डाळ खिचडी रेसिपी Dal Khichdi Recipe in Marathi

Moong Dal Khichdi Recipe in Marathi डाळ खिचडी रेसिपी मराठी जर तुम्हाला पौष्टिक आणि गरमागरम स्वादिष्ट असा कोणतातरी पदार्थ खावासा वाटत असेल तर डाळ खिचडी हा झटापट बनणारा सर्वात उत्तम पदार्थ आहे. डाळ खिचडीला गरमागरम आणि पौष्टिक म्हणायचे कारण डाळ खिचडी मध्ये मुगाची डाळ जास्त वापरलेली असते आणि मुगाची डाळ पौष्टिक असते आणि खिचडी हि गरम असतानाच चांगली लागते. डाळ खिचडी हा पदार्थ जरी कमी वेळेमध्ये होत असला तरी हा चवीला उत्तम लागणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे. डाळ खिचडी हा पदार्थ भारताच्या बहुतेक संपूर्ण भागामध्ये बनवला जातो पण प्रत्येक भागाची खिचडी बनवण्याची पध्दत हि वेगवेगळी असते.

खिचडी हा पदार्थ आपण दही, लोणचे किंवा कढी सोबत खावू शकतो. आज या लेखामध्ये आपण डाळ खिचडी कशी बनवायची याबद्दल पाहणार आहोत.

dal khichdi recipe in marathi
dal khichdi recipe in marathi

डाळ खिचडी रेसिपी – Dal Khichdi Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाउत्तर भारतीय
वाढणी३ ते ४ व्यक्ती
कॅलरी३६८ कॅलरीज

डाळ खिचडी कशी बनवतात – How to Make Dal Khichdi Recipe in Marathi

डाळ खिचडी हा संपूर्ण भारतामध्ये बनवला जाणारा एक पौष्टिक आणि स्वादिष्ट पदार्थ आहे जो दही किंवा लोणच्या सोबत आपण खाऊ शकतो. खिचडी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि हि कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग पाहूयात खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि खिचडी कशी बनवायची ते.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ मिनिटे
पाककलाउत्तर भारतीय
वाढणी३ ते ४ व्यक्ती
कॅलरी३६८ कॅलरीज

डाळ खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dal khichdi 

खिचडी बनवण्यासाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ हे महत्वाचे साहित्य लागते. त्याचबरोबर खिचडीसाठी लागणारे इतर साहित्य म्हणजे भाज्या, तेल किंवा तूप, आलं लसून पेस्ट यासारखे साहित्य लागते ते आपण खाली पाहू. डाळ खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्याची यादी खाली दिलेली आहे.

डाळ खिचडी बनवण्याची पध्दत पहिली 

  • १ वाटी तांदूळ.
  • ३ वाटी डाळ.
  • १ चमचा हळद.
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • १/२ चमचा जिरे.
  • १/४ चमचा हिंग.
  • १/२ चमचा लाल मिरची पावडर.
  • १ टोमॅटो ( चिरलेला ).
  • १ वाटी गाजर ( चीरलेले ).
  • १ वाटी मटार.
  • १ चमचा हिरवी मिरची पेस्ट.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • १ चमचा तूप.

डाळ खिचडी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dal khichdi 

  • डाळ खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर ते तांदूळ आणि डाळ कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये पाणी घाला आणि तो कुकर मोठ्या आचेवर ठेवा पाण्याला उकळी फुटायला लागली कि त्यामध्ये हळद आणि मीठ घाला आणि कुकरला झाकण लाऊन त्याला ५ ते ६ शिट्ट्या द्या त्यामुळे आपली खिचडी चांगली शिजेल. ( टीप : खिचडी थोडी पातळ असू द्या ).
  • खिचडी चांगली शिजली कि गॅस बंद करा.
  • आता एक कढई गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तूप घाला.
  • तूप गरम झाले कि त्यामध्ये जिरे, हिंग, आलं लसून पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट घाला आणि ते चांगले मिक्स करा आता यामध्ये मटार, गाजर, टोमॅटो घाला आणि ते तुपामध्ये चांगले भाजून घ्या आणि मग त्यामध्ये थोडसी लाल मिरची पावडर घाला आणि मिक्स करा.
  • आता हि फोडणी कुकरमधल्या खिचडीमध्ये घाला आणि मिक्स करून कुकरचे झाकण घालून खिचडीला अनेक शिट्टी द्या त्यामुळे त्यामधील भाज्या चांगल्या शिजतील.
  • तुमची डाळ खिचडी तयार झाली.
  • गरमागरम खिचडी तुपासोबत सर्व्ह करा.

डाळ खिचडी बनवण्याची पध्दत दुसरी 

डाळ खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dal khichdi 

खिचडी बनवण्यासाठी आपल्याला डाळ आणि तांदूळ हे महत्वाचे साहित्य लागते. खाली आपण डाळ खिचडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य सविस्तरपणे पाहूयात.

  • १ वाटी तांदूळ.
  • ३ वाटी डाळ.
  • १ चमचा हळद.
  • २ चमचे आलं लसून पेस्ट.
  • १/२ चमचा जिरे.
  • १/४ चमचा हिंग.
  • १ चमचा हिरवी मिरची पेस्ट.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • १ चमचा तूप

डाळ खिचडी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dal khicahdi 

  • डाळ खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्या.
  • त्यानंतर ते तांदूळ आणि डाळ कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये पाणी घाला आणि तो कुकर मोठ्या आचेवर ठेवा पाण्याला उकळी फुटायला लागली कि त्यामध्ये हळद आणि मीठ घाला आणि कुकरला झाकण लाऊन त्याला ५ ते ६ शिट्ट्या द्या त्यामुळे आपली खिचडी चांगली शिजेल. ( टीप : खिचडी थोडी पातळ असू द्या ).
  • खिचडी चांगली शिजली कि गॅस बंद करा.
  • आता एक कढई गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि कढई गरम झाली कि त्यामध्ये तूप घाला.
  • तूप गरम झाले कि त्यामध्ये जिरे, हिंग, आलं लसून पेस्ट आणि हिरवी मिरची पेस्ट घाला आणि ते चांगले मिक्स करा.
  • आलं लसून पेस्ट आणि मिरची पेस्ट चांगली भाजली कि लगेच गॅस बंद करा.
  • आता हि फोडणी कुकरमधल्या खिचडीमध्ये घाला आणि मिक्स करून कुकरचे झाकण घालून खिचडीला अनेक शिट्टी द्या त्यामुळे त्यामधील भाज्या चांगल्या शिजतील.
  • गरमागरम खिचडी सर्व्ह करा.

खिचडी कश्यासोबत खावी – serving suggestion 

पौष्टिक आणि स्वादिष्ट गरमा गरम खिचडी आपण तूप सोबत खावू शकतो किंवा पापड, काकडीचे किंवा कांद्याच्या कोशिंबीर सोबत, लोणच्यासोबत, दह्यासोबत किंवा कढी सोबत खावू शकतो.

टिप्स ( tips ) 

  • जर आपण डाळ आणि तांदूळ आधी तासभर भिजत घालून मग शिजवा त्यामुळे तांदूळ आणि डाळ चांगली शिजली जाईल.
  • खिचडी गरम असतानाच सर्व्ह करा तो गार झाल्यानंतर चांगली लागत नाही.

आम्ही दिलेल्या dal khichdi recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर योगासन चित्र सहित माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या dal khichadi recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dal khichdi recipe in marathi written माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dal khichdi restaurant style in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!