जगन्नाथ पुरी मंदिर माहिती Jagannath Temple Information in Marathi

Jagannath Temple Information in Marathi जगन्नाथ पुरी मंदिराची माहिती जगन्नाथ मंदिर हे भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे. हे मंदिर हिंदू धर्माच्या चार धामांपैकी एक आहे. जगन्नाथ मंदिर त्याच्या भव्यते साठी आणि रहस्यमय कथा साठी प्रसिद्ध आहे. इथे भगवान विष्णू यांची पूजा केली जाते‌. आजच्या ब्लॉग मध्ये आपण याच मंदिरा बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे हिंदु धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. हे मंदिर भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी या शहरात स्थित आहे.

 jagannath temple information in marathi

jagannath temple information in marathi

जगन्नाथ पुरी मंदिर माहिती – Jagannath Temple Information in Marathi

जगन्नाथ मंदिरमाहिती
मंदिराचे नावजगन्नाथ मंदिर
उत्सव, यात्रारथयात्रा उत्सव
मंदिर कोठे आहेजगन्नाथ पुरी हे स्थळ भारतातील ओडिसा राज्यांमध्ये स्थित आहे.
मंदिर स्थापनाकारकिर्दीत (१०७८ ते ११४८) मंदिराचे जगमोहन आणि विमान भाग बांधले गेले.
मंदिर कोणी बांधलेकलिंग राजा अनंतवर्मन चोडगंगा देव
पाहाण्यासारखी ठिकाणेलोकनाथ मंदिर, चक्रतीर्था मंदिर, ‌ सिद्ध महावीर मंदिर, पंचतीर्थ मंदिर, नरेंद्र टँक पुरी, कोणार्क सूर्य मंदिर, बाल गई बीच, पुरी बीच, गोल्डन बीच, स्वर्गद्वार बीच, चंद्रभागा बीच, अस्तरांगा बीच, इत्यादी.

मंदिर वास्तुकला:

मंदिराच क्षेत्रफळ विशाल आहे. सुमारे ४००,००० चौरस फूट पर्यंत पसरलेलं आहे. म़दिरा सभोवती चौकार भिंती आहेत. हे मंदिर भारताच भव्य स्मारकांपैकी एक आहे. कलिंग शैलीतील मंदिराच्या आर्किटेक्चर आणि हस्तकला यांचा आश्चर्यकारक वापर करून हे मंदिर उभारले गेले आहे. मुख्य मंदिर वक्र रेखीय आहे ज्याचा शीर्षस्थानी विष्णूंचे श्री सुदर्शन चक्र सुशोभित केलेले आहेत. त्याला नीलचक्र असेही म्हणतात. हे अष्टधातु ने बनवलेले आहेत,आणि अतीशय पवित्र मानले जातात. मंदिराची मुख्य रचना २१४ फूट म्हणजेच ६५ मीटर उंच दगडी व्यासपीठावर बांधली गेली आहे.

मुख्य दैवतांची मूर्ती आतमध्ये गर्भगृहात स्थापित केल्या गेल्या आहेत. आजूबाजूच्या इतर भागांपेक्षा हा भाग अधिक प्रभावी आहे. मंदिरांची पिरामिड आकार छप्पर आणि त्यालगतचे मंडप अटा्लीकारुपी असून उंच आहेत. मुख्य इमारत २० फूट उंचीची आहे. तर दुसरी इमारत मंदिराला जोडलेली आहे. जगन्नाथ मंदिरातील मुख्य आकर्षण म्हणजे स्वयंपाकघर हे स्वयंपाकघर भारतातील सर्वात मोठं स्वयंपाकघर म्हणून देखील ओळखल जात.

या स्वयंपाक घरात ५०० स्वयंपाकी आणि त्यांचे ३०० सहाय्यक परमेश्वराला अर्पण केले जाणारे महाप्रसाद तयार करायचं काम करतात. मुख्य प्रवेशद्वार समोरुन एक भव्य सोळा बाजू असलेला अखंड स्तंभ उभा आहे. ह्या प्रवेशद्वाराच रक्षण दोन सिंहांनी केले आहे.

मंदिराचा इतिहास:

गंगा वंशाच्या नुकत्याच सापडलेल्या ताम्रपत्रांवरून हे कळते की सध्याच्या मंदिराचे बांधकाम कलिंग राजा अनंतवर्मन चोडगंगा देव यांनी सुरू केले होते. त्याच्या कारकिर्दीत (१०७८ ते ११४८) मंदिराचे जगमोहन आणि विमान भाग बांधले गेले. त्यानंतर १९९७ मध्ये ओडिसा शासक अनंगा भिमा देव यांनी या मंदिराला सध्याचे स्वरूप दिले.

जगन्नाथ अर्चना मंदिरात १५५८ पर्यंत सुरू राहिली. याच वर्षी अफगाणिस्तानच्या जनरल काला पाहाडने ओडिशा वर हल्ला केला आणि मूर्ती आणि मंदिराचे काही भाग नष्ट केले. पूजा बंद केली आणि चिलिका तलावातील एका बेटावर देवतांना गुप्तपणे ठेवण्यात आले. नंतर रामचंद्र देब यांनी खुजडा येथे स्वतंत्र राज्य स्थापन केल्यानंतर मंदिर व त्यातील मूर्ती पुनर्रचित केल्या.

मंदिराची वैशिष्ट्ये:

पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे हिंदु धार्मिक स्थळ आहे. येथे भगवान जगन्नाथ म्हणजेच भगवान श्रीकृष्ण यांची पूजा केली जाते. हे मंदिर भारताच्या ओडिशा राज्यातील पुरी या शहरात स्थित आहे. जगन्नाथ शब्दाचा अर्थ आहे जगाचे स्वामी म्हणूनच या नगरीला जगन्नाथ पुरी किंवा पुरी बोललं जातं. हे मंदिर हिंदू धर्माच्या चार धामांपैकी एक आहे. हे मंदिर वैष्णव संप्रदायाचे मंदिर आहे जे भगवान विष्णू यांचा अवतार श्रीकृष्ण यांना समर्पित आहे. ह्या मंदिरामध्ये प्रत्येक वर्षी एक रथ यात्रा निघते. हा उत्सव अतिशय प्रसिद्ध असा आहे.

या मंदिरांमध्ये तीन मुख्य देवता आहेत भगवान जगन्नाथ त्यांचे मोठे भाऊ बलभद्र व त्यांची बहीण सुभद्रा. आणि ह्या तीन देवांच्या मुर्त्या वेगवेगळ्या भव्य आणि सुंदर रथांमध्ये विराजमान आहेत. या आधी श्री जगन्नाथ पुरी यांची निल माघव या नावाने पूजा केली जात होती. जे भिल सरदार विश्वासू यांचे आराध्यदैवत होते. आज पासून साधारण हजार वर्षांपूर्वी भिल‌ सरदार विश्वासू निल पर्वताच्या गुहेमध्ये यांची पूजा करायचे.

मंदिराचे रहस्य:

एका पुरानिककथे नुसार असं म्हटलं जातं जेव्हा जगन्नाथ मंदिराची स्थापना झाली तेव्हा‌ प्रत्येक भक्तांची देवाचं दर्शन घेण्याची इच्छा‌ होती. असचं समुद्र देखील एक भगवान जगन्नाथ यांचा भक्त होता. त्यामुळे समुद्राने जगन्नाथ मंदिराला तीन चार वेळा भेट दिली आणि त्यामुळे मंदिराचा नुकसान व्हायचं. म्हणूनच एकदा भगवान जगन्नाथ यांनी भक्त हनुमान यांना समुद्रावर लक्ष ठेवायला पाठवलं.

तेव्हा हनुमान यांनी समुद्राला बेडींनी बांधून ठेवलं तेव्हा समुद्राने हनुमानाला विचारलं तुम्ही पण तर त्यांचे भक्त आहात तुम्हाला नाही होत का इच्छा त्यांनच दर्शन करण्याची. तेव्हा हनुमान यांनी भगवान जगन्नाथ यांना भेट देण्याचं ठरवलं तेव्हा हनुमान यांच्या सोबत समुद्र देखील भेट देण्यासाठी आले. हे दोघं बेडीने बांधले असल्यामुळे हनुमान‌ जेव्हा जेव्हा भगवान जगन्नाथ यांनाच दर्शनासाठी यायचे तेव्हा तेव्हा समुद्र‌ सुद्धा त्यांच्या सोबत जायचा.‌ 

यामुळे मंदिराचे नेहमीच नुकसान व्हायचं त्याचमुळे भगवान जगन्नाथ यांनी हनुमान आणि समुद्र‌ दोघांना स्वर्ण बेडीने बांधून ठेवलं आणि हेच कारण आहे ज्यामुळे जगन्नाथ पुरी येथील समुद्र नेहमी शांत असतो.

उत्सव, यात्रा:

मंदिरात दैनिक पूजा-अर्चना होतेच. त्यासोबतच इथे अनेक वार्षिक उत्सवही आयोजित केले जातात. ज्यामध्ये हजारो भाविक भाग घेतात. त्यातील सर्वात महत्त्वाचा उत्सव म्हणजे रथयात्रा उत्सव. हा उत्सव आषाढ शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी येतो त्यानुसार जून किंवा जुलै महिन्यात आयोजित केला जातो. या उत्सवात तीन्ही मूर्ती अतिशय भव्य आणि सुंदर प्रकारे‌ सजवून रथांमध्ये विराजमान‌ होतात. आणि त्यांची यात्रा निघते. ही यात्रा जवळपास पाच किलोमीटर लांबीची असते. ही यात्रा बघण्यासाठी भाविक प्रचंड संख्येने मंदिरात गर्दी करतात. असं म्हणतात जे भाविक या यात्रेमध्ये मन मनपूर्वक सामील होतात त्यांना मोक्षप्राप्ती होते.

जगन्नाथ पुरी मंदिर फोटो:

 jagannath temple information in marathi

jagannath temple information in marathi

मंदिर कोठे आहे? कसे जायचे?:

जगन्नाथ पुरी हे स्थळ भारतातील ओडिसा राज्यांमध्ये स्थित आहे. ओडिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर हे हवाई रेल्वे आणि रोड मार्गे द्वारा सगळ्या मुख्य शहरांशी जोडले गेले आहे. त्यामुळे हवाईमार्गे जर मंदिराला भेट द्यायची असेल तर भुनेश्वर हे जवळचे विमानतळ आहे इथून जगन्नाथ पुरीच अंतर फक्त साठ किलोमीटर आहे. भुनेश्वरला पोहोचण्यासाठी भारतातील सर्व प्रमुख शहरांमधून मुंबई, बंगळूर, चेन्नई, दिल्ली, कोलकत्ता, नागपूर, हैदराबाद, रायपूर, वाराणसी अशा प्रमुख शहरातून विमानसेवा उपलब्ध आहेत.

याच प्रकारे रेल्वे मार्ग देखील सर्व प्रमुख शहरांशी जोडले गेले आहेत. आणि भुवनेश्वर हेच जवळच रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे इथून जगन्नाथ मंदिरापर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकता. भुवनेश्वर हे राष्ट्रीय महामार्गावर येतं म्हणूनच ते चेन्नई व कोलकाता अशा दोन महानगरांशी जोडलं गेलं आहे. भुवनेश्वर कडून मंदिराकडे जाण्यासाठी नियमित बससेवा देखील सुरू असतात.

मंदिर कोणी बनवले आहे:

जगन्नाथ पुरी या भव्य आणि ऐतिहासिक मंदिराचे निर्माण गंगा राजवटीतील राजा अनंतवर्मन चोडगंगा देव यांनी इ.स. ११७४ मध्ये केले त्यानंतर १९९७ मध्ये ओडीसा शासक अनंग भीम देव यांनी केले.

पाहण्यासारखी ठिकाणे :

ओडिसा राज्यातील पुरी हे ऐतिहासिक वारसा लाभलेल एक शहर आहे. जिथे सगळीच पर्यटन स्थळे अतिशय सुंदर आहेत अशीच काही स्थळे म्हणजे लोकनाथ मंदिर, चक्रतीर्था मंदिर, ‌सिद्ध महावीर मंदिर, पंचतीर्थ मंदिर, नरेंद्र टँक पुरी, कोणार्क सूर्य मंदिर, बाल गई बीच, पुरी बीच, गोल्डन बीच, स्वर्गद्वार बीच, चंद्रभागा बीच, अस्तरांगा बीच, इत्यादी.

जगन्नाथ मंदिर रहस्या कथा:

चारण परंपरेमध्ये असं म्हटलं जातं की इथे भगवान द्वारकाधीश यांचे जळलेले मृतदेह पुरीच्या समुद्र किनार्‍यावर आले होते. अग्नि दिल्यावर समुद्राला तुफान आलं आणि त्यामुळे तिन्ही देह अर्ध जळलेल्या स्वरूपात किनार्‍यावर आले त्याच्यानंतर पुरीच्या राजाने ह्या देहांना वेगवेगळा रथामध्ये ठेवलं (कारण जर ते जिवंत असते‌ तर एकाच रथामध्ये ठेवण्यात आला असत) त्यानंतर संपूर्ण शहरातील लोकांनी रथाला खेचायला सुरवात केली आणि शेवटी मृतदेहा सोबत वाहत आलेल्या लाकडाची एक पेटी बनवली आणि ती पृथ्वीला समर्पित केली.

खूपच कमी लोक आहेत ज्यांना ही खरी गोष्ट माहीत आहे जास्त करून तर लोकांना असं वाटतं की स्वतः खुद्द देव इथे जिवंत स्वरूपात विराजमान झाले होते. याचा उल्लेख चरण जगदंबा सोनल यांच्या गुरुपूजन डोलला दान बापूंच्या हस्तरेखेतही आहे.

पुरी माहिती मराठी मध्ये:

जगन्नाथ पुरी हे हिंदू धर्माचे प्रार्थना स्थळ आहे. जगन्नाथ पुरी याचं वर्णन पृथ्वीवरील स्वर्ग असा केला जातो. इथे भगवान विष्णूंनी पुरुषोत्तम नीलमाधव या रूपात अवतार घेतला होता. हे स्थळ हिंदू धर्मियांसाठी श्रद्धेच आणि भावनेचं स्थळ आहे. ह्या स्थळाला ऐतिहासिक वारसा लाभला असल्यामुळें भारतातील प्राचीन परंपरा आणि संस्कृती मध्ये हे स्थळ खूप महत्त्वाचे आहे.

जगन्नाथ रथयात्रेची माहिती:

जगन्नाथ पुरी हे ओडिसा मधील एक श्रीकृष्णाच मंदिर आहे. त्याच्यामध्ये श्री कृष्णाच जगन्नाथ ह्या अवताराची पूजा केली जाते. या मंदिरामध्ये भरणारी रथयात्रा भाविकांना आकर्षित करते. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ यांचा मोठा भाऊ बालभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा या तिघांची अशी मोठी भव्य रथयात्रा निघते. या यात्रेमध्ये भगवान जगन्नाथ यांचा रथ सगळ्यात पाटी असतो.

त्याच्यानंतर बहिण सुभद्रा यांचा रथ मध्ये असतो आणि भाऊ बलभद्र यांचा सर्वात पुढे असतो. बालभद्र यांच्या रथाला तालध्वज असे म्हटले जाते. सुभद्रेचा रथ दर्पदलंन म्हणून ओळखला जातो. भगवान जगन्नाथ यांचा रथ नंदीघोष किंवा गरुडध्वज म्हणून ओळखला जातो. असे म्हणतात या यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या भाविकांना मोक्षप्राप्ती मिळते. या रथामध्ये जगन्नाथ यांचा रथ सोळा चाकी असलेल्या लाकडी रथ आहे. हा रथ ३५ फूट लांब, ३५ फूट रुंद आणि ४५ फूट उंचीचा आहे. बाकीचे दोन रथ तसे आकारमानाने थोडे लहान आहेत.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा जगन्नाथ पुरी मंदिर माहिती jagannath temple information in marathi language हे मंदिर कुठे आहे? ह्याचे वैशिष्ट्य, त्याचे सौंदर्य, याचा इतिहास,  मंदिरातील रहस्य, मंदिरात घडणारे उत्सव, जत्रा याची थोडक्यात माहिती  दिली आहे. jagannath temple information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about jagannath temple in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही जगन्नाथ पुरी मंदिर माहिती विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!