Essay On Banana in Marathi केळ या फळावर निबंध वेगवेगळ्या फळांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आवश्यक पोषक घटक असतात आणि जर आपण वेगवेगळ्या प्रकारची फळे रोज खाल्ली तर आपले आरोग्य निरोगी राहते तसेच आपली प्रतिकार शक्ती निरोगी राहण्यास मदत होते. तसेच केळ या फळामध्ये देखील अनेक पौष्टिक घटक असतात आणि ते रोज खाल्ल्यामुळे आपल्याला हे फळ खूप फायदेशीर ठरू शकते. आता आपण केळ या फळावर निबंध लिहणार आहोत.
केळ हे एक वरून पिवळ्या रंगाचे आणि साल काढल्यानंतर ते पांढऱ्या रंगाचे लांबट फळ आहे आणि हे एक गोड आणि स्वादिष्ट फळ आहे ज्यामध्ये जीवनसत्व बी, जीवनसत्व ए, जीवनसत्व सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि लोह यासारखे घटक असतात. तसेच केळ या फळाची शेती हि उष्ण भागामध्ये केलेली पाहायला मिळते कारण हे एक उष्ण कटीबंधीय फळ आहे म्हणजेच हे फळ उष्ण आणि दमट हवामानामध्ये वाढते.
न पिकलेली जी केळी असतात त्याचा रंग हा हिरवा असतो आणि ती जस जशी पिकातील तसा त्यांचा पिवळा रंग होत जातो. केळ या फळाचे तसे अनेक फायदे आहेत हे फळ झटपट उर्जेचे स्तोत्र म्हणून खाल्ले जाते तसेच उच्च रक्तदाब आणि रक्तदाब यासारखे आजार कमी होतात. आणि केळ खाल्ल्यामुळे हाडे देखील मजबूत होतात. केळ खाल्ल्यामुळे होणारे अनेक फायदे आपण सविस्तरपणे खाली पाहूच.
केळ हे फळ उष्णकटिबंधीय प्रदेशमध्ये पिकवले जाणारे मूसा वंशाचे आणि Musaceae कुटुंबातील एक फळ आहे. काही बागायतदार मानतात की केळी हे पृथ्वीवरील पहिले फळ होते आणि या फळाचे मूळ दक्षिणपूर्व आशियात, मलेसीसच्या जंगलात आढळले होते. चौदाव्या शतकाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय पातळीवर केळीची विक्री होऊ लागली.
केळ या फळावर निबंध – Essay On Banana in Marathi
Banana essay in marathi
केळ हे असे फळ आहे कि जे झाडाला एका मोठ्या गुछामध्ये लागते किंवा समूहामध्ये लागते. ज्यावेळी केळीचे गुच्छ परिपक्व होण्याच्या मार्गावर असतात त्यावेळी ते काढले जाते आणि त्या गुच्छाचे छोटे छोटे भाग केले जातात. केळ हे फळ परिपक्व होण्याअगोदर हिरव्या रंगाचे असते आणि ज्या वेळी ते परिपक्व होते त्यावेळी त्याचा रंग पिवळा होतो.
या फळाचा गाभा हा मऊ आणि पांढऱ्या रंगाचा असतो आणि हे फळ खूप गोड असते तसेच या फळाची साल खाल्ली जात नाही ती काढून टाकली जाते. केळी एक उच्च औषधी वनस्पती आहे जी १५ मीटर पर्यंत वाढू शकते. जगभरात केळीच्या १००० पेक्षा जास्त विविध जाती वाढल्या आहेत आणि ५० गटांमध्ये विभागल्या आहेत.
१५० हून अधिक देशांमध्ये केळीची लागवड केली जाते आणि दरवर्षी ११० दशलक्ष टन फळे तयार केली जातात. भारत हा केळीचा सर्वात मोठा उत्पादक आहे परंतु भारतात तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र ही केळी उत्पादक राज्ये सर्वात जास्त आहेत. भारतामध्ये केळीच्या विविध जाती आहेत. परंतु त्यामध्ये बसराई, सिंगापुरी, बौने प्रसिद्ध आहेत.
आजकाल बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या केळीचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे कॅव्हेंडिश केळी, हे पनामा रोगाच्या प्रतिकारासाठी प्रतिरोधक आहे. भारतामधून केळी परदेशात पाठवत असताना केळी हिरव्या रंगात निवडली जातात आणि जेव्हा ते त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचतात तेव्हा विशेष परिस्थितीत पिकवले जातात आणि पिकल्यानंतर केळी पिवळ्या रंगाची होतात.
केळीला पौष्टिक घटकांचे पॉवरहाऊस म्हटले जाते, कारण यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, मॅंगनीज, मॅग्नेशियम, लोह, फोलेट, नियासिन, रिबोफ्लेविन आणि बी ६ सारखी आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले आहे. आणि यामध्ये चरबी, कोलेस्टेरॉलमुक्त आणि सोडियम कमी असते तसेच एक केळ्यामध्ये १.२ ग्रॅम सोडियम, १० मिली ग्रॅम व्हिटॅमिन सी, ३२ मिली ग्रॅम मॅग्नेशियम, २७ ग्रॅम कर्बोदक, ४२२ ग्रॅम पोटॅशियम, १.३ ग्रॅम प्रथिने, ३ ग्रॅम फायबर, १४ ग्रॅम साखर हे घटक इतक्या प्रमाणामध्ये असतात.
केळी या फळामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतात. आणि या फायबरमध्ये पचन कमी करण्याची गुण असते आणि तुम्हाला दीर्घकाळ तृप्त वाटत राहते. म्हणूनच केळी बर्याचदा नाश्त्याच्या जेवणात समाविष्ट केल्या जातात जेणेकरून आपण पुढील जेवणाची चिंता न करता आपल्या दिवसाची सुरुवात करू शकता. त्याचबरोबर केळ्यामध्ये थोड्या प्रमाणात ट्रिप्टोफॅन नावाचे एक अमीनो आम्ल असते जे केळीच्या नैसर्गिक व्हिटॅमिन बी ६ सह एकत्र केल्याने सेरोटोनिन ‘फील-गुड हार्मोन’ चे उत्पादन वाढण्यास मदत होते.
हा मूड-रेग्युलेटिंग पदार्थ तुमच्या मनाला आणि शरीराला आराम करण्यास मदत करू शकतो. केळ हे शरीराला नियमित हृदयाचे ठोके, रक्तदाब कमी आणि शरीरातील पाण्याचे योग्य संतुलन राखण्यास मदत करते. ते पोटॅशियम समृध्द असल्यामुळे, केळे शरीराच्या रक्ताभिसरण प्रणालीला मेंदूला ऑक्सिजन पोहोचवण्यास मदत करतात.
पोटॅशियम युक्त पदार्थ वृद्ध स्त्रियांमध्ये स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी देखील ओळखले जातात त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांच्यासाठी केळ हा चांगला उपाय आहे. जेंव्हा आपल्याला थकवा किंवा आळस येतो त्यावेळी आपण केळ खाऊ शकतो कारण केळ खाल्ल्याने आपला मूड फ्रेश होतो. केळ्यामध्ये कमी मीठाचे प्रमाण आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते आणि केळीच्या याच गुणधर्मामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
तसेच केळ्यात लोहाचे प्रमाण जास्त असते आणि ते अशक्तपणा ग्रस्त लोकांसाठी चांगले आहेत. अशक्तपणा ही अशी स्थिती आहे जिथे रक्तातील लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिनची संख्या कमी होते. यामुळे थकवा, दम लागणे आणि फिकटपणा येतो. त्यामुळे आपण जर रोज एक केळ खाल्ले तर आपल्याला अशक्तपणाशी लढण्यास मदत होते.
आयुर्वेदानुसार केळीला गोड आणि आंबट चव असते. गोड चव जडपणाची भावना आणते असे म्हटले जाते परंतु आंबट चव अग्नीला उत्तेजित करण्यासाठी ओळखले जाते, ज्यामुळे पचनास समर्थन मिळते आणि चयापचय वाढण्यास मदत होते. असे केळी या फळाचे वेगवेगळे फायदे आहेत. म्हणून जर आपण रोज एक फळ खाल्ले तर ते आपल्या शरीराला खूप चांगले असते.
केळ हे फळ फक्त त्याच्या औषधी गुणांच्यासाठीच वापरले जात नाही तर ते भारतीय स्वयंपाक पध्दतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेश बनवल्या जातात जसे कि केळी ज्यूस, केळाच्या पुऱ्या, केळी चिप्स, केळाचे पंचामृत, केळ या फळाचा वापर केक, कुकीज, मफिन आणि क्विक ब्रेड बनवण्यासाठी केला जातो.
तसेच केळाला भारतीय धार्मिक संस्कृतीमध्ये देखील महत्वाचे स्थान आहे कारण केळी हि सत्यनारायण पूजेमध्ये, किंवा कोणत्याही पूजेसाठी वापरले जाते. तसेच आपण जो नारळाचा विडा देवाला ठेवतो त्यावेळी देखील केळ हे फळ महत्वाचे असते. त्याचबरोबर सत्यनारायण पूजेला पंचामृत केले जाते आणि त्यामधील मुख्य घटकांपैकी केळ हे फळ देखील असते. अश्या प्रकारे केली हे फळाचा वापर पूजेमध्ये केला जातो, केळ खाल्ल्यामुळे अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि केळाचा वापर स्वयंपाक पध्दतीमध्ये देखील केला जातो.
आम्ही दिलेल्या essay on banana in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर केळ या फळावर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on banana tree in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Banana essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट