रोहिडा किल्ला माहिती Rohida Fort History in Marathi

Rohida Fort History in Marathi रोहिडा किल्ल्याचा इतिहास रोहीडा हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यामध्ये बजरवाडी या गावाजवळ महाबळेश्वर (सह्याद्री) डोंगर रांगेवर वसलेला आहे. रोहीडा या किल्ल्याला विचित्रगड किवा रोहिदेश्वर किल्ला या नावांनी देखील ओळखले जाते. रोहीडा हा किल्ला यादव काळात बांधला गेला आणि या किल्ल्याच्या तिसर्‍या वेशीवरील शिलालेखानुसार विजापूरच्या मोहम्मद आदिल शाह याने १६५६ मध्ये या किल्ल्याची डागडुजी केली होती. त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळच्या युद्धात रोहिडाच्या बांदल देशमुख यांच्या कडून हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता.

rohida fort information in marathi रोहिडा हा किल्ला भोर गावातून १५ किलो मीटर अंतरावर वसलेला आहे आणि हा किल्ला पुणे जिल्ह्यातील दक्षिण किल्ल्यांपैकी एक आहेत. रोहीडा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून ३६०० फुट म्हणजेच १०९७ मीटर हून अधिक आहे. रोहीडा या किल्ल्याच्या पायथ्याशी बजरवाडी (भोर) आणि चिखलावडे हि गावे आहेत.

rohida fort history in marathi
rohida fort history in marathi

रोहिडा किल्ला माहिती मराठी – Rohida Fort History in Marathi

किल्ल्याची नावेरोहीडा किल्ला, विचित्रगड किवा रोहिदेश्वर किल्ला.
प्रकारगिरिदुर्ग
ठिकाणहा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यामध्ये बजरवाडी या गावाजवळ महाबळेश्वर ( सह्याद्री ) डोंगर रांगेवर वसलेला आहे
किल्ल्याची बांधणीयादव कालीन
पायथ्याशी असणारी गावेबजरवाडी (भोर) आणि चिखलावडे
उंचीउंची समुद्र सपाटीपासून ३६०० फुट
किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणेगणपती मूर्ती, पाण्याचे टाके आणि कुंड, भगवान रोहिदमल्ला, भैरोबा मंदिर, तीन दरवाजे आणि चोर दरवाजा.

रोहीडा हा किल्ला यादव काळात बांधला गेला. तिसर्‍या दरवाजावरील शिलालेखानुसार हा किल्ला विजापूरच्या मोहम्मद आदिल शाहने इ. स १६५६ मे रोजी या किल्ल्याची डागडुजी केली होती. त्यानंतर हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळच्या युद्धामध्ये रोहिडाच्या बांदल देशमुख यांच्या हस्ते हा किल्ला जिंकला पण या संघर्षामुळे कृष्णाजी बांदल यांचा मृत्यू झाला.  

लढाईनंतर लढाईमधील  मुख्य प्रशासक बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक अधिकारी स्वराज्य चळवळीत सामील झाले. पुरंदर (पुरंदरचा तह) कराराच्या वेळी इ. स. १६५६ छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरच्या तहामध्ये एकूण २३ किल्ले औरंगजेबाला दिले होते त्यामध्ये रोहीडा या किल्ल्याचा समावेश देखील होती.

पण २४ जून १६७० मध्ये हा किल्ला पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी कान्होजी जेधे यांच्या संपूर्ण भोर राज्य आणि रोहिडा किल्ल्याच्या अर्ध्या भागासह काही जमीन ताब्यात होती. त्यानंतर पुढे मुघलांनी हा किल्ला ताब्यात घेतला. हा किल्ला भारतीय स्वातंत्र्य होईपर्यंत भोर राज्यातील पंतसाविच्या ताब्यात होता.

रोहीडा किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे

आपण किल्ल्यावर गेल्यानंतर आपल्या प्रवेशदारामधील चौकटीत गणपती मूर्ती पाहायला मिळते ज्या मूर्तीच्या वरती एक कमान आहे. त्यानंतर एक किल्ल्याचे दुसरे दार ओलांडून पुढे १५ ते २० पावले चालून गेल्यानंतर दरवाज्याच्या समोरच एक भूगर्भात असणारे एक पाण्याचे कुंड आहे ज्यामध्ये १२ महिने पाणी असते आणि बहुतेक या कुंडातील पाणी पिण्यासाठी किवा रोजच्या कामासाठी वापरले जात असावे.

पुढे ५५ ते ५७ पायऱ्या चढून किल्ल्याचे तिसरे दार ओलांडावे लागते या दरवाज्यावर काही कलात्मक कोरीव कामे केली आहेत जी पाहण्यासारखी आहेत तसेच या दरवाज्याच्या दोन्ही बाजूला हत्तीचे डोके कोरलेली आहेत. या दरवाज्यावर उजवीकडील भागामध्ये पारशी भाषेमध्ये कोरीव काम आहे तर डावीकडील भागामध्ये मराठी भाषेमध्ये कोरीव काम केलेले आहे.

तिसऱ्या दरवाज्यामधून आत गेल्यानंतर आपल्याला २ इमारतींचे अवशेष पाहायला मिळतात. त्यामधील एक इमारती मध्ये किल्ल्याचा सेनापती राहत होता. त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये भगवान रोहिदमल्ला आणि भैरोबा मंदिर पाहायला मिळते. या मंदिरा मध्ये हा भगवान गणेश, भैरोबा आणि भैरवी या मुर्त्या पाहायला मिळतात. या मदिरा समोर दीप माला आणि लहान पाण्याची टाकी आहे.

या किल्ल्याच्या दक्षिण पूर्व बाजूला बालेशन, दक्षिणेस पाटणे व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघजाई बुरुज, पूर्वेकडील फत्तेह बुरुज आणि अंगणातील बुरुज हे तटबंदीचे आच्छादन असलेले एकूण ६ बुरुज आहेत. या किल्ल्याच्या उत्तरेकडील भागावर कुंडांची मालिका आहे. भूगर्भातील पाण्याची टाकी, मानवी मूर्ती आणि भगवान शिवचे शिवलिंग अवशेष (शिवलिंग) येथे दिसतात.

ट्रेकिंगसाठी एक प्रसिध्द असणारा रोहीडा किल्ला – trekking 

रोहीडा किल्ला हा १ दिवसाचा ट्रेक किल्ला आहे आणि या किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून ३६०० फुट म्हणजे १०९७ मीटर इतकी आहे. हा एक छोटासा ट्रेक आहे आणि किल्ल्यावर जाण्यासाठी कमीत कमी एक तास लागतो. विचित्रगड किल्ल्याच्या ट्रेकसाठी मान्सूननंतरचा काळ हा सर्वोत्तम काळ आहे. रोहिदमल्ला मंदिर हे किल्ल्यात वसलेले मंदिर आहे त्याचबरोबर अनेक मूर्ती, पाण्याच्या टाक्या आणि बरेच काही शोधण्यासाठी किल्ल्यावर उपलब्ध आहेत. रोहिडा हा संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी एकूण ४ तास लागतात.

रोहीडा किल्ल्याचे पायथ्याशी असणारे गाव : बजरवाडी आणि चिखलावडे

रोहिडा किल्ला ट्रेक मार्ग अंतर : ३ किलो मीटर

रोहिदा ट्रेक कालावधी : किल्ला पाहण्यासाठी चार ते पाच तास लागतात

किल्ला चढाई श्रेणी : एकदम सोपी

रोहिडा ट्रेक एकूण चढाव : १६९७ फूट

बजरवाडी या पायथ्यापाशी असणाऱ्या गावापासुनाची किल्ल्याची उंची : २२४५ फुट

ट्रेकसाठी उत्तम काळ : पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये किल्ल्यांचे हवामान आनंदित असते.

रोहीडा किल्ला फोटो:

rohida fort history in marathi
rohida fort history in marathi

रोहीडा किल्ल्यावर कसे जायचे ? 

  • रेल्वेमार्गाने : पुणे इतर सर्व शहरांशी आणि रेल्वेने जोडलेले शहर आहे. त्यामुळे आपण पुणे या शहरामध्ये रेल्वे ने येवू शकता आणि तेथून बजरवाडीला जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेऊ शकतो पुणे ते बजरवाडी यामधील अंतर ७३ कि.मी. इतके आहे.
  • हवाईमार्गाने: रोहिडा किल्ल्याचे सर्वात जवळचे विमानतळ पुण्यामध्ये सुमारे ७७ कि.मी. अंतरावर आहे. एकदा तुम्ही पुण्यात पोहोचल्यावर किल्ल्यावर थेट टॅक्सी भाड्याने घेऊन बजरवाडी या गावाला जावू शकतो.
  • रस्ता मार्गे : रोहिडा या किल्ल्याला आपण पुण्यातून बसने देखील जावू शकतो.
  • नक्की वाचा: अंबर किल्ल्याची माहिती

टीप

  • रोहिडा हा किल्ला पाहण्यासाठी एकूण ४ तास लागतात.
  • रोहिडा या किल्ल्यावर जरी पाणीसाठा असला तरी तेथील पाणी पिण्यायोग्य नसते त्यामुळे आपण सोबत पिण्याचे पाणी घेवून गेले तर चांगले त्याचबरोबर सोबत खाण्यासाठी स्नॅक्स देखील घेतले तर चालतील.
  • हा किल्ला पाहण्यासाठी कोणताही शुल्क घेतला जात नाही पण जर तुम्ही या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी येत असाल तर ट्रेकिंग पॅकेज उपलब्द असतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, रोहिडा किल्ला rohida fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. rohida fort history in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about rohida fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही रोहिडा किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या rohida killa chi mahiti माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!