डॉक्टर सी व्ही रामन यांची माहिती CV Raman Information in Marathi

Dr CV Raman Information in Marathi डॉक्टर सी व्ही रामन यांची माहिती सी व्ही रमण यांनी भारतात वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. भारतातील नावाजलेल्या वैज्ञानिकांच्या यादी मध्ये सी व्ही रमण होते. सी व्ही रमण यांनी रमन इफेक्ट असा एक शोध लावून भारताला वेगळं ज्ञान प्राप्त करून दिलं. सी वि रमण यांनी लावलेल्या अनेक शोधांपैकी रमण प्रभाव हा शोध अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. या शोधा मुळे लाईट जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून भ्रमण करत असते (सॉलिड, लिक्विड, गॅस) तेव्हा तिचा वेग व गुणांमध्ये बदल जाणवून येतो. यामुळेच समुद्राच्या पाण्याचा रंग निळा का असतो ह्या प्रश्नाचं उत्तर देखील कळून जातं.

सी व्ही रमण यांनी लावलेल्या या शोधामुळे भारताच्या प्रगतीला एक कलाटणी मिळाली. आजच्या ब्लॉग मध्ये नोबल पुरस्कार विजेते महान वैज्ञानिक सी व्ही रमण यांच्या जीवनावर सविस्तर माहिती व त्यांनी लावलेले विविध शोध पाहणार आहोत.

cv raman information in marathi
cv raman information in marathi

डॉक्टर सी व्ही रामन यांची माहिती – CV Raman Information in Marathi

पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण
जन्म७ नोव्हेंबर १९८८
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख भौतिक शास्त्रज्ञ
प्रयोगरमण इफेक्ट म्हणजेच रामण प्रभाव हा प्रयोग
राष्ट्रीय पुरस्कारनोबेल पुरस्कार, भारतरत्न पुरस्कार, लेनिन शांतता
मृत्यू२१ नोव्हेंबर १९७०

जन्म

सी व्ही रमण यांचा जन्म तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे ७ नोव्हेंबर १९८८ मध्ये एका तमिळ कुटुंबामध्ये झाला. या महान वैज्ञानिकच संपूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण असं आहे. सी व्ही रमण हे भौतिक शास्त्रज्ञ होते. चंद्रशेखर म्हणजेच सी व्ही रमण यांचे वडील एका महाविद्यालयामध्ये प्राध्यापक होते. चंद्रशेखर हे भौतिकशास्त्र व गणित यांचे अभ्यासक देखील होते. सी व्ही रमण यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीच शिक्षण पूर्ण झालं होतं. त्यामुळे सी व्ही रमण यांना शिक्षणाचं महत्त्व माहीत होतं.

Raman Effect in Marathi

भारतामध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस काही सर्वसामान्य दिवसांत सारखा नाही आहे या दिवसाचं एक विशेष महत्त्व आणि वेगळं कारण आहे. २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भारताचे महान शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमण यांनी आपल्या आतोनात प्रयत्नानंतर संपूर्ण केलेला असा महत्त्वपूर्ण रमन इफेक्ट नावाचा शोध संपूर्ण जगासमोर मांडला.

शास्त्रज्ञ रमण यांनी त्यांच्या रमन इफेक्ट या महत्त्वपूर्ण संशोधनाद्वारे जगाला प्रकाशा बद्दल एक आधुनिक माहिती मिळवून दिली. या संशोधनाद्वारे रमण यांनी भारतासह जगाला देखील विज्ञान क्षेत्रामध्ये एक नवीन आशा मिळवून दिली.रामन इफेक्ट म्हणजे प्रकाशाचे विकिरण होय. प्रकाश जेव्हा वेगवेगळ्या पदार्थांमधून भ्रमण करतो.

तेव्हा प्रकाशकिरणे पदार्थांच्या रेणूंमधून भ्रमण करतात आणि पदार्थांच्या रंगांमध्ये बदल जाणवून येतो. एका प्रकारे हे प्रकाशाचं विकिरण आहे म्हणजेच प्रकाश प्रत्येक माध्यमातून जेव्हा भ्रमण करत असतो तेव्हा प्रकाश किरणे विखुरतात. ही जी प्रक्रिया आहे याच आणखी सखोल अभ्यास रमण यांनी केला.

सी व्ही रमण यांनी कोणता शोध लावला?

सी वी रमन हे भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ होते. ज्यांनी जगात अजरामर झालेला रामन इफेक्ट हा शोध लावला. या शोधामध्ये रमण यांनी प्रकाशाचा विखुरन म्हणजेच प्रकाशाचे विकिरण या विषयावर अत्यंत सखोल स्पष्टीकरण दिलं आहे. या शोधामुळे विज्ञान क्षेत्रामध्ये जागतिक पातळीवर प्रगती जाणवुन आली.

रमण यांच्या या संशोधनामुळे त्यांना विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावल्यामुळे नोबेल पुरस्कारासाठी देखील नामांकित करण्यात आलं होतं. १९३० मध्ये सी वि रमण यांनी त्यांचे हे संशोधन संपूर्ण जगापुढे मांडलं आणि त्याच वर्षी त्यांनी नोबेल पुरस्कार देखील पटकावला. नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय व आशियाई होते.

शिक्षण

सी व्ही रमण हे हुशार व चतुर विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांचं शैक्षणिक आयुष्य अतिशय सुखात गेलं. सी वि रमण यांनी त्यांच्या प्राथमिक शाळेची सुरुवात अल्मा मेटर युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास इथून झाली. सी व्ही रमण यांचे घराणं उच्चशिक्षित होतं घरातील प्रत्येक सदस्याने चांगला शिक्षण घेतलं होतं.

इतकच नव्हे तर स्वतः सी व्ही रमण यांचे वडील प्राध्यापक होते. सी वि रमण यांची इंग्रजी शिकवणी त्यांच्या वडिलांकडे चालू असायची. रमण यांनी मॅट्रिकची परीक्षा अकरा वर्षाचे असताना दिली आणि त्यामध्ये ते उत्तीर्ण देखील झाले. अल्मा मेटर युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास इथूनच सी व्ही रमण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. सी वि रमण यांनी बी.ए. मध्ये पहिला स्वर्ण पदक १९०५ मध्ये प्राप्त केलं.

वैयक्तिक आयुष्य

सी वी रमन हे तलक बुद्धीचे मनुष्य होते. ज्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर संपूर्ण जगाला एक महत्वपूर्ण संशोधन मिळवून दिलं. सी व्ही रमण यांच शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर त्यांनी कोलकत्ता येथे इंडियन फायनान्स सर्विस मध्ये असिस्टंट अकाउंटंट म्हणून नोकरी केली. त्यांच्या शिक्षणावर असलेला दृढ विश्वास त्यांना शांत बसून देत नव्हता त्यांना काहीतरी मोठं करून दाखवायचं होतं.

त्यामुळे या नोकरीच्या माध्यमातूनच त्यांची ओळख इंडियन असोसिएशन फॉर दि अप्लायन्सेस ऑफ सायन्स या संशोधन शाखेशी झाली. या शाखेद्वारे त्यांना स्वतःचे खाजगी शोध लावण्याची परवानगी मिळाली तिथूनच पुढे सी व्ही रमण यांची शास्त्रज्ञ या क्षेत्राकडे वाटचाल सुरू झाली. १९१७ मध्ये सी वि रमण यांची निवड भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून करण्यात आली.

कलकत्ता विद्यापीठांमधील राजाबाजार विज्ञान महाविद्यालयात आशुतोष मुखर्जी यांनी सी वि रमण यांना विज्ञानाबद्दल असलेली आवड बघून तसेच भौतिकशास्त्राचे असलेले ज्ञान या दोन गोष्टींच्या बळावर त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. पुढे जाऊन सी वी रमण यांच्या रामण प्रभाव या शोधाची ख्याती जगभर झाली.

बेंगलोर मधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये १९३३ साली सी वि रमण यांना पहिले भारतीय संचालक बनण्याचा अधिकार मिळाला. सी वि रमण यांनी बंगलोर मध्ये इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स ची स्थापना केली. शेवटच्या काळामध्ये सी वि रमण त्यांनी १९४८ मध्ये स्थापन केलेल्या रमण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते.

मृत्यू

त्यांच्या आयुष्याचा शेवटच्या काळामध्ये रमण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होते. तसं सी वी रमन यांच्या आयुष्य प्रयोगशाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करण्यामध्ये गेलं. त्यांनी अखेरचा श्वास देखील प्रयोगशाळेमध्ये घेतला. रमण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. २१ नोव्हेंबर १९७० या दिवशी रमण यांचा रुदय विकारामुळेम

 निधन झालं. वयाच्या ८२ व्या वर्षी सी वी रमन यांचे निधन झालं. सी वि रमण यांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण वर्ष विज्ञान क्षेत्रामध्ये व्यतीत केली आणि त्यांच्या अपार कष्टां मुळे त्यांनी भारतासह जगाला विज्ञान क्षेत्रामध्ये एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या याच कार्यामुळे भारतात सी वि रमण यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो.

इतर माहिती

सि व्ही रमण यांचा रमण इफेक्ट म्हणजेच रामण प्रभाव हा प्रयोग संपूर्ण जगभरात नावाजला गेला. ज्यामुळे सी व्हि रमण यांची विज्ञान क्षेत्रामध्ये वाह! वाह!झाली. सी व्हि रमण यांनी वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या योगदानामुळे व लावलेल्या वेगवेगळ्या शोधांमुळे आपल्या भारताला व जगाला भविष्यात प्रगती करण्यासाठी कलाटणी मिळाली.

यामुळे सी व्ही रमण हेदेखील संपूर्ण जगातील महान शास्त्रज्ञांनाच्या यादीमध्ये समाविष्ट झाले. त्यांच्या वैज्ञानिक क्षेत्रातील कार्यामुळे सी व्ही रमण यांना सन्मानित करण्यात आलं. त्यातीलच काही विशेष सन्मान व पुरस्कार म्हणजे १९२४ मध्ये सी व्ही रमण यांना लंडनमधील रॉयल सोसायटीमध्ये सदस्य बनण्याची संधी मिळाली.

२८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी सी वि रमण यांचा रमन इफेक्ट हा शोध संपूर्ण जगामध्ये सादर करण्यात आला. आणि ज्याला पुढे जाऊन संपूर्ण जगभरामध्ये खूप प्रसिद्धी देखील मिळाली. या दिवसाचं भारतामध्ये एक विशेष महत्त्व मानलं जातं. म्हणूनच हा दिवस भारतामधील राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

१९२९ मध्ये विज्ञान काँग्रेसच्या सोळाव्या सत्राराचे अध्यक्ष पद c.v. रमान यांच्याकडे होते. याच वर्षामध्ये सी वि रमण यांना वेगवेगळ्या विद्यापीठाद्वारे त्यांनी लावलेल्या शोधा साठी सन्मानित करण्यात आले होते. १९३० मध्ये रमण यांचा रामन इफेक्ट हा शोध नोबेल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आला होता. व सी वि रमण यांना या शोधा करता नोबेल पुरस्कार देखील जाहीर झाल.

हे पुरस्कार मिळवणारे सी व्ही रमण हे पहिले आशियाई शास्त्रज्ञ होते. भारतामध्ये भारतरत्न हा पुरस्कार सर्वात उत्कृष्ट मानला जातो. १९५४ मध्ये सी वी रमन यांच्या कर्तुत्ववान कार्या साठी भारतरत्न हा पुरस्कार सी व्ही रमण यांना प्रदान करण्यात आला. १९५७ साली सी वि रमण यांनी लेनिन शांतता पुरस्कार देखील पटकावला.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये dr cv raman information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर information of cv raman in marathi म्हणजेच “डॉक्टर सी व्ही रामन यांची माहिती” cv raman info in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या information about scientist cv raman in marathi language या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि raman effect in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “डॉक्टर सी व्ही रामन यांची माहिती CV Raman Information in Marathi”

  1. National Science Day is celebrated in India to commomerate the discovery of Raman effect published globally on 28th Feb 1928. But not as a birthday of Dr C V Raman. Remember Birthday of C V Raman is 7th November 1888. Please kindly requesting to correct information in Marathi medium artical here.
    Thanking you
    SURESH PHALAKE
    A C S College Palus, Dist-Sangli.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!