Essay On Mango in Marathi – My Favourite Fruit Mango Essay in Marathi फळांचा राजा आंबा निबंध मराठी भारत देशाचे राष्ट्रीय फळ आंबा! नुसते नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते. माझेच असे नाही, जवळपास सगळ्यांचेच आवडते फळ आंबा असेल ना! आपल्या देशाच्या कानाकोपर्यापासून सर्व ठिकाणी सहज उपलब्ध होणारा हा रसाळ, मधाळ आणि आंबट रसाने भरलेला आंबा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो, नाही का? आपल्याला कितीही आंबा खायला मिळाला तरी तो कमीच वाटतो, इतका तो रुचकर, गोड, मधाळ आहे. शिवाय, आंबा हा सर्वांना आवडणारे फळ आहे आणि म्हणूनच, फळांचा राजा आंबा अशी पदवी मिरवत देशाचे ‘राष्ट्रीय फळ ‘ होण्याचा सन्मान त्याला दिला गेला आहे.
भारत देशाप्रमाणेच, पाकिस्तान देशाचे देखील राष्ट्रीय फळ आंबा आहे. शिवाय, फिलिपाईन्स या देशाचे आंबा हे राष्ट्रचिन्ह आहे. तर, बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे. म्हणजेच, यावरून समजून येते की, वेगवेगळ्या देशांमध्ये आंबा आणि आंब्याच्या झाडाला किती महत्त्व देण्यात आले आहे
आणि म्हणूनच, आंब्याला सर्व फळांमध्ये सर्वप्रथम स्थान किंवा उच्च स्थान देण्यात आले आहे. आकाराने छोट्या-मोठ्या स्वरूपात उपलब्ध होणारा आंबा आपल्या महाराष्ट्रात ‘कोकणचा राजा’ म्हणून ओळखला जातो.
मित्रहो, जास्तीत जास्त विषुववृत्तीय प्रदेशात आढळणारे हे झाड फक्त देशभरातच नाही तर, संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. आंबा या फळाची आयात-निर्यात फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. शिवाय, त्यातून मिळणारे उत्पन्न सुद्धा देशाच्या आर्थिक विकासाला मदत करत आहे.
विशेषता, ज्या व्यक्ती आंबा या फळाची बागायत करतात, त्यांना भरपूर प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू शकते आणि त्यामुळेच हा उद्देश लक्षात घेऊन आपल्या भारतामध्ये अशा भरपूर आंब्याच्या बागांची लागवड केली गेली आहे शिवाय, आंब्यासाठी मोठी बाजारपेठ सुद्धा उपलब्ध आहे. एप्रिल ते जून या महिन्यांमध्ये आंब्यांचा हंगाम सुरू असतो.
तरीदेखील, आंबा या झाडाची उत्पत्ती ही कोठे व कधी झाली, हे मात्र अज्ञात आहे. शास्त्रज्ञांच्या मते, दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामध्ये आंब्याची जैवविविधता भरपूर आहे. त्यामुळे, आंब्याच्या झाडांची उत्पत्ती त्या भागामध्येच झाली असावी असे मानण्यात आले आहे.
फळांचा राजा आंबा निबंध मराठी – Essay On Mango in Marathi
माझे आवडते फळ आंबा निबंध – My Favourite Fruit Mango Essay in Marathi
आंब्याचे उत्पादन
Mango Essay in Marathi मित्रहो, खरोखरच पृथ्वीतलावर निसर्गाने वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारचे फळे, फुले, झाडे आणि वेगवेगळ्या वनस्पती निर्माण करून आपल्या मनुष्य जातीवर तसेच इतर प्राणिमात्रांवर फार मोठे उपकार केले आहेत. वेगवेगळ्या फळांप्रमाणे आंबा हे फळ सुद्धा आपल्या मानव जातीला फार महत्वपूर्ण आहे.
मित्रहो, जगामध्ये एकूण जितके आंब्याचे उत्पादन होते, त्यापैकी ५६ टक्के उत्पादन एकट्या भारतामध्ये घेतले जात असून, सध्या भारतात १३०० आंब्यांच्या जातींचे नोंद केली गेली आहे आणि त्यापैकी एकूण २५ ते ३० प्रकारच्या जाती या व्यापारीदृष्ट्या उत्पादित केल्या जातात. कोकण कृषी विद्यापीठाने नीलम आणि हापूस या दोन आंब्यांच्या संक्रमीकरणातून रत्ना ही जात निर्माण केली आहे.
त्याचप्रमाणे, गुजरात या राज्यातील केशर आंब्याची जात महाराष्ट्र राज्यामध्ये कोरडवाहू पट्ट्यामध्ये खूप प्रसिद्ध आहे. शिवाय, दक्षिण भागातील नीलम, पायरी, मलगोवा तर, उत्तर प्रदेशांमध्ये दशेरी, लंगडा या जातींना खूप मागणी आहे. याखेरीज, आंध्र प्रदेशामधील बैंगनपल्ली तर, दक्षिण भारतातील तोतापुरी ही जात सुद्धा खूप प्रसिद्ध आहे.
आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचे संक्रमण करून संशोधन केंद्राने नवीन आंब्यांच्या जाती निर्माण केल्या आहेत. दशेरी व नीलम या आंब्याच्या जातीच्या संक्रमणातून आम्रपाली ही जात विकसित केली आहे . शिवाय, कोकण विद्यापीठाने बिना कोईची सिंधू ही आंब्याची जात विकसित केली आहे.
धार्मिक कार्यासाठी उपयोग
मित्रहो, भारतीय संस्कृतीमध्ये आंब्याचे झाड आणि आंबा या दोघांनाही फार महत्त्व देण्यात आले आहे. कोणत्याही शुभ प्रसंगी अथवा कोणतेही मंगल कार्य असेल तर, आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. शिवाय, सणासुदीच्या काळात भारतामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. शुभ कार्य प्रसंगी कलश पूजन कलश करणे ही भारतीय संस्कृतीची एक परंपरा आहे. त्यावेळी, कलश पूजनात आंब्याची पाने ठेवली जातात.
आंब्याच्या झाडाचे स्वरूप
मित्रहो, वरील माहितीवरून आता आपण आंब्याचे स्वरूप कसे आहे ते पाहूयात. साधारणतः आंबा हा छोट्या-मोठ्या आकाराचा आपल्याला पाहायला मिळतो. तसेच, आंब्याच्या झाडाची उंची साधारणता ३५ ते ४० मिटर इतकी असते आणि आंब्याच्या झाडाचा घेर जवळपास १० मीटर एवढा असू शकतो.
याखेरीज, आंब्याच्या पानांची लांबी ही १५ ते ३५ सेंटीमीटर तर, रुंदी ही ६ ते १६ सेंटी मीटर असते. आंब्याच्या झाडाला गुच्छ स्वरूपात फुले येतात आणि त्या फुलाला आपण मोहोर असे म्हणतो. आंब्याचा फळाचा आकार लहान-मोठा असल्यामुळे आंबा साधारणपणे १० ते २५ सेंटीमीटर लांब असतो आणि त्याचा व्यास ७ ते १२ सेंटीमीटर असू शकतो.
आंब्याचे वजन जवळपास ५ किलो ग्रॅम इतके असते. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात आणि ती हिरव्या रंगाची असते. आंबा पिकल्यानंतर त्याचा रंग बदलून तो पिवळसर ,तांबूस रंगाचा होतो. सूर्यकिरणे ज्या बाजूला पडतील, त्या बाजूस लाल रंगाची छटा निर्माण होते.
आंब्यांच्या जाती
मित्रहो, आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यात नामांकित अशा आंब्यांच्या जातींची लागवड केली जाते. त्याची माहिती आपण खाली पाहूयात. आपल्या महाराष्ट्र राज्यात कावसजी पटेल ही नामांकित आंब्याच्या झाडाची लागवड केली जाते तर, कर्नाटकमध्ये पीटर, बंगालमध्ये गोपाळ भोग, गुजरातमध्ये जमादार, पाकिस्तान आणि पंजाबमध्ये चौसा, उत्तरप्रदेशमध्ये दशेरी, आंध्रप्रदेशमध्ये नीलम, गोवा राज्यामध्ये मानकुराद तसेच, बिहार राज्यामध्ये हेमसागर, सुकाल, सिंधू राय अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाती सापडतात.
इतर राज्यांप्रमाणेच, महाराष्ट्र राज्यात देखील हापुस, तोतापुरी, पायरी, मल्लिका, आम्रपाली, केशर, लाल केसर, रत्न यासारख्या अनेक आंब्याच्या जाती पहायला मिळतात.
आंबा खाण्याचे फायदे आणि तोटे
फायदे
मित्रहो, आंबा हा आपल्या शरीराला फार उपयुक्त आहे. आंब्याच्या सेवनाने आपल्या त्वचेची तसेच, शरीराच्या अंतर्गत अवयवांची स्वच्छता होते. आंबा त्वचेला आतून साफ करत असल्यामुळे आपल्या त्वचेला तेज येते. आंब्यामध्ये विटामिन ए आणि बीटा – कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते. आंब्यात असलेल्या या घटकांमुळे त्वचा तजेलदार राहण्यास मदत होते.
शिवाय, आंब्यामध्ये विटामिन सी आणि झिंक सुध्दा असते. त्यामुळे, आपल्या शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढून पचनक्रिया चांगली होते. आंब्याच्या सेवनाने आपल्या शरीराचा उष्माघातापासून बचाव होतो. तसेच, आंब्यामध्ये विटामिन आणि खनिज भरपूर प्रमाणात असल्यामुळे; आंबा शरीराला हायड्रेटेट ठेवतो.
ॲनिमिया या आजारासाठी तर आंबा हा जणू वरदानच आहे. शरीरामध्ये आयर्न, लोह तथा कॅल्शियम वाढवण्यासाठी आंबा फार गुणकारी आहे. आंबा खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. ते आता आपण खाली पाहूया.
तोटे
मित्रहो, बाजारामध्ये आंब्याचा पुरवठा करण्यासाठी बऱ्याच वेळा आंब्यांवर कॅल्शियम कार्बाइडचा फवारा केला जातो. त्यामुळे, आंबे लवकर पिकले जातात आणि मग ते बाजारात विकायला येतात. पण, त्यावर केलेल्या केमिकलच्या फवाऱ्यामुळे शरीराला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. फक्त पाण्याने धुतल्यामुळे आंब्यावरील केमिकल पूर्णता नष्ट होत नाहीत.
त्यामुळे, ते केमिकल पोटात जाण्याची शक्यता असते. एका आंब्यामध्ये साधारणता १३५ कॅलरीज असतात त्यामुळे, आपले वजन वाढू शकते. शिवाय, आंब्याच्या देठाजवळ एक द्रव पदार्थ असतो, तो पदार्थ व्यवस्थित साफ न केल्यास तो आपल्या खाण्यातून पोटात जाऊ शकतो. त्यामुळे, घशाचा त्रास होऊन घशाला सूज येऊ शकते.
बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या आंब्यांचे वेगवेगळे पदार्थ
मित्रहो, मला आंबा आवडत नाही असे सहसा ऐकायला फार कमी येते. कारण, आंबा हे फळ जवळपास सगळ्यांनाच आवडते आणि का नाही आवडणार? आंबा मुळातच जिभेला गोड, मधाळ, रसाळ, आंबट लागत असल्यामुळे तो प्रत्येकालाच हवाहवासा वाटतो आणि अशा आंबा या फळावर वेगवेगळे प्रयोग करून सध्या बाजारामध्ये अनेक नवनवीन पदार्थ उपलब्ध आहेत.
त्यामध्ये, आंब्याचे लोणचे हे भारतातील लोकप्रिय असा पदार्थ आहे. रोजच्या जेवणामध्ये तर लागतेच पण, कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात किंवा शुभ कार्यामध्ये असो की मंगल कार्यात असो, आंब्याचे लोणचे या पदार्थाची उपस्थिती ही आवर्जून असतेच असते.
आंब्याच्या लोणच्याबरोबर आंब्यापासून सिरप, आंब्याचा गर, आंबा पोळी, आंब्याच्या फोडी, आमचूर, स्क्वॅश असे वेगवेगळे टिकाऊ पदार्थ बनवता येतात आणि हे पदार्थ विकून त्यापासून चांगला रोजगारही मिळवता येतो. मित्रांनो, सध्या बाजारामध्ये अशा आंब्याच्या रसापासून वेगवेगळ्या पदार्थाचे सिरप उपलब्ध केले गेलेले आहेत. चॉकलेटमध्ये सुद्धा आंब्याचा फ्लेवर मिसळलेला आपणास पाहायला मिळतो.
मित्रहो, आपण कृत्रिमरित्या आंबा पिकवू शकतो. झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैर्या काढून वाळलेल्या गवतामध्ये ठेवून एका खोलीत १० ते १५ दिवस ठेवले असता, गवताच्या उष्णतेने आंबे पिकवले जातात.
शिवाय, कॅल्शियम कार्बाइडचा फवारा करून तीन-चार दिवसांमध्ये आंबे पिकवता येतात. पण, केमिकलचा फवारा केल्यामुळे काही अंशी केमिकल फळात मुरते व त्याचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो.
मित्रहो, वरील माहितीवरून आपण आंब्याविषयी भरपूर माहिती जाणून घेतली. एप्रिल ते जून या महिन्यात आंब्याचे हंगाम असते. सर्व ठिकाणी अगदी सहज उपलब्ध होणारा आंबा जवळपास सगळ्यांचे आवडते फळ आहे आणि मला सुद्धा आंबा खूप आवडतो. दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल या आंब्याच्या उत्पादनातून होत असते.
१०० वर्षाहून अधिक वर्षे जगणारे आंब्याचे झाड फक्त त्याच्या फलामुळेच नाही तर सर्व गोष्टीने उपयुक्त आहे. निसर्ग देवतेने पृथ्वीतलावर वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या प्रकारची फुले, फळे उपलब्ध करून दिली आहेत आणि त्यामधील, खासकरून आंबा हे एक सर्वगुणसंपन्न फळ आहे जे फक्त मानव जातीलाच नाही तर इतरही प्राणिमात्रांना उपयोगी आहे.
आपण पाहिलं की जवळपास १३०० आंब्यांच्या जाती आहेत आणि प्रत्येक आंब्याचा स्वाद, चव ही मनाला तृप्त करून देणारी आहे. खरंच आपण किती नशीबवान आहोत ना! की, निसर्गाने अशा वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळी फळे, फुले आपल्याला उपलब्ध करून ठेवली आहेत आणि आपण वर्षानुवर्षे या निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या फळा-फुलांचा वापर तसेच, आस्वाद घेत आहोत.
आम्ही दिलेल्या essay on mango in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर फळांचा राजा आंबा निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या my favourite fruit mango essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि 5 lines on mango in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये essay on amba in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट