गोकुळाष्टमी ची माहिती 2023 Gokulashtami Information in Marathi

Gokulashtami Information in Marathi – Krishna Janmashtami in Marathi श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाळकाला माहिती मराठी गोकुळाष्टमी ची माहिती भारतामध्ये अनन्य साधारण महत्त्व असणारा एक सण म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमी. भारतातील विविध प्रांतात हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका, जगन्नाथ पुरी या ठिकाणी हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. श्रीकृष्ण म्हंटले कि बाललीला, प्रेम, मित्रत्व, त्याग, राजकारण, भगवद्गीता, तत्वज्ञान या सर्व गोष्टी स्मरण होतात. विविध ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीला कृष्णाष्टमी, गोकुळाष्टमी, अष्टमी रोहिणी, श्रीकृष्ण जयंती आणि श्री जयंती अशा विविध नावानी संबोधले जाते.

हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे||

हिंदू संस्कृती हि अयोध्येचा राजा राम आणि द्वारकाधीश श्रीकृष्ण या दोन नावात सामावून गेली आहे. श्रीकृष्ण हे एक असे चैतन्यरूप होते ज्यामुळे गोकुळात प्रेम आणि स्नेहाचे वातावरण प्रस्थापित झाले, जरासंध व शिशुपाल यांचा नाश झाला, कंसा सारख्या दुष्ट आणि अत्याचारी  राजाचा वध झाला. द्रोपदीची विटंबना होत असताना रक्षणासाठी धावून येणारा, महाभारतात अर्जुनाचा सारथी, आणि अर्जुनाला गीतेचे तत्वज्ञान देणारा भगवान श्रीकृष्ण. 

gokulashtami information in marathi
gokulashtami information in marathi

गोकुळाष्टमी ची माहिती मराठी – Gokulashtami Information in Marathi

श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, गोकुळाष्टमीगुरुवार, १८ ऑगस्ट २०२१
श्री कृष्ण जयंती ५२४९ वी 

भगवान श्रीकृष्ण जन्माची कथा  

हिंदू धर्मकल्पनानुसार श्रीकृष्णाला भगवान विष्णूंचा आठवा अवतार आहे म्हणूनच याला ‘कृष्णावतार’ असेही म्हटले जाते.श्रावण महिन्यात वद्य अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला.

भगवान श्रीकृष्णाचा जन्माची एक रहस्यमय कथा सांगितली जाते कि, एका ऋषीमुनीने आकाशवाणी  केली होती कि कंसाचा वध हा देवकी आणि वासुदेव यांचा आठवा पुत्र करेल. या आकाशवाणीमुळे कंसाने बहिण देवकी आणि वासुदेव यांना बंदिशाळेत ठेवले. आणि देवकीच्या प्रत्येक अपत्याचा कंस वध करत असत. अशी त्याने सात अपत्ये जन्मता क्षणी ठार मारली.

म्हणूनच देवकीचे आठवे अपत्य म्हणजेच कृष्ण याला जन्मानंतर लगेचच वासुदेवाने आपले मित्र गोकुळातील नंद आणि यशोदा यांच्या स्वाधीन केले होते. गोकुळात कृष्ण जन्मामुळे आनंदीआनंद झाला. दृष्टीचा पालनकरता भगवान विष्णूने दुष्ट कंस मामाचा वध करण्यासाठी आपल्या आठव्या अवतारात श्रीकृष्णाच्या रुपात जन्म घेतला. आणि कृष्ण जन्माच्या आकाशवाणी नुसार श्रीकृष्णच मामा कंस याच्या वधास कारणीभूत ठरले.

भारतात कृष्ण जन्माष्टमी ला हि कृष्णजन्माची कथा मोठ्या श्रद्धेने सांगितली जाते.

गोकुळ अष्टमी साजरी करण्याची पद्धत

श्रीकृष्ण अष्टमीच्या दिवशी एकभुक्त राहून पांढऱ्या तिळाचा कल्क अंगाला लावून स्नान करतात. देवघर लता पल्लवानी सुशोभित करून पूजा केली जाते. आणि सप्तमीच्या मध्यरात्री शुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सपरिवार श्रीकृष्णाची षोडशोपचार पूजा करतात. श्रीकृष्णाला दुग्धाभिषेक करावा. दिवसभर उपवास करतात व देवाला धूप दीप, आणि लोणी आणि साखर एकत्र करून त्याचा नैवद्य दाखवितात.

१२ वाजता कृष्ण पाळण्यात घातल्यानंतर सूंटवडा घेऊन उपवास सोडला जातो. किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात. रात्री इतिहासातील निरनिराळ्या सत्कथा, पुराण, नृत्य, भजन इ. कार्यक्रमांनी जागरण करतात आणि कृष्ण जन्माच्या वेळेला प्रार्थना करतात.

बाळकृष्णाचा फोटो किंवा मूर्ती पाळण्यात घातले जाते आणि श्रीकृष्णाचा पाळणा म्हंटला जातो. तसेच गोकुळातील कृष्णलीला श्रवण करतात. त्यांनतर श्रीकृष्णाच्या मूर्ती किंवा प्रतिमेला दुधाचा अभिषेक घालतात. काही ठिकाणी भगवद्गीतेचे पारायण करून सण साजरा केला जातो.

जन्माष्टमी व्रताचे महत्त्व

‘गोकुळाष्टमी’ या तिथीला श्रीकृष्णाचे तत्त्व पृथ्वीवर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने अधिक कार्यरत असते.

            “ॐ नमो भगवते वासुदेवाय|”

भावपूर्णरित्या मनोभावे नामजप आणि उपासना केल्यास कृष्ण प्रसन्न होऊन भक्तांच्या जीवनातील सर्व कष्ट दूर करतात असे पुराण सांगतात. गोकुळाष्टमीचे व्रत केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ प्राप्ती होते.

विविध ठिकाणी जन्माष्टमी साजरी करण्याची पद्धत

  • महाराष्ट्रामध्ये जन्माष्टमी / गोकुळाष्टमीच्या दुसरा दिवस म्हणजे नवमीला दहीहंडी साजरी केली जाते.  
  • ओरिसा, पुरी, पश्चिम बंगालमध्ये लोक जन्माष्टमी मध्य रात्रीपर्यंत उपवास करून प्रार्थना करतात आणि लहान मुलांना कृष्णाप्रमाणे सजवलं जात.
  • गुजरात आणि राजस्थान मध्ये कृष्णाची मंदिरे सजवून रात्रभर भजन आणि रासलीलेचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
  • आसाम मध्ये या सणाला अन्न आणि फळांचे वाटप केले जाते. मणिपूर मध्ये कृष्ण जन्म असे म्हटले जाते.
  • उत्तरप्रदेश मध्ये या दिवशी रासलीला खेळतात. रंग उडवून आनंद व्यक्त केला जातो.
  • दक्षिण भारतात कृष्ण जन्म हा एक मोठा सण असतो. या दिवशी कृष्णाच्या मंदिरांना दिव्यांची सजावट केली जाते. तामिळनाडू मध्ये लोक जमिनीवर तांदळाच्या पिठापासून सुंदर अशा नक्षिकला काढतात.
  • कृष्णाच्या पायाचे ठसे घराच्या बाहेरपासून आत पूजा गृहापर्यंत काढले जातात.

कृष्ण जन्माष्टमी कधी आहे?

या वर्षी श्रावण महिन्यात ३० ऑगस्ट २०२१ ला भारतात कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी गोपाळकाला म्हणजेच दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे.  

जन्माष्टमीनिमित्त गायली जाणारी गाणी/ अभंग/ गवळणी 

जन्माष्टमी निमित्त सगळीकडे आनंदी आनंद असतो. सगळ्यांच्या ओटांवर कृष्णाची गाणी रेंगाळत असतात. तसेच या गाण्यावर वेगवेगळ्या ठिकाणी नृत्य साजरी केली जातात. त्यातील काही गाणी प्रसिद्ध आहेत,

साधीभोळी मीरा तुला

उधळीत ये रे गुलाल सजना

सांज ये गोकुळी

यमुनेच्या तीरी मी पहिला हरी

परब्रम्ह निष्काम तो हा गवळीया घरी

गोपाळकाल्याचे अध्यात्मिक महत्त्व

गोपालकाला म्हणजे पांढऱ्या रंगाच्या पाच रसयुक्त स्वादांचा जास्तीत जास्त प्रमाणात निर्गुण चैतन्याशी संबंध दर्शवणारा आणि पूर्णावतारी कृष्ण्कार्याचे दर्शक असलेला समुच्चय. काला म्हणजे त्या काळाला, त्या स्थळाला, त्या त्या स्तरावर आवश्यक असे वैशिष्ट्यपूर्ण कार्य दर्शवणाऱ्या घटकांचे एकत्रीकरण.

दहीहंडी/ गोपाळकाला

कृष्णाष्टमी नंतर दुसऱ्या दिवशी दहीहंडी म्हणजेच गोपालकाला हा एक सार्वजनिक उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो. कृष्ण जयंतीच्या उत्सवासाठी तयार केलेल्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असे म्हणतात. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपालकाला करूनच होते. जन्माष्टमी च्या दिवशी उंच जागी दही पोहे भरलेली आणि फुलांच्या माळांनी सजविलेली हंडी टांगली जाते आणि गोविंदाची पथके एकावर एक थर रचून हि हंडी फोडतात. सर्वत्र आनंदी आनंद असतो.

सर्वत्र ‘गोविंदा आला रे आला, गोकुळात आनंद झाला’, ‘गोविंदा रे गोविंदा, यशोदेच्या तान्ह्या बाळा’, अशा प्रकारची गाणी गात अनेक लहान थोर पुरुष नाचून आनंदाने हा सण साजरा करतात. आणि यासाठी मोठमोठी बक्षिसे ही लावली जातात. या ठिकाणी कृष्णाची गाणी लावून वर उंच चढणाऱ्या गोविंदांच्या अंगावर पाणी फेकून त्यांना खाली पाडण्याचा प्रयत्न केला जातो. आणि असे मानले जाते कि या फोडलेल्या मडक्याचा तुकडा घरी आणून सांभाळून ठेवल्यास घरात समृद्धी येते.

गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा आणि काला म्हणजे एकत्र मिसळणे. गोपाळकाला साजरा करण्यामागे एक कथा सांगितली जाते कि, श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर गायी राखण्यासाठी जात असत तेव्हा ते सोबत शिदोऱ्या घेऊन जात असत.

श्रीकृष्ण या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करून त्याचा कला करीत. नंतर तो कला सर्वांमध्ये वाटून खात असत. त्या काल्याचा घास श्रीकृष्णाने मुखात घालता क्षणी सर्वांना अवीट रसाची गोडी चाखायला मिळाली. त्या काल्याच्या आठवणीसाठी आजही गोकुळाष्टमी नंतर गोपाळकाला केला जातो.

गोपालकाल्यातील  हंडी मध्ये भरल्या जाणाऱ्या प्रमुख घटकांमध्ये पोहे, दही, ताक व लोणी, चण्याची भिजवलेली डाळ, साखर, ज्वारीच्या लाह्या, धान्याच्या लाह्या, लिंबू किंवा आंब्याचे लोणचे, साखर, फळांच्या फोडी हे सगळे पदार्थ एकत्र करून एक पदार्थ होतो त्याला काला असे म्हणतात. हा काला कृष्णाला फार प्रिय होता.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये gokulashtami information in marathi काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर krishna janmashtami in marathi म्हणजेच “श्रीकृष्ण जन्माष्टमी, गोपाळकाला, गोकुळाष्टमी” janmashtami information in marathi या सणाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा टी योग्य असल्यास आम्ही ते या krishna janmashtami in 2021 in marathi या article मध्ये upadate करू. मित्रांनो हि gokulashtami chi mahiti माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!