गोमुखासन मराठी माहिती Gomukhasana Information in Marathi

gomukhasana information in marathi गोमुखासन मराठी माहिती, आज आपण या लेखामध्ये गोमुखासन या विषयी माहिती घेणार आहोत. सध्या योग आणि व्यायाम म्हणजे काळाची गरज आहे आणि जे लोक योग आणि व्यायाम नियमित करतात अश्या लोकांचे आरोग्य हे चांगले आणि निरोगी राहण्यास मदत होते. योगाच्या नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो आणि योग ही निरोगी जगण्याची कला आणि विज्ञान आहे आणि ही अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद आणण्यावर लक्ष केंद्रित करते.

योगामध्ये अनेक मुद्रा आहेत आणि योगाची प्रत्येक मुद्रा हि आपल्याला कोणता कोणता तरी आरोग्य फायदा जरूर करते पण कोणत्याही योग मुद्रेचा सराव करत असताना मात्र आपण काळजी पूर्वक केला पाहिजे. अन्लोम विन्लोम, भस्त्रिका, पद्मासन, चक्रासन, सवासन, भुजंगासन, गोमुखासन, वज्रासन, मयुरासन आणि इतर असे अनेक प्रकार आहेत आणि आज आपण या लेखामध्ये गोमुखासन विषयी माहिती घेणार आहोत. चला तर आता आपण गोमुखासन या विषयी खाली सविस्तर महितो घेवूया.

gomukhasana information in marathi
gomukhasana information in marathi

गोमुखासन मराठी माहिती – Gomukhasana Information in Marathi

मुद्रेचे नावगोमुखासन
इंग्रजी नावकाऊ फेस पोझ (Cow face pose)
फायदेशरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, बहुतेक अवयवांना ताण पडून अवयव हलके होतात, मूत्राशयाच्या समस्या दूर होतात, तणाव कमी होतो, सांधे मजबूत बनतात आणि शरीर सुंदर बनते.

गोमुखासन विषयी माहिती – information about gomukhasana in Marathi

गोमुखासन हि एक योगमुद्रा म्हणजेच हा योगासनातील एक प्रकार आहे आणि या प्रकाराला इंग्रजीमध्ये cow face pose म्हणून ओळखले जाते. गोमुखासन करताना आपले सर्व शरीर हे तानते आणि तुमचे खांदे, घोटे, हात, नितंब, मांड्या आणि पाठ हे अवयव या पोसमध्ये दुमडलेले असतात आणि हि मुद्रा गाईच्या तोंडासारखी दिसते आणि म्हणून या मुद्रेला गोमुखासन मुद्रा म्हणून ओळखले जाते.

गोमुखासन हि अशी मुद्रा आहे जी आपल्या शरीराच्या संपूर्ण अवयवांचा व्यायाम होतो आणि त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह देखील चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते तसेच गोमुखासन केल्यामुळे सांधे मजबूत होतात तसेच शरीर देखील सुंदर बनते. गोमुखासन या आसनाचा अर्थ असा होतो कि गो म्हणजे गाय आणि मुख म्हणजे तोंड म्हणजेच हे आसन केल्यानंतर गाईच्या तोंडासारखे तिसते आणि म्हणून या आसनाला गोमुखासन नाव पडलेले आहे.

गोमुखासन कसे करावे – steps 

  • सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
  • आता दंडासन मध्ये बसा आणि प्रारंभ करा.
  • तुमचा उजवा गुढघा वाकव आणि तुमच्या दावा पाय हा तुमच्या उजव्या नितंबाच्या बाहेरील बाजूस आणा आणि तुमचा उजवा पाय तुमच्या डाव्या नितंबयाच्या बाहेरील बाजूस आणा जेणेकरून तुमचा उजवा गुढघा हा तुमच्या डाव्या गुढघ्याच्या वर उचललेला दिसेल.
  • आता तुमच्या उजव्या पायाची टाच हि तुमच्या डाव्या पायाच्या नितंबा जवळ खेचून घ्या.
  • आता तुम्ही ताठ बसा आणि डावा हात हा तुमच्या पाठीवर घेऊन कोपरातून वाकवा आणि तो खालच्या दिशेने वर न्या आणि तुमचा उजवा हात वरून डाव्या खांद्यावरून खाली पाठीकडे नेण्याचा प्रयत्न करा आणि दोन्ही हात एकमेकांना स्पर्श करतील याचा प्रयत्न करा.
  • तुम्ही या मुद्रेमध्ये पूर्णपणे आल्यानंतर स्वस्वर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करा.
  • आणि शेवटी तुमचे हात मोकळे करताना श्वास सोडत आसन स्ठीतून बाहेर पडा आणि तुमचे पाय देखील मोकळे करा.

गोमुखासन फायदे मराठी – benefits 

योगासनामध्ये अनेक मुद्रा आहेत आणि प्रत्येक मुद्रेचे काही ना काही फायदे आहेतच तसेच गोमुखासनाचे देखील काही आरोग्य फायदे आहेत ते आता आपण खाली पाहणार आहोत.

  • किडनी म्हणजेच मूत्राशयाचे काम सुरळीत चालायचे असेल तर गोमुखासन या मुद्रेचा नियमित सराव करणे फायद्याचे ठरू शकते. या मुद्रेच्या सरावामुळे मुतखड्याचा त्रास होत नाही तसेच लघवीद्वारे शरीरातील टॉक्सीन्सचा चांगला प्रकारे निचरा होतो तसेच लघवी आणि मूत्राशयाच्या संबधित सर्व समस्या दूर होतात.
  • सध्या लोकांचे जीवन हे खूप दगदगीचे बनले आहे आणि प्रत्येक व्यक्तीला कामाचा त्रास आहे त्यामुळे बहुतेक व्यक्तींना कामाचा ताण किंवा थकवा जाणवत असतो अश्या व्यक्तींनी जर गोमुखासनाचा सर्व नियमित सराव केला तर अश्या व्यक्तींचा ताण कमी होण्यास मदत होते आणि त्या व्यक्तीला शांत वाटते.
  • गोमुखासन हि मुद्रा केल्यामुळे तुमचा गुढघा, छाती, घोटा,आणि स्नायूंना ताण पडतो आणि त्यामुळे ते मजबूत बनण्यास मदत होते. गोमुखासन करताना तुमच्या शरीरातील जवळजवळ सर्वच सांधे हे कार्यरत असतात त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यासाठी देखील मदत होते.
  • गोमुखासानाच्या नियमित सरावाने पाठीचा काना मजबूत होण्यासाठी देखील मदत होते.
  • जर एखाद्या व्यक्तीला दम्याच्या त्रासाने त्रस्त केले असेल तर अश्या व्यक्तींनी गोमुखासन हे नियमित केले पाहिजे यामुळे दम्याचा त्रास कमी होतो कारण यामुळे फुफ्फुस स्वच्छ होतात आणि छाती देखील मजबूत बनण्यासा मदत होते.
  • या आसनामुळे तुमच्या पाठीचे आणि हाताचे स्नायू हे बळकट आणि मजबूत बनतात आणि यामुळे पाठदुखीच्या समस्या देखील दूर होण्यास मदत होते.
  • या आसनाच्या नियमित सरावाने आपले शरीर सुंदर तर बनतेच परंतु आपले शरीर लवचिक देखील बनण्यास मदत होते.
  • अनेक लोकांना मधुमेहाची समस्या सतावत असते आणि हि समस्या दूर करण्यासाठी ते लोक अनेक प्रयत्न करत असतात तरी देखील काही वेळा हि समस्या दूर होत नाही परंतु जर तुम्ही गोमुखासनाचा सराव नियमितपणे केला तर तुमचा मधुमेहाच त्रास देखील कमी होण्यास मदत होते.

गोमुखासन कोणी करू नये

  • ज्या व्यक्तींना मणक्याच्या सतत समस्या जाणवतात त्या व्यक्तींनी हि मुद्रा करण्याचा प्रयत्न करू नये.
  • त्याचबरोबर गर्भवती महिलांनी हे आसन पहिल्या तीन महिन्यामध्ये करू नये.
  • जर एखाद्या व्यक्तीला मूळव्याधाचा त्रास असेल आणि मुळव्याधातून रक्त येत असल्यास अश्या व्यक्तींनी देखील या आसनाचा सराव करू नये.
  • मासिक पाळी मध्ये देखील महिलांनी हि मुद्रा करू नये
  • आपण जरी वर सांगितले असले कि पाठदुखीचा त्रास हे आसन केल्यानंतर कमी होतो तरी देखील पाठदुखीची समस्या ज्या व्यक्तींना आहे अश्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन हि मुद्रा करावी.

आम्ही दिलेल्या gomukhasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोमुखासन मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gomukhasana yoga information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about gomukhasana in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!