Dal Dhokli Recipe in Marathi डाळ ढोकळी रेसिपी मराठी डाळ ढोकळी हा पदार्थ एक पारंपारिक पदार्थ आहे. जो आज देखील काही लोक आवडीने बनवून खातात आणि हा एक भारतीय पदार्थ आहे. जो आपण कोणत्याही वेळी बनवून खावू शकतो कारण हा बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपण अगदी सहजपणे घरामध्ये उपलब्ध होते. डाळ ढोकळी हि डाळीच्या आमटी मध्ये कानिकीच्या चकत्या किंवा शंकरपाळ्या सारखा आकार बनवून ते घातले जाते आणि मग ते शिजवले जाते. डाळ ढोकळी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजे ३५ ते ४० मिनिटामध्ये बनू शकते आणि यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असू शकते. चला तर आता आपण डाळ ढोकळी कशी बनवायची ते पाहूयात.

डाळ ढोकली रेसिपी मराठी – Dal Dhokli Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
बनवण्याची पध्दत | सोपी |
पाककला | भारतीय |
डाळ ढोकळी हि डाळीच्या आमटी मध्ये कानिकीच्या चकत्या किंवा शंकरपाळ्या सारखा आकार बनवून ते घातले जाते आणि मग ते शिजवले जाते.
- डाळ : डाळ ढोकळी बनवण्यासाठी आपण तुरीची किंवा मुगाची डाळ वापरू शकतो किंवा दोन्ही डाळी मिक्स करून बनवू शकतो. डाळ ढोकळी बनवण्यासाठी डाळ हा महत्वाचा घटक आहे.
- गव्हाचे पीठ : गव्हाचे पीठ देखील डाळ ढोकळी बनवण्यासाठी महत्वाचे आहे कारण आपण गव्हाच्या पिठाची कणिक बनवून मग त्याची ढोकळी बनवतो आणि मग ती डाळीमध्ये घालतो.
- गुळ : डाळ ढोकळी हि थोडी गोड असते आणि याला गोड बनवण्यासाठी यामध्ये गुळ वापरला जातो.
डाळ ढोकळी रेसिपी – dal dhokli recipe
डाळ ढोकळी हा पदार्थ एक पारंपारिक पदार्थ म्हणजेच हा खूप आधीपासून बनवला जाणारा पदार्थ आहे ज्यामध्ये आता थोडी बदल झाले आहेत. पूर्वी या पदार्थामध्ये जी ढोकळी बनवून टाकली जायची ती गोल चकत्या बनवून टाकल्या जायच्या परंतु आता डाळ ढोकळी बनवताना कानिकीच्या गोळ्याची थोडी जाड चपाती लाटली जाते आणि त्याला शंकरपाळ्या सारखा आकार देवून मग त्या डाळी मध्ये टाकल्या जातात. डाळ ढोकाळी हि बनवण्यासाठी खूप सोपी आणि हि कमी वेळेमध्ये अगदी उत्तम बनते. चला तर आता आपण डाळ ढोकळी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहुयात.
नक्की वाचा: डाळ फ्राय रेसिपी
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
बनवण्यासाठी लागणारा वेळ | १५ ते २० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
बनवण्याची पध्दत | सोपी |
पाककला | भारतीय |
डाळ ढोकळी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकता. चला तर आता आपण डाळ ढोकळी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी गव्हाचे पीठ.
- २ चमचे तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- पाणी ( गरजेनुसार ).
- १ वाटी तुरडाळ.
- २ वाटी पाणी.
- २ ते ३ चमचे तेल.
- १/२ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- ६ ते ७ कडीपत्ता पाने
- टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- २ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा हिंग.
- १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- १ मोठा चमचा गुळ.
- २ ते ३ चमचे चीच कोळ.
डाळ ढोकळी हि पारंपारिक रेसिपी असून हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून आपण डाळ ढोकळी कशी बनवायची ते पाहूयात.
- डाळ ढोकळी बनवताना सर्वप्रथम एका भांड्यामध्ये गव्हाचे पीठ घ्या आणि मीठ आणि तेला घाला आणि पाणी घालून आपण चपातीला जशी कणिक मळतो तशी कणिक मळून घ्या आणि ती १० मिनिटे बाजूला ठेवा.
- आता एका बाऊल मध्ये काढून घेवून त्यामध्ये पाणी घालून ते एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
- नंतर कुकर मध्ये १ वाटी तुरडाळ घाला आणि त्यामध्ये २ वाटी पाणी घाला आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून मध्यम आचेवर ४ शिट्या येई पर्यंत ठेवा आणि मग ते शिजल्यानंतर कुकर बंद करा.
- थोडा वेळाने कुकर गार झाला कि त्याचे झाकण उघडून ती डाळ थोडी रवीने गुसळून घ्या.
- मंद आचेवर गॅस लावून एक भांडे ठेवा त्यात २ ते ३ चमचे तेल घालून त्यामध्ये १/२ चमचा मोहरी घाला.
- मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे घाला आणि मग लगेच यामध्ये हिंग, लाल मिरची पावडर घाला आणि ते मिकास करा आणि त्यामध्ये शिजवलेली डाळ घाला आणि त्यामध्ये आणखीन थोडे पाणी घाला आणि ते चांगले मिक्स करा.
- आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि गुळ घाला आणि त्यामधील गुळ विरघळे पर्यंत हलवत रहा.
- गुळ विरघळे पर्यंत कानिकीचा गोळा बनवा आणि त्याची जाड चपाती लाटून त्याच्या चौकोनी आकारामध्ये वड्या पाडा आणि त्या वड्या डाळीमध्ये घाला आणि मिक्स करून हे मिश्रण मध्यम आचेवर ६ ते ७ मिनिटे शिजवा आणि मग गॅस बंद करा.
- आता हि डाळ ढोकळी सर्व्ह करताना एका बाऊल मध्ये घाला आणि त्यावर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
डाळ ढोकळी रेसिपी कश्यासोबत – serving suggestion
- डाळ ढोकळी आपण तशीच चमच्याने खावू शकतो किंवा मग चपाती सोबत देखील खूप छान लागते.
आम्ही दिलेल्या dal dhokli recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डाळ ढोकळी रेसिपी मराठी gujarati dal dhokli recipe बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dal dhokli recipe in marathi download या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of dal dhokli in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dal dhokli recipe in marathi video Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट