Chicken Masala Recipe in Marathi चिकन मसाला रेसिपी मराठी चिकन म्हंटल कि अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण काही लोकांचे चिकन हे खूप प्रिय असते. चिकन पासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी बनवल्या जातात जसे कि चिकन फ्राय, चिकन कुर्मा, चिकन करी आणि यामधील एक वारंवार बनवली जाणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी रेसिपी म्हणजे चिकन मसाला. जे लोक मांसाहारी अन्न खातात त्यांच्यासाठी चिकन मसाला हि रेसिपी एकदम उत्तम रेसिपी आहे आणि हि बहुतेक लोकांच्या आवडत्या डिश मधील एक आहे. चिकन मसाला रेसिपी हि भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते.
आणि हि रेसिपी भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने बनवली जाते. हि रेसिपी घरामध्ये अगदी सोप्या पध्दतीने बनवू शक्ती आणि हि रेसिपी बनवण्यासाठी ३० ते ३५ मिनिटे लागतात. चला तर आज आपण या लेखामध्ये मसालेदार चिकन मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत.
चिकन मसाला रेसिपी मराठी – Chicken Masala Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
शिजण्यासाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
वाढणी | ४ व्यक्ती |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
चिकन मसाला मध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य – key ingredients
- चिकन : चिकन हे चिकन मसाला बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य आहे जे हि रेसिपी बनवताना मॅरीनेट केले जाते मग ते तेलामध्ये थोडे भाजून मऊ बनवले जाते आणि मग ग्रेव्हीमध्ये घालून शिजवले जाते.
- खडे मसाले : आपण चिकन मसाल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चिकन मसाले वापरतो त्यामुळे चिकनला खमंग वास येतो.
- टोमॅटो प्युरी : चिकन मसाला मध्ये टोमॅटो प्युरी वापरल्यामुळे ग्रेव्हीला घट्टपणा येतो आणि टेस्ट देखील चांगली येते.
चिकन मसाला हि एक भारतामध्ये बनवली जाणारी आणि आवडीने खाल्ली जाणारी नॉन व्हेजिटेरियन डिश आहे. चिकन मसाला हा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो . आता आपण पाहूयात तिखट आणि मसालेदार चिकण मसाला कसा बनवायचा. चला तर मग पाहूयात चिकन मसाला कसा बनवायचा आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: बटर चिकन रेसिपी मराठी
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
शिजण्यासाठी लागणारा वेळ | ३० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३५ मिनिटे |
वाढणी | ४ व्यक्ती |
पाककला | भारतीय |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
चिकन मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी हि खूप मोठी आहे आणि यामधील काही साहित्य हे आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग आता आपण चिकन मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
चिकन मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य
- ५०० ग्रॅम चिकन ( छोटे तुकडे ).
- अर्धी वाटी दही.
- १ चमचा आले-लसूण पेस्ट.
- १/२ चमचा लाल मिरची पावडर.
- १ चमचा गरम मसाला.
- मीठ (आवश्यकतेनुसार).
- ३ मोठे चमचे तेल.
- २ वाटी टोमॅटो प्युरी.
- १ छोटी वाटी कांदा ( चिरलेला ).
- २ मोठे चमचे आले-लसूण पेस्ट.
- १ मोठा चमचा बटर.
- १ मोठा चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- मीठ ( आवश्यकतेनुसार ).
- १ चमचा साखर.
- कोथिंबीर ( चिरलेली ).
- अर्धा चमचा जिरे.
- १ दालचिनीची काडी.
- ३ ते ४ चमचे तीळ.
- १ बदाम फुल.
- २ लवंगा.
- २ वेलदोडे आणि १ मसाला वेलदोडा.
- सर्वप्रथम एक मोठा बाऊल घेऊन त्यामध्ये सर्व मॅरीनेटसाठी लागणारे साहित्य घाला आणि ते चांगले मिक्स करून चिकन १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.
- आता एक कढई घेऊन ती मध्यम आचेवर गरम करून मग सर्व खडे मसाले ( दालचिन, जिरे, बदाम फुल, वेलदोडे, मसाला वेलदोडे, तीळ आणि लवंग ) एकत्र घेऊन एका कढईत २-३ मिनिटे परतून घ्या आणि मग ग्राइंडरमध्ये सर्व मसाल्यांची बारीक पावडर बनवा आणि ती थोड्या वेळासाठी बाजूला ठेवा.
- आता त्या कढईमध्ये तेल घाला, तेल गरम झाले कि त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि चिकन लालसर किंवा तपकिरी रंग येईपर्यंत परतून घ्या मग एका भांड्यात चिकन काढून बाजूला ठेवा.
- आता परत कढई मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये तेल आणि बटर घाला.
- तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा आणि आले-लसूण पेस्ट घालून, कांदा चांगला पारदर्शी होईपर्यंत भाजून घ्या.
- मग त्यामध्ये आपण तयार करून ठेवलेली मसाला, हळद, लाल तिखट घाला आणि हलवा नंतर टोमॅटो प्युरी घाला हे सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि हे मिश्रण मंद आचेवर ५ मिनिटे चांगले शिजवून घ्या.
- नंतर ग्रेव्हीमध्ये चिकन, मीठ ( चवीनुसार ), साखर आणि पाणी ( आवश्यकतेनुसार ) घालून चांगले मिक्स करा आणि पुन्हा ग्रेव्ही झाकून १० मिनिटे शिजवा.
- ग्रेव्ही शिजली की गॅस बंद करा आणि त्यावर कोथिंबीर घालून चिकण मसाला तुम्ही सर्व्ह करू शकता.
चिकन मसाला कश्यासोबत सर्व्ह केला जातो – serving suggestions
स्वादिष्ट आणि मसालेदार चिकन मसाला रेसिपी हि आपण चपाती, रोटी, नान, पुलकी, भाकरी किंवा पांढऱ्या भातासोबत देखील खाल्ली तरी चालते.
टिप्स (Tips)
- चिकन मसाल्यामध्ये आपण सुखं खोबरं भाजून ते मिकासरला फिरून त्याची बारीक पेस्ट बनवून घालू शकतो.
- चिकन मसाला तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर या रेसिपीमध्ये लाल मिरची पावडर दिलेल्या प्रमाणापेक्षा कमी जास्ती करू शकता.
- चिकन आपण तेलामध्ये भाजण्याऐवजी ते फोडणीमध्ये घालून थोडे भाजून ग्रेव्ही बनवून त्यामध्ये देखील शिजवू शकतो.
आम्ही दिलेल्या Chicken Masala Recipe in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर चिकन मसाला रेसिपी मराठी chicken lollipop masala recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chicken masala recipe in marathi video या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chicken masala powder recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये butter chicken masala recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट