विसापुर किल्ला माहिती Visapur Fort History in Marathi

Visapur Fort History in Marathi विसापुर किल्ला माहिती विसापूर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा गावाजवळ मावळ ( सह्याद्री ) नावाच्या डोंगर रांगेवर विस्तारलेला आहे. विसापूर हा किल्ला जवळच असणाऱ्या लोहगड किल्ल्याला जोडलेला आहे आणि विसापूर आणि लोहगड हे किल्ले इ. स. १६५७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतले होते. विसापूर हा किल्ला आपल्याला भाजे गावामध्ये गेल्यानंतर दिसतो. विसापूर या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून ३५५० फुट उंच आहे आणि जमिनीपासून या किल्ल्याची उंची ११५० फुट इतकी आहे.

visapur fort information in marathi विसापूर हा किल्ला कोकण आणि खंडाळा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. पूर्वीच्या काळापासून ह्या किल्ल्याकडे तसे दुर्लक्षित केला गेला होता आणि त्यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये फारसे महत्व नव्हतेच.

visapur fort history in marathi
visapur fort history in marathi

विसापुर किल्ला माहिती – Visapur Fort History in Marathi

किल्ल्याचे नावविसापूर किल्ला
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा गावाजवळ वसलेला आहे
डोंगर रांगमुख्य डोंगर रांग सह्याद्री आणि उप डोंगर रांग मावळ
उंचीसमुद्रसपाटी पासून ३५५० फुट
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेप्राचीन लेणी, विशाल कमानी, हनुमानाला समर्पित मंदिरे, प्राचीन शैलीच्या गुहा आणि प्राचीन पाण्याचे कुंड

विसापूर हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील लोणावळा गावाजवळ मावळ ( सह्याद्री ) नावाच्या डोंगर रांगेवर विस्तारलेला आहे. हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्यचा आकार चौकडी आहे आणि या किल्ल्याची उंची समुद्रसपाटी पासून ३५५० फुट इतकी आहे. या किल्ल्याला कातळ कड्याचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे आणि या किल्ल्यामध्ये जाण्यासाठी २ प्रवेश दरवाजे आहेत.

त्याचबरोबर या किल्ल्याला भक्कम अशी तटबंदी देखील आहे. विसापूर या किल्ल्यामध्ये आपल्यला प्राचीन लेणी, विशाल कमानी, पाण्याच्या विहिरी त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये पडझड झालेल्या काही इमारती देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर किल्ल्यावर हनुमानाला समर्पित मंदिरे देखील पाहायला मिळतात. असे म्हणतात कि या किल्ल्यावर असणारी विहीर पांडवांच्या काळामध्ये बांधलेली आहे. त्याचबरोबर या किल्ल्यावर एलिझाबेथ या राणीच्या कारभाऱ्यांची बंदूक आणि दारूगोळे सापडले होते तसेच विसापूर या किल्ल्यामध्ये प्राचीन शैलीच्या गुहा, प्राचीन पाण्याचे कुंड, तेथे असणारी प्राचीन घरांचे अवशेष आणि विशाल गिरिनी पाहायला मिळतात.

विसापूर या किल्ल्याचा इतिहास – history of visapur fort in marathi

विसापूर हा किल्ला बालाजी विश्वनाथ यांनी इ. स. १७१३ ते इ. स. १७२० च्या काळामध्ये बांधला असून हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे. बालाजी विश्वनाथ यांनी हा किल्ला कोकण तसेच तेथील बोर घाटावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. बालाजी विश्वनाथ हे मराठा साम्राज्याचे पहिले पेशवा होते.

विसापूर हा किल्ला लोहगड बांधल्यानंतर किती तरी दिवसांनी बांधला आहे आणि लोहगड आणि विसापूर हे दोन किल्ले एकमेकांशी जोडलेले आहेत. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता त्यावेळी त्यांनी विसापूर किल्ला देखील घेतला होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याला महत्वाचे स्थान होते.

ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये (मुगल) पुरंदरचा तह झाला होता त्यावेळी महाराजांना एकूण २३ किल्ले औरंगजेबाला द्यावे लागले होते आणि या २३ किल्ल्यामध्ये विसापूर हा किल्ला देखील होता. त्यावेळी मुगलांनी या किल्ल्यावर काही दिवस राज्य केले आहे त्यानंतर हा किल्ला परत स्वराज्यामध्ये सामील केला होता.

इ. स. १८०० मध्ये ब्रीटीशांनी भारतावर आक्रमण केले आणि त्यावेळी त्यांनी पेशव्यांच्या किल्ल्यांवर देखील हल्ले करण्यास सुरुवात केली आणि त्यांनी इ. स. १८१८ मध्ये इतर किल्ल्यांप्रमाणे विसापूर किल्ला देखील आपल्या ताब्यात घेतला. ज्यावेळी हा किल्ला ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यानंतर ब्रिटीशांनी विसापूर या किल्ल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

ब्रिटीशांनी विसापूर किल्ल्यावर केलेले शासन 

इ. स. १८१८ मध्ये विसापूर आणि लोहगड हे दोन्हीही किल्ले ब्रिटीशांच्या ताब्यात गेल्यानंतर या दोन्ही किल्ल्यांचे प्रतिनिधित्व ब्रिटीश कर्नल प्रोथेरच्या ताब्यात होते. या किल्ल्याला दोन दरवाजे (कोकण दरवाजा आणि डेक्कन दरवाजा) आणि त्याला भक्कम अशी तटबंदीची भिंत होती आणि या दोन्हीही तटबंदीला सामरिक महत्व असल्यामुळे ब्रिटीशांनी हि दोन्हीही दरवाजे पाडून टाकली आणि किल्ला त्यांच्या वर्चस्वा खाली असताना किल्ल्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केली.

त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये उत्तरेच्या तटबंदीच्या भिंती जवळ एक ४ इंचाची लोखंडी बंदूक सापडली होती आणि हि बंदूक एलिझाबेथ राणीच्या कारकिर्दीतील असावी असे काही इतिहासकारांनी सांगितले आहे.

विसापूर किल्ल्यावर पाहण्यासारखी प्राचीन ठिकाणे 

  • विहीर :

आपल्याला विसापूर या किल्ल्यावर एक विहीर पाहायला मिळते आणि या विहिरीबद्दल असे सांगितले जाते कि हि विहीर पांडवांच्या काळामध्ये बांधलेली विहीर आहे. पूर्वीच्या काळी बहुतेक या विहिरीतील पाणी गडावरील लोक रोजच्या वापरासाठी किवा पिण्याच्या पाण्यासाठी वापर करत असतील.

  • बुरुज :

इतर किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्यावर देखील बुरुज बांधले होते कारण बुरुजावरूनच शत्रूच्या हालचालींवर तसेच कोकण आणि बोर घाटावर लक्ष ठेवले जायचे. आज हे बुरुज उद्वस्त अवस्थेत आहेत.

  • आपल्याला या किल्ल्यावर प्राचीन लेण्या आणि प्राचीन शैलीतील गुहा पाहायला मिळतात.
  • दरवाजे :

विसापूर या किल्ल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी २ दरवाजे होते एक कोकण दरवाजा आणि दुसरा पश्चिम ( डेक्कन ) दरवाजा. ज्यावेळी या किल्ल्यावर ब्रिटीशांचे राज्य होते त्यावेळी ब्रिटिशांनी हे दोन्हीही दरवाजे पाडून टाकले.

  • विसापूर या किल्ल्यावर आपल्याला हनुमानाला समर्पित मंदिरे देखील पाहायला मिळतात.
  • किल्ल्यावरील इतर प्राची ठिकाणे :

विशाल कमानी, प्राचीन पाण्याचे कुंड, तेथे असणारी प्राचीन घरांचे अवशेष, विशाल गिरिनी आणि इतर पडझड झालेल्या प्राचीन इमारती आपल्यला किल्ल्यावर पाहायला मिळतात.

किल्ल्याच्या जवळील इतर आकर्षणे

  • भागा गुहा :

भागा गुहा हि किल्ल्यापासून २ ते ३ किलो मीटर अंतरावर आहे आणि हि गुहा पूर्वीच्या काळी बुध्द संतांचे घर होते.

  • आमी घाटी शहर :

आमी घाटी शहर हे लोणावळा गावापासून २२ ते २३ किलो मीटर अंतरावर आहे. आपण विसापूर हा किल्ला पाहायला गेल्यानंतर हे शहर देखील पाहू शकतो.

  • वाळवण धरन :

हा किल्ला पाहायला गेल्यानंतर आपण लोणावळ्याजवळ असणारे वाळवण धरण देखील पाहू शकतो.

  • लोणावळा :

लोणावळा हे शहर एक प्रसिध्द पहाडी भाग आहे आणि हे किल्ल्यापासून २० किलो मीटर अंतरावर आहे.

  • लोहगड :

लोहगड हा किल्ला विसापूर या किल्ल्याशी जोडलेला आहे आणि हा किल्ला विसापूर किल्ल्याजवळ असल्यामुळे आपण विसापूर किल्ल्यासोबत लोहगड किल्ला देखील पाहू शकतो.

विसापूर किल्ला फोटो:

history of visapur fort in marathi
history of visapur fort in marathi

विसापूर किल्ल्यावर कसे जायचे ? 

रेल्वे मार्गे :

जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी रेल्वे ने जायचे असेल तर तुम्ही पुणे किवा मुंबई मधून रेल्वे पकडून लोणावळा रेल्वे स्टेशनवर उतरू शकता आणि तेथून मावळ बस, स्थानिक रेल्वे पकडून जावू शकता.

रस्ता मार्गे :

किल्ल्यापर्यंत जाणारी कोणतीही थेट बस नाही त्यामुळे लोणावळा बस पकडून तुम्ही लोणावळा शहरामध्ये जावू शकता आणि लोणावळ्यामधून भाजे या गावापर्यंत टॅक्सीने जावू शकता.

विमानाने :

विसापूर किल्ल्याला जाण्यासाठी कोणतेही थेट विमानतळ नाही. या किल्ल्यापासुनाचे सर्वात जवळचे विमानतळ पुणे आहे आणि तेथून रेल्वे किवा बस पकडून लोणावळ्याला येवू शकतो.

टीप

विसापूर हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, विसापूर किल्ला visapur fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. visapur fort history in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about visapur fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही विसापूर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या visapur killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!