Vardhangad Fort Information in Marathi वर्धनगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील मुख्य सह्याद्रीच्या मानदेशातून फिरलेल्या महादेव या उप डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे. वर्धनगड या किल्ल्याच्या पायथ्याशी पुसेगाव व वर्धनगड हि गावे आहेत आणि हा किल्ला खटाव आणि कोरेगाव तालुक्याच्या सीमेवर वसलेला असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून १५५० फुट म्हणजे ४५७ मीटर इतकी आहे. या डोंगरांगेवर असणारे किल्ले मानदेशातील मुख्य किल्ले आहेत आणि या किल्ल्यांपैकी वर्धनगड हा किल्ला देखील महत्वाचा भाग मानला जात होता.
हा किल्ला कोणी बांधला याबद्दल इतिहासामध्ये काही पुरावे नाहीत पण ज्यावेळी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला त्यावेळी म्हणजे इ. स. १६७४ मध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. पूर्वीच्या काळी वर्धनगड या किल्ल्याला सर्व घाटाचा पहारेकरी म्हणून ओळखले जायचे. या किल्ल्याला गोमुखी स्थापत्य शैलीचे पूर्वेकडे मुख असणारा एक प्रवेश दरवाजा आहे त्याचबरोबर किल्ल्यामध्ये आपल्याला २ तलाव, महादेवाचे मंदिर, वर्धिनी देवीचे मंदिर तसेच या किल्ल्यावरून माहीमगडावर जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग आहे.
आपल्यला किल्ल्यावर अशी अनेक प्राचीन ठिकाणे आणि इमारती पाहायला मिळते. या किल्ल्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महत्व असण्याचे कारण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकल्याणार हा किल्ला देखील जिंकला होता आणि या किल्ल्यावर अनेक बांधकामे केली होती तसेच छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावर १ महिन्यासाठी मुक्काम देखील केला होता.
वर्धनगड किल्ला माहिती – Vardhangad Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | वर्धनगड किल्ला |
प्रकार | गिरिदुर्ग |
ठिकाण | हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील मुख्य सह्याद्रीच्या मानदेशातून फिरलेल्या महादेव या उप डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे |
डोंगर रांग | सह्याद्री ( महादेव डोंगर रांग ) |
किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची | १५५० फुट ( ४५७ मीटर ) |
पायथ्याशी असणारी गावे | पुसेगाव व वर्धनगड |
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे | महादेव मंदिर, वर्धिनी देवीचे मंदिर, पाण्याचे २ तलाव, किल्ल्यावर असणारा माहीमगडावर जाण्यासाठी एक गुप्त भुयारी मार्ग |
वर्धनगड हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील मुख्य सह्याद्रीच्या मानदेशातून फिरलेल्या महादेव या उप डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून १५५० फुट इतकी आहे आणि हा किल्ला एकूण २० एकर क्षेत्राफालामध्ये वसलेली आहे.
हा किल्ला कोणी बांधला हे माहित नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर या किल्ल्यावर अनेक बांधकामे केली. या किल्ल्यच्या संरक्षणासाठी या किल्ल्याभोवती भक्कम अशी तटबंदीची भिंत बांधलेली आहे आणि या तटबंदीच्या भिंतींची उंची १० ते १५ फुट इतकी आहे आणि भिंतीचे बांधकाम दगडांपासून केले आहे.
या किल्ल्यावर आपल्याला लहान महादेवाचे मंदिर पाहायला मिळते तसेच मंदिराच्या बाजूला एक वर्धिनी देवीचे मंदिर देखील आहे त्याचबरोबर किल्ल्यावर २ तलाव आणि माहीम गडावर जाण्यासाठी एका गुप्त भुयारी मार्ग देखील आहे.
वर्धनगड किल्ल्याचा इतिहास – vardhangad fort history in marathi
इ. स. १६७३ मध्ये पन्हाळा हा किल्ला स्वराज्यामध्ये सामील केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी वर्धनगड देखील आपल्या ताब्यात घेतला आणि महाराजांच्या पूर्वी हा किल्ला घास असा विकसित झाला नव्हता आणि या किल्ला तेथील पूर्ण घाटावर लक्ष ठेवण्यासाठी एक महत्वाचा किल्ला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्यामध्ये इ. स. १७७४ अनेक बांधकामे करून हा किल्ला विकसित केला. त्याचबरोबर या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक महिन्यासाठी मुक्काम देखील केला होता.
महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याचा सर्व कारभार संभाजी महाराज पाहत होते पण छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर औरंगजेबाने महाराष्ट्रावर आक्रमण करण्यास सुरुवात केली आणि खास करून त्याचा डोळा स्वराज्यातील किल्ल्यांवर होता आणि तो मराठा साम्राज्यातील किल्ल्यांवर हल्ले करू लागला.
औरंगजेबाने पन्हाळा हा किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यानंतर त्याला वाटू लागले कि वर्धनगड हा मोक्याच्या ठिकाणी असणारा वर्धनगड हा किल्ला देखील आपल्याकडे असला पाहिजे. हे ज्यावेळी हो गोष्ट वर्धनगड या किल्ल्याच्या किल्लेदाराला समजली त्यावेळी त्याने आपला एक वकील फत्तेउलखान जो मोगलांचा एक सरदार होता त्याचे कडे पाठवून देवून त्यांनी असे सांगितले कि जर या किल्ल्यावर कोणतीही जीवित हानी होणार नसेल तर आम्ही हा किल्ला खाली करण्यास तयार आहोत.
- नक्की वाचा: अंबर किल्ल्याची माहिती
असा संदेश पाठवल्यामुळे गडावर होणारा हल्ला काही काळासाठी पुढे गेला त्या वेळामध्ये किल्लेदार आणि सैनिकांनी दारूगोळे आणि इतर लढाईसाठी लागणाऱ्या सामानांची जुळवा जुळव केली. त्यानंतर फतेउल खानाला वर्धनगड किल्ल्यावरून कोणताही निर्णय मिळत नसल्यामुळे त्याने किल्ल्यावर हल्ला केला पण वर्धनगडावरील किल्लेदाराने आणि सैनिकांनी त्याला सडेतोड उत्तर दिले पण मुगल सैनिकांनी किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान केले.
तेथील काही मराठा लोक देखील आपल्या ताब्यात घेतले आणि या लढाई मध्ये अनेक मराठा सैनिक देखील मारले गेले त्यामुळे मराठ्यांनी या लढाई मधून माघार घेतली आणि जून १९ या दिवशी वर्धनगड हा किल्ला खाली केला आणि हा किल्ला मुगलांच्या ताब्यात गेला.
किल्ल्यावर पाहण्यासारखी प्राचीन ठिकाणे आणि बांधकामे
महादरवाजा :
महादरवाजा म्हणजे या किल्ल्याचा प्रवेश दरवाजा जो किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीला पूर्वेकडे तोंड करून आहे. हा दरवाजा आपल्याला सहजपणे दिसत नाही कारण तो चिंचोळ्या रस्त्यातून आत गेल्यानंतर दिसतो आणि या दरवाज्यावर शत्रूला सहजपणे तोफांचा मारा करता येत नाही तसेच या दरवाज्याला हत्ती देखील धडक देवू शकत नाही.
बुरुज :
या किल्ल्यावर बुरुज देखील बांधलेले आहेत आणि त्यामधील एक बुरुज दरवाज्याजवळ आहे ज्याचा वापर शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि शत्रूवर हल्ला करण्यासाठी पूर्वीच्या काळी केला जात होता.
महादेव मंदिर :
वर्धनगड या किल्ल्यावर आपल्याला एक छोटेशे प्राचीन महादेवाचे मंदिर देखील पाहायला मिळते आणि हे किल्ल्यावरील एकमेव मंदिर आहे जे सुस्थितीत आहे.
भुयारी मार्ग :
वर्धनगड या किल्ल्यावरून माहीम गडावर जाण्यासाठी पूर्वीच्या काळी एक गुप्त भूयारी मार्ग किवा सुरंग बनवली होती.
तलाव :
या किल्ल्यावर आपल्याला २ तलाव पाहायला मिळतात. पूर्वीच्या काळी बहुतेक या तलावातील रोजच्या वापरासाठी आणि पाणी पिण्यासाठी वापरले जात असावे.
- या किल्ल्यावर आपल्याला वर्धिनी देवीचे मंदिर देखील पाहायला मिळते.
- नक्की वाचा: भानगड किल्ल्याची माहिती
वर्धनगड किल्ला फोटो:
वर्धनगड या किल्ल्यावर कसे जायचे ?
जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यसाठी बसने किवा रेल्वेने यायचे असल्यास तुम्ही सातारा या शहरामध्ये येवू शकता कारण सातारा हे शहर या किल्ल्याजवळचे सर्वात जवळचे मुख्य शहर आहे त्यामुळे तुम्हाला येथे येण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण येत नाही आणि तेथून तुम्हाला वर्धनगडला जाणारी स्थानिक बस किवा टॅक्सी मिळू शकेल.
- नक्की वाचा: प्रतापगड किल्ल्याची माहिती
- वर्धनगड हा किल्ला सातारा शहरापासून ३० ते २९ किलो मीटर अंतरावर आहे.
- कोरेगाव पासून हा किल्ला १४ किलो मीटर अंतरावर आहे.
टीप
- वर्धनगड हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही पण ट्रेकिंग पॅकेज उपलब्द असतात.
- हा किल्ला पाहण्यासाठी १ ते २ तास लागतात.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, वर्धनगड किल्ला vardhangad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. vardhangad fort history in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about vardhangad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही वर्धनगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या vardhangad killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट