Dalcha Recipe in Marathi दालचा रेसिपी मराठी दालचा हि एक दक्षिण भारतीय म्हणजे हैद्राबादी डिश आहे जी मोठ्या प्रमाणात हैद्राबाद म्हणाध्ये बनवली जाते आणि तेथील लोक हि डिश आवडीने खातात. दालचा हि रेसिपी हरभरा डाळ, तूर डाळ, मटणाचे तुकडे वापरून बनवली जाते आणि हि रेसिपी भारताचा दक्षिणेकडील भाग सोडला तर भारताच्या इतर भागामध्ये या रेसिपीची तितकी लोकप्रियता नाही परंतु हि रेसिपी आपण एक पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपी म्हणून बनवून खावू शकतो कारण हि रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते.
दालचा बनवताना हरभरा डाळ आणि तूर डाळ मध्ये पाणी घालून ते कुकरमध्ये घातले जाते आणि त्यामध्ये टोमॅटो आणि हळद मिक्स करून कुकरचे झाकण लावून डाळ शिजवून घेतली जाते आणि मग तेलामध्ये कांदा, दुधी आणि इतर साहित्य घालून फोडणी दिली जाते आणि मग त्यामध्ये मटन घालून ते तेलामध्ये थोडावेळ भाजून घेवून ते शिजवले जाते आणि मग त्यामध्ये शिजवलेली डाळ घालून मिक्स करून दालचाला एक उकळी आणली जाते आणि हि रेसिपी गरमागरम सर्व्ह केली जाते. चला तर मग दालचा कसा बनवायचा ते पाहूयात.
दालचा रेसिपी मराठी – Dalcha Recipe in Marathi
दालचा बनवताना हरभरा डाळ आणि तूर डाळ मध्ये पाणी घालून ते कुकरमध्ये घातले जाते आणि त्यामध्ये टोमॅटो आणि हळद मिक्स करून कुकरचे झाकण लावून डाळ शिजवून घेतली जाते आणि मग तेलामध्ये कांदा, दुधी आणि इतर साहित्य घालून फोडणी दिली जाते आणि मग त्यामध्ये मटन घालून ते तेलामध्ये थोडावेळ भाजून घेवून ते शिजवले जाते आणि मग त्यामध्ये शिजवलेली डाळ घालून मिक्स करून दालचाला एक उकळी आणली जाते आणि तो गरमागरम सर्व्ह केला जातो.
- हरभरा डाळ आणि तूर डाळ : हरभरा डाळ आणि तूर डाळ हे दालचा बनवण्यासाठी लागणारे महत्वाचे साहित्य आहे. हरभरा डाळ आणि तूर डाळ मध्ये पाणी घालून ते कुकरमध्ये घातले जाते आणि त्यामध्ये टोमॅटो आणि हळद मिक्स करून कुकरचे झाकण लावून डाळ शिजवून घेतली जाते आणि त्या डाळी दालचा बनवण्यासाठी वापरल्या जातात.
- मटण : दालचा रेसिपी मध्ये मटण देखील वापरले जाते त्यामुळे दालचाला चांगली टेस्ट येते.
दालचा रेसिपी – mutton dalcha recipe
दालचा हि एक भारतीय रेसिपी आहे जी दक्षिण भारतामध्ये म्हणजेच हैद्राबाद मध्ये मोठ्या प्रमाणात बनवली जाते आणि हि एक तिखट रेसिपी आहे जी नॉनव्हेजीटेरियन लोकांच्या एक वेगळी रेसिपी आहे. दालचा रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनते. चला तर मग आता आपण दालचा रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहुयात.
दालचा बनवण्यासाठी हरभरा डाळ, तूर डाळ, मटन, दुधी भोपळा आणि काही इतर साहित्य देखील लागते आणि हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे सर्वच साहित्य आपल्या घरी उपलब्ध असते असे नाही तर ते आपल्याला काही वेळेला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर आता आपण दालचा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- १ वाटी तूर डाळ.
- अर्धी वाटी हरभरा डाळ.
- २ टोमॅटो ( बारीक चिरलेले ).
- १ वाटी दुधी लांबट चिरलेला.
- १ कांदा ( उभा चिरलेला ).
- २ चमचे आले लसून पेस्ट.
- २ चमचे चिंच कोळ.
- पाव किलो मटण ( छोटे छोटे तुकडे ).
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- २ ते ३ हिरव्या मिरच्या ( उब्या चिरलेल्या ).
- १ चमचा गरम मसाला.
- २ तमाल पत्री पाने.
- २ मोठे चमचे तेल.
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
दालचा बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेमध्ये बनतो. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून दालचा कसा बनवायचा ते पाहूयात.
- दालचा बनवताना हरभरा डाळ आणि तूर डाळ मध्ये पाणी घालून ते कुकरमध्ये घातले जाते आणि त्यामध्ये टोमॅटो आणि हळद मिक्स करून कुकरचे झाकण लावून गॅसवर मध्यम आचेवर कुकरला ४ ते ५ शिट्ट्या आणा डाळ शिजवून घ्या.
- आता एक भांडे घ्या आणि ते गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये कांदा आणि आले लसून पेस्ट घाला आणि कांदा घाला आणि थोडा वेळ भाजा.
- मग त्यामध्ये तमाल पत्री पाने, टोमॅटो, हिरव्या आणि दुधी भोपळा घाला आणि ते चांगले भाजा आणि मग त्यामध्ये मटण घाला आणि ते मिक्स करून ९ ते १० मिनिटे भाजून घ्या.
- आणि मग त्यामध्ये लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि ते मिक्स करा आणि मग त्यामध्ये पाणी घाला आणि मटन मध्यम आचेवर मऊ शिजवून घ्या.
- आता त्यामध्ये शिजवलेल्या डाळी थोड्या रवीने गुसळून त्यामध्ये घाला आणि मग त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि चिंच कोळ घालून ते मिक्स करून दालचाला एक उकळी आणा आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
- दालचा रेसिपी सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
आम्ही दिलेल्या dalcha recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर दालचा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chicken dalcha recipe in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि dalcha rice recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये veg dalcha recipe in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट