Harihar Fort Information in Marathi हरिहर किल्ल्याची माहिती हरिहर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ हा किल्ला त्र्यंबकेश्वर (सह्याद्री) पर्वत रांगेवर वसलेला आहे. हरिहर या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ३६७६ फुट म्हणजे ११२० मीटर इतकी आहे. या किल्ल्याची विशेषता म्हणजे हा किल्ला पायथ्यापासूनच त्रिकोणी आकाराचा आहे पण हा किल्ला डोंगरावर यादव काळामध्ये बांधला होता. हरिहर हा किल्ला बहुतेक ९ व्या ते १४ व्या शतकामध्ये यादवांनी बांधला असावा आणि त्यांनी हा किल्ला बांधण्यासाठी दगड, विटा आणि अल्कली याचा वापर केला असावा.
Harihar Fort Nashik या किल्ल्याच्या स्थापणे पासून ते ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेवू पर्यंत या किल्ल्यावर हा किल्ला घेण्यासाठी अनेक आक्रमणे केली. हरिहर या गडावर आणखीन एक वेशेषता म्हणजे या गडावर चढण्यासाठी कातळपायऱ्या आहेत आणि त्या चढताना मनामध्ये थरारक भावना येते. हरिहर या किल्ल्याला हर्षगड या नावाने देखील ओळखले जाते आणि हा किल्ला ब्रह्मगिरी पासून १५ ते २० किलो मीटर अंतरावर आहे. हरिहर हा किल्ला भारतातील सर्वात लोकप्रिय आणि थरारक ट्रेक किल्ला मनाला जातो.
हरिहर किल्ला माहिती – Harihar Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | हरिहर किल्ला किवा हर्षगड |
प्रकार | गिरिदुर्ग |
ठिकाण | हरिहर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ डोंगरावर वसलेला आहे. |
डोंगर रांग | त्र्यंबकेश्वर (सह्याद्री) पर्वत रांग |
उंची | समुद्र सपाटी पासूनची उंची ३६७६ फुट म्हणजे ११२० मीटर इतकी आहे |
पायथ्याशी असणारी गावे | हर्षेवाडी, कोटमवाडी आणि निगरगुडपाडा |
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे | लहान वाडा, शिव मंदिर, हनुमानाचे मंदिर, पाण्याच्या कातळ टाक्या आणि तलाव. |
हरिहर हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील टाके या गावाजवळ हा किल्ला त्र्यंबकेश्वर (सह्याद्री) पर्वत रांगेवर वसलेला आहे. हरिहर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची समुद्र सपाटी पासूनची उंची ३६७६ फुट म्हणजे ११२० मीटर इतकी आहे. ज्या डोंगरावर हा किल्ला बांधलेला आहे त्या डोंगराचा आकार त्रिकोणी आहे.
- नक्की वाचा: विसापूर किल्ला माहिती
हरिहर या किल्ल्याला हर्षगड या नावाने देखील ओळखले जाते आणि या किल्ल्याच्या पायथ्याशी हर्षेवाडी, कोटमवाडी आणि निगरगुडपाडा हि गावे आहेत. या किल्ल्यावर चढण्यासाठी २०० फुट उंचीवर तीव्र आणि सरळ पायऱ्या आहेत. त्याचबरोबर या किल्ल्यावर आपल्याला शेंदूर माखलेले देवाच्या मुर्त्या तसेच मंदिरे पाहायला मिळतात. या किल्ल्यावर चढण्यासाठी ज्या पायऱ्या कातळ दगडामध्ये कोरलेल्या आहेत त्या पायऱ्यांची संख्या ११७ ते १२५ इतकी आहे.
हरिहर हा किल्ला यादवांनी गोंडा घाटावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केला होता. ह्या गडावर पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर लगेच समोरच किल्ल्याचा मुख्य दरवाजा लागतो. वरती उल्लेख केल्याप्रमाणे ह्या किल्ल्यावर आपल्याला शिव मंदिर आणि हनुमान मंदिर पाहायला मिळते त्याचबरोबर मादिराजवळ एक स्वच्छ पाण्याने भरलेला तलाव पाहायला मिळतो.
तसेच हरिहर या किल्ल्यामध्ये प्राचीन काळातील धान्याचे कोठार अजूनही सुस्थितीत आहे त्याचबरोबर या किल्ल्यावर एक लहान राजवाडा आहे आणि तो देखील सुस्थितीत आहे त्यामुळे तेथे १० ते १५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते.
हरिहर किल्ला इतिहास – Harihar Fort History In Marathi
हरिहर हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील टाके गावाजवळ त्र्यंबकेश्वर (सह्याद्री) डोंगर रांगेवर यादवांच्या काळामध्ये बांधलेला आहे. हरिहर हा किल्ला यादवांनी गोंडा घाटावरून होणाऱ्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी निर्माण केला होता. या किल्ल्याच्या स्थापणे पासून ते ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेवू पर्यंत या किल्ल्यावर हा किल्ला घेण्यासाठी अनेक आक्रमणे केली.
- नक्की वाचा: रोहीडा किल्ला माहिती
त्यानंतर बहुतेक हा किल्ला निजामशाही च्या वर्चस्वा खाली होता आणि त्यानंतर हा किल्ला इ. स. १६३६ मध्ये त्र्यंबकगड किल्ला घेताना हरीगर किल्ला देखील शहाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला पण काही दिवसातच हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला आणि मग तो परत मोरोपंत पिंगळे यांनी इ. स. १६७० मध्ये स्वराज्यामध्ये सामील केला पण एक वर्षाच्या कालावधी नंतर हा किल्ला मोगल सरदार मातब्बर खान याने जिंकला.
पण शेवटी हा किल्ला इतर किल्ल्यांप्रमाणे इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. आता हा किल्ला भारत सरकारच्या मालकीचा बनलेला आहे.
हरिहर किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे
- या किल्ल्याची विशेषता म्हणजे कातळ दगडामध्ये कोरलेल्या पायऱ्या ज्या पाहताना आणि चढताना थरारक वाटतात आणि या अश्या पायऱ्या असल्यामुळे आपण या किल्ल्यावर ट्रेकिंग ची मजा घेवू शकतो. हरिहर या किल्ल्यावर चढण्यासाठी कातळ दगडामध्ये कोरलेल्या एकूण ११७ ते १२५ पायऱ्या आहेत.
- हरिहर या किल्ल्यामध्ये आपल्याला एक स्वच्छ पाण्याचा तलाव पाहायला मिळतो आणि बहुतेक या तलावाला १२ महिने पाणी असते. हे तलाव पूर्वीच्या काळी बांधले असावे आणि या तलावातील पाणी पिण्यासाठी किवा रोजच्या वापरासाठी वापरले जात असावे.
- या किल्ल्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या कातळात बनवलेल्या टाक्या देखील पाहायला मिळतात.
- हरिहर किल्ल्यामध्ये अनेक शेदूर लावलेल्या देवांच्या मुर्त्या पाहायला मिळतात.
- हरिहर किल्ल्यावर आपल्याला भगवान शिव मंदिर तसेच हनुमानाचे मंदिर देखील पाहायला मिळते.
- या किल्ल्यामध्ये एक छोटासा राजवाडा देखील पाहायला मिळतो आणि जर तुम्हाला या किल्ल्यावर मुक्काम करायचा असल्यास तुम्ही या राजवाड्या मध्ये करू शकता. या राजवाड्या मध्ये एकूण १० ते १५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते.
हरिहर किल्ल्याजवळील इतर पाहण्यासारखी ठिकाणे
- हरिहर किल्ल्यापासून ९ ते १० किलो मीटर अंतरावर असणारा डूगारवाडी धबधबा पाहायला मिळतो.
- निवृत्तीनाथ महाराजांची समाधी मंदिर
- आंबोली धरण (१३ किलो मीटर अंतरावर आहे)
- मेटघर किल्ला घाट
- वैतरणा तलाव (किल्ल्यापासून फक्त ६ किलो मीटर अंतरावर आहे)
- भास्कर गड
- गौतम तलाव (१३ किलो मीटर)
हरिहर किल्ला फोटो:
हरिहर किल्ल्यावर कसे जायचे ?
जर तुम्हाला हरिहर किल्ला पाहण्यासाठी रेल्वेने यायचे असल्यास किल्ल्याचे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक नाशिक येथे आहे जे किल्ल्यापासून ५६ किलो मीटर अंतरावर आहे. तुम्ही रेल्वे ने नाशिकला येवून तेथून बस किवा टॅक्सी पकडून किल्ल्याजवळील गावामध्ये जावू शकता. या किल्ल्यापासून कसारा हे रेल्वे स्थानक देखील ६० किलो मीटर अंतरावर आहे.
- नक्की वाचा: वर्धनगड किल्ला माहिती
जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी विमानाने यायचे असल्यास किल्ल्याचे सर्वात जवळचे विमातळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळ. नाशिक अणि मुबंई यामधील अंतर १७० किलो मीटर आहे अणि तुम्ही मुबंई मधून रेल्वेने नाशिकला जावू शकता अणि तेथून तेथून बस किवा टॅक्सी पकडून किल्ल्याजवळील गावामध्ये जावू शकता.
टिप
- आपल्याकडे किल्ला चढताना ओळख पुरावा असणे आवश्यक आहे.
- ट्रेकिंग शूज असले तर चांगलेच आहे.
- पिण्याचे पाणी आणि खाण्यासाठी काही तरी सोबत घ्यावे.
- आवश्यक असणारी औषधे देखील आपल्या सोबत घेतली तर चालतील.
- हा किल्ला चढण्यासाठी कमीत कमी एक ते दीड तास लागतो.
- हा किल्ल्यावर कोणतेही प्रवेश शुल्क घेतले जात नाहीत पण हा किल्ला ट्रेकिंग साठी लोकप्रिय असल्यामुळे ट्रेकिंग पॅकेजीस उपलब्ध असतात.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, हरिहर किल्ला harihar fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. harihar fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about harihar fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही हरिहर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या harihar killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
हरीहर किल्ला पासून हर्शवाडी गाव किती अंतरावर आहे