Apatti Vyavasthapan Information in Marathi Pdf – Disaster Management Information in Marathi आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती आपत्ती म्हणजे नैसर्गिक अपघातातुल मानवाने होणारे आर्थिक, सामाजिक आणि जीवित नुकसान होय. नैसर्गिक अपघातांमुळे होणारे नुकसान हे भरून न काढता येणारे नुकसान असते आणि त्यामुळे जर आपल्याला या नैसर्गिक अपघातापासून मालमत्तेचे होणारे नुकसान रोखायचे असल्यास आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे असते. आपण अनेक नैसर्गिक धोक्यांना (पूर, त्सुनामी, वादळ) येण्यापासून रोखू शकत नाही परंतु योग्य व्यवस्थापनाद्वारे त्यापासून होणारे हानिकारक परिणाम कमी करू शकतो.
या आपत्ती व्यवस्थापनामुळे होणारे जीवित आणि मालमत्तेचे नुकसान कमी करता येईल. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्तीच्या आधी केलेले व्यवस्थापन, आपत्ती दरम्यान केलेले व्यवस्थापन आणि नंतरच्या व्यवस्थापनाचा असू शकतो. आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक अपघात किंवा मानावांमुळे झालेली आपत्ती या पासून होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी केलेले व्यवस्थापन म्हणजे आपत्ती व्यवस्थापन.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन माहिती – Apatti Vyavasthapan Information in Marathi Pdf
आपत्ती म्हणजे काय ?
आपत्ती म्हणजे नैसर्गिक अपघातांमुळे किंवा मानवानिर्मित आपत्तीमुळे झालेले आर्थिक, जीवित आणि सामाजिक नुकसान म्हणजे आपत्ती होय.
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ?
- आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक अपघात किंवा मानावांमुळे झालेली आपत्ती या पासून होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी केलेले व्यवस्थापन म्हणजे आपत्ती व्यवस्थापन.
- आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे सरळ अर्थात सांगायचे म्हंटले तर आपत्तीनंतरचे परिणाम कमी करण्यासाठी विविध पावले उचलणे, प्रभावी प्रतिसाद प्रणालीचे नियोजन करणे, आपत्तीप्रवण समाज तयार करणे आणि पुनर्वसनाचे नियोजन करणे.
- नक्की वाचा: भूकंप बद्दल माहिती
आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्टे – objectives of disaster management
आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश हा धोक्यांमुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे किंवा टाळणे, तसेच आपत्तीग्रस्तांना त्वरित आणि योग्य मदत देणे आणि जलद आणि प्रभावी पुनर्प्राप्ती साध्य करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचे तीन टप्पे
आपण अनेक नैसर्गिक धोक्यांना (पूर, त्सुनामी, वादळ) येण्यापासून रोखू शकत नाही परंतु योग्य व्यवस्थापनाद्वारे त्यापासून होणारे हानिकारक परिणाम कमी करू शकतो आणि हे व्यवस्थापन तीन टप्प्यांमध्ये केले आहे ते म्हणजे आधी केलेले व्यवस्थापन, आपत्ती दरम्यान केलेले व्यवस्थापन आणि नंतरच्या व्यवस्थापनाचा समावेश असू शकतो.
आपत्ती पूर्व किंवा आधी केलेले व्यवस्थापन – Pre disaster management
आपत्ती पूर्व व्यवस्थापन म्हणजे आपण जे आपत्ती येण्यापूर्वी जे व्यवस्थापन करतो त्याला आपत्ती पूर्व व्यवस्थापन म्हणतात. या व्यवस्थापनामध्ये कोणतीही आपत्ती येण्यापूर्वी बचाव संबधित काही कारवाई करणे. या व्यवस्थापनामध्ये आवश्यक कारवाईसाठी संसाधनाची जमवाजमव, आपत्तीचे मूल्यांकन आणि चेतावणी जारी करणे आवश्यक कारवाईसाठी संसाधनाची जमवाजमव, आपत्तीचे मूल्यांकन आणि चेतावणी जारी करणे आणि लोकांना आपत्तीच्या वेळी सुरक्षित ठिकाणी नेणे.
आपत्ती दरम्यानचे व्यवस्थापन – Management during disaster
हे व्यवस्थापन आपत्ती काळामध्ये केले जाते आणि हे एक महत्वाचे व्यवस्थापन आहे जे पूर्णपणे आपत्ती पूर्व व्यवस्थापनावर अवलंबून असते. या व्यवस्थापनामध्ये दुष्काळ काळातील लोकांना, पुरामध्ये अडकलेल्या लोकांना मदत केली जाते. तसेच या काळामध्ये लोकांना अन्न, वस्त्र आणि निवारा देखील पुरवला जातो.
आपत्ती नंतरचे व्यवस्थापन – Post disaster management
आपत्ती नंतरच्या व्यवस्थापनामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे जर लोकांचे नुकसान झाले असेल तर त्यांना सरकार कडून नुकसान भरपाई दिली जाते तसेच आपत्तीमुळे काही क्षेत्रांची मोडतोड किंवा नुकसान झाले असेल तर त्या ठिकाणाचा पुनर्विकास करणे किंवा पुनर्बांधणी करणे.
- नक्की वाचा: ज्वालामुखी बद्दल माहिती
आपत्तीचे प्रकार कोणते ?
आपत्ती हि २ प्रकारे होऊ शकते ती म्हणजे मानवी आपत्ती आणि नैसर्गिक आपत्ती.
नैसर्गिक आपत्ती – Naisargik Apatti Information in Marathi
नैसर्गिक आपत्ती म्हणजे नैसर्गिक अपघातातून किंवा नैसर्गिक कारणामुळे जी जीवित हानी, आर्थिक नुकसान किंवा सामाजिक नुकसान होते त्याला नैसर्गिक आपत्ती म्हणतात. नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर, दुष्काळ (कोरडा दुष्काळा किंवा ओला दुष्काळ), वादळ, सुनामी, भूकंप या सारख्या अनेक नैसर्गिक अपघातांना मनुष्याला सामोरे जावे लागते.
नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही पण त्यापासून होणारे परिणाम आपण कमी करू शकतो. उदा : पुरामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होते कारण जर एखाद्या शेतकऱ्याचे शेत जर नदी जवळ असले तर पूर काळामध्ये त्या शेतामध्ये पानी जावून त्या शेतातील पिक मात्रे होते त्यामुळे यामध्ये शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होते तसेच त्याचे शेतामध्ये केलेले कष्ट देखील वाया जातात.
मानव निर्मित आपत्ती म्हणजे मानवामुळे होणारे आर्थिक, जीवित आणि सामाजिक नुकसान म्हणजे मानवनिर्मित आपत्ती. मानवनिर्मित अपतीचे उदाहरण सांगायचे म्हंटले तर दशहतवाद आणि कोरोना हि मानवनिर्मित आपत्तीची उत्तम उदाहरणे आहेत. कारण मुंबईमध्ये ताज हॉटेल वर २६ नोव्हेंबर २००८ मध्ये काही दशहतवाद्यांनी जो हल्ला केला होता त्यामुळे त्यावेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाली होती तसेच जीवित हानी देखील झाली होती.
त्याचबरोबर सध्या चर्चेत असणारा कोरोना हा रोग देखील मानव निर्मित आहे आणि या रोगामुळे खूप लोकांना आपले प्राण गमवावे लागले तसेच लोक घरी बसून राहिल्यामुळे लोकांचे आर्थिक नुकसान झाले आणि यामुळे लोकांना सामाजिक त्रास देखील झाला.
आपत्ती काळामध्ये केली जाणारी मदत
- आपत्ती काळामध्ये लोकांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करणे (पूरग्रस्त लोकांचे स्थलांतर केले जाते).
- महत्वाच्या सेवांची दुरुस्ती करणे उदा – दूरसंचार, वाहतूक.
- आपत्ती काळामध्ये अन्न, वस्त्र आणि निवारा पुरवणे.
- आपत्ती काळामध्ये बचाव कार्य करणे.
आपत्ती पुनर्प्राप्ती कशी केली जाते
सुरुवातीचे संकट संपल्यानंतर बऱ्याचदा समुदायाची असुरक्षा कायम राहते. आपत्ती पुनर्प्राप्ती मध्ये जे लोक आपत्ती परिणामांना सामोरे गेले आहेत आणि ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनामदत करण्यासाठी तत्काळ मदतीच्या तरतुदीच्या पलीकडे जातात.
- पायाभूत सुविधांची पुनर्बांधणी करणे उदा. घरे, शाळा, रुग्णालये आणि रस्ते.
- आरोग्य सेवा आणि पुनर्वसन करणे.
- विकास उपक्रम उदा. आरोग्यासाठी मानवी संसाधने तयार करणे.
- भविष्यात तत्सम परिस्थिती टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी विकास धोरणे आणि पद्धती तयार करणे.
- नक्की वाचा: महापुरा बद्दल माहिती
आपत्ती व्यवस्थापनाबद्दल काही महत्वाची तथ्ये – facts about disaster management
- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हे व्यवस्थापनासाठी धोरणे, योजना आणि मार्गदर्शक तत्त्वे मांडण्यासाठी आणि आपत्तीला अतिशय वेळेवर आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी” जबाबदार आहे.
- आपत्ती ह्या दोन प्रकारच्या असतात नैसर्गिक आपत्ती आणि मानव निर्मित.
- आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे सरळ अर्थात सांगायचे म्हंटले तर आपत्तीनंतरचे परिणाम कमी करण्यासाठी विविध पावले उचलणे, प्रभावी प्रतिसाद प्रणालीचे नियोजन करणे, आपत्तीप्रवण समाज तयार करणे आणि पुनर्वसनाचे नियोजन करणे.
- आपत्ती व्यवस्थापनाचे तीन टप्पे आहेत ते म्हणजे आधी केलेले व्यवस्थापन, आपत्ती दरम्यान केलेले व्यवस्थापन आणि नंतरच्या व्यवस्थापनाचा समावेश असू शकतो.
- नैसर्गिक अपघातापासून मालमत्तेचे होणारे नुकसान रोखायचे असल्यास आपत्ती व्यवस्थापन करणे गरजेचे असते.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये apatti vyavasthapan information in marathi pdf काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर disaster management information in marathi म्हणजेच “नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन माहिती” naisargik apatti information in marathi pdf यांबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या apatti vyavasthapan project in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि disaster management meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट