Geeta phogat information in marathi गीता फोगाट मराठी माहिती, कुस्ती (wretsling) हा विशेषता भारतामध्ये खेळला जाणारा खेळ असून विशेषता हा खेळ महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि कुस्ती हा महाराष्ट्रामध्ये खेळल्या जाणाऱ्या प्रसिध्द खेळांपैकी एक आहे. कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून म्हणजेच महाराज्यांच्या काळा पासून खेळला जाणारा खेळ आहे आणि हा खेळ दोन प्रतिस्पर्ध्यांच्यामध्ये खेळला जातो आणि या खेळामध्ये खेळणाऱ्या खेळाडूला कुस्तीपट्टु किंवा पैलवान असे म्हणतात.
आणि कुस्ती खेळणारे असे अनेक पैलवान आहेत परंतु पूर्वी फक्त पुरूषच कुस्ती खेळत होते परंतु आता स्त्रिया देखील कुस्ती खेळामध्ये सहभागी होतात आणि महिला कुस्तीपट्टु म्हणून अनेकांनी नाव कमावले आहे आणि त्यामधील एक प्रसिध्द कुस्तीपट्टु म्हणजे गीता फोगाट आणि आज आपण या लेखामध्ये गीता फोगाट विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
गीता फोगाट हि एक लोकप्रिय भारतीय कुस्तीपट्टु आहे आणि गीता फोगाट हिचा जन्म १५ डिसेंबर १९८८ हरियाणा राज्यातील बालली या गावामध्ये झाला. तिच्या जन्म हा जाट कुटुंबामध्ये झाला आणि आईचे नाव शोभा कौर असे होते आणि त्या गृहिणी होत्या तर तिच्या वडिलांचे नाव हे महावीर सिंग फोगाट असे होते.
जे कुस्तीपटू होते आणि त्यांनी वरिष्ठ ऑलम्पिक स्पर्धेमध्ये प्रशिक्षक म्हणून देखील काम केले होते आणि अश्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गीता फोगाटला प्रशिक्षण मिळाले त्यामुळे तिने कुस्ती क्षेत्रामध्ये एक महत्वपूर्ण कामगिरी केली.
गीता फोगाट मराठी माहिती – Geeta Phogat Information in Marathi
नाव | गीता फोगाट |
ओळख | कुस्तीपटू |
जन्म | १५ डिसेंबर १९८८ |
जन्मठिकाण | हरियाणा राज्यातील बलाली या गावामध्ये झाला. |
पालक | महावीर सिंग फोगाट आणि शोभा कौर |
जोडीदार | पवन कुमार |
गीता फोगाटचे सुरुवातीचे आयुष्य – early life
गीता फोगाटचा जन्म १५ डिसेंबर १९८८ हरियाणा राज्यातील बलाली या गावामध्ये झाला आणि तिच्या वडिलांचे नाव महावीर सिंग फोगाट आणि आईचे नाव शोभा कौर असे होते.
तिने आपले शिक्षण हरियाणामधील रोहंतक मधील महर्षी दयानंद विद्यापीठामध्ये पूर्ण केल्यानंतर तिचे वडील देखील कुस्तीपटू आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते असल्यामुळे त्यांनी गीता फोगाटला आणि बबिताला कुस्तीचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.
परंतु गावामध्ये खेळाविषयीच्या सर्व सुविधा नसल्यामुळे त्यांनी गीता फोगाटला आणि बबिता फोगाट सोनीपत या ठिकाणावरील स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटर मध्ये दाखल केले आणि त्या ठिकाणी त्या दोघीही कुस्तीचे प्रशिक्षण घेऊ लागल्या.
गीता फोगाट कोण आहे ?
गीता फोगट हे आपल्या वडिलांचे स्वप्न करणारी एक भारतीय महिला पैलवान आहे आणि हि भारताच्या कुस्तीच्या इतिहासातील रत्नच आहे. तिचे वडील पैलवान होते आणि त्यांना गुरु द्रोणाचार्य पुरस्कारही मिळाला होता. गीता फोगट हिने २०१० मध्ये महिलांच्या राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले सुवर्ण पदक मिळवले होते ज्या दिल्ली मध्ये झाल्या होत्या.
गीता फोगाटची कुस्ती खेळातील कामगिरी – career
गीता फोगाट हि एक कुस्तीपटू आहे, जिने २००९ मध्ये पंजाबमधील जालंधर या ठिकाणी झालेल्या कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमधून अंतरराष्ट्रीय कुस्तीमध्ये पदार्पण केले आणि या २००९ च्या उउं कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले.
त्याचबरोबर २०१० मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये तिने सहभाग घेतला आणि त्या स्पर्धेमध्ये तिनी महिला कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आणि तिने महिला कुस्तीमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले.
त्याचबरोबर गीता फोगाट हिने अनेक आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय खेळ या सारखे अनेक खेळ खेळले आणि या खेळामध्ये तिने चांगली कामगिरी करून तिने त्या खेळामध्ये अनेक पदके देखील जिंकली.
गीता फोगाटला मिळालेले पुरस्कार आणि पदके – awards and medals
- २०१२ मध्ये जागतिक कुस्तीस्पर्धेमध्ये स्ट्रॅथकोना काऊंटमध्ये कांस्य पदक मिळवले होते.
- तिने २००९ च्या कॉमनवेल्थ रेसलिंग चम्पियनशिपमध्ये जालंधर मध्ये सुवर्णपदक मिळवले होते त्याचबरोबर २०११ मध्ये मेलबर्नमध्ये सुवर्ण पदक आणि २०१३ मध्ये जोहान्सबर्गमध्ये ५९ किलो साठी रौप्य पदक मिळवले होते.
- त्याचबरोबर गीता फोगाट हिने २०१० मध्ये दिल्ली या ठिकाणी झालेल्या कॉमनवेल्थ ५५ किलो मध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
- गीता फोगाट हिला तिच्या कुस्ती क्षेत्रातील चांगल्या कामगिरीसाठी २०१२ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
- २०१२ च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये गुमीमध्ये ५५ किलो मध्ये कांस्य पदक जिंकले होते तर २०१५ मध्ये गोहामध्ये ५८ किलोमध्ये कांस्य पदक जिंकले होते.
गीता फोगाट विषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये – facts
- गीता फोगाटचा जन्म हा १५ डिसेंबर १९८८ मध्ये हरियाणा राज्यातील भिवानी जिल्ह्यातील बलाली या गावामध्ये झाला.
- गीता फोगाट हि ऑलम्पिक उन्हाळी खेळामध्ये पात्र ठरणारी पहिली महिला कुस्तीपटू आहे.
- गीता फोगाट हि फ्री स्टाईल कुस्तीपटू आहे आणि तिला कुस्ती या खेळाचे प्रशिक्षण हे तिचे वडील महावीर सिंग फोगाट यांनी दिले आणि नंतर तिने स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतले.
- गीता फोगाट चे लग्न कुस्तीपटू पवन कुमारशी २० नोव्हेंबर २०१६ मध्ये झाले आहे.
- गीता फोगाटचे वडील म्हणजेच महावीर सिंग फोगाट हे माजी कुस्तीपटू होते आणि त्यांना त्यांच्या कुस्तीमधील चांगल्या कामगिरीसाठी द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला होता.
- गीता फोगाटने आशियन स्पर्धेमध्ये, ऑलम्पिक स्पर्धेमध्ये, राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आणि राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अश्या वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये पदके मिळवली आहेत.
आम्ही दिलेल्या geeta phogat information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गीता फोगाट मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या geeta kumari phogat information in marathi या geeta phogat full information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about geeta phogat in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये geeta phogat information in marathi language Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट