रेल्वे निबंध मराठी Essay on Train in Marathi

Essay on Train in Marathi – Essay on Metro Train in Marathi रेल्वे निबंध मराठी आज आपण या लेखामध्ये रेल्वे या विषयावर निबंध लिहिणार आहोत. रेल्वे हे एक वाहतुकीचे साधन आहे ज्याची विशेष अशी ओळख करून द्यावी लागत नाही कारण आपल्याला सर्वांना माहित आहे रेल्वे म्हणजे काय आणि आपण तो प्रत्यक्षात पहिली देखील आहे आणि प्रवास देखील केला आहे. जॉर्ज स्टीफन याने सर्वप्रथम रेल्वेचा शोध लावला आणि मग त्यानंतर यामध्ये जेम्स वॅट याने सुधारणा केली. रेल्वे गाडी हे एक दोन प्रकारामध्ये विभागले आहे एक म्हणजे प्रवासी रेल्वे आणि दुसरी म्हणजे मालगाडी रेल्वे.

प्रवासी रेल्वे हि वेगवेगळ्या प्रवाश्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी जाण्यासाठी वापरली जाते तर मालगाडी रेल्वे हि माल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरले जाते. सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांना सामान्यतः प्रवाशी रेल्वे म्हणतात .बहुतेक देशांमध्ये प्रवासी रेल्वे गाड्या हे सार्वजनिक वाहतुकीचे कमी खर्चिक, कार्यक्षम आणि लोकप्रिय साधन मानले जाते.

ज्या गाड्या वस्तू जसे कि धान्य, लाकूड, दैनंदिन उपयोगाच्या किराणा, अवजड उपकरणे, धातू या प्रकारचे नेण्यासाठी वापरल्या जातात त्यांना मालगाड्या म्हणतात. अनेक व्यवसायांद्वारे मालगाड्या त्यांच्या कच्च्या मालासाठी आणि तयार मालासाठी वाहतुकीचे कमी खर्चिक साधन मानले जातात.

essay on train in marathi
essay on train in marathi

रेल्वे निबंध मराठी – Essay on Train in Marathi

Essay on Metro Train in Marathi

रेल्वे हे आजकाल वाहतुकीचे सर्वात सामान्य आणि उपयुक्त प्रकार आहे आणि लोक रेल्वेने सहज प्रवास करू शकतात आणि रेल्वेचे तिकीट किंवा भाडे देखील परवडणारे असते. पूर्वी रेल्वे हि वाफेच्या इंजिनवर चालत होती आणि आता जलद वाहतुकीसाठी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांद्वारे बदलली आहेत. ट्रेनमध्ये अनेक कंपार्टमेंट असतात आणि रेल्वे ट्रॅकवर प्रवास करतात तसेच गाड्या प्रशस्त आहेत आणि रेल्वेमध्ये भरपूर लोक किंवा प्रवासी प्रवास करू शकतात.

बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात कारण ते परवडणारे आहे आणि त्यात बरेच लोक किंवा प्रवासी मावतात त्यामुळे लांबचा प्रवास असेल तर लोक रेल्वेचा पर्याय निवडतात कारण विमानची तिकिटे खूप महाग असतात. ट्रेनचा प्रवास आरामदायी असतो आणि बहुतेक प्रकरणांमध्ये, लोक फ्लाइटपेक्षा जास्त पसंत करतात. रेल्वे गाड्यांचे वर्गीकरण हे ५ ते ६ प्रकारामध्ये केले आहे आणि ते म्हणजे लांब पल्ल्याच्या ट्रेन, कमी पल्ल्याच्या ट्रेन, हाय-स्पीड रेल्वे, पॅसेंजर ट्रेन, इंटरसिटी ट्रेन्स आणि प्रादेशिक ट्रेन्स.

सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांना सामान्यतः पॅसेंजर ट्रेन म्हणतात. हाय-स्पीड ट्रेन्स विशेषत: लांब पल्ल्यावरील सार्वजनिक वाहतुकीच्या जलद साधनांसाठी तयार केल्या जातात आणि वापरल्या जातात आणि अनेक आधुनिक शहरांमध्ये सार्वजनिक वाहतुकीचे साधन म्हणून मेट्रो ट्रेनचा वापर केला जातो. पारंपारिकपणे मेट्रो ट्रेन भूमिगत बोगद्यांमध्ये धावण्यासाठी तयार केल्या गेल्या होत्या आणि शहरांच्या बाहेर किंवा विशिष्ट भागात त्या खास उभारलेल्या ओव्हरहेड ब्रिजवरही धावतात.

आपल्याला रस्त्यावर जसे नियम असतात किंवा सिग्नल असतात तसेच रेल्वे ला देखील सिग्नल असतात. रस्त्यावर वापरल्या जाणार्‍या सिग्नलसारखेच असतात. ते ट्रेन ड्रायव्हरला “जा”, “थांबा”, “सावधगिरी बाळगा” किंवा “स्लो डाउन” करायला सांगतात. यातील सर्वात सामान्य सिग्नल लाल, पिवळे आणि हिरवे दिवे आहेत ज्याचा अर्थ रस्ता सिग्नलप्रमाणेच अनुक्रमे “थांबा”, “सावधगिरी” आणि “जा” असा होतो. बर्‍याच आधुनिक गाड्यांमध्ये स्वयंचलित ट्रेन-स्टॉप सिस्टीम बसवलेली असते.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हवेमुळे ट्रेनचे ब्रेक काम करतात. ही हवा दाबाखाली ठेवली जाते आणि तिला ‘कंप्रेस्ड एअर’ म्हणतात. जेव्हा ट्रेन ड्रायव्हर ब्रेकलेव्हर खेचतो तेव्हा संकुचित हवा सिलेंडरमध्ये वाहते आणि पिस्टनवर दाबते. जेव्हा पिस्टन हलतात तेव्हा ते ब्रेक शूज ट्रेनच्या चाकांवर दाबतात आणि यामुळे चाकांचा वेग कमी होतो किंवा वळणे थांबते.

ट्रेनचा प्रवास हा सर्वात रोमांचक प्रवास अनुभवांपैकी एक आहे. हे सहसा दोन प्रकारचे असू शकते, लहान सहली आणि लांब अंतराच्या सहली, आपण ट्रेन मधून रात्रभर देखील प्रवास करू शकतो आणि जरी ट्रेन मधून आपण रात्रभर जरी प्रवास केला तरी आपल्याला कंटाळा येते नाही तर ट्रेन मधून प्रवास करण्यास खूप छान वाटते. आणि जर खिडकीच्या जागा मिळाल्यानंतरचा आनंद हा वेगळाच असतो. आजकाल, लोक विमानाने प्रवास करणे पसंत करतात कारण ते वेळेची बचत करते.

पण विमानाने जाणे कंटाळवाणे आणि नीरस होते. रेल्वे प्रवास हा एकसुरीपणापासून दिलासा देणारा आहे. ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना आपण घरामध्ये जशी विश्रांती घेतो तशी विश्रांती घेता येते तसेच ट्रेनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स असते तसेच आपल्याला रेल्वेमध्ये चहा, नाश्ता ई जेवण देखील मिळते तसेच रेल्वेमध्ये आपल्याला घरामध्ये जसे आपण इकडून तिकडे फिरतो तसेच फिरता येते त्यामुळे आपल्या रेल्वे म्हणजे आपले घर असल्यासारखे वाटते.

तसेच तसेच खिडकीतून अधून मधून वाऱ्याचे गार गार झोके देखील येतात तसेच रेल्वेचा प्रवास हा मोठ्या ग्रुपमध्ये करू शकतो आणि त्यामुळे प्रवास हा ग्रुप मध्ये असल्यामुळे आपल्याला कंटाळा येत नाही तसेच आपण रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळू शकतो जसे किं चेस, दमशेराज यासारखे अनेक मनोरंजक गेम खेळू शकतो.

अश्या या सुंदर प्रवासाचा अनुभव आपण रेल्वे प्रवासामध्ये घेवू शकतो. रेल्वे हे एक उत्तम प्रवासाचे साधन आहे म्हणजेच यातून आपण अगदी सुरक्षितपणे आणि अगदी सर्व सोयी सुविधा प्रवासामध्ये आपल्याला रेल्वेमार्फत आपल्याला मिळतात आणि आणि खूप कमी खर्चामध्ये प्रवास देखील होतो.

आम्ही दिलेल्या essay on train in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर रेल्वे निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या essay on metro train in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि train essay in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!