गरुड पक्षाबद्दल माहिती Eagle Information In Marathi

eagle information in marathi आकाशामध्ये उंचच उंच, आणि आपली भलेमोठे पंख पसरून विहार करणार्‍या  पक्षाला आपण पाहिले असेलच. कधी तो पक्षी ससाणा असतो किंवा गरुड, घारही असते. पण आज आपण गरुड या पक्षा बद्दल माहिती पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो या सदरात आपण गरुड पक्षाची रचना, त्याचा अधिवास, त्याचे महत्त्व याबद्दल जाणून घेणार आहोत. (eagle bird in marathi)           

eagle-information-in-marathi
Eagle Information In Marathi

गरुडा ची रचना आणि त्याचा अधिवास! (structure of the eagle and its habitat!)(eagle information in marathi)

जसे सिंह हा प्राण्यांचा राजा आहे असेच गरुडाला पक्षांचा राजा असे म्हटले जाते. गरुड हा साप, इतर पक्षी, मासे यांना खातो त्यामुळे याला शिकारी पक्षी असेही संबोधले जाते. गरुड हा प्राणी या वर्गात मोडतो तसेच तो पाठीचा मनका असलेल्या प्राण्यांच्या उपगटात मोडतो. गरुडाच्या एकूण 60 प्रजाती आहेत. ज्या युरेशिया आणि आफ्रिकी या भागात आढळतात. 60 पैकी 14 प्रजाती आत्ता दिसून आल्या आहेत. त्या 14 पैकी दोन ह्या उत्तर अमेरिका नऊ मध्य आणि दक्षिण अमेरिका आणि तीन ऑस्ट्रेलिया मध्ये आढळतात.

गरुडाचे पंख हे मोठे आणि बलशाली असतात. त्याचे डोके आणि चोच ही अगदी मजबूत असते. अगदी लहान गरुड सुद्धा मोठ्या पंखाचे असतात. आणि अगदी व्यवस्थित समान आकाराचे रुंद पंख असतात.पंखांच्या वायू गतिकीय पिसांचा आकार हा कमी असतो,ज्यामुळे सरळ आणि अगदी वेगात उड्डाण करू शकतो. लहान प्रजाती या दक्षिण निकोबार सरपंट गरुड ओळखले जातात. त्यांचे वजन 450 ग्रॅम असून लांबी 40 सेंटीमीटर पर्यंत असते.

मोठ्या आकाराच्या गरुड यांना आकड्या सारखी मोठी चोच असते ज्यामुळे ते शिकार केलेल्या प्राण्यांचे मांस अगदी ओरबाडून खाऊ शकतात. त्यांचे पाय मजबूत स्नायूंचे बनलेले असतात. पायांची नखे ही अगदी मजबूत असतात. त्याचबरोबर गरुडाचे डोळे ही अतिशय तीक्ष्ण असतात. गरुडाची डोळे माणसाच्या डोळ्याच्या दुप्पट सक्षम असतात. त्यांची अचूकता ही मानवी डोळ्यापेक्षा 3 ते  3.6 पटीने जास्त असते. आशा डोळ्याने गरुड आपली शिकार अगदी दूरवरून सुद्धा टिपू शकते. डोळ्यातील मोठ्या घराच्या मुळांमुळे डोळ्यांमध्ये येणाऱ्या प्रकाशाची दिशा बदलत नाही. मादी ही नरापेक्षा आकाराने मोठी असते. गरुड आपले घरटे उंच उंच झाडांवर किंवा मोठ्या उंचीवर बांधतात. गरुड एका वेळी दोन अंडी देतात. पक्ष्यांच्या अन्नसाखळी मध्ये गरुड हा सगळ्यात वरचा घटक मानला जातो.

कबुतर पक्षाची माहिती 

गरुडाचे प्रकार! (Types of eagles!)(eagle in marathi)

गरुडांची वेगवेगळ्या प्रजाती या वेगवेगळे अन्न खातात ,वेगवेगळे भक्ष पकडतात, त्यांची शिकार ही वेगळी असते आणि त्याच्यावरून सुद्धा त्यांचे प्रकार पडली आहेत. गरुडांची चार प्रकार आहेत. मत्स्य गरुड, बुटेड गरुड , सर्प गरुड ,हरपी गरुड . याबरोबरच बाल्ड गरुड ,सोनेरी गरुड, लाल शेपटीचा गरुड ,असेही काही गरुडाचे प्रकार आहेत.

मत्स्य गरुड

मत्स्य गरुड नावाप्रमाणेच त्यांचे खाद्य हे मासा असते.

बुटेड गरुड (Booted eagle) (Bald Eagle Information in Marathi)      

बूटेड गरुड म्हणजे याचे पाय पिसांनी भरलेले असतात. त्यामुळे तिचे पाय बुट घातला सारखे दिसतात.

सर्प गरुड  (Serpent eagle Information in Marathi)      

सर्प गरुड हा हे नावाप्रमाणेच सरपटणाऱ्या प्राण्यांची शिकार करतो आणि सर्पांना खाद्य म्हणून वापरतो.

हरपी गरुड  (Harpy Eagle Information in Marathi)      

हरपी गरुड म्हणजे हे आकाराने अगदी विशाल आणि प्रचंड मोठे असतात. हे गरुड उष्णकटिबंधीय जंगलांमध्ये आढळतात तसेच हरपी गरुडाच्या दोन ते सहा प्रजाती अस्तित्वात आहेत. त्या मध्य आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतात.

फिलिपाईन ईगल  (Philippine Eagle Information in Marathi)      

फिलिपाईन ईगल हे सर्पगरुडाशीच संबंधित असलेला प्रकार आहे. फिलिपाईन ईगल नावाप्रमाणेच फिलिपाईन्समध्ये आढळतात.

निर्जन गरुड

त्यानंतर निर्जन गरुड म्हणजेच त्याला इंग्लिश मध्ये आपण सोलीतरी ईगल म्हणतो. हे गरुड डोक्यावर मुकुट असल्यासारखे दिसतात त्यामुळे ह्यांना क्राउन इगल असे म्हणतात आणि हे दक्षिण अमेरिकेमध्ये आढळतात.

बाल्ड ईगल  (Bald Eagle Information in Marathi)      

  • बाल्ड ईगल हे 20 वर्ष आणि क्राऊन ईगल हे 14 वर्ष जगतात. आपण त्यांच्या वजनाच्या दृष्टीने पाहिले तर बाल्ड ईगल याचे वजन 3 ते 6.3 किलोग्राम ,गोल्डन ईगल याचे वजन 3 ते 7 किलो ग्राम आणि हर्पी ईगल याचे वजन 6 ते 9 किलोग्राम इतक असते.
  • वेगाच्या दृष्टिकोनातून पाहिले तर बाल्ड ईगल याचा वेग ताशी 120 ते 160 किलोमीटर, गोल्डन ईगल याचा वेग ताशी 320 किलोमीटर, आणि लाल शेपटीचा गरुड याचा वेग ताशी 190 किलोमीटर इतका असतो.
  • पंखाचा लांबीच्या दृष्टिकोनातून पाहिले तर बाल्ड इगल हा 1.8 ते 2.3 मीटर इतका, गोल्डन ईगल हा 1.8 ते 2.3 मीटर आणि स्टेलर सी ईगल हा दोन ते 2.5 मीटर पंखांची लांबी दर्शवतो.
  • संपूर्ण शरीराचा लांबीच्या दृष्टीने पाहिले तर गोल्डन ईगल हा 66 ते 100 सेंटीमीटर लांब हरपी ईगल हा 99 सेंटीमीटर लांब आणि स्टेलर सी ईगल हा 85 ते 100 सेंटीमीटर लांब असतो.

चिमणीची माहिती 

गरुड पक्षाचे महत्व आणि विशिष्ट माहिती! (Importance of Eagle Bird and specific information!)(information about eagle in marathi)

  • गरुड या पक्षाचे पारंपरिक सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्वही तितकेच आहे. सोमेरियन पौराणिक कथेनुसार पौराणिक राजा येताना हा गरुडावर स्वर्गात गेला होता.
  • तसेच त्यानुसार गरुड हा सूर्याकडे अगदी थेट पाहू शकणारा पक्षी होता असे मानले जायचे. प्राचीन ग्रीक देवता झेऊस याचा आश्रयदाता प्राणी म्हणून गरुडाला संबोधले जायचे.अमेरिकेमध्ये आपल्या वस्त्रांवर गरुडाचे परिधान करण्यासाठी एक विशिष्ट कायदा आहे. पेरू या देशातील मॉच नावाची जमात की गरुडांची आजही पूजा करते. ऑस्ट्रिया या देशात गरुडाला कॉट ऑफ अर्मस ओळखले जाते. रोमन साम्राज्य मध्ये गरुडाला एक पवित्र स्थान आहे.
  • इतर सर्व देशांत प्रमाणे भारतात हि गरुड या पक्षाचे अगदी धार्मिक महत्त्व आहे. आपल्याला माहीतच आहे विष्णु या देवाचे वाहन गरूड आहे.
  • गरुड हा पक्षी एका वेळी दोन अंडी घालतो. दोन अंडी पैकी जर एखादे अंडी हे मादीचे असले तर ते आकाराने मोठे असते. आणि मादी पिल्लू हे अंडे फोडून लवकर बाहेर येते. बाहेर आल्यानंतर ते दुसऱ्या अंड्याला फोडून टाकते.त्यामुळे दुसऱ्या अंड्यातून पिल्लू बाहेर येऊ शकत नाही कारण की ती आधीच पहिल्या पिलानी फोडलेले असते. आणि मादी पिल्लू च्या क्रियेला पालक नर मादी गरूड अजिबात विरोध करत नाहीत.

पफ्फिन पक्षी माहिती 

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा गरुड पक्षी कसा आहे त्याची रचना व त्याचे जीवन कसे आहे. eagle information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच eagle bird information in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही गरुड या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!