डोसा रेसिपी मराठी Dosa Recipe in Marathi

Dosa Recipe in Marathi – Rava Dosa Recipe in Marathi डोसा रेसिपी मराठी आपण रोज काही तरी वेगवेगळ्या डिशेश नाश्त्यामध्ये बनवून खात असतो आणि त्यामधील एक लोकप्रिय नाश्ता म्हणून प्रसिध्द असलेली डिश म्हणजे डोसा रेसिपी. डोसा रेसिपी हि जर दक्षिण भारतीय डिश असून देखील हा पदार्थ भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अगदी आवडीने बनवला जातो आणि आनंदाने खाल्ला देखील जातो. डोसा हा पदार्थ काही लोक नाश्ता म्हणून बनवतात तर भारतामधील काही लोक रात्रीच्या जेवणासाठी देखील डोसा बनवतात. डोसा बनवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत कारण डोसा बनवणे अगदी सोपे आहे.

आणि जरी हि डिश बनवण्यासाठी सोपी असली तरी ही खूप स्वादिष्ट असते. तांदूळ, उडीद डाळ, पोहे, शाबु आणि इतर डाळींच्या पासून बनलेला हा कुरकुरीत आणि खमंग डोसा सांबर, खोबऱ्याच्या चटणी सोबत आणि बटाट्याच्या भाजी सोबत खूप मस्त लागतो.

डोसा बॅटरची विशेषता महणजे आपण एक प्रकारचा डोसा बनवण्यासाठी केलेल्या डोसा बॅटरचे वेगवेगळे प्रकार करू शकतो जसे किं साधा डोसा, लोणी डोसा, पेपर डोसा आणि मसाला डोसा इत्यादिं.

dosa recipe in marathi
dosa recipe in marathi

डोसा रेसिपी मराठी – Dosa Recipe in Marathi

डोसा कसा बनवतात – how to make rava dosa recipe in marathi

डोसा रेसिपी हि जरी दक्षिण भारतीय डिश असली तरी भारतामध्ये हा पदार्थ लोक खूप आवडीने बनवतात आणि खातात देखील म्हणूनच या लेखामध्ये आपण दक्षिण भारतीय डोसा कसा बनवला जातो आणि तो बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहणार आहोत.

डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make dosa 

डोसा बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते आपल्या घरामध्ये सहजपणे उपलब्द असू शकते त्यामुळे आपल्याला जेंव्हा डोसा हवा आहे तेंव्हा डोसा बनवून खावू शकतो. आता आपण डोसा बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ वाटी तांदूळ.
  • १ वाटी उडीद डाळ.
  • १/२ चमचा मेथी दाने.
  • १ मोठा चमचा पोहे ( मुठभर ).
  • १ मोठा चमचा शाबु.
  • १ मोठा चमचा हरभरा डाळ.
  • १ मोठा चमचा तूर डाळ.
  • १ मोठा चमचा मुग डाळ.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).

डोसा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make dosa 

वरती जी साहित्याची यादी दिलेली आहे त्या साहित्यापासून घरगुती पध्दतीने डोसा कसा बनवावा याबद्दल आता आपण पाहूयात.

  • सर्वप्रथम डोश्यासाठी लागणारे तांदूळ आणि सर्व डाळी मापून घ्या आणि त्या चांगल्या निवडा.
  • त्यानंतर ते स्वच्छ निवडल्यानंतर तांदूळ, सर्व डाळी, पोहे, मेथी दाने आणि शाबु एका खोल भांड्यामध्ये एकत्र घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून त्या स्वच्छ धुवून त्यामधील पाणी काढून घ्या.
  • मग त्यामध्ये तांदूळ आणि डाळी पाण्यामध्ये चांगल्या बुडतील असे स्वच्छ पाणी घाला आणि त्यावर झाकण घालून ते मिश्रण ६ ते ७ तास चांगले भिजू द्या.
  • ६ ते ७ तासानंतर ते चांगले भिजल्यानंतर त्यातील थोडे थोडे मिश्रण मिक्सर भांड्यामध्ये घालून ते चांगले फिरवून घ्या आणि त्याचे बारीक बॅटर बनवून घ्या आणि हे बॅटर एका हवा बंद डब्यामध्ये झाकून ठेवा.
  • हे मिक्सरवर वाटलेले बॅटर ५ ते ६ तास भिजवा त्यामुळे ते चांगले फसफसून येईल.
  • ५ ते ६ तासांनी हे पीठ चांगले हलवून मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये मीठ ( चवीनुसार ) घालून ते बॅटर चांगले एकत्र करून घ्या.
  • मग आता गॅसवर मोठ्या आचेवर डोसा तवा गरम करण्यासाठी ठेवा एकदा तवा तापला की गॅसची आच मध्यम करा आणि मग डोसा बॅटर चमच्याने तव्याच्या मध्यभागी घाला आणि ते चमच्याच्या सहाय्याने गोल फिरवून त्याची जाडी कमी करून गोल मोठा डोसा करा आणि त्याच्या भोवतीने चमच्याने तेल सोडा आणि ते कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत भाजा.
  • तुमचा डोसा खाण्यासाठी तयार झाला.

मसाला डोसा रेसिपी मराठी – how to make masala dosa in marathi 

आता आपण मसाला डोसा कसा बनवायचा आणि ते बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात.

मसाला डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make masala dosa 

  • ३ वाटी तांदूळ.
  • १ वाटी उडीद डाळ.
  • १/२ चमचा मेथी दाने.
  • लसून चटणी.
  • बटाट्याची भाजी.

मसाला डोसा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make masala dosa 

  • सर्वप्रथम डोश्यासाठी लागणारे तांदूळ आणि उडीद डाळ मापून घ्या आणि ते चांगले निवडा.
  • त्यानंतर ते स्वच्छ निवडल्यानंतर तांदूळ, डाळ आणि मेथी दाने एका खोल भांड्यामध्ये एकत्र घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून त्या स्वच्छ धुवून त्यामधील पाणी काढून घ्या.
  • मग त्यामध्ये तांदूळ आणि डाळ पाण्यामध्ये चांगल्या बुडतील असे स्वच्छ पाणी घाला आणि त्यावर झाकण घालून ते मिश्रण ६ ते ७ तास चांगले भिजू द्या.
  • ६ ते ७ तासानंतर ते चांगले भिजल्यानंतर त्यातील थोडे थोडे मिश्रण मिक्सर भांड्यामध्ये घालून ते चांगले मिक्सरवर फिरवून घ्या आणि त्याचे बारीक बॅटर बनवून घ्या आणि हे बॅटर एका हवा बंद डब्यामध्ये झाकून ठेवा.
  • हे मिक्सरवर वाटलेले बॅटर ५ ते ६ तास भिजवा त्यामुळे ते चांगले फसफसून येईल.
  • मग त्यामध्ये मीठ घालून ते चांगले एकजीव करून घ्या.
  • मग आता गॅसवर मोठ्या आचेवर डोसा तवा गरम करण्यासाठी ठेवा एकदा तवा तापला की गॅसची आच मध्यम करा आणि मग डोसा बॅटर चमच्याने तव्याच्या मध्यभागी घाला आणि ते चमच्याच्या सहाय्याने गोल फिरवून त्याची जाडी कमी करून गोल मोठा डोसा करा आणि मग त्यावर लसून चटणी पसरा आणि मग बटाट्याची भाजी पसरा आणि त्याचा गोल रोल करा.
  • तुमचा मसाला डोसा तयार झाला.

लोणी डोसा कसा बनवायचा – how to make loni dosa in marathi 

आता आपण पाहूयात लोणी डोसा कसा बनवायचा आणि बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.

लोणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make loni dosa 

  • २ वाटी तांदूळ.
  • १/२ वाटी उडीद डाळ.
  • १/२ वाटी पोहे.
  • १ मोठा चमचा शाबु.
  • १/२ चमचा मेथी दाने.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • लोणी ( आवश्यकतेनुसार ).

लोणी डोसा बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make loni dosa 

  • सर्वप्रथम डोश्यासाठी लागणारे तांदूळ, शाबु, पोहे आणि उडीद डाळ मापून घ्या आणि ते चांगले निवडा.
  • त्यानंतर ते स्वच्छ निवडल्यानंतर तांदूळ, डाळ, शाबु आणि मेथी दाने एका खोल भांड्यामध्ये एकत्र घ्या आणि त्यामध्ये पाणी घालून त्या स्वच्छ धुवून त्यामधील पाणी काढून घ्या.
  • मग त्यामध्ये तांदूळ, डाळ, शाबु आणि पोहे पाण्यामध्ये चांगल्या बुडतील असे स्वच्छ पाणी घाला आणि त्यावर झाकण घालून ते मिश्रण ६ ते ७ तास चांगले भिजू द्या.
  • ६ ते ७ तासानंतर ते चांगले भिजल्यानंतर त्यातील थोडे थोडे मिश्रण मिक्सर भांड्यामध्ये घालून ते चांगले मिक्सरवर फिरवून घ्या आणि त्याचे बारीक बॅटर बनवून घ्या आणि हे बॅटर एका हवा बंद डब्यामध्ये झाकून ठेवा.
  • हे मिक्सरवर वाटलेले बॅटर ५ ते ६ तास भिजवा त्यामुळे ते चांगले फसफसून येईल.
  • आता या बॅटर मध्ये मीठ घालून ते चांगले एकजीव करून घ्या आणि मग तवा गॅसवर गरम करून त्यावर चमच्याने बॅटर घालून त्यावरून चमचा फिरवा.
  • लोणी डोसा हा जाडच असतो त्यामुळे त्यावर जास्त वेळ चमचा फिरवू नका.
  • डोसा जाडच बनवा आणि तो थोडा भाजत आला कि त्याला एक चमचा लोणी लावा आणि तो चांगला भाजून घ्या.

डोसा कश्यासोबत खाल्ला जातो – serving ideas 

आपण साधा डोसा, मसाला डोसा आणि लोणी डोसा सांबर, बटाट्याची भाजी आणि खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकतो.

आम्ही दिलेल्या dosa recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर डोसा रेसिपी मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Rava Dosa Recipe in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि masala dosa recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dosa kasa banvaycha Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!