history of gondhali samaj in marathi गोंधळी समाजाचा इतिहास आज आपण या लेखामध्ये गोंधळी समाज आणि त्यांच्या इतिहासाविषयी माहिती घेणार आहोत. गोंधळी समाज म्हणजे मध्य प्रांत आणि बेरारमध्ये आढळणाऱ्या भटक्यांची आणि संगीतकारांची जात म्हणजे गोंधळी समाज. गोंधळी यांचा धर्म हा गोंधळी धर्म आहे आणि गोंधळी समाजातील लोक हे गोंधळ, पोवाडे आणि वासुदेव यांच्यातून जनजागृती करतात तसेच काही लोकांच्या घरामध्ये लग्न झाल्यानंतर अंबाबाईचा किंवा जगदंबेचा गोंधळ घालतात आणि तो गोंधळ घालण्यासाठी गोंधळी समाजातील लोकांना बोलवावे लागते.
गोंधळी समाजातील लोक हे जगदंबा देवीला आपले आराध्य दैवत मानतात आणि तिची पूजा करतात. हि जात जरी सध्या संपूर्ण भारतभर पसरली असली तरी हि जात मोठ्या प्रमाणात हैद्राबाद आणि वऱ्हाड मध्यप्रांत या भागातून आली आहे. गोंधळी समाजामध्ये मराठा, माने कुणबी, खैरे कुणबी, महार, तेली, मांग, देशकर आणि विदुर हे होते. समाज म्हणजे महाराष्ट्रामध्ये हे लोक विधीनाट्यप्रकार करतात. गोंधळी समाजामध्ये रेणूराई आणि कदमराई ह्या दोन जाती आहे आणि या दोन्हीही जाती भिक्षुकी आहेत.
गोंधळी हे संभळ आणि आणि जगदंबा मातीची गाणी म्हणत म्हणत आणि सांभाळ वाजवत गल्ली बोलातून भिक्षा मागत फिरतात. संभळ हे लहान आकाराचे एक पितळीच्या धातूपासून बनलेले एक छोटेसे एक वाद्य आहे. या जातीतील मुख्य कलावंत जे असतात ते घोळ आकाराचा अंगरखा परिधान करतात तसेच गळ्यामध्ये कवड्याच्या माळा घालून भिक्षुकी करतात. चला तर आता आपण गोंधळी सामाज्याविषयी आणखीन माहिती खाली घेवूया.
गोंधळी समाजाचा इतिहास – History of Gondhali Samaj in Marathi
गोंधळी म्हणजे कोण आहेत ?
मध्य प्रांत आणि बेरारमध्ये आढळणाऱ्या भटक्यांची आणि संगीतकारांची जात म्हणजे गोंधळी समाज. गोंधळी यांचा धर्म हा गोंधळी धर्म आहे आणि गोंधळी समाजातील लोक हे गोंधळ, पोवाडे आणि वासुदेव यांच्यातून जनजागृती करतात.
गोंधळातील कलावंत
गोंधळ हे अनेकवेळा घातले जातात तसेच भारतामध्ये काही लोकांच्या घरामध्ये लग्न झाल्यानंतर जगदंबा आईचा गोंधळ घालण्याची पध्दत असते आणि हा गोंधळ गोंधळी समाजाने घालायला असतो आणि गोंधळ घालताना त्यामध्ये १० ते ११ कलावंत असतात आणि त्यामधील मुख्य कलावंताने घोळ या प्रकारचे कपडे परिधान केलेले असतात आणि त्यांनी गळ्यामध्ये कवड्याची माळ घातलेली असते.
गोंधळ घालण्यासाठी गोंधळी लोक संभळ, तुणतुणे, दिमटी, मंजिरा हि वाद्ये वापरली जातात. या कलेमध्ये पाच पांडव, श्री कृष्ण, कुंती, कर्ण द्रौपदी या सारखी पात्रे असतात.
गोंधळासाठी पूजा कशी केली जाते ?
गोंधळामध्ये पूजा हि जगदंबा मातेची केली जाते आणि या देवीचा चौक भरला जातो. चौरंग किंवा पथावर तांदळाची रास काढली जाते आणि चौकावर सुपारी, खारीक खोबरे हळकुंड आणि लेकुरवाळे आणि पाच कोणावर पाच पानविड्यांच्यासह मांडणी केली जाते. तसेच चौरंगाच्या किंवा पटाच्या भोवती पाच उसाचे वाडे उभे करावे.
तसेच चौरंगाच्या मध्यभागी तांब्याचा कलश ठेवतात आणि कलशातील पाण्यामध्ये पैसा सुपारी ठेवतात आणि मग त्यामध्ये आंब्याची पाने घालतात आणि त्यावर एक नारळ ठेवतात तसेच त्या कलशाला एक दागिना देखील घातला जातो. या मांडणीची फुले आणि हळदी कुंकू वाहून पूजा केली जाते तसेच पुरणपोळीचा नैवैद्य दाखवला जातो आणि मग रात्रभर जगदंबा मातेचा जागर आणि गोंधळ केला जातो अश्या प्रकारे गोंधळ पूजा केली जाते.
गोंधळी समाजाचा इतिहास – gondhali samaj history in marathi
१२४० मध्ये काल्ल्यानीचा राजा मुम्मदि सोमेश्वर याने आपल्या राजधानीमध्ये आपल्या भव्यतेसाठी गोंडाळे हे नृत्य केले आणि त्यामध्ये त्याने काही सुधारणा त्याला चित्रा गोंधळी असे नाव देण्यात आले आणि हे चित्रा गोंधळी हे नृत्य हे आजच्या काळातील गोंधळी नृत्याचे प्रमुख स्वरूप असावे असे अनेक विद्वानांचे मत असावे असे म्हटले जाते.
६ व्या किंवा ७ व्या शतकामध्ये कदंबामध्ये गोंधळ केला जात होता. जेंव्हा वंशाचे राज्यकर्ते हे तुळजा भवानीचे भक्त होते त्यावेळी तेंव्हाच्या नोंदीवरून असे दिसून. यादवकालीन वाड्मयातही गोंधळी या शब्दाचा उल्लेख आढळतो.
गोंधळी समाजाविषयी काही प्रश्न
गोंधळामध्ये वापरली जाणारी वाद्ये ?
गोंधळ घालण्यासाठी गोंधळामध्ये वापरली जाणारी वाद्ये म्हणजे संभळ, तुणतुणे, दिमटी, मंजिरा हि वाद्ये वापरली जातात.
गोंधळ का केला जातो ?
विशेषता देवीचा सन नवरात्रीला जागरण हा उपासनेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. गोंधळ घालण्याच्या उद्देश हा आहे कि परम्यात्माला पृथ्वीवर अवतरण्यासाठी भाग पाडणे आणि मानवी अताम्याला पवित्र करणे तसेच सर्व भ्रष्टता आणि दुर्गुणांच्यापासून मुक्त होणे.
गोंधळ नृत्य म्हणजे काय ?
गोंधळ हे रेणुका आणि भवानी या सारख्या देवतांना समर्पित विधीचा एक भाग म्हणून म्हणून पौराणिक कथा आणि लोक कथांचे वर्णन आहे आणि देवतांच्या समोर गाणे आणि नृत्य करणे हे गोंधळी समाज्यातील सदस्य करतात.
गोंधळ काय आहे ?
गोंधळी हा महाराष्ट्रातील एक समुदाय आहे आणि सिध्दीनंतर मनात किंवा कसं या सारख्या पौराणिक कारणासाठी महाराष्ट्रातील देवी देवतांची गाणी गाणे हा त्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांची गाणी हि त्यांच्या देवांच्या पौराणिक कथा असतात.
गोंधळी समाज कोणत्या देवतेला आराध्य दैवत मानतात ?
गोंधळी समाज हे जगदंबा मातेला आपले आराध्य दैवत मानतात आणि ते ज्यावेळी भिक्षा मागताना त्यांच्या आराध्य देवाची गाणी म्हणतात आणि हि गाणी म्हणजे त्यांच्या देवांच्या पौराणिक कथा असतात.
आम्ही दिलेल्या history of gondhali samaj in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर गोंधळी समाजाचा इतिहास माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या gondhali samaj history in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट