इडली सांबर रेसिपी मराठी Idli Sambar Recipe in Marathi

Idli Sambar Recipe in Marathi इडली सांबर रेसिपी मराठी इडली सांबर हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो दक्षिण भारतामध्ये तसेच भारतातील इतर ठिकाणी देखील खूप लोकप्रिय आहे आणि सर्व ठिकाणी हा पदार्थ आहे लोक खूप आवडीने खातात. इडली आणि सांबर ह्या दोन वेगवेगळ्या डिश आहेत आणि ह्या दोन्ही डिश ह्या खूप वेगवेगळ्या पध्दतीने बनवल्या जातात. सांबर हा पदार्थ हे आमटीचा प्रकार आहे जो इडली सोबत खाण्यासाठी दिला जातो. इडली सांबर हे कॉम्बिनेशन भारतामध्ये खूप लोकांना आवडते आणि भारतामधील कित्येक स्वयंपाक घरामध्ये इडली सांबर हा पदार्थ अगदी आवडीने बनवला जातो आणि खाल्ला देखील जातो. आज आपण या लेखामध्ये इडली सांबर कसे बनवतात ते पाहूयात.

idli sambar recipe in marathi
idli sambar recipe in marathi

इडली सांबर रेसिपी मराठी – Idli Sambar Recipe in Marathi

 तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ४५ मिनिटे
पाककलादक्षिण भारतीय

इडली आणि सांबर ह्या डिश वेगवेगळ्या कश्या असतात ?

इडली हा पदार्थ तांदूळ आणि उडदाच्या डाळी पासून बनवला जातो. हा पदार्थ बनवते वेळी तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवली जाते आणि ती वाटून त्यामध्ये मीठ आणि इतर साहित्य घातले जाते.

आणि

सांबर हे तुरीच्या डाळी पासून बनवले जाते आणि सांबर बनवण्यासाठी आपल्याला डाळ, शेवग्याच्या शेंगा, चीच, सांबर पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ हे साहित्य लागते आणि हा एक पातळ आमटीचा प्रकार आहे.

इडली सांबर रेसिपी – idli sambar marathi recipe

इडली सांबर हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे जो त्या भागामध्ये तसेच संपूर्ण भारतामध्ये आवडीने खाल्ला जातो. इडली आणि सांबर ह्या दोन्ही वेगवेगळ्या ( चवीला आणि दिसायला ) डिश आहेत. इडली हि एक मुख्य डिश आहे आणि सांबर हि डिश आपण एक साईड डिश म्हणून सर्व्ह करतो. आता आपण इडली रेसिपी आणि सांबर रेसिपी या दोन्ही रेसिपी पाहणार आहोत. 

इडली सांबर बनवण्यासाठी लागणारा वेळ ( दोन्ही डिश ४५ मिनिटामध्ये बनतात ) :

 तयारीसाठी लागणारा वेळ२० मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ२५ मिनिटे
एकूण लागणारा वेळ४५ मिनिटे
पाककलादक्षिण भारतीय

इडली रेसिपी – idli recipe in marathi 

इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make idli 

इडली बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही आणि जे साहित्य लागते ते घरामध्ये सहजपणे उपलब्द असते. इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्याची यादी खाली दिलेली आहे.

  • ३ वाटी तांदूळ.
  • १ वाटी उडदाची डाळ.
  • १/४ खायचा सोडा.
  • दीड चमचा मीठ.
  • तेल ( आवश्यकतेनुसार ).

इडली बनवण्यासाठी केली जाणारी कृती – instructions to make idli recipe 

  • आत्ता आपण इडली बनवण्यासाठी काय करावे लागते. तांदूळ आणि डाळीचे मिश्रण किती वेळ भिजवावे ते वाटल्यानंतर किती वेळ भिजवावे आणि त्याला कसे वाफवावे या सर्व प्रक्रीयेबद्दल माहिती घेणार आहोत.
  • सर्वप्रथम ३ वाटी तांदूळ आणि १ वाटी डाळ चांगली निवडून घ्या आणि मग पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • मग एक खोल भांडे घ्या आणि त्यामध्ये धुतलेले तांदूळ आणि डाळ घाला आणि त्यामध्ये ६ वाटी पाणी घाला आणि त्यावर झाकण ठेवून ते ६ ते ७ तास भिजवा.
  • सहा ते सात तासानंतर भिजवलेल्या मिश्रनामधील जास्त झालेले पाणी काढून घ्या आणि ते मिक्सर वर फिरवून त्याचे बारीक पीठ/ बॅटर करून घ्या ( सर्व तांदळाच्या आणि डाळीच्या मिश्रणाचे बॅटर करा .
  • मग हे तांदळाचे आणि डाळीचे बॅटर ४ ते ५ भिजवून ठेवा त्यामुळे पीठ चांगले फसफसून येईल आणी आपल्या इडल्या हलक्या आणि मऊ बनतील.
  • ४ ते ५ तासांनी पिठामध्ये खायचा सोडा आणि मीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर इडली पात्र घेवून त्यामध्ये पाणी घाला आणि इडली पात्राच्या प्लेट्सला तेल लावून घ्या आणि त्यामध्ये पीठ घाला आणि त्या प्लेट्स इडली पात्रामध्ये ठेवून त्यावर पत्राचे झाकण घाला.
  • आणि ते मोठ्या आचेवर उकडण्यासाठी ठेवा आणि ते ६ ते ७ मिनिटे वाफवून घ्या. ६ ते ७ मिनिटांनी इडली पात्र उघडून इडलीमध्ये सुरी किंवा चमच्या घालून पहा जर सुरीला किंवा चमच्याला पीठ लागले तर ते आणि थोडा वेळ उकडा आणि जर पीठ लागले नसेल तर त्या चांगल्या उकडल्या असतील.
  • इडल्या उकडल्या असतील तर गॅस बंद करा आणि त्यामधील इडलीच्या प्लेट्स काढून घ्या आणि त्यामधील इडल्या चमच्याने काढून घ्या.
  • राहिलेल्या बॅटरच्या इडल्या वाफवण्यासाठी हीच प्रक्रिया वापरा.
  • तुमच्या मऊ, लुसलुशीत आणि हलक्या इडल्या तयार झाल्या.

सांबर रेसिपी – how to make idli sambar recipe in marathi

सांबर बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make sambar 

सांबर हा पदार्थ अगदी सोप्या पध्दतीने बनवला जातो आणि हा पदार्थ बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही जे सहजा सहजी बाजारामध्ये मिळू शकत नाही. सांबर बनवण्यासाठी आपल्याला डाळ, चीच, सांबर पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ हे महत्वाचे साहित्य लागते. खाली आपण सांबर बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ वाटी तुरडाळ.
  • २ चमचे सांबर मसाला पावडर.
  • १ मोठा टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
  • २ मोठे कांदे ( बारीक चिरलेले ).
  • २ शेवग्याच्या शेंगा ( तुकडे ).
  • १ चमचा आलं लसून पेस्ट.
  • २ चमचे चिंच कोळ.
  • १/४ चमचा हिंग.
  • १/२ चमचा हळद.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १ चमचा मोहरी.
  • १/२ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • २ मोठे चमचे तेल.

सांबर बनवण्यासाठी केली जाणारी कृती – instructions to make sambar recipe 

सांबर बनवण्याची केली जाणारी कृती खूप सोपी असते. आत्ता आपण सांबर बनवण्यासाठी केली जाणारी कृती पाहूयात.

  • सांबर बनवताना सर्वप्रथम तुरडाळ घ्या आणि ती स्वच्छ निवडून घेवून ती चांगल्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्या.
  • मग स्वच्छ धुतलेली डाळ कुकरमध्ये घाला आणि त्यामध्ये २ ते अडीच वाटी घालून त्याचे झाकण घालून तो कुकर गॅसवर मध्यम आचेवर ठेवून त्याला चार ते पाच शिट्या द्या त्यामुळे डाळ चांगली आणि मऊ शिजण्यासा मदत होईल.
  • चार ते पाच शिट्या झाल्यानंतर गॅस बंद करा आणि थोडा वेळ ( १० ते १५ मिनिटे ) कुकर झाकण न उघडता तसेच ठेवा त्यामुळे डाळ चांगली शिजेल.
  • आता एक कढई घ्या आणि ती मध्यम आचेवर गरम करण्यास ठेवा आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा एकदा तेल गरम झाले कि त्यामध्ये मोहरी टाका आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये लगेच हिंग, आलं लसून आणि कांदा घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घाला आणि ते चांगले भाजून त्याच्यावर झाकण घालून ते २ ते ३ मिनिटे शिजवून घ्या आणि मग त्यावरील झाकण कडून त्यामध्ये शेवग्याच्या शेंगा घाला आणि ते चांगले भाजून घ्या.
  • मग त्यामध्ये चिंचेचा कोळ, लाल तिखट, हळद, सांबर पावडर आणि मीठ ( चवीनुसार ) आणि ते चांगले मिक्स करा आणि थोडा वेळ ते चांगले मिक्स करत रहा.
  • मग त्यामध्ये शिजवलेली डाळ घाला आणि ते सर्व मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि जर डाळ घातल्यानंतर ते खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडेसे पाणी घाला आणि ते एक ७ ते ८ मिनिटे मध्यम आचेवर चांगले शिजवा.
  • मग त्या सांबर वर कोथिंबीर टाका आणि तुमचे सांबर इडली, डोसा किंवा मेदु वडा सोबत खाण्यासाठी तयार झाले.

आम्ही दिलेल्या idli sambar recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर इडली सांबर रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या idli sambar recipe in marathi by madhura या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि idli sambar chutney recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये idli sambar marathi recipe Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!