गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता Ganpati Aarti in Marathi

Ganpati Aarti in Marathi – Ganpati Aarti Lyrics in Marathi Pdf गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता आपल्या समाजामध्ये गणेश चतुर्थीचा उत्सव हा अनेक चालीरितींसह वेगवेगळ्या भागांमध्ये साजरा केला जातो. आपली भारतीय संस्कृती ही विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत आपले देवही येतात. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं सगळीकड मानलं जातं. वेगवेगळ्या राज्यांत, वेगवेगळ्या देवांची पूजा केली जाते. परंतू, असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. इतर देवांवर जरी लोकांची मनापासून श्रद्धा असली तरी बाप्पांकडे मात्र जास्तीत जास्त भक्तांचा ओढा आहे.

महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त असल्याचं आपल्याला दिसून येत. घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक ना अनेक गणपती उत्तम सजावटीसह पुजवले जातात. भारतातील अनेक ठिकाणी बाप्पांच्या पूजेच्या विधीही भिन्न स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात.

खासकरून, कोकणातील गणपतीच्या मूर्तीचे आकार हे खूप रेखीव, मनमोहक, डोळ्यांमध्ये टिपणाऱ्या आणि मनाला भारावून टाकणाऱ्या असतात. अनेक ठिकाणच्या चालीरिती जरी वेगवेगळ्या असल्या तरी बाप्पांचा आवडता पदार्थ मात्र सगळीकडे समान असतो, फक्त बाप्पांचा आवडता पदार्थ मोदक बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असतात.

गावाकडील भागांमध्ये गणपती बाप्पाचे स्वागत हे साध्या पद्धतीने केले जाते, तर शहरी भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बाप्पाचे स्वागत मोठ्या धामधुमीमध्ये आणि जल्लोषात केले जाते. काही ठिकाणी तर गौरी पूजनाच्या पद्धतीतही आपल्याला फरक जाणवतो. शिवाय, वेगवेगळ्या भागांमध्ये गौरीचे स्वागत आणि तिचे विसर्जन ही वेगळ्या पद्धतीने केलेले आपल्याला पाहायला मिळते.

अशा रीतीने, आपल्या गणेश चतुर्थीच्या उत्सवामध्ये आपल्या भारताच्या विविध भागातील चालीरितींत जरी भिन्नता असली तरी, बाप्पाच्या भक्तीची भावना मात्र प्रत्येकाची निर्मळ आणि शुध्द आहे.

ganpati aarti in marathi
ganpati aarti in marathi

गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता – Ganpati Aarti in Marathi

सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरती – Ganpati Aarti Lyrics Marathi

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची ।

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।।

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव, जय देव जय मंगलमूर्ती।

दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

चंदनाची उटी कुमकुम केशरा ।।

हिरेजडित मुकुट शोभतो बरा ।

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥२॥

॥ जय देव जय देव०॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।

दास रामाचा वाट पाहे सदना ।

संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना ॥३॥

॥ जय देव जय देव०॥

गणपती प्रार्थना मराठी

घालीन लोटांगण वंदीन चरण । डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।

प्रेमें आलिंगीन आनंद पूजन । भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव । त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।

त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव । त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा । बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।

करमि यद्यत् सकलं परस्मै । नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम् कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।

श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम् जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे

हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

।। गणपतिबाप्पा मोरया ।। ।। मंगलमूर्ती मोरया ।।

शेंदूर लाल चढाओ आरती – Shendur Lal Chadhayo Aarti

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुखको ।

दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहरको ।

हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवरको ।

महिमा कहे न जाय लागत हूं पादको ॥१॥

जय जय श्री गणराज विद्या सुखदाता

धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता, जय देव जय देव ॥ध्रु०॥

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि ।

विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी ।

कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी ।

गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥२॥

॥ जय देव जय देव०॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।

संतत संपत सबही भरपूर पावे ।

ऐसे तुम महाराज मोको अति भावे ।

गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥३॥

॥ जय देव जय देव०॥

आम्ही दिलेल्या ganpati aarti in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर ganpati aarti lyrics in marathi pdf म्हणजेच “गणपती आरती सुखकर्ता दुखहर्ता” ganpati bappa aarti in marathi या बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या ganpati nirop aarti lyrics in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि lyrics of ganpati aarti in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये ganpati ji ki aarti in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!