धनेश (हॉर्नबिल) पक्षी माहिती Hornbill Bird Information in Marathi

Hornbill Bird Information in Marathi हॉर्नबिल (hornbill dhanesh bird) या पक्ष्याला मराठीमध्ये ‘धनेश’ पक्षी म्हणतात त्याचबरोबर या पक्ष्याला गरुड धनेश पक्षी किवा मलबारी धनेश पक्षी या नावांनीही ओळखले जाते. धनेश हे पक्षी भारत, आफ्रिका, आग्नेय आशियातील सुमात्रा बेटावर आणि आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. धनेश हा पक्षी बुसेरोटीडा या कुटुंबातील असून या पक्ष्याच्या जवळ जवळ ६० प्रजाती आहेत.

धनेश या पक्ष्याचे वर्णन करायचे म्हंटले तर सामन्यता हा पक्षी रूढ पंख, बारीक मान, लांब शेपूट, तपकिरी आणि काळ्या रंगाचा पिसारा आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. या पक्षी आकाराने ४० ते १६० सेंटी मीटर असतो. धनेश या पक्ष्याची खासियत म्हणजे या पक्ष्याची चोच हि खूप मजबूत आणि आक्रमक असते आणि ती प्राण्यांच्या शिंगासारखी बळकट असते. धनेश या पक्ष्याची चोच हि या पक्ष्याची ओळख आहे आणि हि चोच थोडी खाली वाळलेली असते आणि त्याच्या मानेशी जोडलेली असते आणि डोक्यावरती पिवळसर लाल रंगाचे मुकुट असल्यासारखा रंग असतो त्यामुळे या पक्ष्याला आपण सहज पणे ओळखू शकतो.

hornbill bird information in marathi
hornbill bird information in marathi / dhanesh bird

धनेश पक्षी माहिती – Hornbill Bird Information in Marathi

नावधनेश, गरुड धनेश पक्षी किवा मलबारी धनेश पक्षी
कुळबुसेरोटीडा
शास्त्रीय नावऑसिसेरॉस बायरोस्ट्रीम
लांबी४० ते १६० सेंटी मीटर
वजन४ किलो
आयुष्य१८ ते २० वर्ष

धनेश हे पक्षी कुठे व कसे राहतात ( habitat )

धनेश हे पक्षी भारत, आफ्रिका, आग्नेय आशियातील सुमात्रा बेटावर आणि आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात आणि या पक्ष्यांना उष्ण कटिबंधात राहणे खूप आवडते. हा पक्षी आपले घरटे बनवण्यासाठी मोठी झाडे निवडतात आणि शक्यतो झाडांच्या ढोलीमध्ये आपले घरटे बनवतात आणि ते पुरपणे चिखलाने बंद करतात फक्त पिल्लांसाठी अन्न देण्या इतपत मोकळे सोडतात.

धनेश पक्ष्याचा आहार ( food )

धनेश हा पक्षी सर्वभक्षी आहे आणि या पक्ष्याचा आवडता आहार छोटे प्राणी आणि फळे हा आहे त्याचबरोबर हे पक्षी बिया, किडे आणि अळ्या या प्रकारचे अन्न हि खातात.

धनेश पक्ष्याचे विविध प्रकार ( types of hornbill bird )

धनेश या पक्ष्याच्या जवळ जवळ ६० प्रजाती आहेत आणि प्रत्येक जातीचा धनेश पक्षी वेगवेगळ्या आकाराचा, वेगवेगळ्या रंगाचा आणि वेगवेगळी वैशिष्ठ्ये असणाणारे अनेक धनेश पक्षी जगभरामध्ये आढळतात. त्यामधील काही प्रकार खाली स्पष्ट केले आहेत.

 • ग्रेट धनेश पक्षी (great hornbill bird)

ग्रेट धनेश हा पक्षी धनेश पक्षी कुळातील सर्वात मोठा पक्षी आहे आणि या पक्ष्याला कॉनकेव्ह कॉनकीव्ड धनेश किवा ग्रेट इंडियन धनेश पक्षी या नावांनीही ओळखले जाते आणि हे पक्षी भारत नेपाळ आणि भूतान मध्ये आढळतात. हे पक्षी पिंजऱ्यामध्ये ४५ ते ५० वर्ष जगू शकतात. या पक्ष्याचे वजन २ ते ४ किलो असते आणि लांबी ९० ते १३० सेंटी मीटर असते आणि पंखांची लांबी १५० सेंटी मीटर असते.

 • इंडियन ग्रे धनेश पक्षी (indian grey hornbill)

इंडियन ग्रे धनेश पक्षी हा पूर्णपणे राखाडी रंगाचा असतो आणि या पक्ष्यावर साधारण काळ्या रंगाचा शेड असतो. या पक्ष्याच्या दोन्ही डोळ्याभोवती आणि अर्ध्या चोचीवर काळा रंग असतो. इंडियन ग्रे धनेश पक्षी एक सर्वसामान्य पक्षी आहे जो बहुतेकदा भारतामध्ये सर्व भागामध्ये आढळतो. या पक्ष्याची लांबी ६० सेंटी मीटर असते.

 • मालाबार ग्रे धनेश पक्षी (malabar grey hornbill bird )

मालाबार ग्रे धनेश पक्षी हा भारतामध्ये दक्षिण आणि पश्चिम घाटामध्ये आढळतो. या पक्ष्यांची चोच इतर पक्ष्यांपेक्षा आकाराने मोठी आहे परंतु या पक्ष्यान इतर जातींसारखे कॉस्क नाही. हे पक्षी शक्यतो लहान गटामध्ये किवा जोडीने फिरतात. या पक्ष्यांची चोच लांब आणि थोडी वक्र असते आणि पिवळ्या तपकिरी रंगाची असते आणि हा पक्षी पूर्णपणे गडद राखाडी रंगाचा असतो. या पक्ष्याची लांबी ४५ ते ६० सेंटी मीटर असते.

 • रुफौस धनेश पक्षी ( rufous hornbill )

रुफौस धनेश पक्षी धनेश पक्ष्याला फिल्लीपपाईन धनेश पक्षी या नावानेही ओळखले जाते. हि एक उपप्रजाती आहे आणि या पक्ष्याची चोच लाल रंगाची असते चेहरा काळ्या रंगाचा असतो, मानेवर केसाळ तपकिरी रंगाचे आवरण असते आणि चोचीच्या खाली थोडा पिवळसर रंग असतो. पंख फिकट काळ्या रंगाचे असतात आणि शेपूर क्रीम कलरची असते आणि पायालाही तपकिरी रंगाचे केसाळ आवरण असते.

 • ओरीयन्टल पाईड धनेश पक्षी ( oriental pied hornbill )

ओरीयन्टल पाईड धनेश पक्षी हा सर्वात लहान आणि सामान्य जात आहे जी दक्षिण आशिया मध्ये आढळते. नर पक्ष्याचे वजन ६५० ग्रॅम ते १०००ग्रॅम इतके असते. ओरीयन्टल पाईड धनेश पक्ष्याला सुन्दा पाईड धनेश पक्षी किवा मलयसीयन पाईड धनेश पक्षी या नावांनीही ओळखले जाते.

धनेश या पक्ष्याविषयी काही तथ्ये ( facts of hornbill bird )

 • मादा धनेश पक्षी एका वेळी २ ते ६ अंडी देतात आणि ती अंडी घरट्यामध्ये सुरक्षित ठेवतात. आणि अंड्यामधून या पक्ष्याची पिल्ले ३० ते 40 दिवसांनी बाहेर येतात.
 • धनेश या पक्ष्यांना थव्यामध्ये राहायला आवडते.
 • हे तुम्हाला माहित आहे का कि हे पक्षी २००० फुट उंच उडू शकतात.
 • धनेश या पक्ष्याचे आयुष्य १८ ते २० वर्ष इतके असते.
 • धनेश हे पक्षी भारतामध्ये हिमालयामध्ये दक्षिण किवा पश्चिम पर्वत क्षेत्रामध्ये आढळतात.
 • मादा धनेश पक्षी नर धनेश पक्ष्यापेक्षा छोटा असतो आणि मादा पक्ष्याचे डोळे निळ्या पांढऱ्या रंगाचे असतात आणि नर पक्ष्याचे डोळे लाल रंगाचे असतात.
 • या पक्ष्यांना त्यांच्या चोचीचा उपयोग शिकार करण्यासाठी आणि झाडाला छिद्र पाडण्यासाठी होतो.
 • धनेश पक्षी दिवसभर सक्रीय असतात आणि रात्री आराम करतात.
 • या पक्ष्याच्या काही जाती माणसांना घाबरत नाहीत आणि काही जाती माणसांना घाबरतात.
 • धनेश हा पक्षी अरुणाचल प्रदेश आणि केरळचा राज्य पक्षी आहे.
 • नक्की वाचा: गरुड पक्षाची माहिती 

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा (हॉर्नबिल) धनेश पक्षी hornbill bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. hornbill information in marathi for project हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about hornbill bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही धनेश पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या hornbill bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!