My First Train Journey Essay in Marathi – Majha Pahila Railway Pravas माझा पहिला रेल्वे प्रवास निबंध आज आपण या लेखामध्ये माझा पहिला रेल्वे प्रवास या विषयावर निबंध लिहिणार आहोत म्हणजेच मी या लेखामध्ये माझा रेल्वेने केलेला पहिला प्रवास कसा झाला या विषयावर निबंध लिहिणार आहोत. प्रवास बहुतेक व्यक्तींना आवडणारा एक आनंदाचे क्षण असतात आणि आपण सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे प्रवास हा केलेला असतो आणि त्यामधील काही प्रवास हे आयुष्यभर आठवणीमध्ये राहण्यासारखे असतात म्हणजेच ते आपण विसरू शकत नाही.
कोणताही प्रवास आपण बस, गाडी, स्वताची कार, विमान, जहाज किंवा रेल्वेने केलेला असतो आणि कोणत्याही वाहतूक मार्हाने केलेला पहिला प्रवास हा आपल्यासाठी खूप अविस्मरणीय आणि आनंदाचा असतो. आपल्याला कोणत्याही वाहतूक मार्गाने केलेला प्रवास हा खूप मजेशीर वाटतो तसेच या प्रवासामुळे तुम्हाला वेगळे पणा अनुभवायला मिळतो.
तसेच मला देखील पहिल्यांदा रेल्वे प्रवास केल्यानंतर एक वेगळे पणा अनुभवायला मिळाला होता. मी ज्यावेळी पहिल्यांदा रेल्वे मध्ये बसले त्यावेळी मी १५ ते १६ वर्षाची होती आणि रेल्वेने प्रवास करण्याचे कारण होते तिरुपती बालाजी म्हणजेच आम्ही सर्व कुटुंबातील सदस्य आणि आमचे काही नातेवाईक सर्वजन आम्ही तिरुपतीला रेल्वेने जाण्याचे ठरवले होते.
माझा पहिला रेल्वे प्रवास निबंध – My First Train Journey Essay in Marathi
Essay on My Train Journey in Marathi
माझी नववी ची परीक्षा संपली होती आणि आम्हाला मी महिन्याच्या सुट्ट्या पडल्या होत्या आणि आम्ही नेहमी प्रमाणे मी महिन्यामध्ये कोठे तरी फिरायला जाण्याचा प्लॅन करत होतो आणि आमचे तिरुपतीला जाण्याचे अचानक ठरले माझ्या घरातील इतर सदस्य या पूर्वीदेखील तिरुपतीला जावून आलेले ते देखील रेल्वेने आणि आम्ही अजून तिरुपती बालाजी अजून बघितले नव्हते आणि आपल्या सर्वांना माहित आहे कि तिरुपती बालाजी हे एक भारतातील पवित्र ठिकाण आहे.
आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी जायचे होते म्हणून आम्ही तिरुपतीला जाण्याचा हट्ट केला आणि मग शेवटी तिरुपतीला जाण्याचे ठरले आणि ते देखील रेल्वेने. आम्ही ३ दिवस तिरुपतीमध्ये फिरण्याचा प्लॅन केला आणि आम्हाला तिरुपतीला जाण्यासाठी आणि येण्यासाठी अशे २ दिवस लागणार होते म्हणजेच आम्ही एकूण ५ दिवस हि तरीप करणार होतो. आमच्या घरातील सदस्य आणि नातेवाईक हे सार्वजन मिळून आम्ही १४ ते १५ जन होतो आणि आमच्या घरातील एकूण ७ जन होतो.
आम्ही तिरुपतीला जाण्यासाठी जी तारीख ठरलेली आहे त्या तारखेचे रेल्वेचे १५ जणांचे बुकिंग ऑनलाईन केले. त्या तारखेला आमची रेल्वे सात वाजता होतो त्यामुळे आम्ही सर्वजण सकाळी लवकर उठून सर्व आवरून आणि प्रवासाला जायचे म्हणून भरून ठेवलेल्या बॅग घेवून रेल्वे स्थानकाकडे निघालो. आम्ही ज्या शहरामध्ये राहत होती त्या ठिकाणी रेल्वे स्थानक होते आणि तेथून बालाजीला जाण्यासाठी थेट रेल्वे देखील होती.
रेल्वे स्थानक थोडे लांब असल्यामुळे आम्ही थोडे लवकरच निघालो आणि रेल्वे स्थानकावर आम्ही बरोबर ६:३० वाजता पोहचलो. त्याचबरोबर आमचे इतर नातेवाईक देखील सांगितलेल्या वेळेला हजार झाले. आमची तिरुपतीची रेल्वे ज्या प्लॅट फॉर्मवर येणार होती त्याचा प्लॅट फॉर्मवर आम्ही जाऊन उभारलेलो. आम्ही रेल्वे स्थानकावर अगोदर अर्धा तास पोहचलो होतो आणि मग त्या वेळेमध्ये काय करायचे म्हणून आम्ही रेल्वे स्थानकावर थोडे फोटो काढले.
बरोबर ७ वाजता आमची रेल्वे आली आणि आमच्या बुक केलेल्या भागामध्ये पटकन चढलो कारण रेल्वे स्थानाकार रेल्वे ठराविक वेळेसाठी थांबते. आता आम्ही रेल्वेमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम आमच्या जागा शोधल्या आणि तेथे आमच्या बॅग आणि समान ठेवले आणि सुदैवाने आमच्या कुटुंबातील सदस्य जवळ जवळ आल्यामुळे चांगले वाटले. अश्या प्रकारे आमचा रेल्वेतील प्रवास सुरु झाला आणि संत गतीने जाणाऱ्या रेल्वेचा वेग वाढला. रेल्वेतून जाताना खिडकीतून बाहेरील निसर्ग पाहण्यास खूप छान वाटत होते.
तसेच त्याच्या खिडकीतून वाऱ्याचे अधून अधून झोके देखील येत होते त्यामुळे रेल्वेतील प्रवास छान वाटत होता. आम्ही रेल्वेमध्ये बसल्यानंतर थोड्या वेळाने सोबत आणेल्या चिवड्याचा नाश्ता केला आणि मग रेल्वे मध्ये मिळणाऱ्या चहाने चहाची तलप भागवली तसेच दुपारचे जेवण घरातून चपाती, भाजी आणि भात यामध्ये केले.
आम्ही रेल्वेमध्ये सर्व एकत्र येऊन गाण्याच्या भेंड्या, दम शेराज, आणि इतर वेगवेगळे गेम खेळले तसेच खूप मज्जा केली तसेच आमच्या बाबा, काका, मामा हे एकमेकांशी गप्पा मारत बसले तसेच एकमेकांची विचारपूस केली तसेच दुपारची झोप काढली अश्या प्रकारे कसा बस दिवस काढला आणि मग रात्र झाली मग आम्हाला रेल्वेमध्ये मिळालेल्या जेवणातून रात्रीचे जेवण केले आणि थोडावेळ परत गप्पा सुरु झाल्या तसेच या गप्पा तश्या तास दीड तास रंगल्या आणि मग आम्ही थोड्या वेळाने सर्वजण झोपी गेलो.
रेल्वेमध्ये घरामध्ये जशी झोप लागते तशी झोप लागलीच नाही मग सकाळी आम्ही सर्वजण उठलो आणि पाहतो तर काय आमची काकी रडत होती आणि बाबा, काका आणि दादा तिच्या भोवती होते. ती रडण्याचे कारण होते तिची पर्स केली होती आणि त्यामध्ये तिने घरातील बाजारातून बचत करू ठेवलेले पैसे आणले होते जेणेकरून काही तरी घेता यावे परंतु तीच पर्स गेली होती पण आता ती सापडणे देखील अवघड होते त्यामुळे काका, बाबा आणि दादाने आणी आम्ही देखील काकीला समजावले आणि शांत केले.
मग थोड्या वेळात आम्ही तिरुपतीमध्ये पोहचलो आणि रेल्वेमधून उतरल्यानंतर अम्हाल तेथील वातावरण एकदम भक्तीमय वाटू लागले. आम्ही एक गाडी भाड्याने घेतली आणि आम्ही ऑनलाईन बुक केलेल्या हॉटेलमध्ये गेलो आणि मग अंघोळ वैगेरे करून प्रथम नाश्ता केला आणि मग बालाजीचे मुख्य मंदिर पहिले आणि तसेच तीरुपतीतील अनेक पर्यटक स्थळे पहिली.
अश्या प्रकारे आम्ही तिरुपतीमध्ये ३ दिवस मुकाक्म केला आणि तिरुपती बालाजी मंदिर, सुवर्ण मंदिर आणि हेस्कॉम मंदिर पहिले आणि तीन दिवस खूप मज्जा केली आणि परतीच्या प्रवासासाठी निघालो आणि आम्ही तिरुपती हून परत रेल्वेनेच येणार होतो आणि आम्ही रिटर्न तिकीट देखील बुक केले होते आणि आम्ही तिरुपतीच्या रेल्वे स्थानकावर रेल्वे मध्ये बसलो आणि आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.
आम्ही रेल्वे मध्ये परत सर्व एकत्र येऊन गाण्याच्या भेंड्या, दम शेराज, आणि इतर वेगवेगळे गेम खेळले तसेच खूप मज्जा केली आणि गप्पा मारल्या आणि रेल्वेमध्ये वेळ घालवला आणि अश्या प्रकारे माझा रेल्वेचा पहिला प्रवास झाला होता आणि मी पहिल्यांदा रेल्वे प्रवास अनुभवला होता.
आम्ही दिलेल्या My First Train Journey Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर माझा पहिला रेल्वे प्रवास निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Essay on my train journey in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Majha Pahila Railway Pravas माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये types of yoga information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट