भुजंगासन मराठी माहिती Bhujangasana Information in Marathi

bhujangasana  information in marathi भुजंगासन मराठी माहिती, योग करणे हे रोजच्या जीवनातील एक महत्वाची क्रिया बनली आहे कारण सध्याच्या दगदगीच्या आणि प्रदूषणाच्या काळामध्ये आपल्याला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते आणि या आरोग्य समस्यांच्या पासून जर आपल्याला आपला बचाव करून घ्यायचा असेल तर आपल्याला रोज नियमित पण वेगवेगळ्या प्रकारेचे व्यायाम आणि योगासन करणे खूप गरजेचे आहे कारण आपण जर नियमितपणे योगा आणि व्यायाम केला तर आपल्याला कोणत्याही प्रकारची आरोग्य समस्या उदबवणार नाही तसेच योग नियमितपणे सराव करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनशैलीत कायमस्वरूपी सकारात्मक फरक निर्माण करू शकतो.

योग ही एक जुनी कला आहे ज्यामध्ये शरीर मनाशी जोडलेले असते. हा एक प्रकारचा व्यायाम आहे ज्याद्वारे शरीरातील सर्व घटक ध्यान आणि विश्रांतीच्या मदतीने मनाशी जोडले जातात. योगाचे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत ते म्हणजे प्राणायाम, अन्लोम विन्लोम, भस्त्रिका, पद्मासन, चक्रासन, सवासन, भुजंगासन, वज्रासन आणि इतर असे अनेक प्रकार आहेत आणि आज आपण या लेखामध्ये भुजंगासन या विषयी माहिती घेणार आहोत. चला तर मग भुजंगासन काय आहे ते कसे केले जाते आणि त्याचे काय आरोग्य फायदे आहेत ते आपण आज या लेखामध्ये पाहूया.

bhujangasana information in marathi
bhujangasana information in marathi

भुजंगासन मराठी माहिती – Bhujangasana Information in Marathi

भुजंगासन विषयी माहिती – information about bhujangasana in marathi

योगामध्ये अनेक प्रकार आहेत आणि त्यामधील भुजंगासन हा योगासनाचा एक प्रकार आहे आणि आपण ज्यावेळी सूर्य नमस्कार घालत असतो त्यावेळी भुजंगासन देखील त्या अंतर्गत येते. भुजंगासनाला कोब्रा पोस म्हणून देखील ओळखले जाते आणि भुजगासणाच्या नियमित सरावाने आपल्याला अनेक आरोग्य फायदे मिळतात आणि आपल्या शरीराची लवचिकता देखील वाढते परंतु जर तुम्ही नवशिखे असाल तर प्रथम ३० सेकंदासाठी भुजंगासणाचा सराव करा.

भुजंगासन केल्यामुळे आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात परतू भुजंगासन हे गरोदर असलेल्या स्त्रियांनी, पोटाची शस्त्रक्रिया झालेल्या लोकांनी, पाटीच्या कण्याचा त्रास होत असलेल्या व्यक्तींनी अश्या करू नये.आपण वर सांगितल्याप्रमाणे हे असं सुर्यनमस्कार मध्ये येते आणि सूर्यनमस्कार मध्ये १२ आसन असतात त्यामधी भुजंगासन हे ७ वे आसन आहे.

भुजंगासन म्हणजे काय ?

भुजंगासन हा एक योगासनाचा प्रकार आहे आणि ह्या आसनाला कोब्रा आसन म्हणतात किंवा सर्पासन असे म्हणतात. भुजंगासन हा सूर्यनमस्कार मधील एक आसन आहे आणि या योगासनामध्ये श्वासाचे नियमन केले जाते आणि या आसनामुळे शरीर लवचिक बनण्यास मदत होते.  

भुजंगासन कसे करावे – steps 

 • भुजंगासन करताना सर्वप्रथम जमिनीवर चटई किंवा जमखाना अंथरून घ्या.
 • आता पायाची बोटे जमिनीवर सपाट ठेवा आणि तुम्ही पोटावर झोपा, पोटावर झोपल्यानंतर आपल्या पायाचे तळवे वरच्या बाजूला होतील आणि मग आपले कपाळ जमिनीवर ठेवा.
 • तुमचे दोन पाय जवळ ठेवा आणि दोन्ही हात अश्या प्रकारे ठेवा कि तुमच्या दोन्ही हाताचे तळवे तुमच्या खांद्याखाली जमिनीला स्पर्श करतील तसेच कोपर समांतर आणि तुमच्या धडाच्या जवळ असावेत.
 • आता दीर्घ श्वास घेवून हळू हळू आपले डोके, छाती आणि पोट वर करा आणि नाभीचा स्पर्श जमिनीवर असावा.
 • तुमच्या हाताच्या आधाराने युमचे धड मागे आणि जमिनीवरून खेचा. तुम्ही दोन्ही तळ हातावर समान दाब देत असल्याची खात्री करा.
 • आता या पोस मध्ये श्वास घेत रागा, जसे तुम्ही तुमचा पाठीचा कना थोडा वक्र करा आणि हात सरळ आणि डोके थोडे मागे वाकवा.
 • ४ ते ५ श्वासोच्छवासाठी समान रीतीने श्वास घेताना पोझ कायम ठेवा.
 • आता श्वास सोडा आणि हळुवारपणे तुमचे पोट, छाती, आणि डोके जमिनीवर परत आणा आणि आराम करा.
 • असे ५ वेळा पुन्हा करा.

भुजंगासन फायदे – bhujangasana yoga information in marathi

भुजंगासन हे हे योगासन आहे आणि हे केल्यामुळे शरीराची लवचिकता वाढते तसेच या योगासनामुळे अनेक आरोग्य फायदे देखील दूर होतात. चला तर त आपण योगासन केल्यामुळे काय काय फायदे होतात ते पाहूया.

 • भुजंगसनाचे अनेक आरोग्य फायदे तर आहेच परंतु भुजंगासन केल्या नंतर खांदे आणि मान या अवयवांची वेदना कमी होण्यास मदत होते.
 • भुजंगासन केल्यानंतर छातीचा विस्तार होण्यासाठी मदत होते.
 • या व्यायामामुळे रक्ताभिसरण चांगले होण्यास मदत होते.
 • जर एखाद्या व्यक्तीला सतत थकवा किंवा तणाव जाणवत असेल तर व्यक्तीने भुजंगासन नियमितपणे केले तर थकवा आणि तणाव कमी होण्यास मदत होते.
 • हे आसन हृदय आणि फुफ्फुसे उघडण्यास मदत करते जे विशेषता कोविड १९ च्या साठीच्या आजाराच्या दरम्यान प्रचलित फुफ्फुसांची रक्त संचय रोखण्यासाठी सर्वोत्तम आहे.
 • तसेच काही व्यक्तींना दम्याचा त्रास असतो आणि दम्यामुळे त्यांना श्वसनाचा देखील त्रास होतो आणि अशा व्यक्तींच्यासाठी भुजंगासन उपयुक्त ठरू शकते.
 • या आसनामुळे रक्तप्रवाह वाढवते तसेच तुमच्या हृदयावर परिणाम होतो आणि त्यामुळे नकारात्मक भावना दूर होण्यास मदत होते.
 • हे आसन आपण फिटनेसच्या उद्देश्याने देखील करू शकतो कारण ह्या आसनाच्या नियमित सरावाने पोटातील चरबी जाळून टाकण्यास मदत होते.
 • या योगासनामुळे पाठ आणि खांदे मजबूत होण्यास मदत होते.
 • भुजंगच्या नियमित सरावाने अनियमित होणारी मासिक पाळी दुरुस्त होते म्हणजे पाळी नियमित होण्यास मदत होते. तसेच हे मासिक पाळीच्या वेदनांना देखील आराम देते.
 • भुजंगासणामुळे मूत्रपिंडाचे कार्य देखील सुधारते आणि त्याचबरोबर हि मुद्रा मानवी शरीरावर अनेक मार्गांनी चांगला प्रभाव करत असते.
 • भुजंगासनामुळे अनेक फायदे होतात त्यामुळे हे आसन नियमित केले पाहिजे.

भुजंगासन कोणी करू नये

 • हे आसन गरोदर स्त्रियांनी करू नये तसेच एखाद्या व्यक्तीला पाठीच्याकण्याचा त्रास असेल तर त्या व्यक्तीने देखील हे आसन करी नये.
 • कार्पल टनल सिंड्रोम हि समस्या असेल तर अश्या व्यक्तींनी देखील हा व्यायाम करू नये.
 • पोटाच्या खालच्या भागामध्ये कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर अश्या व्यक्तींनी देखील हे आसन करू नये.
 • हर्नियाचा त्रास असेल किंवा हर्नियाचे शस्त्रक्रिया झाली असेल तर अश्या व्यक्तींनी देखील भुजंगासन करू नये.
 • डोके दुखी मध्ये देखील हा व्यायाम करू नये.

आम्ही दिलेल्या bhujangasana information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भुजंगासन मराठी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about bhujangasana in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि bhujangasana information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!