धिरडे रेसिपी मराठी Dhirde Recipe in Marathi

Dhirde Recipe in Marathi धिरडे रेसिपी मराठी धिरडे हि एक पारंपारिक रेसिपी आहे जी खूप पूर्वीच्या काळापासून बनवली जाते आणि आणि भारतामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये आवडीने बनवली जाते. धिरडे रेसिपी हि अतिशय सोपी रेईपी आहे जी तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, तूर डाळ आणि मुग डाळ हे सर्व मिक्स करून ते गीरनि मधून दळून आणले जाते आणि मग त्यामध्ये लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, आणि काही इतर साहित्य घालून त्यामध्ये पाणी घालून आपण डोसा बनवण्यासाठी जसे बॅटर बनवतो तसे बनवू घेतले जाते आणि मग ते तव्यामध्ये आपण जसा डोसा घालतो तसे घालून तेल सोडून लालसर रंगावर भाजून घेतले जाते.

धिरडे हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळामध्ये म्हणजे २५ ते २० मिनिटामध्ये बनते आणि खूप कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग आता आपण धिरडे रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

dhirde recipe in marathi
dhirde recipe in marathi

धिरडे रेसिपी मराठी – Dhirde Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे

धिरडे कसे बनवतात ?

धिरडे रेसिपी बनवताना तांदूळ, हरभरा डाळ, उडीद डाळ, तूर डाळ आणि मुग डाळ हे सर्व मिक्स करून ते गीरनिमधून दळून आणले जाते आणि मग त्यामध्ये लाल तिखट, मीठ, कोथिंबीर, आणि काही इतर साहित्य घालून त्यामध्ये पाणी घालून आपण डोसा बनवण्यासाठी जसे बॅटर बनवतो तसे बनवू घेतले जाते आणि मग ते तव्यामध्ये आपण जसा डोसा घालतो तसे घालून तेल सोडून लालसर रंगावर भाजून घेतले जाते.

धिरडे बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • तांदूळ आणि डाळी : धिरडे बनवण्यासाठी तांदूळ आणि डाळी हे महत्वाचे साहित्य लागते. हे सर्व साहित्य गिरणीमधून दळून आणून त्याचे पीठ बनवले जाते आणि हे पीठ जास्त बनवून ठेवू आपल्याला जेंव्हा हवे तेंव्हा त्याचे बॅटर बनवून धिरडे बनवू शकतो.
  • लाल तिखट : धिरडे बनवायच्या मिश्रणामध्ये लाल तिखट वापरल्यामुळे रेसिपीला तिखट पणा येतो.

धिरडे रेसिपी – dhirde recipe 

धिरडे रेसिपी हि पारंपारिक रेसिपी असून हि महाराष्ट्राबरोबर देशाच्या काही इतर भागामध्ये देखील बनवून खाल्ली जाते आणि जर तुम्ही हि रेसिपी तुमच्या घरामध्ये बनवून खायला घातली तर ती सर्वांना आवडेल देखील. धिरडे रेसिपी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण धिरडे रेसिपी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

तयारीसाठी लागणारा वेळ१० मिनिटे
बनवण्यासाठी लागणारा वेळ१५ ते २० मिनिटे
एकूण लागणारा वेळ२५ ते ३० मिनिटे

धिरडे रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dhirde recipe 

धिरडे रेसिपी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते शक्यतो आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्ध असते आणि जर नसेल तर ते आपण बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर मग आता आपण धिरडे रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात.

पीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

  • ३ ते ४ मोठी वाटी तांदूळ.
  • १ वाटी हरभरा डाळ.
  • अर्धी वाटी उडीद डाळ.
  • अर्धी वाटी तूर डाळ.
  • अर्धी वाटी मुग डाळ.
  • १ चमचा धणे.
  • १/२ चमचा जिरे.

बॅटर बनवण्यासाठी लागणारे साहित्य 

  • २ वाटी बनवलेले मिक्स पीठ.
  • १ चमचा लाल मिरची पावडर.
  • १/३ चमचा हळद.
  • २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).

धिरडे रेसिपी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dhirde recipe 

धिरडे रेसिपी पूर्वीच्या काळी खूप बनवून खाल्ली जायचं परंतु सध्या त्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे तरी देखील ग्रामीण भागामध्ये अजूनही तितक्याच प्रेमाने आणि आवडीने बनवून खाल्ली जाते. धिरडे हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि झटपट बनते त्यामुळे हि रेसीपी आपण सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकतो. चला तर मग वर दिलेले साहित्य वापरून धिरडे रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात.

पहिली कृती : धिरडे बनवण्यासाठी लागणारे पीठ कसे बनवायचे ते पाहूयात.

  • धिरडे बनवण्यासाठी लागणारे पीठ बनवताना सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून ते उन्हामध्ये चांगले कोरडे होईपर्यंत वाळवून घ्या.
  • मग त्या वाळलेल्या तांदळामध्ये, हरभरा डाळ, उडीद डाळ, तूर डाळ, मुग डाळ, धणे आणि जिरे मिक्स करा आणि ते गिरणीमधून बारीक दळून आणा.
  • हे पीठ तुम्ही २ ते ३ महिने हवा बंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता.

दुसरी कृती : धिरडे कसे बनवायचे ते पाहूयात.

  • धिरडे बनवताना सर्वप्रथम २ वाटी पीठ भांड्यामध्ये घ्यावे आणि मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालावे आणि त्याचे डोस्याला बनवतो तसे बॅटर बनवून घेतले जाते परंतु हे थोडे पातळ असते.
  • ते मिश्रण झाकण लावून १० मिनिटे बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर एक नॉनस्टिक तवा ठेवा आणि तो गरम होऊ द्या.
  • आता ते पीठाचे मिश्रण खोलगट चमच्याने चांगले हलवून घ्या आणि मग त्याच चमच्याने ते तव्यावर घाला आणि हळुवार पणे आपण डोसा जसा पसरवतो तसे पसरवा. ( हि प्रक्रिया करताना गॅस आच मंद करा ).
  • आता गॅसची आच मध्यम करून तेल सोडून ते लालसर रंगावर दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • अश्या प्रकारे सर्व धिरडे बनवून घ्या.
  • धिरडे सर्व्ह करण्यासाठी तयार झाले

धिरडे कश्या सोबत सर्व्ह करावे – serving suggestion

  • धिरडे आपण हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या घट्ट चटणी सोबत खावू शकतो.

आम्ही दिलेल्या dhirde recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर धिरडे रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या yoga information in marathi language pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि gavhache dhirde recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bhagar dhirde recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!