गंगा नदी विषयी माहिती Ganga River Information in Marathi

Ganga River Information in Marathi गंगा नदी विषयी माहिती गंगा नदी ही हिमालायात उगम पावणाऱ्या नद्यांपैकी एक महत्वाची नदी आहे. हिमालयातील बर्फाच्छादित शिखरातून उगम पावणाऱ्या नद्यांना मोसामी पावसापासून ही पाण्याचा पूरवठा होतो त्यामुळे वर्षभर भरपूर पाणी असणाऱ्या मोठमोठया नद्या येथून वाहतात. त्यानी मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन ही केले आहे. त्यामुळे भारताच्या आर्थिक जीवनात त्याना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे .

ganga nadi हिंदुधर्मीयांची ही अत्यंत पवित्र अशी नदी आहे. तिला हिमालयाच्या दक्षिण उतारावरील व विंध्य पर्वताच्या उत्तरेकडील उतारावरील नद्या उतारावरील नद्या येऊन मिळतात या नदीचे जलसंधारण क्षेत्र अत्यंत विस्तृत म्हणजे सुमारे 8 लाख 61 हजार 404 चौरस किलोमीटर असून त्याचे भारताचा एक चतुर्थांश भाग व्यापला आहे. गंगा नदीची लांबी 2510 किमी आहे.

ganga river information in marathi
ganga river information in marathi

गंगा नदीची माहिती – Ganga River Information in Marathi

गंगा नदीमाहिती
लांबीसुमारे 2510 किमी
राज्य क्षेत्रउत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल
नदीप्रणाली ते क्षेत्र8 लाख 61 हजार 404 चौरस किमी
उपनद्या यमुना, कोसी, गंडक, घागरा, गोमती, राम गंगा, दामोदर, सोन (शोन)
उगमस्थान (Ganga Nadi Ugam Sthan)हिमालयातील बर्फाच्छादित शिखरातून

उगमस्थान व नदी प्रणाली  – Ganga Nadi Ugam Sthan

  • समुद्रासपट्टीपासून सुमारे सात हजार दहा मीटर उंचीवरील गोमुखा जवळ गंगोत्री हिमनदी पासून गंगा नदीचा उगम होतो. येथे भागीरथी या नावाने ओळखली जाते. देवप्रयागजवळ  तीला अलकनंदा नदी येऊन मिळते. हा संयुक्त प्रवाह येथून पुढे गंगा या नावाने ओळखला जातो. हरिद्वार जवळील गंगा नदी डोंगराळ प्रदेश सोडून सपाटीच्या प्रदेशात उतरते . 
  • हरिद्वारच्या दक्षिनेला गंगा नदीपासून कालवा काढला असून तो अप्पर गंगा कालवाया नावाने ओळखल्या जातो. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यातूनही नदी वळणे घेत वाहते. प्रयाग व  अलाहाबाद या शहराजवळ तिला यमुना नदी येऊन मिळते. गंगा व यमुना या नद्यांचे संगम हिंदुधर्मियांना अत्यंत पवित्र आहे .यापुढे संयुक्त प्रवाह उत्तर प्रदेशातील वाराणसी जिल्ह्यातून पूर्वेकडे वाहतो.
  • तेथे तिला गोमती व घागरा (शरयू) या उपनद्या मिळतात. त्यानंतर ती बिहार राज्यातून वाहते. पाटणा शहराच्या थोडे अलीकडे तिला दक्षिणेकडे सोन (शोन) या उपनद्या  मिळतातं. काही अंतर गेल्यावर पश्चिम बंगालच्या राज्यात नदीच्या त्रिभुज प्रदेश आला सुरुवात होते. तिच्या अनेक शाखा- प्रशाखा होत जातात. मेघना, पद्या, मधुमती, हुगळी इत्यादी शाखांनी शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते.
  • या शस्खानपैकी  एक हुगली शाखा भारतात येते. तिच्या तीरावरच कोलकत्ता हे बंदर आहे. गंगानदीच्या प्रवाहात मार्गाची लांबी 2525 किमी आहे. तिचा वरचा, मधला, खालचा प्रवाह सर्वसाधारण पणे उत्तर प्रदेश, बिहार व बंगाल प्रांतात आहे. या सर्व भागात तिला डाव्या-  उजव्या तीरावर मोठमोठ्या उपनद्या येऊन मिळतात. बंगाल प्रांतात गंगा नदीने  विस्तृत असा त्रिभुज प्रदेश तयार केला आहे.
  • गंगेचा दक्षिणेकडचा भाग वन व्याप्त असून त्याला सुंदरबनअसे नाव आहे .यापैकी बरचसा भाग बांगलादेश मध्ये येतो.  गंगेचा प्रवाह मार्गाला डाव्या उजव्या तीरावर येऊन मिळणाऱ्या नद्या पैकी उजव्या तीरावरील उपनद्या दक्षिणेकडून तर डाव्या तीरावरील उपनद्या उत्तरेकडून वाहत येतात.
  • नक्की वाचा : गोदावरी नदी माहिती 

दक्षिणेकडून येणाऱ्या उपनद्या :-

१. यमुना नदी 

ही गंगेची सर्वात लांब व महत्त्वाची उपनदी आहे व हिचे जलसंग्राहक क्षेत्र सुमारे तीन लाख 66 हजार 223 चौ. की. मी इतकी असून ते भारतात दुसर्या क्रमांकाचे आहे.

गढवाल (उत्तराखंड) येथे बंदरपुंच शिखरावर समुद्रसपाटीपासून 6330 मीटर उंचीवर यमुनोत्री या हिमनदीतून उगम पावते. तिच्यावरच्या प्रवाहास तोस ही उत्तरेकडून येणारे नदी मिळते. कालसी गावाच्या पुढे ती डून खोऱ्यातून वाहते. उत्तर प्रदेशातील सहारणपुर जिल्ह्यात फैजाबाद  या गावाजवळ ती मैदानी प्रदेशात प्रवेश करते. 

कधी या भागात तिची रुंदी बरीच वाढलेली दिसते. येथे तिचा उजव्या  व डाव्या तिरांवरून  कालवे  काढले आहेत. यानंतर ती मुजफ्फराबाद, दिल्ली व मथुरा या शहरांकडून वाहते. पुढे अलाहाबाद शहराजवळ ती गंगेस मिळते.

2.सोन (शोन) नदी

जवळजवळ 784 कि.मी. लांबीची ही नदी गंगेची उपनदी अमरकंटक च्या उंच भागात (समुद्र सपाटीपासून जवळपास 600 मीटर) उगम पावते. तिचा उगम नर्मदा नदीच्या उगमा जवळच आहे. उगमापासूनपासून काही अंतर गेल्यावर ती अमरकंटक च्या पठारावरून खाली उतरते व बिलास्पुर आणि रेवा जिल्ह्यातून वाहते.

पुढे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातून वाहत असताना तिने रुंद व खोल दरी तयार केली आहे. काही ठिकाणी तिची दरी घळीच्या स्वरूपात आहे. बिहार राज्यात आल्यावर दिनाजपुर शहराच्या उत्तरेस 48 किमी अंतरावर गंगेला मिळते.

3.दामोदर नदी

या नदीची एकूण लांबी 541 की. मी. इतकी असून एक जलसंधारण क्षेत्र 25,820 चौ.कि मी. इतके आहे. ही गंगा नदीच्या हुगळी शाखेची उपनदी आहे.

झारखंड राज्याच्या दक्षिण भागात छोटा नागपूर पठारात दोन प्रवाह च्या स्वरूपात तिचा उगम होतो. पालमू आणि पालमाऊ जिल्ह्यातील तोरी परगण्यात दक्षिण कडील प्रवाह हजारीबाग च्या वायव्येस उत्तरेकडील प्रवाह उगम पावतो. यापैकी दक्षिणेकडील प्रवाह अधिक महत्त्वाचा आहे. सुमारे 42 किमी अंतर गेल्यावर हजारीबाग जवळ हे दोन्ही प्रवाह एकत्र येतात. हा संयुक्त प्रवाय दामोदर या नावाने ओळखला जातो.

उत्तरेकडून येणारे उपनद्या:-

1.राम गंगा नदी :-

या नदीचा उगम गढवाल जिल्ह्यातील हिमालयातील बर्फाच्छादित प्रदेशात थोड्या दक्षिणेस समुद्रसपाटीपासून सुमारे तीन  3110 मीटर उंचीवर होतो. सुरवातीचा 144 किमी लांबीचा प्रवाहमार्ग गढवाल व कुमाऊ प्रदेशात असून येथे नदीच्या प्रवाह मार्गात अनेक धावत्या आहेत. बिजनोर जिल्हा कालघर येथे ही नदी मैदानी प्रदेशात प्रवेशते. तिथे तिच्या पात्राचा विस्तार झालेला आहे. रामगंगा नदीच्या प्रवाह मार्गाची लांबी 596 किमी इतकी आहे.

2.गोमती नदी:-

उत्तर प्रदेशांत उत्तरेकडे पिलिभित शहराच्या पूर्वेस 32 किमी अंतरावर या नदीचा उगम होतो. या नदीच्या सुरुवातीचा 20 किमी लांबीचा प्रवाह फारच लहान असून कोरडा पडतो; परंतु गइहाई नावाची एक लहानशी उपनदी येऊन मिळाल्यावर हा प्रवास बराचसा रुंद होतो.

पुढे तिला जोकनाई नदी येऊन मिळते. गोमतीचा प्रवाह वर्षभर वाहतो. यानंतरच्या भागात नदी वळणे घेत घेत वाहते. 800 किमी लांबीनन्तर ही नदी गाझिपूर जिल्ह्यातील सैदपूर गावाजवळ गंगा नदीला येऊन मिळते.

3.घागरा नदी:- 

तिबेटमध्ये मानसरोवरच्या दक्षिण गुर्ला मंधाता शिखराजवल उगम पावणारी ही नदी नेपाळमधून भारतात प्रवेश करते. पश्चिम नेपाळमध्ये ही ‘कर्नाली’ या नावाने ओळखली जाते. सारद्द, राप्ती व सारजू नदी या घागरा नदीच्या प्रमुख उपनदया होत. घागरा नदीच्या प्रवाहमार्गाची लांबी 1080 किमी इतकी आहे .अयोध्या शहराजवळून ती गोरखपूर जिल्ह्यत येते; नंतर बिहारच्या सिमेजवळ छाप्रा येथे नदी ती गंगा नदीला येऊन मिळते.

अयोध्या प्रदेशातील ही सर्वात मोठी नदी असून तिच्यापासून काही प्रमाणात दळण वळणं ही चालते. घागरा नदिसच शरयू नदी म्हणून ही ओळखले जाते.

4.गंडक नदी:-

ही नदी नेपाळ हिमालयात उगम पावते व नैऋत्य दिशीने वाहत भारतात येते. तिच्यामुळे उत्तर प्रदेश व बिहार राज्यांच्या सीमा तयार झाल्या आहेत. हाजीपुर (बिहार) येथे ती गंगेला येऊन मिलते. या नदीचा उगम 7620 मिटर उंचीवर बर्फाच्छादित शिखरातून होत असल्यामुळे ती बारमाही वाहणारी तर आहेच परंतु तिला वारंवार पुरही येतात. या नदीची भारतातील एकूण लांबी 425 किमी इतकी आहे.

5.कोसी नदी:-

हीचा उगम पूर्व नेपाळमध्ये सप्त कौशिक प्रदेशात होतो. सात वेगवेगळ्या प्रवाहापासून या नदीचा

उगम झाल्यामुळे तिला ‘सप्तकौशीकी’ असेही म्हणतात. हीचा सुरवातीचा 96 किमी लांबीचा प्रवाहमार्ग नैऋतु दिशेने , तर नंतरचा 256 किमी लांबीचा प्रवाह मार्ग आगनेया दिशेने आहे. छत्र शहराजवळ गेल्यावर ती डोंगराळ भाग सोडते व काही अंतर प्रवास करून भागलपूर जिल्यात प्रवेशते. येथे तिचे पात्र बरेच रुंद झाले आहे.

बिहार राज्यात 134 किमी अंतर वाहत गेल्यावर ती पुरनिया जिल्ह्यत गंगा नदीला मिळते. वेगवान प्रवाह, वारंवार बदलेले जाणारे पात्र आणि मोठेमोठे पूर यामुले कोसी नदी बिहारचे दु:खाश्रु म्हणून कुप्रसिद्ध आहे.

गंगेचे प्रदूषण आणि पर्यावरणीय समस्या:- Ganga River Pollution Information in Marathi

नदीच्या जवळपास राहणाऱ्या 400 दशलक्ष लोकांमुळे प्रदूषण पातळीमुळे गंगेचा त्रास होतो.  नदीच्या काठावरुन अनेक शहरांमधील सांडपाणी, औद्योगिक कचरा आणि नॉन-डिग्रेटेबल प्लास्टिकमध्ये लपेटलेले धार्मिक अर्पणे नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषक वाढतात कारण ती दाट लोकवस्तीच्या प्रदेशातून वाहते. ही समस्या आणखीनच वाढली आहे की बरेच गरीब लोक रोज आंघोळ, धुणे आणि स्वयंपाक यासाठी नदीवर अवलंबून असतात. 

जागतिक बँकेचा अंदाज आहे की भारतातील जल प्रदूषणाचा आरोग्य खर्च भारताच्या जीडीपीच्या तीन टक्के इतका आहे.  असेही सुचविले गेले आहे की भारतातील सर्व आजारांपैकी 80% आणि मृत्यूंपैकी एक तृतीयांश पाण्यामुळे होणा-या रोगांना कारणीभूत ठरू शकते.

अर्थव्यवस्था संपादन:-

  • गंगा नदीची सुपीक जमीन आणि भारत आणि बांगलादेशच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे. गंगा आणि त्याच्या उपनद्या मोठ्या भागात सिंचनाचा बारमाही स्रोत प्रदान करतात.
  • भात, ऊस, मसूर, तेलाचे बियाणे, बटाटे आणि गहू या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पिकविल्या जातात. नदीच्या काठावर, दलदल व तलावांच्या उपस्थितीमुळे शेंगदाणे, मिरची, मोहरी, तीळ, ऊस आणि पाट या पिकांना समृद्धी मिळते.
  • नदीकाठी मासेमारीच्या बर्‍याच संधी आहेत, तरीही ती अत्यंत प्रदूषित आहे. नदीच्या काठी वसलेल्या उन्नाव आणि कानपूर ही प्रमुख औद्योगिक शहरे प्रदूषणात भर घालत आहेत. कानपूर हे गंगेवरील सर्वात मोठे शहर आहे.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि गंगा नदी कोठून कोठे वाहते तिची लांबी किती आहे त्याचबरोबर नदीचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्व कसे आहे तसेच नदीची वैशिट्ये कोणती आहेत. ganga river information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about ganga river in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही गंगा नदी ganga nadi information in marathi विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या ganga river in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!