Chole Recipe in Marathi – Chole Bhature Recipe in Marathi छोले भटूरे रेसिपी मराठी छोले म्हंटल कि आठवते ती पंजाबी स्वयंपाक पध्दती कारण छोले रेसिपी हि पंजाबी स्वयंपाक पध्दतीने बनवलेली एक डिश आहे. छोले रेसिपी हि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा मसाला वापरून बनवलेली असते आणि हि रेसिपी पंजाबमध्ये तर बनवलीच जाते पण भारताच्या काही इतर भागामध्ये देखील हि रेसिपी अगदी आनंदाने बनवली जाते आणि आवडीने खाल्ली देखील जाते. छोले हि रेसिपी काही लोक नाश्त्यासाठी बनवतात तर काही लोक हि जेवणासाठी बनवतात.
आणि या रेसिपी सोबत आपण भटुरे, चपाती किंवा रोटी यापैकी काहीही खावू शकतो आणि कोणत्याही प्रकाराबरोबर छोले रेसिपी अगदी उत्तम लागते. छोले रेसिपी हि घरी बनवण्यासाठी खूप सोपी असते आणि काही मिनिटांमध्ये बनते आणि हे बनवण्यासाठी घरातील काही मोजकेच साहित्य लागते.
छोले भटूरे रेसिपी मराठी – Chole Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारे वेळ | १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | पंजाबी |
छोले हि एक पंजाबी डिश आहे जी मोठ्या आकारच्या पांढऱ्या हरभऱ्या पासून बनवली जाते आणि हि डिश पंजाबमध्ये तसेच भारतामध्ये देखील खूप लोकप्रिय आहे. छोले रेसिपी हि घरामध्ये बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि कमी वेळेमध्ये आणि खूप कमी साहित्यामध्ये अगदी उत्तम बनते. चला तर मग पाहूयात छोले रेसिपी कशी बनवायची आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: पाव भाजी रेसिपी
तयारीसाठी लागणारे वेळ | १५ मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० मिनिटे |
पाककला | पंजाबी |
छोले रेसिपी बनवण्यासाठी काही विशेष साहित्य लागत आणि आणि घरामध्ये असणाऱ्या साहित्यापासून आपण अगदी सहजपणे छोले मसाला बनवू शकतो. छोले रेसिपी बनवण्यासाठी हरभरा छोले, छोले मसाला आणि टोमॅटो आणि कांदा हे मुख्य साहित्य आहे. छोले मसाला आपण घरगुती पध्दतीने बनवू शकतो किंवा बाजारातून विकत अनु शकतो. चला तर मग पाहूयात छोले मसाला बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी.
- २५० ग्रॅम हरभरा छोले.
- ३ ते ४ टोमॅटो ( बिया काढलेले आणि मोठे चिरलेले )
- २ कांदे ( उभे चिरलेले ).
- १ मध्यम आकाराचा कांदा ( चौकोनी चिरलेला ).
- २ चमचे तेल.
- १ चमचा आले लसून पेस्ट.
- २ चमचे छोले मसाला.
- १/२ चमचा धने पावडर.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- २ तमाल पत्री पाने.
- १/४ चमचा आमचूर पावडर.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- कोथिंबीर.
- छोले रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवावे लागतात. कारण ते भिजवल्यामुळे चांगले भिजण्यास मदत होते.
- सर्वप्रथम रात्रभर भिजवलेले छोले एका कुकरमध्ये घालून त्यामध्ये आवश्यक तेवढे पाणी घाला आणि त्यामध्ये तमाल पत्रीची पाने टाका आणि कुकरचे झाकण लावून कुकर गॅसवर मोठ्या आचेवर ठेवून त्याला ३ ते ४ शिट्या द्या. त्यामुळे छोले चांगले शिजले जातील.
- ३ ते ४ शिट्या दिल्यानंतर गॅस बंद करा आणि कुकर गार होईपर्यंत वाट पहा.
- मग आता कांदा आणि टोमॅटो थोड्याश्या तेलामध्ये भाजून त्याची बारीक पेस्ट करून ते थोडा वेळ बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला. तेल गरम झाले कि त्यामध्ये चौकोनी चिरलेला कांदा घाला आणि तो चांगला भाजा आणि मग त्यामध्ये थोड्या वेळाने आले लसून पेस्ट घाला ती देखील तेलामध्ये थोडी भाजून घ्या.
- मग त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो पेस्ट घाला आणि ती देखील चांगली भाजून घ्या.
- मग त्यामध्ये धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद, छोले मसाला घाला आणि ते चांगले एकत्र करा मग त्यामध्ये शिजवलेले छोले घाला आणि ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या. ( टीप : त्यामध्ये थोडे पाणी घालावे लागत असल्यास पाणी घाला ).
- आता त्यामध्ये आमचूर पावडर, साखर आणि मीठ चवीनुसार घाला आणि ते मिक्स करून थोडा वेळ शिजवा.
- आता गॅस बंद करा आणि त्यावर कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
छोले / छोले मसाला कश्यासोबत खातात – serving suggestions
छोले आपण भटुरे, नान, चपाती, रोटी किंवा प्लेन राईस सोबत देखील खावू शकतो. तसेच छोले आणि भटुरे बनवून लस्सी सोबत सकाळच्या नाश्त्याचा आनंद घेवू शकतो.
साहित्य
- २ मोठे उकडलेले बटाटे.
- ४ चमचे मैदा.
- २ छोटे चमचे तेल.
- १/४ सोडा.
- मीठ ( चवीनुसार ).
कृती
- सर्वप्रथम एक बाऊल घ्या आणि त्यामध्ये उकडलेले बटाटे कुसकरा मग त्यामध्ये मैदा, तेल आणि मीठ घाला आणि ते चांगले मळून घ्या.
- आता त्याचे छोटे छोटे गोळे करून ते लाटून घ्या आणि ते तळून घ्या.
खाली आपण घरगुती गरम मसाला कसा बनवायचा याबद्दल माहिती घेणारा आहोत. त्यासाठी खाली साहित्य आणि कृती दिलेली आहे.
साहित्य
- २ ते ३ कांड्या दालचिन.
- ३ ते ४ वेलदोडे.
- १ मसाला वेलदोडा.
- २ बदाम फुल.
- १ तमाल पत्रीचे पान.
- ४ ते ५ चमचा काळी मिरी.
- १ राम पत्री.
- २ ते ३ लवंग.
- सर्वप्रथम एक कढई घ्या आणि ती मधयम आचेवर गॅसवर ठेवा मग त्यामध्ये दालचिन, वेलदोडे, बदाम फुल, मसाला वेलदोडे, तमाल पत्रीचे पान, काळी मिरी, राम पत्री आणि लवंग घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
- भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये गार करा आणि मग ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्या सर्व खड्या मसाल्याची बारीक पूड करून घ्या.
- बारीक पूड केल्यानंतर तो मसाला चाळून घ्या. तुमचा घरगुती गरम मसाला तयार झाला.
आम्ही दिलेल्या chole recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर छोले भटूरे रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chole recipe in marathi by archana या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि chole masala recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhature recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट