चांभारगड किल्ला माहिती Chambhar Gad Fort History in Marathi

Chambhar Gad Fort History in Marathi चांभारगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील एक अज्ञात किल्ला आहे असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. हा किल्ला सातारा येथे आहे वसलेला आहे आणि हा किल्ला येथे उभा करण्याचे कारण हा सातारा शहराचा परिसर पाहण्यासाठी त्याचबरोबर सातारा परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. चांभारगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील सर्वात जुना किल्ला म्हणून ओळखला जातो. चांभार गड हा किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची १२०० फुट म्हणजेच ३६५ मीटर इतकी आहे.

Chambhargad Fort Information in Marathi रायगड जवळील पर्वतरांगेमध्ये अनेक किल्ले वसलेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने लिंगना, सोनगड, कलदुर्ग आणि चांभारगड यांचा समावेश आहे. हे किल्ले मुळात जवळच्या भागावर लक्ष ठेवण्यासाठी बांधले गेले होते. चांभार गड या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला जंगलामधून वाट आहे आणि त्यामुळे हा किल्ला ट्रेकिंगसाठी लोकप्रिय मनाला जातो. या किल्ल्याच्या पायथ्याशी महाड (चांभारगड हा महाडच्या अगदी जवळ आहे) चांभारखेड आणि रायगड हि गावे आहेत.

chambhar gad fort history in marathi
chambhar gad fort history in marathi

चांभारगड किल्ला माहिती – Chambhar Gad Fort History in Marathi

किल्ल्याचे नावचांभार गड किल्ला किवा महेंद्रगड किल्ला
ठिकाणचांभारगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील सातारा या गावाजवळ डोंगर रांगेवर वसलेला आहे
उंचीया किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासूनची उंची १२०० फुट म्हणजेच ३६५ मीटर इतकी आहे
पायथ्याशी असणारी गावेमहाड, चांभारखेड आणि रायगड
मुख्य हेतूहा किल्ला उभारण्याचा मुख्य हेतू म्हणजे महाड प्राचीन व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी

चांभारगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील सातारा या गावाजवळ डोंगर रांगेवर वसलेला आहे. या भागातील इतर किल्ल्यांच्या तुलनेत चांभारगड ह्या किल्ल्याच्या पठाराचा आकार लहान आहे. चांभारगड हा किल्ला महाड या गावापासून खूप जवळ आहे म्हणजे हाकेच्या अंतरावर आहे आणि हा किल्ला मुख्यता महाडच्या प्राची बाजार पेठेवर लक्ष ठेवण्यासाठी आणि तेथील कारभार पाहण्यासाठी बांधलेला आहे.

या किल्ल्याच्या पठारावर आपल्याला काही प्राचीन घरांचे अवशेष पाहायला मिळतात त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्याला पाण्याचे टाके बांधलेले पाहायला मिळते या टाक्यांच्या बांधणीवरून हा किल्ला खूप प्राचीन असेल हे समजते. चांभार गड ह्या किल्ल्याची उंची १२०० फुट म्हणजे ३६५ मीटर इतकी आहे आणि या किल्ल्याला महेंद्रगड या नावाने देखील ओळखले जाते. हा किल्ला ट्रेकिंग साठी मध्यम स्वरूपाचा आहे.

चांभारगड किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

 • किल्ल्यावर जाताना आपल्याला एक चांभारगडाची गुहा पाहायला मिळते.
 • या किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्यला चार खांब टाके पाहायला मिळतात ज्यामधील पाणी पूर्वीच्या काळी पिण्यासाठी वापरले जात असावे.
 • त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्याला ९ ते १० हौद पाहायला मिळतात ज्यामधील पाणी पूर्वीच्या काळी रोजच्या वापरासाठी केले जात असावे.
 • चांभारगड किल्ल्यावर जाताना आपल्याला चांभार खिंड देखील पाहायला मिळते.

चांभारगड किल्ला फोटो:

chambhar gad fort history in marathi
chambhar gad fort history in marathi

चांभार गड किल्ल्यावर कसे जायचे ? 

चांभार गड या किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्यला चांभारखेड हे किल्ल्याच्या पाथ्याशी असणाऱ्या गावामध्ये महाड पोलादपुरचा महामार्ग ओलांडला कि आपण चांभारखेड गावामध्ये येतो. त्याचबरोबर या किल्ल्यावर जाण्यासाठी महाड गाव देखील या किल्ल्याचे पायथ्याचे गाव आहे आणि हे किल्ल्यापासुनाचे खूप जवळचे गाव आहे त्यामुळे आपण महाड मध्ये देखील उतरू शकतो. महाड मधून या किल्ल्यावर जाण्यासाठी फक्त १५ ते २० मिनिटे लागतात.

महाड गावामधून जाताना आपल्याला कातळ कड्याची वाट लागते. या किल्ल्यावर जाताना खिंडीतून एकूण १ तास लागतो खिंडीतून चालत वरती गेले कि आपल्याला कातळकडा लागतो तेथून पुढे जनाईच्या वाटेने गेल्यानंतर १० ते १५ मिनिटामध्ये आपण किल्ल्याच्या पठारावर पोहचतो.

जर स्वताच्या वाहनाने तुम्हाला किल्ल्याला भेट द्यायची असेल तर तुम्हाला खोपोली – पाली –रोहा – माणगाव – महाड – चांभारखेड या मार्गाने प्रवास करू शकतो.

मुंबई किंवा पुणे ते महाड अशी कोणतीही थेट गाड्या उपलब्ध नाहीत, परंतु वीर स्थानकासाठी गाड्या आहेत आणि तेथून महाड स्टेशनला जाणारी ट्रेन पकडता येते. मुंबई शहरापासून हा किल्ला १७५ किलो मीटर आहे.

चांभारगड या किल्ल्यावर ट्रेकिंग सुध्दा करू शकतो – trecking 

 • किल्ल्याचा प्रकार : चांबरगड हा किल्ला डोंगराळ प्रकारामध्ये मोडतो
 • चढाईची पातळी : चांभारगड चढाईची पातळी मध्यम  आहे
 • समुद्रसपाटीपासून उंची : चांभारगड किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १२०० फुट म्हणजेच ३६५ मीटर इतकी आहे.
 • पायथ्याशी असणारी गावे : चांभारखेड, महाड किवा रायगड
 • शिखरावर पोहोचण्याची वेळ : चांभारगडच्या पायथ्याच्या गावातून हा किल्ला चढण्यासाठी कमीत कमी ३० मिनिटे आणि जास्तीत जास्त १ तास लागतो.
 • ट्रेकिंगसाठी लागणारा किमान कालावधी : १ दिवस
 • गडावर जाण्यासाठी उत्तम वेळ : कधीही आपण चांभारगड किल्ल्याला भेट देऊ शकता.
 • किल्ला पाहण्यासाठी लागणारा वेळ : ३० मिनिटे.

टीप

 • चांभार गड या किल्ल्यावर पाण्याची सोय १२ महिने असते पण ते पाणी आपण पिण्यासाठी वापरू शकत नाही त्यामुळे गडावर जाताना पिण्याचे पाणी घेवून गेले तर चांगले.
 • या किल्ल्यावर राहण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्यामुळे आपल्याला हा गड पाहून सायंकाळी गड उतरवा लागतो.
 • चांभार गड या किल्ल्यावर खाण्याची देखील सोय नाही त्यामुळे आपण गड चढताना काही स्नॅक्स सोबत घेतले तर चांगलेच आहे.
 • हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही पण ट्रेकिंग पॅकेज उपलब्द असतात.
 • नक्की वाचा: हरिहर किल्ला माहिती 

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, चांभारगड किल्ला Chambhar Gad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. Chambhar Gad Fort History in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about Chambhargad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही चांभारगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या Chambhar Gad killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “चांभारगड किल्ला माहिती Chambhar Gad Fort History in Marathi”

 1. चांभार गड हा किल्ला कोणी बांधला होता ?
  हा कोणाच्या अधीन होता ? ही माहिती कृपया सविस्तर सांगवी.

  उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!