माझा आवडता मित्र निबंध My Best Friend Essay in Marathi

My Best Friend Essay in Marathi माय बेस्ट फ्रेंड, माझा प्रिय मित्र, माझा वर्गमित्र निबंध: मैत्री हा शब्द दोन अक्षरी असून, किती मोहक व नाजूक आहे. आपले वाडवडील म्हणतात की, मैत्रिशिवाय माणूस हा अर्धवट आहे. खरंतर, मैत्री ही अनेक प्रकारची असते. ज्याप्रमाणे, आई व तिचं मुल यांचं नातं असत, त्याचप्रमाणे मैत्री हे एक पवित्र नात आहे. मैत्री ही कधी न तुटणारी असली पाहिजे. कोणी एका महान व्यक्तीने म्हटले आहे की, जो संकटकाळी आपल्याला मदत करतो तोच खरा मित्र. पण, आज काही व्यक्ती वाईट संगतीमुळे मैत्रीला दोष देतात. मित्रमैत्रिणींचे मैत्रीचे नाते कधीही वाईट नसते, वाईट असते ती त्यांची संगत. मैत्री तर नकळत होत असते. मैत्रीला या जगात कोणतेही बंधन नसते.

मैत्री असावी आशा,

मैत्री नसावी निराशा ,

सर्व ऋणानुबंधांना ,

जोडणारी नवी दिशा.”

my best friend essay in marathi
my best friend essay in marathi

माझा आवडता मित्र निबंध मराठी – My Best Friend Essay in Marathi

माझा मित्र निबंध मराठी

आपुलकीच्या माणसांशी नाती जोडता जोडता निसर्गाशी नाती जोडली गेली पाहिजेत, असा मौलिक संदेश देणारे कॉलेज म्हणजे ‘विवेकानंद कॉलेज’. खरंतर, या महाविद्यालयाच नावलौकिक सर्वत्रच आहे. त्यामुळे, आसपासच्या गावांतून तसेच, लांबलांबून अनेक विद्यार्थी येथे शिकायला येत.

असे हे महाविद्यालय निसर्गरम्य वातावरणात असल्याने ते अधिकच उठावदार दिसे. अशा या महाविद्यालयात विद्यार्थ्याला गुरुविषयी आदर तर, गुरुंना विद्यार्थ्यांविषयी उत्कट प्रेम असायचे, असे हे महाविद्यालय जेथे सगळी नाती जपली जातात, तेथेच मला मैत्रीचं नात कळलं व उमगलही.

मैत्री म्हणजे नुसतीच दोन पावलांची साथ नसते,

अखंडपणे तेवणारी स्नेहाची वात असते …

मैत्री म्हणजे रोपं असत,मनात खोल रुजलेल,

आपुलकीच्या मायेत चिंब अस भिजलेलं…

मी माझं १२ वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १३ वीसाठी या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. पहिल्यांदा, सगळ काही माझ्यासाठी नवीनच होत, ते अनोळखी कोल्हापूर शहर, त्यात वसलेलं विवेकानंद कॉलेज, अगदी सर्व काही नवीनच. त्यामुळे, मी सुरुवातीला वर्गामध्ये एकटीच पहिल्या बेंचवर बसायचे आणि सर्व लेक्चर्स झाले की परत एकटीच हॉस्टेलची वाट धरायचे.

कितीतरी दिवस असेच गेले, मग मात्र काही महिन्यांनी माझी ओळख सुरज नावाच्या मुलाशी झाली, तोही तेथे नवीनच होता. आमची ओळख एका प्रसंगातून झाली होती, तो प्रसंग म्हणजे “मी दररोज फळ्यावर सुविचार लिहायचे, त्यावेळी वर्गातील मुलांमध्ये मी लिहलेला सुविचार खोडून नवीन सुविचार कोण लिहिलं यासाठी चॅलेंज व्हायची.

एकेदिवशी, मी सुविचार लिहून माझ्या बेंचवर बसते तोच एक मुलगा फळ्याजवळ येऊन माझा सुविचार खोडत होता. त्यावेळी मला खूप राग आला. पण, नंतर मला कळलं की मी लिहलेल्या सुविचारात थोडीशी चूक होती, ती दुरुस्त करण्यासाठी आणि त्याचबरोबर मुलांनी दिलेलं चॅलेंज जिंकण्यासाठी त्याने हे केलं होत, हे मला त्याच्याकडूनच कळलं.

दुपारच्या सुट्टीत तो माझ्याकडे आला आणि माझी माफी मागू लागला, मला त्याचा हेतू स्पष्ट कळला होता, त्यामुळे मी स्वच्छ मनाने आता कोणताही राग न ठेवता त्याला माफ करून टाकलं आणि त्याचे आभार ही मानले, कारण त्याच्यामुळे माझं सगळ्या वर्गासमोर हस होता होता वाचलं “. त्यानंतर आमच्यात खूप चांगली मैत्री तयार झाली.

आम्ही दोघं एकत्र ग्रंथालयात अभ्यास करायला लागलो, दुपारचा डब्बा ही एकत्रच खात होतो. कॉलेजमधील प्रत्येक दिवस सर्वांसाठीच काहीतरी नवीन घेऊन येतो. असाच एक दिवस म्हणजे कॉलेजचा स्नेहसंमेलनचा कार्यक्रम, ज्याची वाट सर्व विद्यार्थी आतुरतेने पाहत असतात. मी आणि माझा मित्र सुरज आम्ही दोघांनीही या कार्यक्रमात सहभाग घ्यायचं ठरवलं.

पण, एक अडचण होती, आम्हां दोघांमध्ये अनेक बाबतीत भिन्नता होती, अगदी आवडी निवडी ही वेगवेगळ्या होत्या. त्याला साधं राहणीमान आवडायचं तर, मला प्रोफेशनल रहायला आवडायचं, त्याला फक्त अभ्यास करायला आवडायचं तर, मला सर्व गोष्टींत प्रावीण्य मिळवायला आवडायचं, या गोष्टींमध्ये जरी भिन्नता असली तरी आमच्यात सगळ्यात महत्वाचा समजूतदारपणा, एकमेकांना दिला जाणार आदर, प्रामाणिकपणा, सत्यवर्तन, सभ्यता, इतरांविषयी प्रेम, दया, सहानुभूती होती.

आम्ही दोघंही प्रत्येक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करायचो. पण, समस्या अशी होती की या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी दोघंही तयार होतो पण, मला डान्स येत होता तर, त्याला डान्स येत नव्हता, त्याला सुंदर हस्ताक्षरामध्ये निबंध लिहता येत होता तर, माझ हस्ताक्षरच रेखीव नव्हतं, मला वकृत्व आवडायचं पण,त्याला सगळ्यांसमोर बोलायची भीती वाटायची.

मी ठरवलं होत की हीच संधी आहे त्याच्या मनातील भीती दूर करायची, त्याच्यात धाडस निर्माण करायची. स्नेहसंमेलनाला दहा दिवस शिल्लक होते, मी त्याच्याकडून तयारी करून घ्यायला सुरुवात केली. बोलताना आवाजातील चढ – उतार कसा असावा, हातांची हालचाल व चेहऱ्यावरचे भाव कसे असावेत, या सगळ्या गोष्टी नीटपणे सांगितल्या.

हळूहळू तो न घाबरता बोलायला लागला, त्याच्याकडून सगळी तयारी करून घेतली आणि अखेर तो दिवस आला ज्याची मी उत्सुकतेने वाट पाहत होते तो दिवस म्हणजे कॉलेजचं स्नेहसंमेलन. आमच्या कॉलेजचा स्नेहसंमेलनचा कार्यक्रम तीन दिवस होता, पण पहिल्याच दिवशी वकृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

कॉलेजमधील इतर मुल – मुलीही चांगली तयारी करून आली होती. लगेच, सुरजला भाषण करण्यासाठी स्टेजवर बोलवण्यात आल. मी त्याला परत एकदा धीर दिला आणि लांब दिर्घ श्वास घ्यायला सांगितला, तोही धीटपणे स्टेजवर गेला आणि भाषणाला सुरुवात केली. खर सांगायचं तर, अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीन त्यानं चांगलं भाषण केलं होत. आता, आम्ही दोघंही स्पर्धा झाल्यानंतर निकालाची वाट पाहत होतो आणि चक्क त्याचा वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला होता.

मला तो दिवस आजही आठवतो. सुरज चकित झाला होता आणि मी तर आनंदाने भरभरून गेले होते. त्याचे डोळे आनंदाने भरुन आले होते. पण, मला सगळ्यात मोठा आनंद या गोष्टीचा वाटत होता, की या स्पर्धेत भाग घेतल्यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता, त्याच्यामध्ये घर धरून बसलेली भीती निघून जाऊन; आता, त्याच्यामध्ये स्वतःबद्दलचा विश्वास निर्माण झाला होता. त्या दिवसापासून आमच्यातील मैत्री अजून घट्ट झाली.

मैत्री हा गंध असतो ,

एकमेकांत दंग होण्याचा .

मैत्री हा भोवरा असतो ,

सुतासंगे फिरवण्याचा .

मैत्री हा अभिमान असतो ,

मान ताठपणे ठेवण्याचा .”

काही दिवसातच आमच्या सेमीस्टर परीक्षा तोंडावर आल्या होत्या. आम्ही दोघांनीही अभ्यासाला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे आम्ही ग्रंथालयात बसू लागलो. पण, अचानक मी ज्या नोट्सचा इतके दिवस अभ्यास करत होते, ज्या नोट्सची मला वाचून सवय झाली होती, त्या नोट्स हॉस्टेलमधून गायब झाल्या होत्या.

नोट्स हरवल्याच्या भीतीने माझा जीव कासावीस झाला होता. मी त्यादिवशी खूप रडले होते. मी लगेचच संध्याकाळी सूरजला सगळा घडलेला प्रकार सांगितला. तो तातडीने प्राचार्यांच्या परवानगी ने आमच्या हॉस्टेलमध्ये आला आणि त्याने मला शांत केलं, धीर दिला. मी ज्या ठिकाणी नोट्स ठेवल्या होत्या त्या ठिकाणी त्याने शोधायला सुरुवात केली.

आम्हां दोघांना ही लक्षात आलं होत की हे माझ्या रूममेटसनी मुद्दामहून केलं होत. त्याने त्या दोघींनाही समोर बोलवलं आणि कणखर शब्दात विचारलं; शिवाय, न सांगितल्यास पोलिसांना कंप्लेंट करेन असा वचक ही दिला, त्याभितीने त्या दोघींनीही आपली चूक कबूल केली आणि माझे नोट्स ही परत दिले.

त्यानंतर, सुरजने प्राचार्यांशी तत्काळ बोलून माझी रूम ही बदलली. जर त्यादिवशी सुरज आला नसता तर, माहीत नाही काय झालं असत. त्याने त्यावेळी केलेली मदत मी कधीच विसरू शकत नाही.

मैत्री करणं हा काही गुन्हा नाही की अपराध नाही; परंतु , मैत्री या शब्दाचा मूळ अर्थच आपण आज विसरत चाललो आहोत. मैत्री म्हणजे ‘टाईमपास’ नव्हे, मैत्री म्हणजे ‘मौजमजा’ नव्हे; तर, मैत्री म्हणजे एकमेंकावर असलेला ‘विश्वास’, मैत्री म्हणजे एकमेकांसाठी केलेला ‘त्याग’. पण, आजकालच्या मैत्रीमध्ये कपटपणा, स्वार्थीपणा, स्पर्धा आणि ईर्ष्या दिसते.

आज मैत्री कुठंतरी हरवल्या सारखी दिसते. खरंतर, मैत्री ही फक्त तरुण – तरुणींसाठी असते, असा बऱ्याच जणांचा समज आहे, परंतु हा समजच मुळात चुकीचा आहे. मैत्रीला ना वयाच बंधन असत ना नात्याच ना जातीच. मैत्री ही आपल्या आई – वडिलांशीही होऊ शकते.

आज मी आणि सुरज जरी एकमेकांपासून दूर असलो तरी, त्या आठवणी आमच्यातल सुंदर अस मैत्रीचं नात आजही जिवंत ठेवत असतात. आजही आमच्यातली मैत्री ही शुध्द पाण्यासारखी, निर्मळ झऱ्यासारखी आणि पवित्र अशा नदीसारखी वाहते. कारण,……

मैत्री हे नात असतं ,

दोन जीवांच्या मिलनाच.

मैत्रीतील वचन असतं ,

दोघांनी निभवायच .”

– तेजल तानाजी पाटील

                 बागीलगे, चंदगड.

आम्ही दिलेल्या my best friend essay in marathi wikipedia माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माझा आवडता मित्र निबंध मराठी” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my friend essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि essay on friendship in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण maza avadta mitra nibandh या लेखाचा वापर maza mitra essay in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!