हर्निया झालेला असेल तर त्यांनीही हे आसन वर्ज्य करावे. खासकरून, सायटिकाच्या समस्येमध्ये देखील चक्रासन करणे टाळावे. याखेरीज, ज्या महिला गर्भवती आहेत, त्यांनी अशा प्रकारची कठीण आसने करू नयेत. मित्रहो, चक्रासन हे आसन करण्याची योग्य वेळ म्हणजे सकाळ होय.

पहाटे किंवा सकाळी लवकर उठून कोमट पाणी पिऊन मनाने आणि शरीराने ताजेतवाने झाल्यावर चक्रासन करणे हे अधिक फायदेशीर आहे. परंतु मित्रहो, आपण लक्षात ठेवले पाहिजेत की तुम्ही जर पहिल्यांदा चक्रासन करत असाल तर आपण थेट चक्रासन करू नये.

कारण, चक्रासन करण्यापूर्वी तुम्ही तुमचे शरीर लवचिक बनवले पाहिजे तरच ते सहजरीत्या ताणले जाईल. विशेषत: सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला कंबरेचा सोपा आणि हलका व्यायाम करावा लागेल, मग त्यानंतरच हे आसन करायला घ्यावे लागेल.

मित्रहो, जर तुम्हाला चक्रासन करायला सकाळी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही हे आसन संध्याकाळच्या वेळी सुर्यास्त व्हायच्या आधिदेखील करू शकता. याखेरीज, अजुन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेवणानंतर लगेचच चक्रासन कधीही करू नये तसेच, रात्रीच्या वेळी सुद्धा हे आसन करू नये.

आपण जेवणानंतर कमीतकमी दोन ते तीन तासांनीच चक्रासन करावे. त्याचबरोबर, जर तुम्हाला ताप, अतिसार, ओटीपोटात दुखणे किंवा इतर काही  शारीरिक समस्या असतील तरीदेखील तुम्ही हे आसन करणे टाळावे. कारण, चक्रासनाचे फायदे  मिळवण्यासाठी योग्य वेळी चक्रासन करणे देखील खूप महत्वाचे आहे.

                    तेजल तानाजी पाटील

                       बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या chakrasana information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चक्रासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ardha chakrasana information in marathi WIKIPEDIA या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of chakrasana in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chakrasana yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “चक्रासन म्हणजे काय ? कसे करावे ? Chakrasana Information in Marathi”

  1. तुमच्या जवळ चक्रासानाची अजून माहिती असेल तर plz मला पाठवाल का ?
    मला त्याची प्रबंध लेखनास मदत होईल.
    धन्यवाद 🙏

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!