विशाळगड किल्ला माहिती Vishalgad Fort Information In Marathi

Vishalgad Fort Information In Marathi विशाळगड किल्ला माहिती मराठी Khelna Fort विशाळगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यामध्ये अंबा घाटाच्या जवळ मुख्य सह्याद्रीच्या पर्वत रांगेला लागून विशाळगड किल्ला वसलेला आहे. विशाळगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून १०२१ मीटर उंच आहे. हा किल्ला कोल्हापूर बाजारपेठ आणि कोकणातील बंदरे जोडणाऱ्या घाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला आहे आणि हा किल्ला बहुतेक शिलाहार काळामध्ये बांधला असावा. विशाळगड या किल्ल्याला तेथील स्थानिक लोक खेळणा या नावने देखील संबोधतात. 

vishalgad fort information in marathi
vishalgad fort information in marathi

विशाळगड किल्ला माहिती – Vishalgad Fort Information In Marathi

किल्ल्याचे नावविशाळगड
ठिकाणमहाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यामध्ये आहे.
स्थापना११ व्या किवा १२ व्या शतकामध्ये
संस्थापकदुसरा राजा भोज
प्रकारगिरिदुर्ग
डोंगर रांगकोल्हापूर
उंची१०२१ मीटर
किल्ल्यावरील ठिकाणेराजवाडा, पावन खिंड, गोलाकार विहीर, बाजी प्रभू देशपांडे समाधी, भगवंतेश्वर मंदिर, भुयारी मार्ग आणि टकमक टोक

पण हा किल्ला इतिहासामध्ये आणि भारतामध्ये विशाळगड म्हणूनच प्रसिध्द आहे. हा किल्ला मराठा सरदार बाजी प्रभू देशपांडे आणि विजापूर सल्तनतचा सिद्दी जोहर यांच्या लढाईसाठी प्रसिध्द आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील दुसरा राजा भोज याने ११ व्या किवा १२ व्या शतकामध्ये बांधला.

विशाळगड किल्ल्याबद्दल माहिती 

विशाळगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यामध्ये अंबा घाटाच्या जवळ मुख्य सह्याद्रीच्या पर्वत रांगेला लागून विशाळगड किल्ला वसलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून १०२१ मीटर इतकी आहे. विशाळगड हा किल्ला कोल्हापूर मधून ८० किलो मीटर आहे.

विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाळ आहे. हा किल्ला अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार आहे. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याचे काही बांधकाम तसेच डाकडूजी करण्यासाठी ५ हजार होन खर्च केले होते. पूर्वीच्या लोकांनी हा गड गड राखण्यासाठी रक्ताचे पाणी केले आणि काहींना वीर मरण देखील आले पण आज या किल्ल्याची अवस्था उद्विग्न झालेली आहे.

या किल्ल्यावर आपल्यला वाडा, मंदिरे, विहिरी तसेच गडाच्या पायथ्याशी आपल्याला बाजी प्रभू देशपांडे यांनी ज्या ठिकाणी प्राण सोडले ती पावन खिंड आहे तसेच गडावर बाजी प्रभू देशपांडे यांची समाधी देखील पाहायला मिळते. विशाळगडावर गाडी फक्त खिंडीच्या पायथ्य पर्यंत जाते.

इतिहास – Vishalgad fort history in Marathi

हा किल्ला शिलाहार वंशातील दुसरा राजा भोज याने ११ व्या किवा १२ व्या शतकामध्ये बांधला आणि त्याने या गडाचे नाव खिलगिल असे ठवले होते त्यानंतर इ. स. १२०९ मध्ये देवगिरीच्या यादव राज्याने या किल्ल्यावर हल्ला करून शिलाहारांचा पराभव केला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. इ. स. १३०९ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीच्या राजा रामचंद्र याला हरवून विशाळगड हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

ऑगस्ट इ. स. १३४७ मध्ये पश्चिम मोगल प्रमुख हसन गंगू बहामनी स्वातंत्र्य झाला ज्यामुले हा किल्ला बहामनी सुलतानांचा भाग बनला. १३५४ ते १४३३ या काळामध्ये हा किल्ला विजयनगर साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. विजयनगर साम्राज्याचा नाश झाल्यानंतर स्थानिक मराठा राजा शंकराव मोरे याने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पण बहामनी सुलतानाने पुन्हा हा किल्ला मिळवण्यासाठी महमूद गवान आणि त्याच्यासोबत सैन्य पाठवलं.

गवानच्या अधिकारी कर्णसिंह आणि त्याचा मुलगा भीमसिंह यांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला पण लगेच हा किल्ला आदिल शाही मध्ये गेला. इ. स. १६५९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या मदतीने हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ गडावर होते म्हणजेच जुलै १६६० सिद्दी जोहरने वेढा घातला त्यावेळी शिवाजी महाराज त्या वेढ्यातून सुटून विशाळगडावर जात असताना पावन खिंडी पर्यंत सिद्दी जोहर त्यांचा पाठलाग करत आला होता पण तेथे सिद्दी जोहराला बाजी प्रभू यांनी अडवले आणि त्यांच्याशी लढाई देखील केली.

बाजी प्रभू देशपांडे यांना लढताना पावन खिंडी मध्ये वीरमरण आले पण महाराज विशाळगडावर सुखरूप पोहचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूत्यू नंतर संभाजी महाराजांनी ह्या किल्ल्यावर अनेक बांधकामे केली त्याचबरोबर इ. स. १६८९ मध्ये राजाराम महाराजांनी हा किल्ला मराठ्यांची राजधानी बनवली आणि मराठ्यांच्या प्रमुख हालचालींचा केंद्र बिंदू बनला.

हा किल्ला शाहूंच्या काळापर्यंत मराठ्यांच्या कडेच राहिला. इ. स. १८४४ मध्ये हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेला. हा किल्ला त्यांच्या अधिपत्याखाली असताना त्यांनी या किल्ल्याची नासधूस केली.

पावन खिंड लढाई:

“श्री बाजींचे रक्त पेरिले खिंडीत त्या काळा

म्हणूनी रायगडी स्वातंत्र्याचा थोर वृक्ष झाला”

सिध्दी जोहरने १ मार्च १६६० मध्ये पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला हा वेढा त्याने सलग ४ महिने घातला होता. सिध्दी जोहर काही केल्या मागे हटण्यास तयार न्हवता म्हणून शिवाजी महाराजांनी असे ठरवले कि या गडावरून विशाळगडावर जाने सुरक्षेचे ठरेल आणि त्यांनी काही सैनिक जमवले त्यांमध्ये बाजी प्रभू देशपांडे आणि शिवा काशीद देखील होते.

छत्रपती शिवाजी महाराज एका रात्री मुसळधार पाऊस पडत असताना ते पन्हाळगडावरून सुटले. त्यावेळी शिवा काशीद हे थोडेफार शिवाजी महाराजांसारखे दिसत असल्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांचे सोंग घेतले आणि सिध्दी जोहराला त्यामध्ये गुंतवून ठेवले आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना पालीन जाण्यासाठी वेळ मिळाला.

पण सिध्दी जोहराला हे शिवाजी महाराज नाहीत तर त्याचे सोंग घेतलेला शिवा काशीद आहे हे समजताच त्यांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्याचे ठरवले पण तिकडे शिवा काशीदला आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती.

सिध्दी जोहर शिवाजी महाराजांचा पाठलाग करत असताना त्याला पावनखिंडी जवळ “लाख मेले तरी चालतील पण लोकांचा पोशिंदा जगला पाहिजे” असे म्हणणारे बाजीप्रभू देशपांडे यांनी त्याला तेथे रोखले त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षितपणे विशाळगडावर पोहचले तो दिवस होता १३ जुलै १६६० हा होता. इकडे पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे सिध्दी जोहरशी लढत असताना तेथेच धारातीर्थ झाले.

किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

  • भगवंतेश्वर मंदिर :

गडावर जाण्यासाठी उजव्या बाजूला नव्या पायऱ्या बांधल्या आहेत त्या पायऱ्या चडून वरती गेले कि भगवंतेश्वर मंदिर पाहायला मिळते. त्याचबरोबर या मंदिरात जे कासाव आहे ते अगदी विलक्षण आहे तसेच या मंदिरात ब्रह्मदेवाची मूर्ती देखील आहे. जर आपल्यला गडावर राहायचे असेल तर आपण या मंदिरात राहू शकतो.

  • राजवाडा :

या किल्ल्यावर आपल्यला पूर्वच्या काळात जे या किल्ल्यावरील प्रधान होते त्यांचे राज वाड्याचे चौथरे पाहायला मिळतात. राजवाड्यकडे जाताना तेथे चोकोन आकाराची भिंत पाहायला मिळते.

  • भुयारी मार्ग :

या किल्ल्याच्या प्रवेश दारा जवळच्या भिंतीला एक लहान भुयार आहे जे चोकोनी विहिरी जवळ जाते.

  • विहीर :

आपल्याला किल्ल्यावर एक गोलाकार विहीर आहे ज्याला दिंडी दरवाजा आहे आणि त्या विहिरीमध्ये छोटेसे महादेवाचे मंदिर आहे.

  • टकमक टोक :

या किल्ल्यावर आपल्याला टकमक टोक देखील पाहायला मिळतो.

  • बाजी प्रभू देशपांडे समाधी :

ज्यांना सिद्दी जोहारसी लढताना वीर मरण आले त्यांची समाधी किल्ल्यावर पाहायला मिळते.

  • मुंडा दरवाजा :

किल्ल्यावर आपण थोडे पुढे चालत आलो कि आपल्या एक पडझड अवस्थेतील एक दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाज्याचा एक बुरुज आणि कमान अजूनही शाबूत आहे.

  • पावन खिंड :

ज्यावेळी शिवाजी महाराजांचा पाठलाग करत सिद्दी जोहर विशालगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या खिंडी पर्यत आला होता त्यावेळी त्याला बाजी प्रभू देशपांडे यांनी खिंडीत रोखले होते आणि त्यांच्यामध्ये लढाई झाली होती आणि यामध्ये बाजी प्रभू देशपांडे यांना या खिंडी मध्ये वीर मरण आले होते म्हणून या खिंडीला पावन खिंड असे नाव पडले.

विशाळगड किल्ला फोटो:

vishalgad fort information in marathi
vishalgad fort information in marathi

विशाळगडावर कसे जायचे ?

जर तुम्हाला रेल्वेने यायचे असल्यास या किल्ल्यापासून सर्वात जवळचे रेल्वे स्थानक कोल्हापूर मध्ये आहे. कोणत्याही मुख्य शहरातून आपण कोल्हापूर रेल्वे स्थानकावर येवून तेथून विशाळ गडावर बसने जावू शकतो. कोल्हापूरचे बस स्थानक रेल्वे स्थानकाच्या जवळच आहे तेथून कर्नाटक परिवहन बस मंडळाची बस दिवसातून ४ वेळा विशाळगडावर जाते.

किल्ल्यावर जाण्याचे मार्ग

  • मलकापूर – गजापूर – विशाळगड
  • शाहूवाडी – पावनखिंड – गजापूर – विशाळगड

टीप

  • आपल्याला गाडीने या किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते.
  • जून ते फेब्रुवारी या काळामध्ये हा किल्ला पाहण्यासाठी आनंददायी वाटतो.
  • हा किल्ला सकाळी ५.३० ते रात्री ८ पर्यंत केव्हाही पाहू शकतो.
  • विशाळगड हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, विशाळगड किल्ला vishalgad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. vishalgad fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about vishalgad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही विशाळगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या vishalgad killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही khelna fort त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!