घसा खवखवणे घरगुती उपाय मराठी Ghasa Khavkhavne Upay in Marathi

ghasa khavkhavne upay in marathi – ghasa dukhane gharguti upay घसा खवखवणे घरगुती उपाय मराठी, घसा दुखणे घरगुती उपाय, आज आपण या लेखामध्ये घसा खवखवणे या बद्दल माहिती आणि त्यावर केले जाणारे उपाय पाहणार आहोत. आपला घसा किंवा घशाची पोकळी ही नळीसारखी रचना आहे जी अन्ननलिकेपर्यंत अन्न आणि हवा तुमच्या पवननलिकेपर्यंत पोहोचवते. घशातील संसर्ग तोंडातून किंवा नाकातून आत जाऊ शकतो आणि यापैकी बरेच संक्रमण व्हायरल असतात परंतु इतर बॅक्टेरियामुळे होऊ शकतात. घशाच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सामान्यतः वेदना आणि घशात उष्णता जाणवणे यांचा समावेश होतो.

संसर्ग घशातील इतर संरचनांवर, विशेषतः टॉन्सिल्सवर देखील परिणाम करू शकतो. लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात आणि त्यात ताप,  खोकला , रक्तसंचय आणि  शरीरातील वेदना यांसारखी फ्लूसारखी लक्षणे असू शकतात आणि अश्या ह्या अनेक संसार्गांच्या मुळे आपला घसा खवखवू शकतो. घसा खवखवणे हे काही वेळा गंभीर असू शकते आणि काही वेळा गंभीर असू शकत नाही. चला तर मग आता आपण घसा खवखवन्यावर उपाय काय करायचे ते पाहूया.

ghasa khavkhavne upay in marathi
ghasa khavkhavne upay in marathi

घसा खवखवणे घरगुती उपाय मराठी – Ghasa Khavkhavne Upay in Marathi

घसा खवखवणे म्हणजे – what is mean by throat infection

घशातील संसर्ग तोंडातून किंवा नाकातून आत जाऊ शकतो आणि यापैकी बरेच संक्रमण व्हायरल असतात परंतु इतर बॅक्टेरियामुळे होऊ शकतात. घशाच्या संसर्गाच्या लक्षणांमध्ये सामान्यतः वेदना आणि घशात उष्णता जाणवणे यांचा समावेश होतो.

घसा खवखवणे याची पूर्व लक्षणे काय आहेत ? – what are the symptoms of throat infection

घसा खवखवणे याची पूर्व लक्षणे लक्षणे सौम्य ते गंभीर असू शकतात आणि त्त्यामध्ये ताप,  खोकला , रक्तसंचय आणि  शरीरातील वेदना यांसारखी फ्लूसारखी लक्षणे असू शकतात

घसा खवखवण्याची कारणे – causes of throat infection

आपला घसा किंवा घशाची पोकळी ही नळीसारखी रचना आहे जी अन्ननलिकेपर्यंत अन्न आणि हवा तुमच्या पवननलिकेपर्यंत पोहोचवते आणि या नळीसारख्या रचनेला अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात. चला तर आत्ता आपण पाहूया घसा खवखवण्याची कारणे पाहूया.

 • जर आपले पूर्ण शरीर दुखत असेल तर त्यावेळी आपला घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे शरीर दुखत असेल तर योग्य वेळी त्यावर उपचार घ्या.
 • टॉन्सिल सुजलेले असतील तर देखील घसा खवखवू शकतो.
 • जर एखाद्या व्यक्तीला कोरडा खोकला किंवा कफ खोकला झाला असेल तर त्या व्यक्तीचा घसा खवखवण्याची शक्यता असू शकते.
 • जास्त कोरडा हवामान असल्यामुळे देखील घसा खवखवण्याची समस्या उद्भवू शकते.
 • ताप आणि थंडी वाजून आलेल्या व्यक्तीचा देखील घसा दुखू शकतो किंवा खवखवू शकतो.

घसा खवखवणे किंवा घसा दुखणे घरगुती उपाय – ghasa dukhane gharguti upay

आपला घसा किंवा घशाची पोकळी ही नळीसारखी रचना आहे जी अन्ननलिकेपर्यंत अन्न आणि हवा तुमच्या पवननलिकेपर्यंत पोहोचवते आणि या नळीसारख्या रचनेला अनेक प्रकारचे संसर्ग होऊ शकतात आणि हे संसर्ग टॉन्सिल्सवर देखील परिणाम करू शकतो. चला तर आता आपण घसा खवखवणे या वर घरगुती उपाय काय आहेत ते पाहूया.

 • लवंग मध्ये अनेक अनेक औषधी गुणधर्म असतात तसेच त्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म देखील असतात आणि त्यामध्ये सुन्न करणारे गुंद्गार्म देखील असतात त्यामुळे तुमचा जर घसा खवखवत असेल तर तुम्ही लवंगचा वापर करू शकता. ३ ते ४ लवंग घ्या आणि त्या तोंडामध्ये चावा त्यामुळे त्यामधील अर्क घश्यामध्ये जाईल आणि त्यामुळे सुन्न करणारा आणि दाहक विरोधी गुणधर्म खवखवणाऱ्या घश्यावर प्रभावी पणे काम करेल.
 • सुपारीची पाने हे एक प्राचीन आणि पारंपारिक लोकसाहित्य औषध आहे जे तुमचा घसा खवखवणे कमी करण्यास मदत करू शकते. तुम्ही सुपारीची पाने आणि तुळशीची पाने पाण्यामध्ये उकळू शकते आणि हे पाणी उकळत असताना ते पाणी निम्मे होईपर्यंत उकळा त्यामुळे सुपारीच्या पानांचा आणि तुळशीच्या पानांचा अर्क पाण्यामध्ये उतरेल आता हे पाणी गाळून घ्या आणि ते घशाला भाजत भाजत प्या त्यामुळे देखील घसा खवखवणे थांबेल.
 • मधामध्ये काही प्रतिजैविक गुणधर्म असतात आणि हे गुणधर्म जीवानुंशी आणि विषाणूंशी लढण्यासाठी मदत करतात त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीला खसा खवखवणे, सर्दी, खोकला येत असेल तर अशा व्यक्तींनी सकाळी एक ग्लास गरम पाण्यामध्ये एक चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबू रस मिक्स करून पिले तर त्याची घसा खवखवण्याची समस्या काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
 • कोमट पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस घालून प्या. मध घसा खवखवण्याच्या वेदनापासून मुक्त होण्यास मदत करू शकते.
 • आले आणि मध असलेला चहा हा एक लोकप्रिय पदार्थ आहे जो सूजलेल्या घशाला शांत करतो.
 • मीठ आणि पाण्याच्या गुळण्या केल्यानंतर घसा खवखवणे हि समस्या कमी होऊ शकते आणि हे करण्यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक चमच्याला थोडे कमी मीठ घालून त्या पाण्याच्या गुळण्या करा कारण असे केल्याने तुमचा खोकला किंवा घसा खवखवणे कमी होईल.
 • मार्शमॅलो रूट ही एक प्राचीन प्रकारची औषधी वनस्पती आहे जी घसा खवखवणे किंवा खोकला या वर खूप उपयुक्त आहे. मार्शमॅलो रूट पाण्यामध्ये घाला आणि ते पाणी उकळा आणि गाळून ते थोडे थंड झाले कि त्या पाण्याच्या गुळण्या करा.
 • आपण जर पाण्यामध्ये हळद घालून त्या पाण्याच्या गुळण्या केल्या तर आपल्या घश्याला आराम मिळू शकतो.
 • घसा खवखवत असणाऱ्या व्यक्तींनी तुळशी पासून बनवलेला काढा घेतला तर घसा खवखवणे कमी होते आणि हा काढा बनवण्यासाठी तुळशीची पाने, तुळशीच्या मंजुळा, तुळशीच्या फांद्या, थोडेसे आले, हळद, २ लवंग, २ ते ३ काळी मिरी, थोडीसी साखर हे सर्व पाण्यामध्ये घाला आणि ते चांगले उकळून घ्या आणि ते चांगले उकळले कि ते गरम असताना गाळा आणि ते गरम गरम पिले कि आपल्याला सर्दी पासून किंवा घसा खवखवण्यापासून आराम मिळतो.
 • कोमट पाणी वारंवार प्या कारण ते सामान्य सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याशी लढण्यास मदत करते. कोमट पाण्याने घशातील जळजळ कमी होते आणि शरीरातील द्रव आणि संसर्ग पुन्हा भरून काढण्यास मदत होते.
 • घसा खवखवणे किंवा सर्दी कमी करायची असल्यास एक सोपा आणि सर्वांना माहिती असणारा घरगुती उपाय म्हणजे पाण्याची वाफ घेणे. पाण्याची वाफ घेतल्यानंतर घसा खवखवत असणाऱ्या आणि सर्दी असणाऱ्या व्यक्तीला एकदम आराम वाटते घरगुती पध्दतीने वाफ घेताना प्रथम एका भाड्यामध्ये पाणी घ्या त्यामध्ये कुस्करलेला लसून किंवा २ ते ३ लवंग टाकून वाफ घेतली तरी आपल्याला घसा खवखवन्या पासून आराम मिळतो.
 • तुळशीची पाने जर रोज चाऊन खाल्ली तर घसा खवखवन्यापासून दूर होऊ शकतो.
 • हळदीचे दुध हे देखील घसा खवखवन्यावर एक चांगला उपाय ठरू शकतो.

टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.

आम्ही दिलेल्या ghasa khavkhavne upay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर घसा खवखवणे घरगुती उपाय मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या ghasa dukhane gharguti upay या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!