इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध Iccha Tithe Marg Essay in Marathi

Iccha Tithe Marg Essay in Marathi – Where There is a Will There’s a Way Essay in Marathi इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध आज आपण या लेखामध्ये इच्छा तिथे मार्ग (iccha tithe marg essay) या विषयावर निबंध लिहिणार आहोत. असे म्हणतात कि जर आपल्याला काही करण्याची इच्छा असेल तर आपल्याला ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग देखील सापडतोच म्हणजेच मला असे म्हणायचे आहे कि इच्छा तिथे मार्ग हा असतोच. जर आपल्याकडे कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण करण्यासाठी जरी मार्ग नसेल किंवा एखाद्या व्यक्तीला मार्ग सापडत नसेल तर त्या व्यक्तीने आपल्या मार्ग शोधून काढून त्यासाठी प्रयत्न, परिश्रम, कष्ट, सहनशीलता, समर्पण भाव या सारख्या गोष्टी असणे खूप गरजेचे असते कारण त्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

आपण जर असे म्हणून बसलो कि इच्छा तिथे मार्ग असतोच पण फक्त असे म्हणून देखील चालत नाही तर आपल्याला मार्ग शोधावा लागतो. जगामध्ये असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्य काही न काही इच्छा असतातच आणि त्यामधील काही इच्छा ह्या इतक्या सहजपणे पूर्ण होतात तर काही इच्छा पूर्ण होण्यासाठी खूप अडचणी येतात आणि त्यावेळी मनुष्याला आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक मार्ग पूर्ण करावे लागतात तसेच अनेक अडचणींच्या मधून मार्ग काढावे लागतात आणि मग आपली इच्छा पूर्ण करावी लागते.

Iccha Tithe Marg Essay in Marathi
Iccha Tithe Marg Essay in Marathi

इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध – Iccha Tithe Marg Essay in Marathi

Where There is a Will There’s a Way Essay in Marathi

इच्छा हि अशी गोष्ट आहे जी फक्त आपल्या मनामध्ये बाळगणे गरजेचे नाही तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला कष्ट घेणे गरजेचे असते किंवा एखाद्या व्यक्तीने दृढ निर्णय घेवून ती पूर्ण करण्यासाठी हालचाल केली असली पाहिजे ज्यामुळे ती पूर्ण होण्याची शक्यता वाढते आणि जर एखाद्या व्यक्तीने जर मनामध्ये फक्त इच्छा बाळगली तर तो इच्छा पूर्ण होत नाही त्या व्यक्तीची ती इच्छा आयुष्यभर तशीच राहते ती पूर्ण होऊ शकत नाही कारण इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावे लागतात जेणेकरून इच्छा पूर्ण होईल.

इच्छा तिथे मार्ग असतोच हे माझ्या आयुष्यामध्ये किती वेळा सिध्द झाले आहे कारण मी काही छोट्या मोठ्या इच्छा व्यक्त केल्या आणि माझ्या त्या इच्छा अनेक मार्गाने पूर्ण देखील झाल्या त्यामुळे मला असे वाटते कि आपली इच्छा असली कि तेथे ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग देखील तयार असतोच त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने मागे न हटता आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट आणि परिश्रम हे घेतले पाहिजेत ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील.

जर एकाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट हवी असेल तर त्या व्यक्तीला ती एकाजागी बसून मिळू शकत नाही किंवा मग त्या व्यक्तीने फक्त ती मला मिळणार आहे असे म्हणून देखील मिळत नाही तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीने प्रयत्न करावे लागतात आणि मार्ग शोधावा लागतो. इच्छा म्हणजे जी आपण एखादी साधी इच्छा बाळगतो अशी इच्छा नव्हे तर अशी इच्छा ज्यामुळे आपल्या जीवानासाठी उपयोगी ठरेल अशी इच्छा जसे कि जर मला उच्च शिक्षण घ्यायचे असल्यास मी असे म्हणून फक्त बसून राहू शकत नाही.

तर मला त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील जसे कि मला शाळेमध्ये चांगला अभ्यास करून परीक्षा देवून परीक्षेमध्ये चांगले मार्क पाडले पाहिजेत आणि मग तेथून पुढील शिक्षणासाठी चांगला मार्ग शोधून पुढच्या शिक्षणासाठी आपला प्रवेश निश्चित केला पाहिजे आणि मग त्याठिकाणी देखील मला अभ्यास केला पाहिजे आणि चांगले गुण मिलावाण्यासाठू कष्ट घेतले पाहिजेत आणि ते देखील शिक्षण पूर्ण केले पाहिजे आणि उच्च शिक्षण घेण्यसाठी देखील मला कष्ट करून शिक्षण पूर्ण केले पाहिजे अश्या प्रकारे आपल्याला कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आणि आपली इच्छा पूर्ण करावी लागते.

इच्छा असेल तर ती पूर्ण होते हे आपण आता पुढे दिलेल्या उदाहरणा वरून बघू शकतो. शिष्य एकलव्य आणि गुरु द्रोणाचार्य यांच्याविषयाची कथा हि कोणाला माहित नाही तर हि कथा सर्वांना नाहीत आहे आणि ज्यामध्ये एकलव्याला गुरु द्रोनाचार्यायांच्या कडून धनुर्विद्या शिकायची होती आणि म्हणून शिष्य एकलव्य याने गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे जाऊन धनुर्विद्या शिकवण्यासाठी मागणी केली परंतु गुरु द्रोणाचार्य यांनी एकलव्य याला धनुर्विद्या शिकवण्यासाठी नकार दिला.

पण एकलव्याने आपली जिद्द हरली नाही कारण त्याला द्रोणाचार्यांच्या कडूनच धनुर्विद्या शिकायची होती म्हणून त्यांने एके ठिकाणी जंगलामध्ये गुरु दद्रोणाचार्यांचा पुतळा उभा केला आणि ज्यावेळी गुरु द्रोणाचार्य इतर शिष्यांना शिकवत होते त्यावेळी त्याने चोरून धनुर्विद्या शिकली आणि तो त्यांच्या पुतळ्या समोर धनुर्विद्येचा सराव करू लागला आणि अश्या प्रकारे त्याने आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग काढला आणि आपली इच्छा पूर्ण केली आणि म्हणूनच म्हटले जाते कि इच्छा तिथे मार्ग हा असतोच.

असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांनी आपल्या लहान लहान वयामध्ये आपल्या इच्छा पूर्ण केल्या किंवा मोलाची कामगिरी केली. जसे कि संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजेच या वरून असे स्पष्ट होते कि इच्छा असेल तर सर्व काही शक्य आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक व्यक्तीने आयुष्याच्या मार्गावर चालताना कोणती न कोणती तरी इच्छा हि बाळगली पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पाहिजेच तसेच परिश्रम घेतले पाहिजेत आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी मार्ग देखील शोधले पाहिजे कारण इच्छा जिथे निर्माण झाली आहे तिथे मार्ग देखील अगदी सहजपणे सापडतो.

आम्ही दिलेल्या Iccha Tithe Marg Essay in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इच्छा तेथे मार्ग मराठी निबंध बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या where there is a will there’s a way essay in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि  माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!