दयाळ (रॉबिन) पक्षाची माहिती  Robin Bird Information in Marathi

Robin Bird Information in Marathi जवळ जवळ चिमणी सारखा दिसणारा ‘दयाळ’ हा पक्षी भारतामध्ये आणि आशिया खंडामध्ये आढळतो. या पक्ष्याची खासियत म्हणजे या पक्ष्याचा सुरेख आवाज हा पक्षी एखादी सुंदर शिळ घातल्यासारखा आवाज काढतो आणि दयाळ हा पक्षी वसंत ऋतू सुरु होणार असेल तर आपल्या गोड गळ्याने सर्वाना आला वसंत असे सांगतो असे म्हंटले जाते. भारतीय दयाळ Indian Robin हा पक्षी भारत, भूतान, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान मध्ये हा पक्षी विपुल प्रमाणात आढळतो.

उत्तर भागामध्ये आढळणाऱ्या पक्ष्याची पाठ तपकिरी रंगाची असते आणि दक्षिणेमध्ये आढळणाऱ्या दयाळ पक्ष्याची पाठ काळ्या रंगाची असते. हा पक्षी बुलबुल पक्ष्याच्या आकाराचा असतो आणि दिसायल चिमणीसारखा असतो पण या पक्ष्याची शेपू थोडी लांब असते. नर आणि मादी दोघे एकसारखेच असतात पण नर पक्षी काळ्या रंगाचा असतो आणि मादी पक्षी खोल राखी रंगाचा असतो. 

indian robin bird information in marathi
indian robin bird information in marathi / robin bird in india

दयाळ (रॉबिन) पक्षाची माहिती – Robin Bird Information in Marathi

नावदयाळ, डोमिंग आणि चीरक
शास्त्रीय नावकॉप्सिकस सॉलॅरीस
रंगकाळा किवा तपकिरी
लांबी२४ ते २७ सेंटी मीटर
वजन७० ते ७५ ग्रॅम
आयुष्य १३ ते १४ वर्ष

दयाळ हे पक्षी कुठे राहतात ( habitat )

भारतीय दयाळ हा पक्षी भारत, भूतान, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांमध्ये आढळतात. दयाळ हे पक्षी शक्यतो झाडांच्या खुल्या भागात आढळतात आणि हे पक्षी या झाडावरून त्या झाडावर सारख्या उड्या मारत असतात आणि दयाळ पक्षी झुडूपांमध्ये राहतात तसेच दयाळ हे पक्षी आपले घरटे घरांच्या छिद्रांमध्ये किवा झाडांवर बनवतात आणि शक्यतो मादा दयाळ पक्षी घरटे बनवण्याचे काम करतात.

दयाळ पक्ष्याचा आहार ( food )

दयाळ हे पक्षी बोरे, बेरी, बिया तसेच छोटे कीटक, अळ्या, नाकतोडे आणि गांडूळ या प्रकारचा आहार हे पक्षी खातात.

दयाळ पक्ष्याचे विविध प्रकार ( types of robin )

दयाळ या पक्ष्याच्या जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक जाती आढळतात जसे कि इंडिअन रॉबिन, अमेरिकन रॉबिन, युरोपियन रॉबिन, माउंटेन रॉबिन, पॅसिफीक रॉबिन, स्कारर्लेट रॉबिन, ब्लॅक रॉबिन या सारखे कितीतरी पराक्र आहेत. खाली दयाळ या पक्ष्याचे काही प्रकार दिले आहेत.

इंडिअन रॉबिन – Robin Bird in India

इंडिअन रॉबिन या पक्ष्याला भारतामध्ये दयाळ या नावाने ओळखले जाते. भारतीय दयाळ हा पक्षी भारत, भूतान, श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान या देशांमध्ये आढळतात. दयाळ हे पक्षी आपले घरटे घरांच्या छिद्रांमध्ये किवा झाडांवर बनवतात आणि हा पक्षी बोरे, बेरी, बिया तसेच छोटे कीटक, अळ्या, नाकतोडे आणि गांडूळ या प्रकारचा आहार खातात. या पक्ष्याची लांबी २४ ते २७ सेंटी मीटर असते आणि वजन ७० ते ७५ ग्रॅम इतके असते.

ब्लॅक रॉबिन ( black robin )

ब्लॅक रॉबिन पक्ष्याला चठम इजलँड रॉबिन या नावानेही ओळखले जाते. हा पक्षी चीमानीच्या आकाराचा असतो आणि दिसायला चिमणी सारखाच असतो या पक्ष्याचे शरीर चिमणी सारखे गोलाकार असते. या पक्ष्याचा रंग काळ्या रंगाचा सातो आणि या पक्ष्याच्या पंखावर तपकिरी रंगाचा शेड असतो आणि या पक्ष्याचे पाय फिकट गुलाबी रंगाचे असतात. हे पक्षी न्यूझीलंड मध्ये आढळतात.

अमेरिकन रॉबिन ( american robin )

अमेरिकन रॉबिन किवा उत्तर अमेरिकन रॉबिन हा पक्षी एक स्थलांतरित पक्षी आहे आणि या पक्ष्याकडे उत्तम गायकीचे वैशिष्ठ आहे. हे पक्षी उत्तर अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. हे पक्षी हिवाळ्यामध्ये कॅनडा, फ्लोरिडा आणि मेक्सिको या देशांमध्ये आढळतात. या पक्ष्याची लांबी २३ ते २८ सेन्तीमितर असते आणि वजन ७५ ग्रॅम असते.. हा पक्षी जवळ जवळ साळुंखी सारखा असतो. या पक्ष्याचे डोके ते मानेपर्यंत काळा रंग असतो आणि घाश्यावर पांढऱ्या रंगाच्या छोट्या छोट्या पट्ट्या असतात. या पक्ष्याची चोच पिवळ्या रंगाची असते तसेच या पक्ष्याची छाती आणि पोटाकडील भाग तपकिरी रंगाचा असतो आणि पंख काळ्या आणि राखाडी रंगाचे असतात.

माउंटेन रॉबिन ( mountain robin )

माउंटेन रॉबिन हा पक्षी उंच पर्वतामध्ये आढळतात हा पक्षी मेक्सिको आणि पनामा या देशांमध्ये वास करतात. मेक्सिको मधील उत्तर दक्षिण भागातील ओएक्सा आणि चियापास भागामध्ये आढळतात. माउंटेन रॉबिन हा पक्ष्याची लांबी २२ ते २६ सेन्तीमितर इतकी असते आणि या पक्ष्यांचे वजन ८६ ग्रॅम इतके असते. या पक्ष्याचे पंख गडद पिवळट हिरव्या रंगाचे असतात आणि पुढचा भाग साधारण पिवळसर रंगाचा असतो चोच थोडी लांब आणि या पक्ष्याचा आकार थोडा गोलाकार असतो. हे पक्षी बिया, बेरीज आणि इतर फळे खातात.

फ्लेम रॉबिन ( flame robin )

फ्लेम रॉबिन पक्ष्याला फ्लेम ब्रेंस्टेड रॉबिन असेही म्हणतात. नर फ्लेम रॉबिन पक्ष्याचा वरचा भाग हा काळा असतो आणि या पक्ष्याचा घसा, छाती आणि पोट लालसर रंगाची असते, चोच काळ्या रंगाची असते, शेपूट लांब असते. नर आणि मादी दिसायला वेगवेगळे असतात. या पक्ष्याची लांबी १२ ते १४ सेंटी मीटर असते. फ्लेम रॉबिन या प्रकारचे पक्षी ऑस्ट्रोलिया मध्ये आढळतात. हे पक्षी किडे, अळ्या आणि झाडाची पणे या प्रकारचे अन्न खातात.

युरोपियन रॉबिन ( european robin )

युरोपियन रॉबिन पक्ष्याचे तपकिरी डोके आणि मागचा भाग नारंगी, लाल स्तन, फिकट गुलाबी पोट, लहान शेपूट आणि लांब पाय असे या पक्ष्याचे वर्णन आहे. युरोपियन रॉबिन हे स्थलांतरित पक्षी आहेत. युरोपियन रॉबिन या पक्ष्याची लांबी २.५ ते 13 सेंटी मीटर असते.

दयाळ पक्ष्याविषयी तथ्ये ( facts of robin bird ) (robin bird information in marathi)

  • दयाळ हा पक्षी ताशी १७७ किलो मीटर अंतर उडून पार करतात.
  • जगामध्ये जितके दयाळ पक्ष्याच्या जाती आहेत त्या सर्व जातींमध्ये गायीकीची वैशिष्ठ्ये आहेत.
  • रॉबिन ( दयाळ ) हा पक्षी ब्रिटन या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि या पक्ष्याला १९६० मध्ये ब्रिटनचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले.
  • या पक्ष्याच्या मुख्य प्रजाती म्हणजे आफ्रिकन दयाळ, युरोपियन दयाळ, ऑस्ट्रोलीयन दयाळ आणि अमेरिकन ह्या चार प्रजाती आहेत.
  • मादा दयाळ पक्षी एका वेळी ४ ते ५ अंडी घालते आणि अंडी उबवण्याचे काम हे फक्त मादा पक्ष्याचे असते आणि नर पक्ष्याचे काम अन्न शोधून आनणे एवढेच असते.
  • २० व्या शतकात रॉबिन ( दयाळ ) ह्या पक्ष्याला रेडब्रेस्ट म्हणून ओळखले जात होते.
  • रॉबिन ( दयाळ ) हा पक्षी थ्रश या कुटुंबातील सदस्य आहे.

दयाळ या पक्ष्याची महाराष्ट्रातील वेगवेगळी नावे 

महाराष्ट्रामध्ये दयाळ या पक्ष्याला वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते आणि या पक्ष्याची काही वेगवेगळी नावे खाली दिली आहेत.

नावभाग
दयाळ, खापऱ्या चोर ( नर दयाळ )पुणे
दहीगोल ( नर दयाळ )चंद्रपूर
सुईन ( मादी दयाळ )चंद्रपूर
काळचिडी ( नर दयाळ )नाशिक
मडवळ ( नर दयाळ )सिंधुदुर्ग
डोमिंग ( नर दयाळ )पुणे
सुई ( नर दयाळ )भंडारा

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा दयाळ पक्षी robin bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. indian robin bird information in marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about robin bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही दयाळ पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या robin bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!