Vasai Fort Information in Marathi वसईचा किल्ला माहिती मराठी आज आपण या लेखामध्ये महाराष्ट्र राज्यांमध्ये पालघर जिल्ह्यात असणाऱ्या वसई किल्ल्याविषयी माहिती घेणार आहोत. वसई किल्ल्याला बसीन किल्ला Bassein Fort देखील म्हणतात आणि हा किल्ला पालघर जिल्ह्यातील वसई गावाजवळ आहे. असे म्हणतात कि या किल्ल्याचे नाव हे एका पोर्तुगीज शब्दावरून पडले आहे. वसई हा किल्ला पालघर शहरापासून ४० ते ४५ किलो मीटर आहे. या किल्ल्यामध्ये आपल्यला आत गेल्यानंतर चर्च, न्यायालय आणि हॉस्पिटल इमारती दिसतात आणि किल्ल्याचे पूर्वीचे इतर अवशेष देखील पाहायला मिळतात.
वसईचा किल्ला माहिती – Vasai Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | वसई किवा बसीन –Bassein Fort |
प्रकार | भू किल्ला |
ठिकाण | महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यामधील वसई या गावाजवळ आहे. |
क्षेत्रफळ | ११० एकर |
किल्ल्याचे पालघर पासूनचे अंतर | ४० ते ४५ किलो मीटर |
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे | चर्च, न्यायालय, हॉस्पिटल, विहिरी, बुरुज, शिव मंदिर, हनुमान मंदिर, भुयारी मार्ग, नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, वज्रेश्वरी देवी मंदिर, जोसेफ कॅथेड्रल आणि मुख्य किल्ला. |
वसई या किल्ल्याचे नाव घेतले कि या किल्ल्यावरील पोर्तीगीजांचे वर्चस्व नष्ट करण्यासाठी चिमाजी अप्पा आणि मराठा सैनिकांनी केलेले प्रयत्न आठवतात. या किल्ला बांधण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ठाणे या शहरातील आणि शहराच्या आजूबाजूच्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी हा किल्ला मोक्याच्या ठिकाणी बांधला. काही इतिहास कारांच्या मते असे म्हंटले जाते कि हा किल्ला १६ व्या किवा १७ व्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी बांधला असावा.
- नक्की वाचा: अजिंक्यतारा किल्ला माहिती
वसई हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यामधील वसई या गावाजवळ आहे. हा किल्ला भूकील्ला असून या किल्ल्याच्या तीन बाजूस समुद्राचे पाणी आहे. या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी प्रवेश दार आहे पण या किल्ल्याचे मुख्य प्रवेश दार हे वसई गावाकडे तोंड करून आहे.
वसई हा किल्ला ११० एकर क्षेत्रफळा मध्ये विस्तारलेला आहे आणि या किल्याला शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी किल्ल्याभोवती भक्कम अशी तटबंदीची भिंत बांधली आहे ती भिंत २० ते २५ फुट उंच आहे. या किल्ल्याविषयी काही विशेष सांगायचे म्हंटले तर या किल्ल्याला एकूण १० ते ११ बुरुज आहेत त्याचबरोबर या किल्ल्यावर ५० हून अधिक विहिरी आहेत, तसेच मंदिर आणि चर्च देखील आपल्यला या किल्ल्यावर पाहायला मिळतात.
त्याचबरोबर या किल्ल्याच्या भिंतीवर मराठा साम्राज्याच्या विजयाचा शिलालेख देखील पाहायला मिळतो, शिव मंदिर, हनुमान मंदिर आणि यासारख्या अनेक गोष्टी आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळतात. हा किल्ला पालघर या शहरापासून ४० ते ४५ किलो मीटर अंतरावर आहे आणि हा किल्ला व्यापार ठाणे भागामध्ये वयावर करण्यासाठी पोर्तुगीजांनी १६ व्या किवा १७ व्या शतकामध्ये बांधला असावा. या किल्ल्यावर किल्ल्याची मुख्य कमान सोडली तर तेथे काहीच सुरक्षित नाही.
- नक्की वाचा: जयगड किल्ला माहिती
वसईचा किल्ला इतिहास – Vasai fort History in Marathi
वसई हा किल्ला इ. स. १४१४ मध्ये भडारी भेंगाळे याने बांधला त्यानंतर तो गुजरातच्या सुलतान बहादूर शहाचा सेनापती मलिक तुहान याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला त्यानंतर या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी इ. स. १५३४ मध्ये हल्ला करून किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्याची पुनर्बांधणी १६ व्या किवा १७ व्या शतकामध्ये करून त्यांनी त्या किल्ल्यला आपली राजधानी घोषित केले.
या किल्ल्यावर पोर्तुगीजांनी दोन शतके राज्य केले व त्यानंतर मराठा साम्राज्याचे सेनापती चिमाजी अप्पा आणि सैनिकांनी या किल्ल्याला वेढा घातला आणि आपली लढाई धैर्याने लढून हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील केला.
चिमाजी अप्पांनी घातलेला वेढा आणि लढाई – Maratha History
इ. स १७३७ मध्ये या किल्ल्यावर मराठ्यांनी हल्ला करून हा किल्ला पोर्तुगीजांच्या कडून काढून घेण्यचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी वसई हा किल्ला मराठ्यांना घेता आला नव्हता. वसई हा किल्ला मराठा सामाराज्यामध्ये असावा असे बाजीरावांना खूप वाटत होते त्यामुळे त्यांनी चिमाजी आप्पा यांना वसई किल्ल्याची मोहीम दिली.
चिमाजी अप्पा यांनी या किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी पूर्वतयारी केली तसेच योजनाही आखली. इ. स. १७३८ मध्ये चिमाजी अप्पांनी किल्ल्याच्या दलदलीच्या भागातून किल्ल्यावर हल्ला करायचे ठरवले आणि किल्ल्याला वेढा घातला. सैनिकांनी तटाला खिंडार पाडून सर्व सैनिक किल्ल्यामध्ये घुसले त्यांनी लावलेला सुरंग वेळाने उडाला आणि त्यामध्ये भरपून सैनिक मरण पावले.
- नक्की वाचा: विजयदुर्ग किल्ला माहिती
वसईवरील मराठा आणि पोर्तुगीजांमधील लढाई सलग दोन दिवस चालली त्यामध्ये पोर्तुगीजांचे कितीतर सैनिक मारले गेले आणि शेवटी त्यांनी चिमाजी अप्पा च्या पुढे हार मानली आणि हा किल्ला इ. स. १७३९ मराठा सामाराज्यामध्ये आला.
किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
चिमाजी अप्पा स्मारक :
वसई किल्ल्यामध्ये गेल्यानंतर आपल्यला पहिल्यांदा आपल्यला नरवीर चिमाजी अप्पा स्मारक पाहायला मिळेल. चिमाजी अप्पा म्हणजे ज्यांनी हा किल्ला पोर्तुगीजांकडून काढून घेवून मराठा साम्राज्यामध्ये आणला त्यांचे स्मारक आपल्यला या किल्ल्यावर पाहायला मिळते.
मुख्य किल्ला :
काही अंतर रात्यावरून पुढे आल्यानंतर आपल्यला वसईचा मुख्य किल्ला पाहायला मिळतो. जो इ. स. १४१४ मध्ये भडारी भेंगाळे याने बांधला होता. या किल्ल्यामध्ये येण्यासाठी २ मुख्य दरवाजे आहे एक जे वसई गावाकडे तोंड करून आहे आणि दुसरे भुयारा मार्गे आहे.
चर्च :
या किल्ल्यामध्ये चर्च ऑफ डोमिनिकन आणि चर्च ऑफ सेंट पॉल हि तेथील प्रसिध्द चर्च असून या किल्ल्यावर अशी ७ चर्च पाहायला मिळतात.
विहिरी :
या किल्ल्यावर पूर्वीच्या काळी ५० हून अधिक विहिरी पाहायला मिळत होत्या आता त्यामधील १० विहिरी अजूनही सुस्थितीत पाहायला मिळतात.
मंदिरे :
या किल्ल्यावर शिव मंदिर, वज्रेश्वरी देवीचे मंदिर, हनुमान मंदिर पाहायला मिळते. या किल्ल्यावर आपल्यला जोसेफ कॅथेड्रल देखील पाहायला मिळते.
बुरुज :
या किल्ल्यावर आपल्याला एकूण १० बुरुज पाहायला मिळतात त्यामधील काही सेंट पोल्स, सेंट सेबस्तियन, कावालीरो बुरुज, एलीफांत, माद्रद दीय, रैस मागो असे आणि काही बुरुज आहेत.
भुयारी मार्ग :
या किल्ल्यावर आपल्यला समुद्रातून येणारा एक भुयारी मार्ग देखील पाहायला मिळतो आणि हा भुयारी मार्ग ५५३ फुटाचा आहे. वसई किल्ल्याच्या भिंतीवर मराठा साम्राज्याच्या विजयाचा शिलालेख देखील पाहायला मिळतो.
वसईचा किल्ला फोटो:
वसई किल्ल्यावर कसे जायचे ?
- जर तुम्हाला या किल्ल्याला भेट देण्यासाठी विमानाने यायचे असेल तर सर्वात जवळचे विमान तळ म्हणजे शिवाजी आंतरराष्ट्रीय विमान तळ मुंबई येथे आहे कोणत्याही शहरातून तुम्ही या विमातळा वर येवू शकता आणि तेथून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी टॅक्सी पकडावी लागते.
- रेल्वेने यायचे असल्यास वसई येथे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक आहे तेथून तुम्ही टॅक्सीने जावू शकता.
- बसने यायचे असल्यास आपल्यला मुंबई मधेच यावे लागते आणि तेथून टॅक्सी पकडून किल्ल्यावर जावे लागते.
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, वसईचा किल्ला vasai fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. vasai fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about vasai fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही वसईचा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या vasai killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही vasai fort thane district information in marathi त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट