Dal Fry Recipe in Marathi – Dal Fry Marathi Recipe डाळ फ्राय रेसिपी मराठी डाळ फ्राय हा पदार्थ भारतातील एक प्रसिद्ध आमटीचा प्रकार आहे जो तूर डाळ शिजवून त्याला कांदा, लसून, टोमॅटो, तिखट – मीठ आणि इतर मसाल्यांची फोडणी टाकली जाते. डाळ फ्राय हा पदार्थ भारतीय जेवणामध्ये बहुतेकदा असतोच आणि मोठ्या मोठ्या जेवणामध्ये देखील डाळ फ्राय हा पदार्थ अगदी आवर्जून बनवला जातो तसेच आपण जेवाण्यासाठी हॉटेल मध्ये किंवा रेस्टॉरंट मध्ये गेलो तर आपण साध्या पांढऱ्या भाता सोबत किंवा जीरा राईस सोबत आपण डाळ फ्राय ऑर्डर करतो कारण डाळ फ्राय हा प्लेन भातांच्या प्रकाराबरोबर खूप छान लागतो.
डाळ फ्राय हा भारतीय रेस्टॉरंटमध्ये दिला जाणारा सर्वात लोकप्रिय पदार्थ आहे आणि हा पदार्थ लोकप्रिय असण्याचे कारण हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये चवीला अगदी उत्तम बनतो. म्हणूनच आल आपण या लेखामध्ये डाळ फ्राय कसा बनवायचा हे पाहणार आहोत.
डाळ फ्राय रेसिपी मराठी – Dal Fry Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
फोडणीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
डाळ फ्राय म्हणजे काय ?
डाळ फ्राय म्हणजे तूर डाळ शिजवून त्याला कांदे, लसून, टोमॅटो, तिखट – मीठ आणि इतर मसाल्यांची फोडणी टाकली जाते.
डाळ फ्राय रेसिपी – Dal Fry Marathi Recipe
डाळ फ्राय हा पदार्थ एक भारतीय पदार्थ आहे जो आपण प्लेन राईस, जीरा राईस, चपाती यासोबत खावू शकतो आणि डाळ फ्राय हि डिश रेस्टॉरंट मध्ये वारंवार ऑर्डर केली जाणारी डिश आहे. डाळ फ्राय हि रेसिपी घरी बनवण्यासाठी सोपी आहे आणि भारतीय जेवणामध्ये हि डीश आपल्याला बहुतेक वेळा पाहायला मिळते. चला तर मग पाहूयात डाळ फ्राय हा पदार्थ कसा बनवायचा आणि हा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: दाल तडका रेसिपी मराठी
तयारीसाठी लागणारा वेळ | १५ मिनिटे |
फोडणीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
- १ वाटी तुरडाळ.
- २ वाटी पाणी.
- २ ते ३ चमचे तेल किंवा तूप.
- १/२ चमचा मोहरी.
- १/२ चमचा जिरे.
- ६ ते ७ कडीपत्ता पाने
- १ मोठा कांदा ( बारीक चिरलेला ).
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- १ चमचा गरम मसाला.
- २ चमचा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- १/४ चमचा हिंग.
- १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- सर्वप्रथम डाळ एका बाऊल मध्ये काढून घेवून त्यामध्ये पाणी घालून ते एक दोन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
- नंतर कुकर मध्ये १ वाटी तुरडाळ घाला आणि त्यामध्ये २ वाटी पाणी घाला आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून मध्यम आचेवर ४ शिट्या येई पर्यंत ठेवा आणि मग ते शिजल्यानंतर कुकर बंद करा.
- थोडा वेळाने कुकर गार झाला कि त्याचे झाकण उघडून ती डाळ थोडी रवीने गुसळून घ्या.
- मंद आचेवर गॅस लावून त्यावर कढई ठेवा त्यात २ ते ३ चमचे तेल किवा तूप घालून त्यामध्ये १/२ चमचा मोहरी घाला.
- मोहरी तडतडली कि त्यामध्ये जिरे घाला आणि मग त्यामध्ये लगेच १ मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा घाला आणि तो कांदा चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
- त्यानंतर त्यामध्ये आले लसून पेस्ट, कडीपत्ता घाला आणि ते एकत्र करून चांगले भाजून घ्या.
- मग त्यामध्ये हिंग, हळद, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालून ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि मग ते थोडे भाजले कि त्यामध्ये गुसळलेली डाळ घालून ते मिश्रण चांगले मिक्स करीन घ्या ( टीप – जर यामध्ये थोडे पाणी घालण्याची गरज असेल तर थोडे पाणी घालावे ).
- मग त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि ते एकत्र करा आणि त्यावर थोडी चिरलेली कोथिंबीर घालून एक चांगली उकळी आणा.
- तुमचा डाळ फ्राय भातासोबत किंवा चपाती किंवा रोटी सोबत खाण्यासाठी तयार झाला.
डाळ फ्राय कश्यासोबत खातात – serving suggestion
डाळ फ्राय हा पदार्थ आपण रोटी, चपाती, नान, पांढरा भात किंवा जीरा राईस सोबत खावू शकतो.
- नक्की वाचा: डाळ खिचडी रेसिपी मराठी
- डाळ फ्राय मध्ये वापरली जाणारी डाळ हि चांगल्या प्रतीची असावी म्हणजे ती शिजून चांगली मऊ व्हावी आणि शिजवल्यानंतर डाळीचे मिश्रण एक सारखे दिसावे.
- जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही डाळ फ्राय मध्ये फोडणीसाठी तूप देखील वापरले तर चालते.
- डाळ फ्रायला लसणाची चांगली कडक फोडणी द्यावी ज्यामुळे लसणाचा फ्लेवर फ्राय मध्ये चांगला लागेल.
- जर तुम्हाला कांदा आवडत नसेल तर तुम्ही फ्राय मध्ये कांदा घातला नाही तरी चालतो.
खाली आपण घरगुती गरम मसाला कसा बनवायचा याबद्दल माहिती घेणारा आहोत. त्यासाठी खाली साहित्य आणि कृती दिलेली आहे.
साहित्य
- २ ते ३ कांड्या दालचिन.
- ३ ते ४ वेलदोडे.
- १ मसाला वेलदोडा.
- २ बदाम फुल.
- १ तमाल पत्रीचे पान.
- ६ ते ७ चमचा काळी मिरी.
- सर्वप्रथम एक कढई घ्या आणि ती मधयम आचेवर गॅसवर ठेवा मग त्यामध्ये दालचिन, वेलदोडे, बदाम फुल, मसाला वेलदोडे, तमाल पत्रीचे पान, काळी मिरी घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
- भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये गार करा आणि मग ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्या सर्व खड्या मसाल्याची बारीक पूड करून घ्या.
- बारीक पूड केल्यानंतर तो मसाला चाळून घ्या. तुमचा घरगुती गरम मसाला तयार झाला.
आम्ही दिलेल्या dal fry recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर डाळ फ्राय रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dal fry tadka recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dal fry recipe in marathi by archana माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dal recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट