जेम्स वॅट यांची माहिती James Watt Information in Marathi

James Watt Information in Marathi जेम्स वॅट मराठी माहिती शक्ती म्हटलं की त्याच्याबरोबर त्याचे एकक वॅट येतेच. पण मग आपल्याला प्रश्न पडतो शक्तीसाठी वॅट हेच एकक का वापरतात? तर ज्या शास्त्रज्ञाने शक्ती साठी हॉर्स पॉवर किंवा अश्वशक्ती ही सज्ञा वापरली त्याच्या नावावरून शक्तीला हे एकक दिले. तर मग चला आज जाणून घेऊया या शास्त्रज्ञ बद्दल ज्याचे नाव आहे जेम्स वॅट. चला तर मग आज आपण जेम्स वॅट या शास्त्रज्ञाची थोडक्यात माहिती करून घ्यायचा प्रयत्न करू.

james watt information in marathi
james watt information in marathi

जेम्स वॅट यांची माहिती – James Watt Information in Marathi

जेम्स वॅटमाहिती
जन्म19 जानेवारी 1736
जन्मग्रीनक स्कॉटलंड
शोधजेम्स वॅट यांनी आधीच्या इंजिनात सुधारणा करून वाफ इंजिन बनवले
मृत्यू25 ऑगस्ट 1819
मृत्यूस्थानइंग्लंड

बालपण 

जेम्स वॅट यांचा जन्म 19 जानेवारी 1736 साली ग्रीनक स्कॉटलंड येथे झाला. त्यांच्या वडिलांचा जहाज बांधणीचा आणि बांधकामाचा व्यवसाय होता. जेम्स अशक्त असल्याने त्यांचे आधीचे शिक्षण घरीच झाले. त्यांची आई सुशिक्षित असल्यामुळे त्याला घरीच शिकवत. नंतर शाळेत त्यांनी लॅटिन, ग्रीक व गणित या विषयांचे अध्ययन केले. त्यांच्या वडिलांची एक कर्मशाळा होती तिथेच त्यांनी जहाजावरच्या उपकरणांची माहिती करून घेतली.

महत्वाचे शोध – James Watt Invention

जेम्स वॅट यांनी आधीच्या इंजिनात सुधारणा करून वाफ इंजिन बनवले. हे सर्वत्र वापरले जाऊ लागले तसेच औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात हे महत्त्वाचे साधन ठरले. गेट्स यांनी ग्लासगो व लंडन येथे वैज्ञानिक उपकरण यांच्या निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी ग्लासगो विद्यापीठात वैज्ञानिक उपकरण निर्माते म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

तेथे असताना त्यांनी चतुर्थ यंत्र, होकायंत्र, दाबमापक इत्यादी उपकरणे तयार केली. इंजिन चालवण्यासाठी फार ऊर्जा निर्माण करण्यास मनुष्यबळ लागायचे पण वॅट यांनी वाफेचे इंजिन बनवले व हॉर्सपॉवर ही संकल्पना मांडली आणि युनिट ऑफ पॉवर असे नाव दिले. जन्माच्या वेळी ही वाफ इंजिने खाणीतील पाणी उपसण्यासाठी वापरात होती.यांच्या सुधारणांमुळे वाफ इंजिन चालवायला सोपे झाले. ते अधिक खात्रीशीर रीतीने वापरता येऊ लागले.

अधिक शक्तिशाली बनवता येऊ लागले यामुळे कापड गिरण्या, कागद गिरण्या, पिठाच्या गिरण्या, लोखंडाचे कारखाने,भट्या, पाणी पुरवठा इत्यादी असंख्य ठिकाणी याचा उपयोग होऊ लागला. व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या या इंजिनाने औद्योगिक क्रांतीला बरीच चालना मिळाली.

वाफ इंजिन – James Watt Steam Engine Information in Marathi

वॅट यांनी वाफ इंजिने बनवण्याचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला आणि 1769 साली या इंजिनाचे पेटंट घेतले. 1774 साली ते बर्मिंगहॅम ला गेले व तेथे वाफ इंजिने बनवण्याचा उद्योग सुरू केला. त्यांचा हा उद्योग भरभराटीला आला 1776 साली त्यांनी दोन इंजिने उभारली त्यापैकी एक इंजिन कोळशाच्या खाणीत व दुसरे इंजिन लोखंडाच्या कारखान्यात उभारले.

यामुळे वाफ इंजिनांना मागणी वाढली व धंद्याला भरभराटी प्राप्त झाली. 1781 सालापर्यंत त्यांनी तांब्याच्या आणि कथिलाचा खाणीतील पाणी उपसण्यासाठी असंख्य वाफ इंजिने उभारून त्यांच्या देखभालीचे काम केले. वॅट यांनी इंजिनातील  दट्ट्याच्या  पश्चाग्र गतीचे भुजा दंडाच्या परिभ्रमी फिरत्या गतीत परिवर्तित केले.

त्यांनी सूर्य व ग्रह दंतचक्र ही योजना मांडली. त्यामुळे इंजिनाच्या एका आवर्तनात भुजा दंडाचे दोन फेरी होतात 1782 साली त्यांनी द्विक्रीय इंजिनाचे पेटंट घेतले. या इंजिनात दांडा रेटला व ओढलाही जातो. वॅट यांनी इंजिनाची गती स्वयंचलितपणे नियंत्रित करणारा केंद्रोत्सारी गती नियम शोधून काढला.

1790 साली दाबमापक शोधला. त्यामुळे वॅट इंजिन परिपूर्ण अवस्थेत पोहोचले. इंजिनची शक्ती मोजण्यासाठी त्यांनी त्यांची घोड्याच्या शक्तीची तुलना केली आणि अशाप्रकारे हॉर्सपॉवर (अश्वशक्ती) ही सज्ञा प्रचारात आली. त्यानंतर त्यांनी एक अश्वशक्ती म्हणजे एका मिनिटात 33 हजार पौंड वजन एक फूट उंच उचलण्यास लागणारी शक्ती हे मूल्य निश्चित केले. दाबमापकाने इंजिनाची अश्वशक्ती मोजत आणि अश्वशक्ती नुसार इंजिनाची किंमत ठरवत.

रसायनशास्त्रज्ञ आणि अभियांत्रिक 

वॅट इंजिना शिवाय त्यांनी रसायन शास्त्र आणि अभियांत्रिकी या विषयातही संशोधन केले होते. तसेच त्यांना संगीत व भाषा यामध्येही रस होता. त्यांनी वेगवेगळे महत्त्वाचे शोध लावले जसे की इंधनाची बचत करणारी भट्टी, पुतळ्याची पुनर्निर्मिती करणारे यंत्र, आमलंतेची चाचणी घेणारे दर्शक, नियामक झडप दाब देऊन मजकुराचा प्रति काढावयाचे यंत्र व प्रतिलिपि शाई, क्लोरीन च्या मदतीने विरंजन करण्याचे तंत्र वगैरे त्यांचे शोध महत्त्वाचे आहेत.

आपले कार्यालय ऊबदार ठेवण्यासाठी त्यांनी वाफेच्या वेटोळ्याचा वापर केला होता. मूलद्रव्य नसून संयोग आहे असे सुचविणारे ते पहिले संशोधक होती त्यांनी ग्लासगो वॉटर कंपनीचे सल्लागार म्हणून काम केले होते. ते लूणार सोसायटीचे सदस्य होते जी विज्ञान व कला यांचा प्रसार करत होती.

मानसन्मान 

वॅट यांना त्यांच्या संशोधन कार्याबद्दल अनेक मानसन्मान मिळाले होते: ग्लासगो विद्यापीठाची डॉक्टर ऑफ लॉज ही पदवी, एडिंबरो व लंडन येथील रॉयल सोसायटीचे सदस्यत्व, अकॅडमी ऑफ सायन्स चे परदेशी सदस्यत्व. त्यांना जहागिरी सुद्धा देण्यात आली होती पण त्यांनी ती नाकारली. त्यांच्या सन्मानार्थ शक्तीच्या एककाला वॅट हे नाव देण्यात आले असून वेस्टमिन्स्टर येथे त्यांचा पुतळा उभारला आहे.

बजावणाऱ्या लोकांमध्ये फ्रँकलिन यांची गणना होऊ लागली.

जेम्स वॅट यांच्या वस्तूंचे पेटंट

पेटंट 913 A –  स्टीम इंजिन ला वेगळे कांडेसर लावून त्याचा वापर करणे यास 1769 ला मान्यता मिळाली.
पेटंट 1306 –  सूर्य आणि ग्रहांच्या परिभ्रमण याच्या गतीस सांगणाऱ्या यंत्राचा शोध लावला या 1782 मध्ये मान्यता मिळाली.
पेटंट 1244 –  शब्दांना कॉपी करण्याच्या नवीन विधीस शोधून काढले यास सतराशे ऐंशी ला मान्यता मिळाली.
पेटंट 1321 –  विविध रूपांना प्रस्तुत केले यास 1782 ला मान्यता मिळाली.
पेटंट 1422 –   स्टीम इंजिन  मध्ये अमुलाग्र बदल घडवून आणला यास 1180 ला मान्यता मिळाली.
पेटंट 1485 –    भट्टीस निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले या 1785 ला मान्यता मिळाली.

बजावणाऱ्या लोकांमध्ये फ्रँकलिन यांची गणना होऊ लागली.

मृत्यू 

अशा या थोर शास्त्रज्ञाचा मृत्यू 25 ऑगस्ट 1819 रोजी इंग्लंड येथे झाला.

वरील सर्व मजकूर पाहून आपणास अंदाज लागला असेल कि जेम्स वॅट कोण होते james watt information in marathi language त्यांनी कशाचा शोध लावला व त्यांचा इतिहास काय आहे. scientist james watt information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच james watt steam engine information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही जेम्स वॅट या शास्त्रज्ञाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या information about james watt and his steam engine in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!