Padmadurg Fort Information in Marathi पद्मदुर्ग किल्ला माहिती मराठी पद्मदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावाजवळ आहे. पद्मदुर्ग हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला मुरुड नजीकच्या समुद्रकिनारपट्टीपासून खोल समुद्रामध्ये कासा बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याची बांधणी इ. स. १६७५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुड येथे असणारा जंजिरा किल्ल्यातील सिद्दी ला पायबंद घालण्यासाठी शितापीने बांधलेला किल्ला म्हणजे पद्मदुर्ग. पद्मदुर्ग हा किल्ला कासा बेटावर आहे म्हणून या किल्ल्याला कासा किल्ला म्हणून देखील ओळखले जाते.

पद्मदुर्ग किल्ला माहिती – Padmadurg Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | पद्मदुर्ग , कासा |
प्रकार | जलदुर्ग |
ठिकाण | पद्मदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावाजवळ आहे. |
समुद्र | अरबी |
बेट | कासा |
किल्ल्याचे २ भाग | मुख्य किल्ला आणि पडकोट किल्ला |
स्थापना | इ. स. १६७५ |
संस्थापक | छत्रपती शिवाजी महाराज |
एबेसिया मधून आलेले हबशी लोक राजपुरी गावाजवळ ३ ते ४ किलोमीटर अंतरावर एक किल्ल्यावर राहत होते ते म्हणजे जंजिरा किल्ला अजिंक्य ठेवणारे सिद्दी. हे लोक या किनारपट्टी जवळ असणाऱ्या लोकांच्या छळ करू लागले त्यांच्यावर अत्याचार करू लागले. त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्या हबशी सिद्दी वर एक रचना तयार केली होती ती म्हणजे “ जैसा घराशी उंदीर, तैसा स्वराज्यासी सिद्दी” म्हणजे घरामध्ये बिळामध्ये राहणारा उंदीर मारता येत नाही पण तो घरामध्ये आहे यांचे अस्तित्व मात्र सारखे जाणवते तसेच या सिद्दी चे देखील झाले होते.
- नक्की वाचा: सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती
कारण राजपुरी भाग हा जरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात असला तरी जंजिरा हा किल्ला सिद्दी कडून त्यांना घेता आला नाही आणि म्हणून त्याच्या चुकीच्या कामांवर पायबंद घालण्यासाठी महाराजांनी जंजिर्याच्या काही अंतरावरच पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली. स्वराज्यातील पद्मदुर्ग किल्ल्यावर राहणारा एक बहादूर व्यक्ती लाय पाटील याने रात्री जंजिराच्या तठाला शिडी लावून तो वरती चढला आणि मावळ्यांची वाट पाहत तो पहाटे पर्यंत तो तिथेच थांबला पण मोरोपंतांना मावळ्यांना घेवून येण्यासाठी वेळ झाल्यामुळे तो तेथील शिढ्या काढून माघारी परत पद्मदुर्ग किल्ल्यावर आला होता.
पद्मदुर्ग बांधल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वाक्य म्हंटले होते
“पद्मदुर्ग वसवूनी राजपुरीच्या ( जंजिरा ) उरावरी
दुसरी राजापुरी केली आहे”
पद्मदुर्ग हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यातील मुरुड या गावाजवळ हा किल्ला समुद्रामध्ये कासा नावाच्या बेटावर वसलेला आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याचे बांधकाम ३५० वर्षाचे आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता.
हा किल्ला जरी समुद्राच्या लाठा झेलत असला तरी आजही आपल्यला सुस्थितीत पाहायला मिळतो. या किल्ल्याचे दगड थोडे समुद्राच्या लाठांनी झिजले आहेत पण ते बांधण्यासाठी वापरलेला चुना अजून जसाचा तसा आहे. पद्मदुर्ग हा किल्ला २ भागामध्ये विभागलेला आहे एक म्हणजे मुख्य किल्ला आणि दुसरा पडकोट.
- नक्की वाचा: विजयदुर्ग किल्ल्याची माहिती
या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी आहे आणि हि तटबंदी अजूनही मजबूत आहे तसेच तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्या आणि त्या तटबंदीवर जागोजागी झरोखे आहे आणि त्यामध्ये तोफा आहेत. त्याचबरोबर या किल्ल्याच्या बुरुजावर कमळाच्या पाकळ्यांसारखे नक्षी केलेली पाहायला मिळते. पद्मदुर्ग हा किल्ला राजपुरी गावापासून ९ ते १० किलो मीटर अंतरावर आहे.
पद्मदुर्ग किल्ल्याचा इतिहास – Padmadurg fort History in Marathi
मरुड समुद्र किनारपट्टी वरील होणाऱ्या व्यापारावर तसेच समुद्रातून येणाऱ्या शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच जंजिर्याच्या सिद्दीला पायबंद घालण्यासाठी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला कासा बेटावर इ. स. १६७५ मध्ये बांधला. इ. स १६७७ मध्ये पद्मदुर्ग बांधण्यासाठी तर्किक सहाय्य करणाऱ्या जिवाजी विनायक यांना लिहिलेल्या पत्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे महत्व विशद केले होते.
पद्मदुर्ग किल्ल्यामध्ये महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील सागरी वर्चस्वा साठी छत्रपती शिवाजी महाराज आणि सिद्दी मध्ये अनेक भयंकर युध्ये झाली होती. छत्रपती संभाजी महाराजांनंतर हा किल्ला सिद्दींनी आपल्या ताब्यात घेतला होता आणि या किल्ल्यावर आपल्या शैलीनुसार बांधकाम करून घेतले होते ते म्हणजे तोफ, पाण्याच्या टाक्या आणि बुरुज. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला त्यांनी तेथे बॅरेक्स बांधली. १९ व्या शतकात हा किल्ला गुन्हेगारांना कैद करण्यासाठी वापरण्यात आला होता.
- नक्की वाचा: पुरंदर किल्ल्याची माहिती
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे
तोफा :
या किल्ल्यावर आपल्यला पूर्वीच्या काळात सुमारे ७० ते ८० तोफा होत्या पण आज या किल्ल्यावर आपल्यला ४२ तोफा पाहायला मिळतात आणि या तोफांना आज गंज आला आहे.
मुख्य किल्ला :
पद्मदुर्ग हा किल्ला २ भागामध्ये बांधलेला आहे एक मुख्य किल्ला आणि दुसरा पडकोट. ज्यावेळी आपण समुद्रामधून बोटीने जातो त्यावेळी आपण मुख्य किल्ल्याच्या प्रवेश दाराजवळ जातो तेथे एक बुरुज अजूनही शाबूत आहे तसेच या किल्ल्याची तटबंदी देखील बऱ्यापैकी शाबूत आहे.
पडकोट :
आपल्यला येथे पडकोट आपल्यला मुख्य किल्ल्याच्या समोर पाहायला मिळतो म्हणजे पडकोट किल्ल्याचे काही अवशेष पाहायला मिळतात. येथे आपल्यला विहीर, तोफा आणि इमारतीचे काही अवशेष पाहायला मिळतात.
बुरुज :
बुरुज हा आपल्यला प्रत्येक किल्ल्यावर पाहायला मिळतो कारण तो शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जातो. या किल्ल्यावर देखील आपल्यला बुरुज पाहायला मिळतात आणि या बुरुजांच्या वरती कमळाच्या फुलांच्या पाकळ्यांचे नक्षी बनवली आहेत त्यामुळे हे बुरुज कमळाच्या फुलासारखे दिसतात.
किल्ल्याजवळील इतर ठिकाणे
- जंजिरा किल्ला
- मुरुड बीच
- गारंबी धबधबा
- अह्मेदगंज पॅलेस
पद्मदुर्ग किल्ला फोटो:

पद्मदुर्ग किल्ल्यावर कसे जायचे ?
या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा मुंबई किवा पुण्याला जावे लागते किवा आपण विमान, रेल्वे किवा स्वताच्या गाडीने देखील जावू शकतो. मुंबई मधून पद्मदुर्ग किल्ल्याचे अंतर १७५ किलो मीटर आहे. मुंबई किवा पुण्यामधून आपल्याला अलिबाग किवा रोहा पर्यंत जावे लागेल. तेथून राजपुरी गावामध्ये बसने किवा टॅक्सीने जावे लागते आणि राजपूरी गावातून बोटीने जावे लागते. राजपुरी या गावातून हा किल्ला १० किलो मीटर अंतरावर आहे.
टीप
- या किल्ल्याला भेट देण्यासाठी कस्टम नेव्हीची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
- या किल्ल्यावर किल्ला पाहण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, पद्मदुर्ग किल्ला padmadurg fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. padmadurg fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about padmadurg fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही पद्मदुर्ग किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या padmadurg killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
पद्मदुर्ग पाहण्यासाठी नेवी/कस्टम ची परवानगी घेण्यासाठी प्रोसेजर ची माहिती द्यावी
धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!