गौरी गणपतीची माहिती Gauri Ganpati Information in Marathi

Gauri Ganpati Information in Marathi – Gauri Ganpati Relationship in Marathi गौरी गणपती विषयी माहिती भारत देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपली संस्कृती जपली जाते त्याच बरोबर वेगवेगळे सण साजरे करणे हे देखील आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. भारतामध्ये अनेक सण अगदी आनंदाने साजरे केले जातात त्यामधील एक महत्वाचा सण म्हणजे गौरी आणि गणपती सण आहे आणि या सणाची अनेक गणेश भक्त तसेच लोक वर्षभरा आतुरतेने वाट पाहत असतात. गौरी गणपती या सणाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक वेगळीच उस्तुकता आणि प्रेम असते.

गौरी गणपती हा सण वर्षातून एकदा साजरा केला जातो आणि हा सण ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असतो. गौरी गणपती सणामध्ये गणपतीची आणि पार्वती देवींची पूजा केली जाते (र्वती देवी ह्या गणपती बाप्पांच्या आई आहेत). गौरी गणपती हा सण ५ किंवा ६ दिवसांचा असतो ज्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळी पूजा, विधी आणि उपवास केले जातात. गौरी गणपती हा सण कर्नाटक आणि तामिळनाडू मधील एक महत्वाचा सण मनाला जातो.

तसेच हा सण मोठ्या उस्तुकतेने महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश मध्ये साजरा केला जातो. या सणामध्ये हरतालिका पूजा, गणेश आगमण, उंदीर बीज, गौरी आगमण, गौरी पूजन आणि गौरी गणपती विसर्जन यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात.

वक्रतुंड महाकायं सूर्यकोटी समप्रभा |

निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येशु सर्वदा |

gauri ganpati information in marathi
gauri ganpati information in marathi

गौरी गणपतीची माहिती – Gauri Ganpati Information in Marathi

गौरी गणपतीची कोण लागते

Gauri Ganpati Relationship in Marathi गौरी म्हणजे गणपतीची आई म्हणजेच पार्वती मानली जाते. काही भागात गौरी म्हणजे गणपतीची बहीण मानली जाते. म्हणून ती भावाकडे पाहुणचारासाठी येते असं म्हटलं जात.

गौरी गणपती सण कसा साजरा केला जातो 

how to celebrate gauri ganapati festival गौरी गणपती हा भारतामध्ये सण मोठ्या गुण्या गोविंदाने साजरा केला जातो आणि हा सण कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र, राजस्थान, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण वर्षातून एकदा साजरा केला जातो.

हा ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असतो. गौरी गणपती हा सण ५ किंवा ६ दिवसांचा असतो ज्यामध्ये हरतालिका पूजा, गणेश आगमण, उंदीर बीज, गौरी आगमण, गौरी पूजन आणि गौरी गणपती विसर्जन यासारखे कार्यक्रम साजरे केले जातात.

हरतालिका पूजेच्या दिवशी सुहासिनी आणि कुमारिका महीला उपवास करतात. हरतालिकेचा उपवास हा सुहासिनी स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घाआयुष्यासाठी करतात आणि कुमारिका त्यांच्या काही इच्छा किंवा मनोकामना पूर्ण करण्यासाठी उपवास करतात आणि देवाकडे प्रार्थना करतात.

हरतालिका पूजेमध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते हि पूजा वेगवेगळ्या विधीनुसार केली जाते. काही ठिकाणी हि पूजा रिध्दी सिध्दी च्या दोन वाळूच्या बाहुल्या बनवून केली जाते तसेच वाळूची महादेवाची पिंडी देखील बनवली जाते आणि त्याची पूजा करून हरतालिकेची कथा वाचली जाते.

तर काही ठिकाणी भगवान शिव, माता पार्वती आणि गणपतीच्या कच्च्या मूर्तीं बनवली जाते आणि त्याची बेल, फुले आणि दुर्वा घालून पूजा केली जाते आणि हरतालिकेची कथा वाचली जाते. हि कथा व्रत करणाऱ्या महिलांनी ऐकावी. हरतालिकेचा उपवास हा दुसऱ्या दिवशी गणेश चार्तुर्थी दिवशी सोडला जातो.

  • गणेश आगमन 

गणेश आगमानादिवशी वेगवेगळ्या ठिकानाहून गणपतीच्या छान आणि देखण्या मुर्त्या आपल्या घरी आणतात. गणपती दारामध्ये आल्यानंतर गणपतीला ओवाळून आता घेतले जाते. गणपती बापांच्यासाठी मखर सजवले जाते आणि त्यामध्ये त्यांची प्रतिष्ठापणा केली जाते.

या सणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ५ किंवा ६ दिवस पुजली जाते आणि बाप्पांना उकडीचे मोदक, खीर, पुरण पोळी, लाडू यासारख्या गोड पदार्थांचा नैवैद्य दाखवला जातो आणि त्याची ५ ते ६ दिवस रोज पूजा करून दुर्वा घालून त्यांची रोज आरती केली जाते.

  • उंदीर बीज 

उंदीर बीज हा दिवस उंदराचा असतो या दिवशी वेगवेगळ्या कडधान्यांच्या घुगऱ्या करून त्या शेतामध्ये आणि घरामध्ये अडगळीच्या ठिकाणी टाकल्या जातात जेणेकरून त्या उंदीर खावू शकतील. गणपती बापांच्या लेखी उंदरांना महत्वाचे स्थान आहे कारण उंदीर हा गणपती बाप्पांचे वाहन आहे.

  • गौरी आगमन

गौरी आगमना दिवशी पार्वती देवी आपल्या घरी म्हणजेच माहेरवाशीन म्हणून येते आणि या गौरीचे स्वागत सुहासिनी स्त्रिया आणि कुमारिका ह्या नटून थटून करतात. गवर नावाची एक वानापती असते ती गौरी म्हणून पुजली जाते ह्या गौरी सुहासिनी स्त्रिया आणि कुमारिका नदीहून, ओढे, तलाव किंवा घराच्या बाहेरून भरून आणतात.

  • गौरी पूजन 

Gauri ganpati puja vidhi in marathi गौरी आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गौरीचे पूजन केले जात. या दिवशी गौरीला मुखवटा बसवला जातो तसेच तिला साडी नेसवली जाते आणि वेगेवगळे दागिने, फुलांचा गजरा लावून नटवले जाते. त्यानंतर तिला हळदी कुकू लावून फुले वाहून तिची आरती केली जाते तिला पुरण पोळीचा तसेच लाडवांचा नैवैद्य दाखवला जातो.

  • गौरी गणपती विसर्जन 

गौरी गणपती विसर्जन हा सणाचा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी गौरीचे आणि गणपतीचे पाण्यामध्ये विसर्जन केले जाते.

गणपतीची आरती 

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु ॥

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय ॥२॥

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ॥ ७ ॥

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ ध्रु ॥

गणेश चतुर्थीमध्ये गणपती पूजा कशी करावी

मुख्यता गणपती बाप्पांची पूजा आपल्या अडचणी, संकटे आणि दुखं दूर व्हावीत म्हणून केली जाते कारण आपण जसे बापांच्या आरतीमध्ये सुखकर्ता दुखहर्ता असे असते तसेच गणपती आपली सर्व दुखं हरतो आणि सुख देतो. गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणपतीची पूजा भक्तीपूर्वक केली जाते.

ज्यावेळी आपण गणपतीची प्रतिष्ठापणा करून पूजा करत असतो त्यावेळी सर्वप्रथम घरातील देवपूजा, कलशपूजा, दीप पूजा आणि घंटापूजा करून घ्यावी त्यावेळी पूजा करताना कलशाला, दिव्याला आणि घंटीला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहून, फुल घालून त्याची पूजा करावी. त्यानंतर दिवा, अगरबत्ती आणि धूप लावून घ्यावा.

त्यानंतर गणपतीची पूजा करण्यास सुरुवात करावी. त्यानंतर गणपतीला अष्टगंध, हळदी कुंकू आणि अक्षदा वाहाव्यात त्यानंतर दुर्वा घालाव्यात आणि त्याला फुल घालून गणपतीला अगरबत्ती आणि धूप ओवाळावा आणि मग कापूर लावून गणपतीची आरती करावी.

गणपती विसर्जन पूजा 

गणपतीचे विसर्जन हे गौरीविसर्जनाच्या दिवशी किंवा अनंत चतुर्थी दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. गणपतीला हळदी कुंकू आणि अक्षदा वाहाव्यात त्यानंतर दुर्वा घालाव्यात आणि त्याला फुल घालून गणपतीला अगरबत्ती आणि धूप ओवाळावा आणि मग कापूर लावून गणपतीची आरती करावी.

त्यानंतर पूजेच्या शेवटी मंत्र पुष्पांजली म्हणावी आणि प्रार्थना करावी. गणपती सोबत शिदोरी म्हणून मोदक किंवा लाडू द्यावेत (ते तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे ५ किंवा १०, ११ असे देवू शकता) जे गणपतीच्या विसर्जनासोबत विसर्जित केले जातील.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये gauri ganpati information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर Gauri Ganpati Relationship in Marathi म्हणजेच “गौरी गणपतीची माहिती” annabhau sathe yanchi mahiti यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा ती योग्य असल्यास आम्ही ते या gauri pujan in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि jyeshta gauri story in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “गौरी गणपतीची माहिती Gauri Ganpati Information in Marathi”

  1. गौरी म्हणजे पार्वती, मग दोन गौरी काय आहेत.दोन गौरी आणि गणपती भाऊ बहिण आहेत, म्हणूनच गणपती आगमन झाल्यावर तो आपल्या भाहिनिना आणण्यासाठी जातो व त्यांना माहेरी घेऊन येतो असा आमचा संमज आहे.तरी या बद्दल काही माहिती आपण द्यावी.

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!