Essay On Save Fuel in Marathi इंधन बचत मराठी निबंध आज आपण इंधन बचत या विषयावर निबंध लिहिणार आहोत आणि सध्या पहिले तर इंधन बचतीची खूप गरज आहे कारण इंधनाचा साठा कमी पडत आहे. दैनंदिन कामकाजासाठी इंधन ही सर्वात आवश्यक घटकापैकी एक आहे कारण इंधन हे लोकांच्या रोजच्या जीवनातील एक महत्वाचा घटक बनला आहे. उदाहरणार्थ सध्या सर्वजन बाहेर जाताना आपल्या स्वताच्या गाडीशिवाय जात नाहीत आणि गाडी बाहेर घेवून जाण्यासाठी त्यामध्ये पेट्रोल असावे लागते आणि पेट्रोल हे एक इंधन आहे.
आपण सार्वजन अनेक कारानंच्यासाठी इंधनावर अवलंबून आहोत आणि कोळसा, लाकूड, तेल, पेट्रोल किंवा वायू गरम केल्यावर ऊर्जा निर्माण करतात आणि म्हणूनच या सर्व घटकांना आपण त्यांना इंधन म्हणतो आणि इंधन हा आपल्या जीवनात एक अपरिहार्य भूमिका बजावते. आपण वापरत असलेली जवळजवळ प्रत्येक गोष्ट इंधनावर अवलंबून असते.
इंधनाचे काही सामान्य प्रकार म्हणजे पेट्रोल, गॅस, डिझेल, विमानचालन इंधन जे स्वयंपाक, जहाजे, ऑटोमोबाईल, विमाने, उत्पादन आणि प्रक्रिया इत्यादींमध्ये वापरले जातात. इंधन म्हणजे उष्णता ऊर्जा निर्माण करण्यासाठी जाळलेल्या पदार्थाला इंधन म्हणतात आणि जर इंधन म्हणजे काय हे सोप्या शब्दामध्ये सांगायचे म्हटले तर, जळणाऱ्या पदार्थाला इंधन म्हणतात आणि कोळसा, एलपीजी, पेट्रोल, डीझेल हि त्याची काही उदाहरणे आहेत.
पण सध्या आपण मोठ्या इंधन संकटाचा सामना करत आहोत. इंधन हे मानवनिर्मित साधन नाही आणि ही एक नैसर्गिक संसाधने आहे त्यामुळे आपले पर्यावरण वाचवण्यासाठी आपण इंधनाचा वापर अत्यंत विवेकीपणे केला पाहिजे. ज्यावेळी जगामध्ये औद्योगिकीकरणाच्या सुरुवात झाली औद्योगिकीकरणाच्या सुरुवातीपासून, इंधनाच्या वापराचे प्रमाण आणि वेग अनेक पटींनी वाढला आहे.
बहुतेक उद्योग इंधनाच्या वापरावर चालतात तसेच वीज निर्मिती देखील कोळश्यावर अवलंबून असते. म्हणून मला असे वाटते कि इंधनाची बचत म्हणजे पर्यावरणाची आणि नैसर्गिक साधनांची बचत होय.
इंधन बचत मराठी निबंध – Essay On Save Fuel in Marathi
Save Fuel Essay in Marathi 700 Words
वाहनांद्वारे इंधनाच्या ज्वलनाने सोडल्या जाणार्या हानिकारक आणि विषारी वायूंमुळे आपले वातावरण वाईटरित्या संक्रमित झाले आहे. याशिवाय, यामुळे ओझोनचा ऱ्हास, ग्लोबल वार्मिंग अशा अनेक समस्या निर्माण होतात. या गोष्टी पृथ्वीवरील जीवसृष्टीला मोठा धोका बनल्या आहेत.
तसेच यापूर्वी इंधनाचा इतका वापर केला आहे कि सध्या इंधनांचा कमतरता भासत आहे आणि असे चित्र दिसून येत आहे कि काही दिवसामध्ये इंधन संपुष्टात येईल आणि त्यांना पुन्हा निर्माण होण्यासाठी शतके लागतील. म्हणून आपण आत्ताच आपल्या हातामध्ये संधी असताना इंधन बचतीसाठी पावले उचलली पाहिजे आणि आपल्या देशाला इंधन कमतरतेपासून वाचवले पाहिजे.
इंधनाची बचत केवळ आपल्यालाच नाही तर पुढच्या पिढीलाही मदत करणार आहे. कारण यामुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल आणि आपल्या तसेच भावी पिढीला वापरासाठी चांगले आणि सुरक्षित इंधन शोधण्यासाठी वेळ मिळेल. खाली असे काही मार्ग दिले आहेत. ज्यामुळे इंधनाची बचत होईल, ज्यावेळी तुम्ही गाडी चालवत असताना ती वेग मर्यादेने चालावा, त्यामुळे पेट्रोलचा वापर कमी होईल.
त्याचबरोबर आपल्यामधील अनेक लोकांना सवय असते कि गाडी चालू ठेवून बोलत थांबतात आणि त्यावेळी विनाकारण इंधन जळते त्यामुळे लोकांनी गाड्या विनाकारण चालू ठेवून बोलू नये, कारण त्यामुळे इंधन संपते जर कोणासोबत बोलत थांबल्यावर किंवा कोणत्याही कारणामुळे थांबल्यावर गाडी बंद करावी त्यामुळे पेट्रोल वाचेल.
अन्न आणि पेये शिजवताना आणि पुन्हा गरम करण्यासाठी भरपूर इंधन लागते आणि काही लोकांना जेवण बनवताना त्यावर झाकण न लावता शिजवण्याची सवय असते किंवा झाकण न लावता गरम करण्याची सवय असते त्यामुळे इंधन जास्ती लागते आणि जर आपण कोणतीही भाजी किंवा जेवण बनवताना कोणताही पदार्थ झाकण लावून शिजवला तर तो लवकर शिजतो आणि त्यामुळे इंधन वाचते.
तसेच आपल्याला जेवणासाठी वापरल्या जाणाऱ्या इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत करायची असल्यास आपण इलेक्ट्रिक शेगडीचा देखील उपयोग करू शकतो. त्याचबरोबर तुम्हाला अनेक प्रकारे इंधनाची बचत करायची असल्यास एसीचा वापर कमी करा तसेच वापरात नसताना घरातील दिवे आणि पंखे बंद करा.
तसेच तुमच्या कारमध्ये ४५ किलो पेक्षा जास्त वजन २ टक्के पेक्षा जास्त इंधन वापरते, त्यामुळे गाडीमध्ये जितके कमी होईल तितके समान कमी ठेवा त्यामुळे इंधन वाचण्यास मदत होईल, तसेच गाडीच्या टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा आहे का ते चेक करून घ्या, जर गाडीच्या तयार मध्ये हवा कमी किंवा जास्ती असल्यास गाडी सुरळीत वेगाने पळणार नाही आणि त्यामुळे इंधन देखील खूप जळेल.
जर तुम्ही घरातील सर्व व्यक्ती कोठेतरी प्रवासाला जात असाल तर एक मोठे वाहन घेऊन जा त्यामुळे एकाच वाहनाच्या इंधनाचा वापर होईल आणि तुमचा प्रवास देखील होईल अश्या वेगवेगळ्या पद्धतीने आपण इंधनाच होणारा दुर्रुपयोग थांबवू शकतो आणि आपल्या जगाला येणाऱ्या संकटापासून वाचवू शकतो.
आपण इंधनाचा वापर सोयीस्करपणे आणि शाश्वतपणे केला तर आपण आपल्या पुढच्या पिढीच्या अस्तित्वाची खात्री देऊ शकतो. तसेच, शाश्वत वापरामुळे आपल्याला पर्यावरणाचे रक्षण करण्यात मदत होईल कारण ते बाह्य शक्तींमुळे विचलित न झाल्यास ते त्याच्या मूळ स्वरुपात भरून निघेल.
इंधन हि एक नैसर्गिक मालमत्ता जरी असली तरी ती आपली संपत्ती आहे. असे मानून जर प्रेत्येक माणसाने इंधन वाचवण्याचा प्रयत्न केला तर जगातील भरपूर इंधनाची बचत होईल म्हणून इंधन हा आपल्या जीवनातील एक अविभाज्य घटक आहे असे समजून आपण त्याची बचत केली पाहिजे.
आम्ही दिलेल्या essay on save fuel in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर इंधन बचत मराठी निबंध save fuel essay 700 words in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या save fuel essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Essay on Fuel Conservation in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये save fuel essay 500 words in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट