Golconda Fort Information in Marathi गोवळकोंडा किल्ला मराठी माहिती गोलकोंडा किल्ला हा तेलंगना राज्यातील हैदराबाद शहरापासून पश्चिमेला ११ किलो मीटर अंतरावर आहे. या किल्ल्याची ओळख म्हणजे हा किल्ला देशातील सर्वात मोठा आणि आतापर्यंत सुरक्षित राहिलेला किल्ला आहे. प्राचीन काळी या किल्ल्यावर हिरे आणि मोती यांचा अरब आणि आफ्रीकामधून व्यापार होत होता. हा किल्ला पूर्वी मातीने बांधला होता मग कुतुबशहाच्या काळामध्ये हा किल्ला ग्रेनाईटचा वापर करून बांधला म्हणजे या किल्ल्याच्या बाहेरील बांधकामासाठी विटा, दगड, चुनखडी आणि धातूचा वापर करण्यात आला आहे.
गोळकोंडा किल्ला माहिती – Golconda Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | गोलकोंडा किवा गोळकोंडा |
ठिकाण | गोलकोंडा किल्ला हा तेलंगना राज्यातील हैदराबाद शहरापासून पश्चिमेला ११ किलो मीटर अंतरावर आहे |
स्थपना | ११ व्या शतकामध्ये |
उंची | हा किल्ला १२० मीटर उंचीवर बांधला आहे. |
गोलकोंडा हा किल्ला कशासाठी प्रसिध्द आहे | हिरा |
किल्ल्यावरील ठिकाणे | बाला हिसार, रेहबान, नगीना बाग, व्हॉईस आणि लाईट शो, महाकाली मंदिर, अशलाह खाना, हब्शी कॉमन्स, रामदास बंदी खाना, रमासा कोठा, दरबार हॉल, अंबर खाना, तारामती मशीद आणि राणी महल |
आतील बांधकामासाठी तसेच नक्षी कामासाठी ग्रेनाईटचा वापर करण्यात आला आहे. कुतुबशहाने या किल्ल्याला इ. स १५१८ ते १६८७ पर्यंत आपली राजधानी बनवली होती पण असे म्हणतात कि या किल्ल्याची निर्मिती आणि किल्ल्याची देखभाल काकतैया वंशाने केली. नूर आणि कोहिनूर हे हिरे देखील या गोलकोंडा किल्ल्यातील राजाकडे होते तसेच आशा आणि रीजेन्ट हिरे भारतातून बाहेर देशामध्ये जाण्यागोदर या गोलकोंडा राजांच्या कडेच होते.
- नक्की वाचा: पद्मदुर्ग किल्ल्याची माहिती
गोळकोंडा किल्ला हा तेलंगना राज्यातील हैदराबाद शहरापासून पश्चिमेला ११ किलो मीटर अंतरावर आहे. हा किल्ला पहिल्यांदा जेव्हा बांधलेला त्यावेळी हा मातीने बांधला होता पण कुतुबशहाच्या काळामध्ये या किल्ल्याची पुनर्बांधणी करण्यात आली आणि त्यावेळी या किल्ल्याची बांधणी करण्यासाठी ग्रेनाईटचा वापर करण्यात आला.
या किल्ल्यामध्ये मुख्यता ४ स्वतंत्र्य किल्ले आहेत ज्यांना १० किलोमीटर लांबीचे तट आहेत त्याबरोबर ४ पूल आणि ८ प्रवेशदार आहेत आणि आपल्यला या किल्ल्यामध्ये इतर मंदिर, मशिदी , काही शाही इमारती, तबेले देखील पाहायला मिळतात. हा किल्ला १२० मीटर उंची वर बांधला आहे आणि त्याला भक्कम आणि विशाल अशी तटबंदीची भिंत देखील आहे.
या किल्ल्यामध्ये हिरे मोती याचा मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्यामुळे या किल्ल्याच्या अधिक सुरक्षतेच्या दृष्टीने या किल्ल्याला तिहेरी तटबंदी आहे आणि बाहेरील तटबंदीच्या भिंतीला एक खोल खंदक आहे. या किल्ल्यला १५ ते १७ मीटर उंचीचे एकूण ८७ बुरुज आहेत.
गोळकोंडा किल्ल्याचा इतिहास – Golconda fort History in Marathi
पहिल्यांदा हा किल्ला मातीने बांधला होता आणि या किल्ल्याची निर्मिती ११ व्या शतकामध्ये वरंगल राजाने केली होती आणि या किल्ल्याची देखभाल काकतैया घराण्यातील प्रताप रुद्र याने केली होती. त्यानंतर या किल्ल्यावर मुसुनुरी नायक याने हल्ला केला आणि वरंगल सैनिकांना हरवले आणि हा किल्ला त्याच्या ताब्यात गेला पण काही दिवसांनी हा किल्ला बहामनी वंशाकडे गेला ज्यावेळी हा किल्ला बहामानींच्या होता त्यावेळी या किल्ल्याला मुहम्मदनगर या नावाने ओळखले जावू लागले.
- नक्की वाचा: विशाळगड किल्ल्याची माहिती
इ. स. १५१२ मध्ये हा किल्ला कुतुबशाही राज्यांच्या वर्चस्वा खाली गेला आणि त्यावेळी त्यांनी मातीचे बांधकाम पाडून तेथे किल्ल्याच्या बाहेरील बांधकामासाठी विटा, दगड, चुनखडी आणि धातूचा वापर करण्यात आला आहे. आणि आतील बांधकामासाठी तसेच नक्षी कामासाठी ग्रेनाईटचा वापर करण्यात आला.
कुतुबशहाने या किल्ल्याला इ. स १५१८ ते १६८७ पर्यंत आपली राजधानी बनवली होती. १७ व्या शतकामध्ये या किल्ल्याला एक प्रसिध्द हिर्यांचा बाजार मानले जावू लागले. नूर आणि कोहिनूर हे हिरे देखील या गोलकोंडा किल्ल्यातील राजाकडे होते तसेच आशा आणि रीजेन्ट हिरे भारतातून बाहेर देशामध्ये जाण्यागोदर या गोलकोंडा राजांच्या कडेच होते.
या किल्ल्यावर एकूण ६२ वर्ष कुतुबशाहीने राज्य केले आणि त्यांनी इ. स. १५९० मध्ये गोलकोंडा हि आपली राजधानी बनवली होती. १६८७ मध्ये हा किल्ला औरंजेबाच्या ताब्यात गेला.
गोळकोंडा या किल्ल्यावर पाहण्यासारखी ठीकाणे:
नगीना बाग :
या ठिकाणी हिरे खरेदी करण्याचा विकण्याचा व्यवहार होत होते आणि हे आज्ज देखील आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळते.
बाला हिसार :
बाला हिसार हा एक किल्ल्याचा उंच भाग आहे ज्यावर आपल्यला ३०० हून अधिक पायर्या चान्धून जावे लागते.
रहबान :
रहबान म्हणजे हि एक पूर्वीच्या काळातील पाण्याची मुख्य सुविधा आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळते.
काळा मंदिर :
या किल्ल्यावर आपल्यला काळा मंदिर देखील पाहायला मिळते.
महाकाली मंदिर :
महाकाली मंदिर हे किल्ल्याच्या वरच्या भागावर बांधले आहे. राजा इब्राहीम कुतुब शाह हा त्या काळी हिंदू लोकांच्यामध्ये खूप लोकप्रिय होता त्यामुळे त्याने किल्ल्यावर महाकाली मंदिर बांधले. त्या काळी या राजाला हिंदू लोक मलकाभिराम या नावाने संबोधत होते.
व्हॉईस आणि लाईट शो :
येथील व्हॉईस आणि लाईट शो हा प्रेक्षकांच्या आकर्षणाचा मुख्य मुद्दा बनला आहे. या शो द्वारे राजाच्या कथा, प्रेम आणि इतिहास सांगितला जातो.
किल्ल्यामधील इतर ठिकाणे :
या किल्ल्यावर आपल्यला अशलाह खाना, हब्शी कॉमन्स, रामदास बंदी खाना, रमासा कोठा, दरबार हॉल, अंबर खाना, राणी महल आणि तारामती मशीद.
- नक्की वाचा: वसई किल्ल्याची माहिती
गोलकोंडा किल्ल्याविषयी काही तथ्ये – facts about golconda fort
- या किल्ल्यामध्ये किल्ल्याच्या प्रवेश दाराजवळ वाजवलेली टाळी किल्ल्याच्या बाला हिसार या भागापर्यंत ऐकू जाते.
- जगातील प्रसिध्द हिरे दर्या ए नूर, नूर उल ऐन, कोहिनूर, आशा आणि रीजेन्ट या प्रकारचे हिरे भारतच्या बाहेर विदेशात जायच्या अगोदर हे हिरे गोलकोंडा किल्ल्यामधील राजांच्याकडे होते.
- या किल्ल्य्वर एक ४०० वर्षापूर्वीचे झाड पाहायला मिळते जे व्यापाऱ्यांनी मुहम्मद कुतुब शाह राजाला भेट दिले होते.
- या किल्ल्यावर एक गुप्त सुरंग आणि बाहेर जायचा रस्ता आहे.
गोलकोंडा किल्ला फोटो:
गोलकोंडा किल्ल्यावर कसे जायचे ?
गोलकोंडा किल्ला हा तेलंगना राज्यातील हैदराबाद शहरापासून पश्चिमेला ११ किलो मीटर अंतरावर आहे. आपल्यला कोणत्याही मुख्य शहरातून बस, रेल्वे किवा विमान पकडून हैदराबाद शहरामध्ये जाता येते तेथून आपल्यला किल्ल्यापर्यंत जाणारी स्थानिक बस किवा टॅक्सी पकडून किल्ल्यावर जावे लागेल.
प्रवेश शुल्क : गोलकोंडा या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी भारतीय पर्यटकांच्यासाठी ३० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो आणि विदेशी पर्यटकांच्यासाठी २०० रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो. जर तुम्हाल फोटो किवा शुटींग करायचे असेल तर त्याचे २५ रुपये आकारले जातात. व्हॉईस आणि लाईट शो या कार्यक्रमासाठी १३० रुपये फी आकारली जाते.
वेळ : हा किल्ला आठवड्यातील कोणत्याही दिवशी आपल्यला पाहता येतो. हा किल्ला पाहण्याची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५.३० पर्यंत हा किल्ला पर्यटकांच्यासाठी खुला असतो.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, गोळकोंडा किल्ला golconda fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. golconda fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about golconda fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही गोळकोंडा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या golconda killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट