गणपत पाटील मराठी माहिती Ganpat Patil Biography in Marathi

Ganpat Patil Biography in Marathi – Ganpat Patil Information in Marathi गणपत पाटील मराठी माहिती नटरंग ही भूमिकाच ज्यांनी खऱ्या आयुष्यामध्ये साकारली व जगली ते म्हणजे मराठी तमाशा चित्रपटांमधील अभिनयसम्राट गणपत पाटील. गणपत पाटील हे मराठी तमाशा चित्रपटांमधील एक अस व्यक्तिमत्व होतं ज्यांनी आपल्या बायकी सोंगाड्या च्या म्हणजेच ‘नाच्या’ च्या भूमिकेतून संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. परंतु समाजाच्या मानसिकतेमुळे त्यांचं आयुष्य आगीमध्ये होरपळून निघालं. गणपत पाटील यांचा जीवन परिचय आपण आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

ganpat patil biography in marathi
ganpat patil biography in marathi

गणपत पाटील मराठी माहिती – Ganpat Patil Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)गणपत पाटील
जन्म (Birthday)२० ऑगस्ट १९२०
जन्म गाव (Birth Place)महाराष्ट्रातील कोल्हापूर
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)तमाशा चित्रपटांमधील अभिनयसम्राट
मृत्यू (Death)२३ मार्च २००८

Ganpat Patil Information in Marathi

जन्म

गणपत पाटील यांचा जन्म २० ऑगस्ट १९२० रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे झाला. गणपत पाटील यांचं कुटुंब अतिशय सामान्य आणि गरीब होतं. घराची परिस्थिती बेताची होती त्यातच अगदी लहान वयामध्ये देवाने गणपत पाटील यांच्याकडून वडिलांचे सुख देखील हिरावून घेतलं. त्यामुळे सर्व कुटुंबाचा भार त्यांच्या आईवर येऊन पडला होता.

शिवाय घरामध्ये खाणारी तोंड देखील जास्त होती. गणपत पाटील यांना सहा भावंडे होती. घराची आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी व आईला तितकाच हातभार लागावा म्हणून गणपत पाटील यांनी लहान वयामध्ये मिळेल ती काम करायला सुरुवात केली. कधी भाजी विकणे तर कधी मोल मजुरीचे काम देखील केले. लहान वयामध्ये चिमुकल्या गणपतला पोटाची भूक मिटवण्यासाठी कष्ट सोसावे लागले.

खऱ्या आयुष्यातील नटरंग गणपत पाटील

पूर्वीच्या काळी जत्रा भरायची आणि त्या वेळी रामायणाचे खेळ प्रसिद्ध होते. या खेळांमध्ये गणपत पाटील हे अगदी हौसेने भाग घ्यायचे. रामायणाच्या खेळांमध्ये बऱ्याच वेळा बजावलेली सीतेची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली. पुढील काळात त्यांचा परिचय राजा गोसावी यांच्याशी झाला आणि त्यांच्याच ओळखीतून पुढे गणपत पाटील यांना मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटमध्ये प्रफुल्ल पिक्चर मार्फत चित्रपटसृष्टीमध्ये काम करण्याची संधी चालून आली.

सुरवातीला सुतार काम, रंगभूषा सहाय्यकाची कामे मिळाली. परंतु मास्टर विनायक यांचे निधन झालं आणि गणपत पाटील पुन्हा मुंबईवरून कोल्हापूरला परतले. त्यावेळी गणपत पाटील बलिदान व वंदे मातरम या चित्रपटांमध्ये अभिनय करत होते. या चित्रपटांमधील भूमिकांमधून त्यांना भालाजी पेंढारकरांच्या मीठभाकर या चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका मिळाली.

या भूमिकेने गणपत पाटील यांच्या अभिनय कारकिर्दीमध्ये मोलाची भर घातली. सन १९५०.. पारतंत्र्याचा तो काळ होता आणि त्या काळामध्ये तमाशा हा ग्रामीण महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा कलाप्रकार लोकप्रिय होता. आणि या कलाप्रकाराचा प्रभाव कुठे ना कुठे मराठी चित्रपटांवरही दिसून आला. एक काळ होता जेव्हा मराठी चित्रपट सृष्टीमध्ये तमाशापटांनी व लावणीपटानीं मैदान जिंकलं होतं. आता तमाशा म्हटलं तर तमाशीनीं आल्या आणि त्याच्या सोबतच प्रेक्षकांना मनोरंजनाची फोडणी देणारा नाच्या देखील आलेच.

मग मराठी चित्रपट सृष्टी मध्ये देखील नाच्या ची भूमिका गाजली आणि ही भूमिका गाजवणारे महान कलाकार होते गणपत पाटील. गणपत पाटील हे नाटकांमध्ये देखील अभिनय करायचे. ‘ऐका हो ऐका’ या तमाशाप्रधान नाटकांमध्ये गणपत पाटील यांनी बायकी सोंगाड्याची म्हणजेच नाच्याची भूमिका बजावली आणि या भूमिकेने महाराष्ट्रामध्ये एक वेगळीच लोकप्रियता मिळवली.

पुढे ‘जाळीमंदी पिकली करवंद’ या नाटकातही त्यांनी हीच व्यक्तिरेखा साकारली त्यांची सोंगाड्या ची भूमिका इतकी गाजली की ‘वाघ्या मुरळी’ या कृष्ण पाटील यांच्या चित्रपटात गणपत पाटील यांना पुन्हा नाच्या ची भूमिका मिळाली. गणपत पाटील यांनी साकारलेली नाच्याची भूमिका लोकांच्या मनामध्ये झपाट्याने घर करू लागली आणि त्यांच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत मध्ये बरंच गाजलं.

तसं बघायला गेलं तर नाचाची ही भूमिका जेमतेम फुटेज मिळवून देणारी होती. प्रेक्षक मराठी तमाशापटांत मध्ये गणपत पाटील यांना नाच्या च्या भूमिकेमध्ये बघायला व्याकूळ व्हायचे. त्यांनी साकारलेली ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात इतकी भरली की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळायला सुरुवात झाली. गणपत पाटील यांनी साकारलेली नाच्याची भूमिका लोकांच्या पसंतीस पडली कारण त्यामध्ये एक वेगळंच वैशिष्ट्य होतं.

बायकी आवाजात ओरडत बोलणं, उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवणं आणि डावा हात कमरेवर ठेवत बोलताना अंगाला लचके देणं असा अगदी ठसक्यात आणि खुमासदार पद्धतीने त्यांनी नाचाची व्यक्तीरेखा साकारली. १९४९ मधील मीठभाकर या चित्रपटाने त्यांना नवीन ओळख दिली, पुढे राम राम पाव्हणं, पाटलाचा पोर या दोन चित्रपटांमुळे मराठी तमाशापटांत मध्ये गणपत पाटील यांचं वर्तुळ मोठं होत गेलं. १९५१ मध्ये आलेल्या छत्रपती शिवाजी या मध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या.

१९६० साली आलेल्या शिकलेली बायको व १९६३ मधील थोरातांची कमळा ने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. मग पुढे १९६४ साली प्रदर्शित झालेल्या ‘वाघ्या मुरळी’ या चित्रपटांतील त्यांनी साकारलेल्या सोंगाड्या च्या भूमिकेमुळे त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट चरित्र अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बोला दाजिबा, मल्हारी मार्तंड, एक गाव बारा भानगडी, सवाल माझा ऐका, गणानं घुंगरू हरवलं, केला इशारा जाता जाता, सोंगाड्या, पिंजरा, देवा तुझी सोन्याची जेजुरी, रायगडचा राजबंदी, बाई मी भोळी, सांगू मी कशी, सुरंगा म्हनत्यात मला, छंद प्रीतीचा, अशी रंगली रात, खंडोबाची आण, अशीच एक रात्र, लाखात अशी देखणी,,

या सर्व चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिकेमुळे गणपत पाटील लोकप्रियतेच्या झोतात आले. जवळपास ६२ सिनेमे व १७ नाटकांमधून गणपत पाटील यांनी आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने सादर केलेल्या भुमिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करून गेल्या. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये नाच्याची भूमिका करण्यामध्ये गणपत पाटील यांचा हात कोणीच धरू शकत नाही.

विशेष म्हणजे तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीन जयश्री गडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण, उषा नाईक, रंजना मधू कांबीकर पासून ते माया जाधव यांच्यापर्यंत कुठलीही अभिनेत्री असो मात्र नाच्या चे काम हे गणपत पाटलांना द्या असा अभिनेत्री आणि दिग्दर्शकांचा नेहमीच आग्रह असायचा. महाराष्ट्रातील रसिका प्रेक्षकांकडून गणपत पाटील यांना भरभरून प्रेम मिळालं परंतु समाजाच्या मानसिकतेने त्यांच्या उत्कृष्ट अभिनय कौशल्याचा अपमान देखील केला.

नाच्याची भूमिका साकारल्या मुळे समाजातील लोकांकडून, नातेवाईकांकडून गणपत पाटील व त्यांच्या कुटुंबियांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. गणपत पाटील यांनी काम केलेल्या प्रत्येक चित्रपटातील प्रत्येक भूमिका गाजली परंतु त्या भूमिकेने गणपत पाटील यांच्या आयुष्याची राखरांगोळी केली. समाजाने गणपत पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांना फारच वाईट आणि तुच्छ वागणूक दिली. गणपत पाटील यांच स्वतःचं लग्न ठरत असताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

शिवाय त्यांच्या दोन मुलींच व मुलांचे लग्न जुळवताना देखील त्यांना अडचणींना तोंड द्यावं लागलं. त्यांच्या बायको व मुलांना समाजाकडून काय काय ऐकून घ्यावे लागले असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांचा हा अनुभव एका मुलाखतीमधून सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. परंतु गणपत पाटील यांनी ही सगळी दुःख, अपमान, व्यथा आपल्या जवळच ठेवल्या आणि त्याचा परिणाम आपल्या अभिनयावर कधीच होऊन दिला नाही.

आज तमाशाप्रधान चित्रपट मराठी मध्ये बरेच आले आणि त्यामध्ये नाच्याचे काम करणारे अनेक कलाकार मंडळी देखील आहेत. परंतु गणपत पाटील यांनी रंगवलेली नाच्याची भूमिका रसिक प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिली आणि याबाबतीत कोणीही त्यांची बरोबरी करू शकत नाही. साधारणता तमाशा किंवा लावणी मध्ये प्रेक्षकांच मुख्य लक्ष हे तमाशाच्या फडावर नाचणार्‍या कलावंतीणं वर असतं परंतु गणपत पाटील यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर साकारलेल्या नाच्याने प्रत्येक प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.

सन २००६ मध्ये अभिनय सम्राट गणपत पाटील यांना भारतीय चित्रपट महामंडळाचा चित्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. झी मराठी तर्फे त्यांना लाइफ टाइम अचीव्हमेंट अवॉर्ड ने गौरवण्यात आलं. सन २०१३ मध्ये विशेष दीनानाथ मंगेशकर पुरस्कार त्यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आला.

मृत्यू

२३ मार्च २००८ रोजी गणपत पाटील यांचे निधन झालं आणि त्यांच्या मराठी चित्रपट सृष्टी मधील योगदानासाठी त्यांच्या खऱ्या आयुष्याची कथा सांगणारा नटरंग हा सिनेमा २०१० मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. प्रेक्षकांचं गणपत पाटील यांच्यावर तर भरपूर प्रेम होतं म्हणून या चित्रपटाला संपूर्ण महाराष्ट्रातून दणदणीत प्रतिसाद मिळाला.

आम्ही दिलेल्या ganpat patil biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गणपत पाटील मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ganpat patil information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of ganpat patil in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

2 thoughts on “गणपत पाटील मराठी माहिती Ganpat Patil Biography in Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!