मैत्री वर निबंध मराठी Essay on Friendship in Marathi

Essay on Friendship in Marathi – My Best Friend Essay in Marathi मैत्री वर निबंध मराठी विश्वासाचं प्रेमाचं एक निखळ नातं म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं आहे ज्यामध्ये कोणतीही वयोमर्यादा, रंगरूप, जातिभेद, उच्च-नीच‌ पाळलं जात नाही. मैत्रीच वर्तुळ फार मोठं आहे आणि त्याला कोणतीही रेषा नाही आहे. मैत्री एक असं नात आहे जे आपल्या सर्वांचे आयुष्य अधिक सुंदर बनवत. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात अशी एक तरी मैत्रिण किंवा मित्र असतो ज्याच्या सोबत आपली फार घट्ट अशी मैत्री असते. म्हणजे जिथे आपल्याला आपल्या मैत्रिणी बद्दल किंवा मित्राबद्दल फार प्रेम आपुलकी वाटते आणि सहज आपली मैत्री अशा व्यक्तीशी होते.

ज्यांच्या आवडीनिवडी आपल्या आवडीनिवडीशी मिळत्याजुळत्या असतात. मैत्री एक अस नात आहे जे आपल्या सर्वांनाच हवंहवंसं वाटत असतं. ते लोकं फारच भाग्यवान आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारे व विश्वासू मित्र मैत्रिणी आहेत.‌ मैत्री आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे.

मैत्रीमुळे आपले आयुष्य अधिक सुखी आणि आनंददायी बनतं. अगदी लहानपणापासूनच आपले वेगवेगळे मित्र-मैत्रिणी बनत जातात काहीं सोबत आपल अगदी घट्ट असं नातं तयार होतं परंतु तेच आपले खरे मित्र असतात जे अगदी शेवट पर्यंत आपल्या आयुष्यात टिकून राहतात. मैत्री हे एक असं नातं आहे जे आपल्या सुखा मध्ये सहभागी होतं आणि आपल्या दुःखामध्ये आपला आधार बनतं.

essay on friendship in marathi
essay on friendship in marathi

मैत्री वर निबंध मराठी – Essay on Friendship in Marathi

My Best Friend Essay in Marathi

एक घट्ट मैत्री म्हणजे सोबत हसणं, खेळणं, आपल्या मनातील प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सांगणं, एकमेकांच्या सुखा दुःखामध्ये सहभागी होणे, याला खरी मैत्री बोलतात. मैत्रीमध्ये आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जगायला मिळतात मैत्री आपल्याला जगायला शिकवते मैत्रीमुळे आपली स्वतःशीच एक वेगळी ओळख होते.

मैत्री आपल्यातील कलागुण कौशल्याची आपल्याला जाणीव करून देते. मैत्रीमुळे आपण मानसिक दृष्ट्या  तंदुरुस्त आणि सकारात्मक राहतो.‌ आपल्या आयुष्यामध्ये अशी अधिक लोक आहेत ज्यांना आपण आपले मित्र म्हणून बोलावतो परंतु आपण आपल्या सगळ्या गोष्टी त्यांच्याशीच शेअर करतो जे आपल्या खूप जवळचे असतात आणि त्यांच्यावरती आपण विश्वास ठेवू शकतो.

आपलं मैत्रीचं वर्तुळ कितीही मोठं असलं तरीही आपल्याला माहित असतं की आपल्या गरजेच्या वेळी आपल्याला आपल्या हाकेला कोण धावून येईल ते, कारण आपला त्या व्यक्तीवरती विश्वास असतो आपली त्याच्या सोबत असलेली मैत्री हा विश्वास घडवते. शाळेमध्ये, महाविद्यालयांमध्ये आपले अनेक मित्र मैत्रिणी बनतात परंतु आपला खरा मित्र तोच असतो जो अगदी शेवटपर्यंत त्या प्रत्येक क्षणी आपल्याला साथ देतो.

मैत्री ही दोन प्रकारची असते आपल्या आयुष्यामध्ये दोन प्रकारचे मित्र असतात एक चांगले मित्र आणि दुसरे म्हणजे खरे मित्र. खरे मित्र हेच असतात ज्यांचा आपल्याशी आपुलकीचं, प्रेमाच एक विशेष असं नातं जोडलेलं असतं. त्यांच्यावरती आपण दीर्घकाळ विश्वास ठेवू शकतो आणि आपल्याला माहीत असते की पुढे जाऊन हे मित्र आपल्याला नेहमी साथ देतील.

खरा मित्र आपला आयुष्य अधिक सोप्प आणि आनंददायी बनवतो खरा मित्र आपल्याला अडचणीच्या वेळी मदत करतो तोच खरा मित्र आपल्याला योग्य ते उपदेश देऊन योग्य ती मदत करतो. खरी मैत्री आपल्याला परिपूर्ण बनवते. खऱ्या मैत्रीमध्ये आपण एकमेकांना योग्य ते मार्गदर्शन करतो. मैत्रीच नात हे कुठल्याही मर्यादा पलीकडे जाऊन जपलं जातं.

मैत्री हे एक असं नात आहे जे आपण हृदयापासून जगतो, निभावतो. प्रेम, त्याग, काळजी, आपुलकी हे सगळं मैत्री या गोड नात्या मध्ये पहायला मिळतं. मैत्रीमध्ये एक एकमेकांवर वर हक्काने रागवायचं, रुसायचं, एकमेकाच्या खोड्या काढायच्या, अगदी हक्काने आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट सांगायची आणि एकमेकांवर जीवापाड प्रेम करत अगदी घट्ट विश्वास ठेवणं म्हणजे मैत्री होय. मैत्री कुणाशीही असू शकते.

मैत्री हा असा विषय आहे ज्यावर बोलण्यासाठी लिहिण्यासाठी शब्द कमी पडतील मैत्री एक भावना आहे जी शब्दांमध्ये उतरवणं अशक्य आहे. जर आयुष्यामध्ये मैत्री नसेल तर आपल आयुष्य व्यर्थ आहे. कारण आपल्या आयुष्याला अधिक सुंदर बनवण्याचे काम मैत्री करते मैत्रीमुळे आपण जगायला शिकतो.

आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये जे नात आपण अगदी हृदयाने जपतो ते म्हणजे मैत्रीचं नातं. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक मित्र-मैत्रिणी येतच असतात तरीही जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मैत्री बदलत जाते. परंतु अगदी लहानपणापासुन ते अगदी आपल्या मरणा पर्यंत जर एखादी व्यक्ती आपल्यासोबत असेल तर ती खरी मैत्री असते.

संपूर्ण जगभरात मैत्रीचे नात सुंदर मानलं जातं. मैत्रीचं नातं सुंदर विशेष आणि खास मानलं जात म्हणूनच संपूर्ण जगभरात मैत्रीचा एक स्वतंत्र खास दिवस देखील साजरा केला जातो. त्याला फ्रेंडशिप डे असं म्हणतात भारतामध्ये फ्रेंडशिप डे हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या हफ्त्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.

फ्रेंडशिप डेच्या दिवशी आपण आपल्या आवडत्या मित्र मैत्रिणीला वेगवेगळ्या भेटवस्तू भेट म्हणून देतो ग्रीटिंग कार्ड देतो. इतकच नव्हे तर या दिवशी मैत्री अगदी शेवटपर्यंत टिकवण्याचा वचन देखील दिलं जातं. फ्रेंडशिप डे हा दिवस इतर सणां सारखा साजरा केला जातो. मैत्रीच नात हे खूप वेगळ असत जरी आपले बरेच मित्रमैत्रिणी आपल्यासोबत नसले तरी जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपण त्यांची आठवण नेहमीच काढतो आपण त्यांच्यापासून कितीही दूर असलो तरी मैत्रीचं नातं हे कायम तसच राहत.

मैत्रीचं नातं हे वर्तुळा सारख असतं ज्याला शेवट कधीच नसतो. मैत्री ही दिव्यातल्या पणती सारखी असते जी अंधारामध्ये पण प्रकाश देते. आपल्या मनात असणारे प्रश्न अडचणी, मनात असणार ओझ हलका करण्याची जागा म्हणजे मैत्री. मैत्री हे एक असं नातं आहे जिथे आपण आपल्या मनापेक्षा समोरच्या व्यक्तीचा खूप जास्त विचार करतो समोरच्याचं मनं जपण्याचा प्रयत्न करतो.

मैत्री ही पाण्यासारखी अगदी शुभ्र आणि निर्मळ असते. मैत्री ही ओळखीच्या व्यक्तींशी होते असं नाही आपल्या नकळत आपण अनोळख्या व्यक्तीशी मैत्री करतो. आपण जन्माला येतो तेव्हा सगळी नाती आधीच आपल्या पदरात पडतात परंतु मैत्रीचं नातं हे एक असं नात असतं जे आपण स्वतः निवडतो.

शेवटी ती ईश्वराची लीला अगाध आहे न जाणे कुठून देव आपल्याला अनोळख्या व्यक्तीशी नात जुळवून देतो अनोळख्या व्यक्तींना आपल्या मनात हृदयात स्थान देतो ज्यांना कधी आपण ओळखतही नसतो अशा व्यक्तीशी आपली अगदी घट्ट मैत्री होऊन बसते. आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी मित्र-मैत्रिणी बनवतो ती अगदी साधारण गोष्ट आहे.

परंतु एकाच व्यक्ती सोबत आपण आयुष्यभर मैत्री निभावतो एकाच व्यक्ती बरोबर मैत्री टिकवून ठेवणे ही असामान्य गोष्ट आहे. आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळे लोक येत राहतात त्यातील काहींशी आपली चांगली मैत्री होते काही आपल्याला सोडून जातात काही सोडून गेलेली पुन्हा येतात पण काही सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबत राहतात यालाच खरी मैत्री म्हणतात.

रक्ताची नाती आपल्याला जन्मता मिळतात परंतु मनाने जोडलेलं नातं म्हणजे मैत्रीचं नातं असतं. मैत्रीचं नातं हे सर्वाँचं आवडीच नातं असतं कारण त्यामध्ये कोणतेही बंधन नसतं, कोणत्याही अटी नसतात. मैत्रीची अनेक रूपे असतात. काही वाईट असतात काही चांगले असतात काहींना आपल्या मनामध्ये जपून ठेवतो.

मैत्री या दोन अक्षरांमध्ये फार ताकद आहे मैत्री हा शब्दाच आपल्या चेहऱ्यावर एक स्माईल आणण्यास पुरेसा आहे. मैत्रीचं नातं इतकं अतूट असते की आयुष्यातील कोणतीही नाते शेवटपर्यंत टिकत नाहीत परंतु मैत्रीचं नातं असं नातं असतं जे अगदी शेवटपर्यंत सोबत राहत. मैत्रीचं नातं असं असावं की अगदी एकमेकांपासून लांब असलात तरी एकमेकांची आठवण काढल्याशिवाय दिवस जाणार नाही.

आयुष्यामध्ये एक चांगला मित्र किंवा मैत्रीण असण्यासाठी खूप नशीबवान असावं लागतं. मैत्रीमध्ये जसे दोन शब्द असतात तसेच दोन मनांना जोडणारी म्हणजे मैत्री. दोन व्यक्तींनी हृदयापासून जपलेलं नातं म्हणजे मैत्री. मैत्री एक सोपी व्याख्या आहे रोज आठवण यावी असं काही नाही रोज भेट व्हावी असं काही नाही एवढंच कशाला रोज बोलणं व्हावं असंही काही नाही पण मी तुला विसरणार नाही ही माझी खात्री आणि तुला त्याची जाणीव असावी ही आपली मैत्री. 

पु. ल. देशपांडे यांनी मैत्री या विषयावर लिहिलेली ही कविता मैत्रीच्या गोड नात्याचं सुंदर वर्णन करते. खरा मित्र कोणाला म्हणावे? खरा मित्र तो असतो ज्याच्या समोर आपण आपल्या मनातील प्रत्येक भाव लज्जा संकोच न वाटून घेता व्यक्त करतो. मैत्रीच गोड नात जर अगदी शेवटपर्यंत टिकवून ठेवायचं असेल तर आपण आपल्या खऱ्या मित्राशी कधीच खोटं नाही बोललं पाहिजे.

मैत्रीमध्ये एकमेकांचा आदर करणे देखिल तितकच गरजेचं असतं. एकमेकांच्या विचारांचा आदर करणं. मैत्री हे एक सुंदर नात आहे आणि प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्री सारखं सुंदर नातं असणे अतिशय गरजेचे आहे.

आम्ही दिलेल्या essay on friendship in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मैत्री वर निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या marathi essay on my friend या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि my best friend essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये maza avadta mitra nibandh Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!