पु ल देशपांडे यांची माहिती मराठी Pu La Deshpande Information in Marathi

“जगा इतके की आयुष्य कमी पडेल

हसा इतके की आनंद कमी पडेल,

काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे

पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला देणे भागच आहे.”

Pu La Deshpande Information in Marathi – Purushottam Laxman Deshpande Information in Marathi पु ल देशपांडे यांची माहिती मराठी असे विचार असणारे बहुरूपी व्यक्तिमत्त्व ज्यांनी आपल्या विनोदी स्वभावाने, तत्त्वज्ञानाने, गायकीने, संगीतातील असणाऱ्या हुनरबाजीने अखंड महाराष्ट्रातील लोकांच्या मनात घर करून ठेवले ते सर्वांचे लाडके भाई अर्थात पु. ल. देशपांडे. मराठी भाषेवर विलक्षण प्रभुत्व असणाऱ्या आणि विनोदी कार्यासाठी प्रख्यात असलेल्या पू. ल. नी जवळजवळ सगळ्याच क्षेत्रात आपला ठसा उमटवला होता. त्यांनी जणू लोकांना हसवण्याचा ध्यासच घेतला होता.

pu la deshpande information in marathi
pu la deshpande information in marathi

पु. ल. देशपांडे यांचा जीवनपरिचय – Pu La Deshpande Information in Marathi

नावपुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
टोपणनावेपु. ल. देशपांडे, पु. ल., भाई
जन्म८ नोव्हेंबर १९१९, मुंबई
मृत्यू१२ जून २०००, पुणे
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रनाटककार, साहित्यकार, संगीतकार, तत्त्वज्ञान, दूरचित्रवाणी, दिग्दर्शक
भाषामराठी, कानडी, बंगाली
वडीललक्ष्मण त्र्यंबक देशपांडे
आईलक्ष्मीबाई
पत्नीसुनिता देशपांडे
पुरस्कारपुण्यभूषण, पद्मभूषण, पद्मश्री

पु.ल. देशपांडे यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१९ ला मुंबईतील गावदेवी या भागात ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. जोगेश्वरी येथील सारस्वत कॉलनीमध्ये त्यांचे बालपण गेले. त्यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात घेतले. त्यांनतर शिक्षण त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात घेतले. पु. ल. च्या पहिल्या पत्नी सुंदर दिवाळकर यांचे लग्नानंतर लगेचच मृत्यू झाला.

त्यानंतर त्यांनी १९४६ मध्ये त्यांची सहकारी सुनिता ठाकूर यांच्याशी विवाह केला. सुनीताबाई या मराठी लेखिका आणि अभिनेत्री होत्या. यांना अपत्ये नव्हती. पु. ल. चे आजोबा वामन मंगेश दुभाषी उर्फ ऋग्वेदी हे एक लेखक आणि कवी होते. त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांचा मुळच्या बंगाली भाषेतील ‘गीतांजली’ हा काव्यसंग्रह ‘अभंग गीतांजली’ या नावाने मराठी भाषेत भाषांतरित केला होता.

बालपण आणि शिक्षण

देशपांडे यांचे वडील लक्ष्मण देशपांडे हे अडवाणी कागद कंपनीत दीडशे रुपये पगारावर विक्रेते होते. पु.ल. लहानपणापासूनच धष्टपुष्ट होते. तसेच ते हुशार आणि सतत काहीना काही कुरखोड्या करीत असत. ते लहानपणापासूनच भाषण देण्यात पटाईत होते. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी त्यांच्या आजोबांनी लिहून दिलेले १०-१५ ओळींचे भाषण खणखणीत धारदार आवाजात हावभावानसहित त्यांच्या शाळेत सादर केले.

त्यांना वाचनाची आवड होती. सात वर्षे भाषणे केल्यानंतर वयाच्या १२ व्या वर्षी देशपांडे स्वतःचे भाषण स्वतः लिहू लागले. आणि इतरानाही ते भाषणे आणि संवादलेखन लिहून देऊ लागले. कॉलेजमध्ये असताना पु. ल. हार्मोनियम वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवत असत. त्याचे त्यांना १५ रुपये मिळत आणि ते तिघांमध्ये वाटून घेत असत.       

लहानपणापासून त्यांच्या घरात त्यांना रेडीओ ऐकायला मिळत असे तसेच त्यांच्या घरी संगीताच्या बैठकाही होत असे. त्यामुळे त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. ते घरीच बाजाची पेटी वाजवायला शिकले. ते शाळेत असल्यापासूनच भावगीते गायचे आणि अनेक कवितांना चाली लावायचे.

एकदा टिळक मंदिरात बालगंधर्व आले असताना पु. ल. नी त्यांना पेटी वाजवून दाखवली. सगळ्या व्यक्तींच्या नकला करण्यात पु. ल. पटाईत होते. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून त्यांच्या नकला करायचे, तो जणू त्यांचा छंदच होता. त्यामुळे घरी पाहुणे आले असताना पु. ल. घरी नसलेलेच घरच्यांना बरे वाटत असे.

देशपांडे यांची आई कारवारी, वडील कोल्हापूरचे आणि बहिण कोकणात दिलेली, त्यामुळे घरात भोजनात विविधता असे. त्यामुळेच पु.ल. खाण्याचे शौकीन झाले.

वडिलांच्या मृत्युनंतर देशपांडे संगीताच्या शिकवण्या करू लागले. आज जे गाण मराठी भावसंगीतातील अनमोल ठेवा समजला जातो त्या राजा बढे यांच्या ‘माझिया माहेरा जा’ या कवितेला त्यांनी कॉलेजमध्ये असताना चाल लावली. ग. दि. माडगूळांनी लिहिलेल्या आणि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेल्या ‘इंद्रायणी काठी, देवाची आळंदी’ या अजरामर झालेल्या अभंगाला पु. ल. नी संगीत दिले आहे.  

त्यांचे माध्यमिक शिक्षण पार्ले टिळक विद्यालयातून पूर्ण झाले. त्यानंतर त्यांनी मुंबईमधील इस्माईल युसुफ कॉलेज मधून इंटर व सरकारी लॉं कॉलेजमधून एल. एल. बी चे शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीला ते पेट्रोल रेशनिंग ऑफीसमध्ये कारकून आणि ओरिएन्टल हायस्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत होते.

त्यानंतर त्यांनी काही काळ कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात नोकरी केली. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. आणि नंतर  त्यांनी एम.ए चे शिक्षण पूर्ण केले.

कार्य

त्यांचे आजोबा हे साहित्यिक असल्यामुळे पुल यांच्यावर बालपणापासूनच साहित्य प्रेमाचे, सहृदय विनोदबुद्धीचे संस्कार झाले होते. पुढे नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर आणि महाराष्टारतील एक प्रसिद्ध हार्मोनियम वादक दत्तोपंत राजोपाध्ये ह्यांच्या सहवासातून नाटक आणि संगीत ह्या क्षेत्रांकडे त्यांची वाटचाल चालू झाली.

फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना ‘ललितकुंत’‘नाट्यनिकेतन’ या नाट्यसंस्थांमध्ये काम करत असताना चिंतामण कोल्हटकर यांच्याकडून त्यांना बरेच धडे मिळाले.  

सुरुवातीच्या काळात पु. ल. नी शिक्षक म्हणून काम केले. पु. ल. देशपांडे यांचे मराठी साहित्य आणि संगीतामध्ये मौल्यवान योगदान आहे. याव्यतिरिक्त त्यांचे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य, चित्रपट इत्यादी क्षेत्रातही लक्षणीय कार्य केले आहे.

  • १९५५ साली पु. ल. नी आकाशवाणीत (ऑल इंडिया रेडिओत) नोकरीला लागले.    
  • १९५८ मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मिडिया ऑफ मास कम्युनिकेशन्स या अभ्यासक्रमासाठी लंडनला पाठवले.
  • १९५९ मध्ये पु. ल. भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दूरदर्शनसाठी पंडित जवाहरलाल नेहरू याची पहिली मुलाखत घेणारे पहिले मुलाखतकार होते.

पुरस्कार व सन्मान  

  • १९९३- पुण्यभूषण
  • १९९०- पद्मभूषण
  • १९६६- पद्मश्री
  • १९९६- महाराष्ट्र भूषण पुरस्कार
  • १९६५- साहित्य अकादमी पुरस्कार
  • १९६७- संगीत नाटक अकादमी पुरस्कार
  • १९७९- संगीत नाटक अकादमी फेलोशिप
  • १९८८- कालिदास सन्मान

सार्वजनिक क्षेत्रात विस्मरणीय कामगिरी केल्याबद्दल भारतीय टपाल खात्याने पु.ल. च्या नावाचा स्टॅम्प काढला आहे.

साहित्यलेखन / दूरचित्रवाणी  

पु ल देशपांडे यांची पुस्तके – pu la deshpande books name in marathi

पु. ल. नी जवळपास ४० वेगवेगळी पुस्तके लिहिली .

खोगीरभरती, नसती उठाठेव, बटाट्याची चाळ, गोळाबेरीज, पूर्वरंग, असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली, हसवणूक, खिल्ली, कोट्याधीश, उरल सुरल, पुरचुंडी हि त्यांची विनोदी पुस्तकेही लोकप्रिय झाली.

चित्रपटसृष्टीतील कार्य

१९४७ मध्ये पु.ल. नी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. अनेक चित्रपटामध्ये त्यांनी मुख्य भूमिका बजावली तर अनेकांमध्ये संगीत दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद, देण्याचे काम केले.

‘गुळाचा गणपती’, या त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातून त्यांच्या अंगी असलेल्या अष्टपैलुंचे दर्शन होते. या चित्रपटात त्यांनी कथा, पटकथा, दिग्दर्शन, काव्य, संगीत, मुख्य भूमिका अशी सर्व कामे केली आहेत. ‘दुधभात’ मध्येही त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.

‘वंदे मातरम्’ मध्ये पु. ल. व त्यांची पत्नी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यानंतर त्यांचा ‘देवबाप्पा’ पसिद्ध झाला आणि त्यातील नाच रे मोरा’ हे गाणे खूपच प्रसिद्ध झाले.

तसेच पुलंचे कुबेर (१९४७), भाग्यरेखा (१९४८), वंदे मातरम् (१९४८), जागा भाड्याने देणे आहे (१९४९), मानाचे पान (१९४९), गोकुळचा राजा (१९५०), गुळाचा गणपती (१९५३), देवबाप्पा (१९५३) इत्यादी मराठी भाषेतील चित्रपट आहेत. तर संदेश (१९५२), फुल और कलियॉ (१९६०), आज और कल (१९६३) असे हिंदी भाषेतून आणि महात्मा (१९५३) हा मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील चित्रपट आहेत.

पु ल देशपांडे यांची नाटकांची नावे

वाऱ्यावरची वरात, एक झुंज वाऱ्याशी, तुझ आहे तुझ्यापाशी, अंमलदार, तुका म्हणे आता, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, फुलराणी, पुढारी पाहिजे.

प्रवासवर्णने

त्यांनी युरोप, अमेरिका, आशियातील अनेक देश पहिले. त्या प्रवासात आलेले अनुभव त्यांनी गमतीशीर पद्धतीने ‘पुर्वरग’, ‘अपूर्वाई’, ‘जावे त्याच्या देशा’, व्यंगचित्रे आदी प्रवासवर्णना मध्ये मांडली आहेत.

  • त्यांची आपुलकी, गणगोत, गुंगैन आवडी मैत्र, व्यक्ती आणि वल्ली, स्वगत अशी काही व्यक्तिचित्रे अजरामर ठरली आहेत.
  • एका रविवारची कहानी, पाळीव प्राणी, उरलासुरला, काही नवे ग्रहयोग इ. त्यांच्या विनोदी कथा आहेत.

मृत्यू

१२ जून २००० रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी पुलंचे पुण्यातील प्रयाग इस्पितळात निधन झाले. महेश मांजरेकर यांनी पु. ल. च्या जीवनावर आधारित ‘व्यक्ती आणि वल्ली’ हा चित्रपट काढला.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये pu la deshpande information in marathi language काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर purushottam laxman deshpande information in marathi म्हणजेच “अण्णाभाऊ साठे” pu la deshpande in marathi यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या pu la deshpande biography in marathi language या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि information about pu la deshpande in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “पु ल देशपांडे यांची माहिती मराठी Pu La Deshpande Information in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!