Disaster Management Act 2005 in Marathi PDF आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ विषयी माहिती आज आपण या लेखामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ या विषयावर माहिती घेणार आहोत. आपला भारत देश हा अनेक सुंदर गोष्टींनी आणि विविधतेने जरी नटला असला असला तरी भारतामध्ये अनेक प्रकारची नैसर्गिक संकटे येतात तसेच अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते जसे कि महापूर, दुष्काळ, सुनामी. ज्यावेळी २००४ मध्ये देशामध्ये सुनामीचे सावट आले होते त्यावेळी त्या सुनामिमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले होते तसेच देशातील अनेक भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी याचा विचार करून २६ डिसेंबर २००५ या दिवशी संपूर्ण देशामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हा कायदा लागू केला.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ लागू करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश हा आपत्तीचे व्यवस्थापन करणे, शमन धोरणे तयार करणे तसेच लोकांची क्षमता वाढवणे असे अनेक वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्यासाठी लोकांना तयार केले जाते. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हि एक नोडल एजन्सी आहे जी आपत्ती व्यवस्थापनासाठी धोरणे ठरवण्याचे आदेश धारण करते आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करतात. या कायद्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी सारख्या अपत्कालिक प्रतिसादासाठी निधी निर्माण करण्यासह आर्थिक यंत्रणेसाठी तरतूद आहेत.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ विषयी माहिती – Disaster Management Act 2005 in Marathi PDF
कायद्याचे नाव | आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ |
केंव्हा सुरु केला | २६ डिसेंबर २००४ |
मुख्य हेतू | आपत्तीचे व्यवस्थापन करणे, शमन धोरणे तयार करणे तसेच लोकांची क्षमता वाढवणे |
कामे कोण पाहते | राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काम करतात |
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ म्हणजे काय ?
भारतामध्ये अनेक प्रकारची नैसर्गिक संकटे येतात तसेच अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते जसे कि महापूर, दुष्काळ, सुनामी. ज्यावेळी २००४ मध्ये देशामध्ये सुनामीचे सावट आले होते त्यावेळी त्या सुनामिमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले होते तसेच देशातील अनेक भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यावेळी याचा विचार करून २६ डिसेंबर २००५ या दिवशी संपूर्ण देश्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हा कायदा लागू केला.
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कायद्याचे मुख्य उद्देश – disaster management act 2005 pdf
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हा कायदा सुरु करण्यापाठीमागे काही कारणे किंवा उदिष्ट आहेत आणि ती उदिष्टे आपण खाली पाहूयात.
- आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा मुख्य हेतू हा आपत्तीचे व्यवस्थापन करणे.
- कोणत्याही ठिकाणच्या आपत्ती परिस्थितीला लगेच प्रतिसाद देणे.
- निर्वासन करणे, बचत आणि आपत्ती मध्ये अडकलेल्या लोकांना मदत करणे.
- कोणत्याही आपत्तीचा धोखा कमी करणे.
- तसेच कोणत्याही प्रकारच्या आपत्तीला तोंड देण्याची तयारीची भावना लोकांच्या मनामध्ये वाढवणे तसेच लोकांची क्षमता वाढवणे.
- तसेच कोणत्याही आपत्तीचा धोखा, तीव्रता आणि परिणाम कमी होण्यासाठी काही उपाय योजना शोधणे आणि त्या लागू करणे.
- आपत्ती मुले जे लोक बेघर किंवा इतर समस्यांचा सामना करत आहेत अश्या लोकांचे पुनर्वसन आणि पुनर्रचना करणे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन झाल्यास केल्या जाणाऱ्या शिक्षा
आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ हा कायदा देशातील विविध भागामध्ये नैसर्गिक आपत्ती पासून होणाऱ्या नुकसानाचा धोका किंवा तीव्रता कमी करण्यासाठी सुरु केला आहे तसेच या कायद्याद्वारे जे लोक आपत्ती मध्ये सापडले आहेत अश्या लोकांना मदत केली जाते तसेच बच्चव कार्य देखील केले जाते. केंद्र सरकार आपत्ती व्यवस्थापनात मदत आणि योगदान देण्यासाठी भारतात कोठेही आणि कोणत्याही प्राधिकरणाला सूचन देते आणि यामध्ये जर एखाद्या प्राधिकरणाने या कायद्याचे उल्लंघन केल्यास शिक्षा होऊ शकते.
- कलम ५१ प्रमाणे जर कोणत्याही व्यक्तीने किंवा संस्थेने आदेशाचे पालन करण्यास नकार दिला किंवा अयशस्वी झाला तर त्याला एक वर्षापर्यंत कारावास होऊ शकतो किंवा दंड होऊ शकते.
- आपत्ती व्यवस्थापन या कायद्यामध्ये ७९ कलमे आणि ११ प्रकाराने आहेत आणि या कायद्यामधील १० अध्याय गुन्हा आणि दंड यांच्या संबधित आहे.
- अनुच्छेद ५२ मध्ये जर कोणत्याही व्यक्तीने मदतीचा लाभ मिळवण्यासाठी खोटे दावे केलेल्या व्यक्तीला दोन वर्षाचा तुरुंगवास आणि दंड केला जातो.
- कायद्यातील ५२ आणि ५४ या दोन कलमांना अलीकडच्या काळामध्ये महत्व प्राप्त झाले आणि हे भयानक पणे पसरलेल्या कोविड मुळे झाले.
- कलम ५४ नुसार आपत्तीच्या तीव्रतेबद्दल किंवा वाढत्या परिणामांच्याबद्दल खोटी माहिती प्रसारित करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगवास किंवा दंडाची तरतूद या कायद्यामध्ये आहे.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेली प्रशासकीय मंडळे
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती ज्याला NDMA असे देखील म्हणातले जाते हि आपत्ती व्यवस्थापन समन्वयासाठी नोडल केंद्रीय संस्था आहे ज्या संस्थेचे अध्यक्ष प्रधानमंत्री असतात. हि संस्था किंवा समिती कोणत्याही आपत्तीच्या काळामध्ये प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासाठी धोरणे, मार्गदर्शन तत्वे, योजना तयार करण्याची मुख्य जबाबदारी हि या समिती कडे असते.
- राज्य आणि जिल्हा स्तरावर SDMA आणि NDMA या संस्था काम करतात आणि या संस्था जिल्ह्यासाठी आपत्ती योजना तयार करण्यासाठी जबाबदार असतात.
- राष्ट्रीय कार्यकारी समिती किंवा NEC जी NDMA ला मदत करते आणि संपूर्ण देशासाठीरास्त्रीय व्यवस्थापन योजना तयार करते.
- राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल ( NDRF ) हे थेट धोकादायक अपतींना प्रतिसाद देते आणि हि समिती अनेक वर्षापासून लोकांना आपत्तीपासून वाचवण्यासाठी मदत करते.
आम्ही दिलेल्या disaster management act 2005 in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या disaster management act 2005 pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि disaster management act 2005 ppt माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये disaster management act 2005 pdf in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट